फोटो ओळखा 2

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
14 Mar 2019 - 7:59 pm

संदर्भ -
Photo Olkha 1

नमस्कार.

मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.

काही सोपे नियम -

एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

31 Mar 2019 - 8:32 am | गोरगावलेकर

@चौकटराजा
मी पाहिलेही एकदा सांगितले होते कि प्रश्नातच उत्तर आहे म्हणून.
फोटो टाकताना फोटोचे नाव बदलण्याची काळजी घ्या. जसे कि आता "बेलूर" आहे.

चौकटराजा's picture

31 Mar 2019 - 8:38 am | चौकटराजा

फोटोत बेलूर असा उल्लेख आहे ?

गोरगावलेकर's picture

31 Mar 2019 - 9:09 am | गोरगावलेकर

फोटोवर उजवी टिचकी मारून फोटो "Save as" करायला गेलो की फाईलच्या मूळ नावानेच फोटो सेव्ह करायचा का विचारले जाते.
मलाही नाही कळत या गोष्टी. पण मुलगी सांगते कधी कधी समजावून. फोटो अपलोड करायला तिनेच शिकवले.
बाकी जाणकार सांगतीलच व्यवस्थित.

तुषार काळभोर's picture

31 Mar 2019 - 11:50 am | तुषार काळभोर

E

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2019 - 2:31 pm | चौथा कोनाडा

मातृमंदिर, अरोव्हिले, पॉण्डिचेरी.
लैच फेमस लँडमार्क, हा फोटो बराच सुप्रसिद्ध आहे.
(सोपा प्रश्न दिल्याबद्दल थॅन्क यू, पैलवान )

मातृमंदिरच्या काही रोचक गोष्टी:
१. अरबिंदो आश्रमाच्या माता मिररा अल्फास्सा (फ्रेंच भारतीय) यांच्या अध्यात्मिक अनुभूतीतून साकार
२. बांधावयला ३७ वर्षे लागली
३. सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या १२ सोनेरी पाकळ्या
४. जीओ डेसिक या प्रकारातील भौमितीक गोलाकार
५. प्रकाशीय दृष्ट्या परिपूर्ण अशी खुप मोठी काच या गोलाच्या वार बसवलेली आहे ज्यामुळे गोलाच्या अंतर्भागात विशेष असे अध्यात्मिक क्षेत्र तयार होते. या क्षेत्रात जर ध्यान धारणा करायची असेल तर बरीच फी आहे आणि वेटिंग देखील चिकार.

आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. जाणकार जास्त प्रकाश टाकू शकतील.

खंडेराव's picture

31 Mar 2019 - 10:38 pm | खंडेराव

फक्त पाचवा पॉईंट चुकीचा आहे. मी मागील वर्षी जवळ जवळ 2 तास आत होतो, कुठेही एक रुपयाही लागला नाही. तुम्हाला एक दिवस आधी येऊन नोंदणी करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊन अंतर्भागात जाऊ शकता.

त्या बारा पाकळ्या मधेही ध्यानाच्या खोल्या आहेत..बाकी आत जायचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा..

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2019 - 1:55 pm | चौथा कोनाडा

अचूक माहितीसाठी धन्यवाद , खंडेराव !
मी त्या आधी एक वर्ष गेलो होतो. चेन्नईअच्या सहकार्‍यानं असं सांगितलं होतं, त्यामुळे आणि हाताशी वेळ कमी असल्यामुळं बाकी चौकशी करण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो

बाकी पाकळ्याच्या आतला अनुभव भारी असणार. त्या बद्दल आणखी वाचायला आवडेल.
ध्यानधारणा गृहाचा हा असला प्रकार आपल्या संस्कृतीत वाचल्याचं मलातरी आठवत नाही.

खंडेराव's picture

1 Apr 2019 - 3:48 pm | खंडेराव

त्यांच्या अधिकृत साईट वरून माहिती घेऊन गेलो होतो. https://www.auroville.org/contents/252
२ दिवस सलग जावे लागले पण आत जायचा अनुभव अगदी अप्रतिम होता.

