(दाराआडचा यजमान)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 7:59 pm

एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो
किती बाहेर?
दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार
जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा ....
असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ?
येत असेल का तो ही
आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे?
यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
(पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते)
मग तो कल्पनेचे पंख पसरतो,
त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन
यजमान शांतपणे खुष राहतो....
दूरदेशी लेकरे आपल्याच जगात
पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...
भेटतच राहतात....
(यजमान पुन्हा एकदा ताजातवाना होतो नव्या स्वप्नांसाठी )
..

मुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरसनाट्यमुक्तक

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2019 - 1:12 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .....
बिचार्‍या यजमानाची कुचंबण !

मग तो कल्पनेचे पंख पसरतो,
त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन
यजमान शांतपणे खुष राहतो....
दूरदेशी लेकरे आपल्याच जगात
पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात...
भेटतच राहतात....

हे सुरेखच !

यशोधरा's picture

27 Apr 2019 - 1:43 pm | यशोधरा

हाच भाग मलाही आवडला.

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2019 - 12:47 pm | चौथा कोनाडा

+१

.... आणि याच परिच्छेदातले कंसातले च (च) "भिवविती संध्याछाया"ची आठवण देऊन उदासवाणं करून जातात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Apr 2019 - 2:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

या दारा आड अजून काय काय दडले आहे कोण जाणे?
पैजारबुवा

नाखु's picture

27 Apr 2019 - 3:08 pm | नाखु

कुठलीही दारं (मनाची आणि जनांची) उघडी नसल्याने,दारामागे अंमळ गर्दी जमली आहे.

दाराच्या दोन्ही बाजूंचा अभ्यंगत पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जे पैंबू काकांचं मत आहे तेच माझेही आहे .. काय काय लिहिलं जाणार आहे ते तो वरचाच जाणे .... आणि हो कविता आवडली गेलीय हे वेगळे सांगायला नको ..