एखाद्या साय फाय सिनेमा मध्ये प्रवेश केला असे वाटते. आतला भाग हा पूर्ण स्वच्छ पांढरा आहे आणि तुम्हाला त्यांनी दिलेले पांढरे मोजे घालूनच जावे लागते. आत मध्ये पायऱ्या आहेत आणि त्यांनी वरच्या इंनेर चेंबर मध्ये आपण पोहोचतो, तिथे पांढऱ्या रंगाच्या कुशन वर ध्यान लावता येते. जर पॉण्ड्यचेरी मध्ये २-३ दिवस मिळत असतील तर हे केलेच पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2019 - 12:57 pm | चौथा कोनाडा

वाह, भारी महिती खंडेराव. त्यांची साईट पहिली. उत्तम माहिती आहे.
वनाराजीतून प्रवास करत मातृमंदिर व्ह्यूऊजिंग पॉईंट इथून मातृमंदिर बाहेरून पाहण्याचा अनुभव देखील खूप सुंदर होता.

अश्या वातावरणात दोन तीन दिवस काढणे काय सुंदर अनुभव असेल !

हे अरोव्हिले एकदम इनोवेटीव प्रकरण आहे. तुम्हाला हवे ते काम तुम्ही करु शकता फक्त पगार तेव्हडा सर्वाना समान जेमतेम १२ की १५ हजार... अर्थात तरीही तुम्हाला ईथे खायला प्यायला रहायला एकदम उत्क्रुश्ट मिळेलच. इथे ध्यान सोडुन कसलेही देवपुजन नाही, नो गॉड, नो रिलीजन, नो पोलिटिक्स. अत्यंत इंटरेस्टींग प्रकरण आहे. आम्ही वेटींगवरच होतो पण कोवीड सुरु झाला.

चौथा कोनाडा's picture

1 May 2021 - 1:39 pm | चौथा कोनाडा

गॉडजिला साहेब, येईल की योग आगामी काळात !
अनुभव लिहायला विसरु नकात.

प्रसाद_१९८२'s picture

31 Mar 2019 - 2:45 pm | प्रसाद_१९८२

12

प्रचेतस's picture

31 Mar 2019 - 3:18 pm | प्रचेतस

मलंगगड

गोरगावलेकर's picture

1 Apr 2019 - 11:04 pm | गोरगावलेकर

हा ओळखा

शैली उत्तरेकडील मंदिरांशी मिळतीजुळती आहे. बहुधा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड.

गोरगावलेकर's picture

2 Apr 2019 - 10:24 am | गोरगावलेकर

व्वा! शैलीहून बांधलेला अंदाज बरोबरच. दोन्हीपैकी एक राज्य निश्चित .

अनिंद्य's picture

2 Apr 2019 - 2:12 pm | अनिंद्य

बहुतेक चंबा - हिमाचल

गोरगावलेकर's picture

2 Apr 2019 - 2:53 pm | गोरगावलेकर

नाही

तुषार काळभोर's picture

2 Apr 2019 - 3:26 pm | तुषार काळभोर

सूर्यमंदिर, कातरमल/कटरमल

गोरगावलेकर's picture

2 Apr 2019 - 4:12 pm | गोरगावलेकर

अगदी बरोबर.
सूर्य मंदिर, कटारमल, अलमोरा, उत्तराखंड
मुख्य मंदिर व आजूबाजूने 44 मंदिरे असा समूह आहे.

गोरगावलेकर's picture

5 Apr 2019 - 3:53 pm | गोरगावलेकर

ओळखा. एक भुताळी गांव.

गोरगावलेकर's picture

13 Apr 2019 - 11:19 am | गोरगावलेकर

मला वाटते हे ठिकाण ओळखता येत नसावे किंवा या धाग्यावरचा उत्साह संपला असावा.
त्यामुळे मीच उत्तर देते निदान दुसऱ्या कोणाला फोटो ओळखण्यासाठी द्यायचा असेल तर देऊ शकेल.
ठिकाण : कुलधरा , जेसलमेर, राजस्थान
साधारण २०० वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मणाची वस्ती असलेल्या या गावातून सर्व लोक एका रात्रीत अजाणत्या जागी निघून गेले. तेव्हापासून हे गाव ओसाड पडले आहे.
गाव सोडण्याबद्दल रोचक कथाही सांगितली जाते. येथे भूत/पिशाच्चं असल्याचा भास अनेकांना झाल्याने परत येथे वस्ती झालेली नाही असाही समज आहे.
याला पर्यटन स्थळ घोषित करून राजस्थान पर्यटन मंडळाने जपणूक व विकास कामे सुरु केली आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Apr 2019 - 6:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

मला असे वाटते की नाना पाटेकर आणि करिष्मा कपुरच्या शक्ती द पॉवर या सिनेमातला काही भागाचे इथे शुटिंग झाले होते.
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

15 Apr 2019 - 1:05 pm | अनिंद्य

गोरगावलेकर's picture

15 Apr 2019 - 1:45 pm | गोरगावलेकर

छान आहे फोटो. पण जरा शोधलं तर लगेच सापडतो आहे.

गोरगावलेकर's picture

15 Apr 2019 - 2:31 pm | गोरगावलेकर

चहरगडना, चणीपा, चठवणीचीसा चकीटा, चयपूरज

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Apr 2019 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

चगलगु चशारहु चहेआ चहे चन्यचमा चहेआ.
चणप चलात्या चचारुनवि चकडेइ चत्तरउ चहिण्यातलि चयका चशीलहा चहेआ?
चनेज्या चया चगांनाजा चत्यक्षप्र चटभे चलीदि चहेआ चच्यात्या चडूनक चजूनअ चहितीमा चळालीमि, चजी चगलगु चरव चपलब्धउ चहीना, चरत चधिकअ चनंदआ चईलहो.
चजारबुवापै

गोरगावलेकर's picture

15 Apr 2019 - 4:20 pm | गोरगावलेकर

चपलेआ चरोबरब चहेआ चणप चत्यक्षप्र चऊनजा चल्यानेचआ चत्तरउ
चगायचेसां चहेआ चका?
चपलेआ चमका चटोफो चळखण्याचेओ. चत्तरउ चरोबरब चसेलअ चरत
चत्यक्षप्र चऊनजा चलेल्यांनीआ चधिकअ चहितीमा चगावीसां.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2019 - 5:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

च्चच्चच्च ! =))

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2019 - 10:49 pm | चौथा कोनाडा

बाबौ ......

अनिंद्य's picture

16 Apr 2019 - 9:33 am | अनिंद्य

इतक्यांदा 'च च' बघून फोटोबद्दल कोणी चकार शब्द बोलले नाही असे म्हणायची सोय राहिली नाही :-)

फोटो - नाहरगढ किल्ला जयपूर येथील पाणी साठवणुकीच्या तळ्याचाच आहे. मला तो पायऱ्यांचा पॅटर्न फार आवडला.

निशाचर's picture

17 Apr 2019 - 3:09 am | निशाचर

पायर्‍या खरंच सुंदर आहेत. टेकडीचा आकार आणि दगडाच्या स्तरांचा योग्य वापर केलेला दिसतोय. असममिती आवडली.

प्रसाद_१९८२'s picture

26 Apr 2019 - 7:23 am | प्रसाद_१९८२

1

अभ्या..'s picture

26 Apr 2019 - 10:23 am | अभ्या..

प्रसाद फोटो दिसत नाहीये

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2019 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस नाही. प्रथम पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन, मग त्याचा इमेज अ‍ॅड्रेस वापरून, तो इथे परत टाकला तर दिसू शकेल.

प्रसाद_१९८२'s picture

27 Apr 2019 - 8:04 am | प्रसाद_१९८२

1
---

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2019 - 1:00 pm | चौथा कोनाडा

बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू) येथील ओळक्कणेश्वरा हे शिवाचं मंदिर ?
(हे महिषासूर मर्दिनी मंडप मंदिर असा सार्वत्रिक गैरसमज आहे)
याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे !

गोरगावलेकर's picture

27 Apr 2019 - 1:54 pm | गोरगावलेकर

ज्या खडकात महिषासूर मर्दिनी मंडपाच्या गुफा आहेत अगदी त्यावरच ओळक्कानेश्वर मंदिर असल्याने असा गैरसमज होत असेल.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2019 - 1:10 pm | चौथा कोनाडा

बरोबर.

प्रसाद_१९८२'s picture

29 Apr 2019 - 4:12 pm | प्रसाद_१९८२

बरोबर ओळखलेय !
----
याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे !
--
या वरिल फोटोतील मंदिरातून घेतलेला दिपगृहाचा हा फोटो.

--
--
1

दिपगृहाच्या फोटो दिसला नाही.

चौथा कोनाडा's picture

7 May 2019 - 12:28 pm | चौथा कोनाडा

नाही दिसत आहे फोटो, प्रसाद_१९८२ !

प्रसाद_१९८२'s picture

7 May 2019 - 3:18 pm | प्रसाद_१९८२

1

चौथा कोनाडा's picture

8 May 2019 - 4:58 pm | चौथा कोनाडा

आता दिसला ! सुंदर फोटो आहे !
सौम्य प्रकाशात भारी टिपलाय.
हा परिसर जादुई आहे.

अनिंद्य's picture

6 May 2019 - 1:38 pm | अनिंद्य

दीपगृहाचा * फोटो असे वाचावे.

अनिंद्य's picture

6 May 2019 - 1:43 pm | अनिंद्य

टीप :- फोटो मी काढलेला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2019 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

ISKCON Chandrodaya Temple

अनिंद्य's picture

7 May 2019 - 10:47 am | अनिंद्य

हरे रामा हरे कृष्णा !
बरोबर.
मायापुर, पश्चिम बंगाल.

तुषार काळभोर's picture

8 May 2019 - 9:29 pm | तुषार काळभोर

E

अनिंद्य's picture

3 Jun 2019 - 1:51 pm | अनिंद्य

अरे हा धागा का सुस्त ?

रचनेवरून बंगाल / आसाम भागातील वाटते आहे. अशी मंदिरे मी हरिपूर (बंगाल) आणि शिवसागर (आसाम) मध्ये बघितली आहेत, पण हे नक्की कुठले ते सांगा आता पैलवान.

गोरगावलेकर's picture

29 Jul 2019 - 2:46 pm | गोरगावलेकर

पश्चिम बंगालमधील विष्णुपूर येथील टेराकोटा रचना व पंचरत्न शैलीतील "शामराई मंदिर " असावे.
टेराकोटा -भाजलेली माती /वीटा
पंचरत्न शैली - पाच शिखर असलेली

अनिंद्य's picture

31 Jul 2019 - 1:38 pm | अनिंद्य

@ पैलवान,
गोरगावलेकर म्हणतात तसे 'शामराई' मंदिरच आहे का ?

तेच आहे.

गोरगावलेकर's picture

2 Jan 2021 - 10:16 pm | गोरगावलेकर

ओळखा हे भव्य शिल्प कोणत्या देवतेचे आहे , कुठे आहे आणि या ठिकाणची महती काय?
(फोटो क्रॉप केला आहे. मुद्दामच पूर्ण फोटो दिलेला नाही )

प्रचेतस's picture

3 Jan 2021 - 6:31 am | प्रचेतस

शिव - भैरव स्वरूपात. डाव्या हातात कपाल धारण केले आहे तर उजव्या हातात फूल वाटते आहे. कपालाच्या बाजूस शिवलिंग दिसते आहे.
ठिकाण माहीत नाही पण उत्तर भारतीय नागर शैली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा ओरिसा.

गोरगावलेकर's picture

4 Jan 2021 - 9:30 am | गोरगावलेकर

निरीक्षण अचूक. तरीही मूर्ती कुठल्या देवतेची या बाबतीतला अंदाज करणे केवळ अशक्य. गुगलल्याशिवाय सांगणे कठीण किंवा प्रत्यक्ष जाऊन आलेले लोकच सांगू शकतील.
उद्यापर्यंत वाट पाहून उत्तर देईन

नक्की सांगा, हा भैरव नसल्यास कुबेर असू शकतो पण शिवाचेच रुप आहे बहुधा.

गोरगावलेकर's picture

4 Jan 2021 - 10:02 am | गोरगावलेकर

शंकराचा या जागेशी निश्चित संबंध आहे पण हे शिवाचे रूप नाही

गोरगावलेकर's picture

5 Jan 2021 - 12:34 am | गोरगावलेकर

आधी हा पूर्ण फोटो

हे शिल्प देवी पार्वतीचे आहे. (मी स्वत: सहमत नाही. कारण कुठल्याच अंगाने हि स्त्रीची प्रतिमा वाटत नाही)
ठिकाण: बैजनाथ, उत्तराखंड.
अशी वंदता आहे की भगवान शंकर व पार्वतीचा विवाह येथेच म्हणजे गोमती व गरुडगंगा नदीच्या संगमावर संपन्न झाला होता.
जालावर बऱ्याच ठिकाणी शिल्पाचा उल्लेख पार्वती असाच केला आहे .

पार्वतीच्या शिल्पाविषयी येथे वाचायला मिळते पण फोटो नाही.

आम्ही २०१५ ला या मंदिरास भेट दिली तेव्हा हे शिल्प पहिले आहे. पण माहिती देणारी कोणतीही जाणकार व्यक्ती बरोबर नव्हती .
त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे/संग्राहालयात ठेवायची असल्या कारणाने ही मूर्ती भांडारागृहात बंदिस्त करण्यात आली आहे.
येथेही या मूर्तीचा पार्वती असाच संदर्भ आहे.
बातमी

फोटो ओळखण्यासाठी मी दिलेला असला तरी माझ्या उत्तरावर मीच ठाम नाही. प्रचतेस यांचेच म्हणणे बरोबर असावे.

निशाचर's picture

5 Jan 2021 - 4:25 am | निशाचर

खूप सुंदर फोटो आहे.

प्रचेतस's picture

5 Jan 2021 - 9:14 am | प्रचेतस

पार्वती शक्यच नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले असता मूर्तीचा जवळून दिसणारा फोटो आहे. हातातील कपाल तर स्पष्टच आहे, शेजारी त्रिशुळ दिसत आहेत. शिवाय स्त्री मूर्ती ही नाहीच. भैरवच हा.

गोरगावलेकर's picture

5 Jan 2021 - 12:35 am | गोरगावलेकर

मी माझे शब्द मागे घेते. हे शिल्प भैरवाचेच असावे.
गोंधळलेली गोरगावलेकर

प्रचेतस's picture

5 Jan 2021 - 9:32 am | प्रचेतस

फोटो ओळखा, लक्षणे सुस्पष्ट आहेत.

a

तुषार काळभोर's picture

5 Jan 2021 - 7:01 pm | तुषार काळभोर

हत्ती हे वाहन फक्त इंद्राचे आहे ना?
पण वज्र दिसत नाहीये.

हत्ती हे वाहन फक्त इंद्राचे आहे ना?

नाही, इतर देवतांचेही आहे :) वज्र नाहीये, पण इतर लक्षणे आहेत. ही देवता इंद्र नाही.

गामा पैलवान's picture

6 Jan 2021 - 3:58 am | गामा पैलवान

डाव्या हातात कमंडलू व उजव्या हातात जपमाळ आहे का? तसं असल्यास हा दत्त झाला बहुतेक.
-गा.पै.

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 6:15 am | प्रचेतस

नाही.

निशाचर's picture

6 Jan 2021 - 4:33 am | निशाचर

जपमाळ, कलश (सोमरस?) आणि वाहन हत्ती म्हणजे बृहस्पती. हत्तीने शेपटीने छान टेकू दिला आहे.

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 6:15 am | प्रचेतस

बृहस्पती पण नाही :)

चांदणे संदीप's picture

6 Jan 2021 - 2:22 pm | चांदणे संदीप

वरूणदेव.

सं - दी - प

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 5:17 pm | प्रचेतस

नाही.

हा कुबेर आहे. कुबेर हा मुख्यतः नरवाहन, पण मध्ययुगात त्याला हत्ती हे वाहनही चिकटले. कुबेर ओळखायचे प्रमुख लक्षण म्हणजे त्याच्या खांद्यावर असलेली धनाची पिशवी. कुबेराच्या काही शिल्पांत ह्या पिशवीचे तोंड मुंगसासारखे पण असते.

कपिलमुनी's picture

6 Jan 2021 - 3:55 pm | कपिलमुनी

जुन्या धाग्यतले फोटो टोका नये

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 5:17 pm | प्रचेतस

मुद्दामून तोच टाकला. त्या धाग्यात माझे वर्णन चुकलेले होते. :)

चांदणे संदीप's picture

6 Jan 2021 - 5:23 pm | चांदणे संदीप

लोल! =))
मी तेच केल. आधी तुमचे धागे चाळले.
अर्थात बरोबर म्हटल्यावरही सांगणारच होतो.

पण हे बरोबर नाही. हाच प्रश्न हॉटसीटवर एक करोडसाठी वगैरे असता तर केवढा मोठ्ठा पोपट झाला असता. :प
(तेवढं, धाग्यात बदलून घ्या)

सं - दी - प

प्रचेतस's picture

6 Jan 2021 - 5:40 pm | प्रचेतस

:)
धाग्यात बदलून घेतो :)

गोरगावलेकर's picture

5 Jan 2021 - 10:50 pm | गोरगावलेकर

हुश्श! सापडले एकदाचे. क्रमांक ४३ आणि त्यावरचा सुधारित उल्लेख.

लक्षणांहून मला नाही ओळखता येत. पण शोधाशोध करण्याच्या निमित्ताने काही नवीन माहिती मिळते त्यातच आनंद.

सुमेरिअन's picture

6 Jan 2021 - 10:46 pm | सुमेरिअन

Olakha pahu..

प्रचेतस's picture

7 Jan 2021 - 6:51 am | प्रचेतस

फोटो दिसत नाही

फोटो कुठला ते ओळखा

महाराष्ट्रातला निश्चित नाहीये.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Apr 2021 - 2:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा फोटो पाहून तिकोन्यावरचा चपेटदान मारुती आठवला, वासोट्यावर पण असाच एक मारुती आहे.
वरचा फोटो कुठला आहे ते माहिती नाही.
पैजारबुवा,

गोरगावलेकर's picture

1 May 2021 - 3:56 pm | गोरगावलेकर

३-४ दिवस झाले फोटो टाकून पण उत्तर आले नाही म्हणून मीच सांगते.
@प्रचेतस . निश्चितच हा फोटो महाराष्ट्रातील नाही.
@ ज्ञानोबाचे पैजार . तिकोना आणि वासोटा दोन्ही ठिकाणे पाहिलेली नाहीत.
फोटोतील ठिकाण ओळखणे विशेष कठीण नव्हते. आपल्यापैकी बरेच जण येथे जाऊन आलेले असतील.

मध्यप्रदेश व सातपुड्यातील हिल स्टेशन 'पंचमढी' येथील हा फोटो. येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'गुप्त महादेव'. भस्मासुराच्या भीतीने शंकर या गुंफेत लपले होते म्हणून हा गुप्त महादेव. साधारण ४० फुटाचा अतिशय चिंचोळा मार्ग असल्याने गुंफेत एका वेळी मोजकेच लोक जाऊ शकतात.
याच गुंफेच्या बाहेर हा मारुती आहे. याची स्थापना कधी झाली वगैरे माहिती मला मिळू शकली नाही .

प्रचेतस's picture

1 May 2021 - 4:42 pm | प्रचेतस

धन्यवाद माहितीबद्दल.
मारुतीची मूर्ती मात्र तुलनेने अलीकडची दिसतेय.