मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोटो ओळखा 2

खंडेराव · · भटकंती
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचने 126447 वाचनखूण प्रतिक्रिया 263

गोरगावलेकर Sun, 03/31/2019 - 08:32
@चौकटराजा मी पाहिलेही एकदा सांगितले होते कि प्रश्नातच उत्तर आहे म्हणून. फोटो टाकताना फोटोचे नाव बदलण्याची काळजी घ्या. जसे कि आता "बेलूर" आहे.

In reply to by चौकटराजा

गोरगावलेकर Sun, 03/31/2019 - 09:09
फोटोवर उजवी टिचकी मारून फोटो "Save as" करायला गेलो की फाईलच्या मूळ नावानेच फोटो सेव्ह करायचा का विचारले जाते. मलाही नाही कळत या गोष्टी. पण मुलगी सांगते कधी कधी समजावून. फोटो अपलोड करायला तिनेच शिकवले. बाकी जाणकार सांगतीलच व्यवस्थित.

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा Sun, 03/31/2019 - 14:31
मातृमंदिर, अरोव्हिले, पॉण्डिचेरी. लैच फेमस लँडमार्क, हा फोटो बराच सुप्रसिद्ध आहे. (सोपा प्रश्न दिल्याबद्दल थॅन्क यू, पैलवान ) मातृमंदिरच्या काही रोचक गोष्टी: १. अरबिंदो आश्रमाच्या माता मिररा अल्फास्सा (फ्रेंच भारतीय) यांच्या अध्यात्मिक अनुभूतीतून साकार २. बांधावयला ३७ वर्षे लागली ३. सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या १२ सोनेरी पाकळ्या ४. जीओ डेसिक या प्रकारातील भौमितीक गोलाकार ५. प्रकाशीय दृष्ट्या परिपूर्ण अशी खुप मोठी काच या गोलाच्या वार बसवलेली आहे ज्यामुळे गोलाच्या अंतर्भागात विशेष असे अध्यात्मिक क्षेत्र तयार होते. या क्षेत्रात जर ध्यान धारणा करायची असेल तर बरीच फी आहे आणि वेटिंग देखील चिकार. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. जाणकार जास्त प्रकाश टाकू शकतील.

In reply to by चौथा कोनाडा

खंडेराव Sun, 03/31/2019 - 22:38
फक्त पाचवा पॉईंट चुकीचा आहे. मी मागील वर्षी जवळ जवळ 2 तास आत होतो, कुठेही एक रुपयाही लागला नाही. तुम्हाला एक दिवस आधी येऊन नोंदणी करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊन अंतर्भागात जाऊ शकता. त्या बारा पाकळ्या मधेही ध्यानाच्या खोल्या आहेत..बाकी आत जायचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा..

In reply to by खंडेराव

चौथा कोनाडा Mon, 04/01/2019 - 13:55
अचूक माहितीसाठी धन्यवाद , खंडेराव ! मी त्या आधी एक वर्ष गेलो होतो. चेन्नईअच्या सहकार्‍यानं असं सांगितलं होतं, त्यामुळे आणि हाताशी वेळ कमी असल्यामुळं बाकी चौकशी करण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो बाकी पाकळ्याच्या आतला अनुभव भारी असणार. त्या बद्दल आणखी वाचायला आवडेल. ध्यानधारणा गृहाचा हा असला प्रकार आपल्या संस्कृतीत वाचल्याचं मलातरी आठवत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

खंडेराव Mon, 04/01/2019 - 15:48
त्यांच्या अधिकृत साईट वरून माहिती घेऊन गेलो होतो. https://www.auroville.org/contents/252 २ दिवस सलग जावे लागले पण आत जायचा अनुभव अगदी अप्रतिम होता. एखाद्या साय फाय सिनेमा मध्ये प्रवेश केला असे वाटते. आतला भाग हा पूर्ण स्वच्छ पांढरा आहे आणि तुम्हाला त्यांनी दिलेले पांढरे मोजे घालूनच जावे लागते. आत मध्ये पायऱ्या आहेत आणि त्यांनी वरच्या इंनेर चेंबर मध्ये आपण पोहोचतो, तिथे पांढऱ्या रंगाच्या कुशन वर ध्यान लावता येते. जर पॉण्ड्यचेरी मध्ये २-३ दिवस मिळत असतील तर हे केलेच पाहिजे.

In reply to by खंडेराव

चौथा कोनाडा Tue, 04/02/2019 - 12:57
वाह, भारी महिती खंडेराव. त्यांची साईट पहिली. उत्तम माहिती आहे. वनाराजीतून प्रवास करत मातृमंदिर व्ह्यूऊजिंग पॉईंट इथून मातृमंदिर बाहेरून पाहण्याचा अनुभव देखील खूप सुंदर होता. अश्या वातावरणात दोन तीन दिवस काढणे काय सुंदर अनुभव असेल !

In reply to by चौथा कोनाडा

गॉडजिला Tue, 04/27/2021 - 22:40
हे अरोव्हिले एकदम इनोवेटीव प्रकरण आहे. तुम्हाला हवे ते काम तुम्ही करु शकता फक्त पगार तेव्हडा सर्वाना समान जेमतेम १२ की १५ हजार... अर्थात तरीही तुम्हाला ईथे खायला प्यायला रहायला एकदम उत्क्रुश्ट मिळेलच. इथे ध्यान सोडुन कसलेही देवपुजन नाही, नो गॉड, नो रिलीजन, नो पोलिटिक्स. अत्यंत इंटरेस्टींग प्रकरण आहे. आम्ही वेटींगवरच होतो पण कोवीड सुरु झाला.

In reply to by गॉडजिला

चौथा कोनाडा Sat, 05/01/2021 - 13:39
गॉडजिला साहेब, येईल की योग आगामी काळात ! अनुभव लिहायला विसरु नकात.

In reply to by तुषार काळभोर

गोरगावलेकर Tue, 04/02/2019 - 16:12
अगदी बरोबर. सूर्य मंदिर, कटारमल, अलमोरा, उत्तराखंड मुख्य मंदिर व आजूबाजूने 44 मंदिरे असा समूह आहे.

गोरगावलेकर Sat, 04/13/2019 - 11:19
मला वाटते हे ठिकाण ओळखता येत नसावे किंवा या धाग्यावरचा उत्साह संपला असावा. त्यामुळे मीच उत्तर देते निदान दुसऱ्या कोणाला फोटो ओळखण्यासाठी द्यायचा असेल तर देऊ शकेल. ठिकाण : कुलधरा , जेसलमेर, राजस्थान साधारण २०० वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मणाची वस्ती असलेल्या या गावातून सर्व लोक एका रात्रीत अजाणत्या जागी निघून गेले. तेव्हापासून हे गाव ओसाड पडले आहे. गाव सोडण्याबद्दल रोचक कथाही सांगितली जाते. येथे भूत/पिशाच्चं असल्याचा भास अनेकांना झाल्याने परत येथे वस्ती झालेली नाही असाही समज आहे. याला पर्यटन स्थळ घोषित करून राजस्थान पर्यटन मंडळाने जपणूक व विकास कामे सुरु केली आहेत.

In reply to by गोरगावलेकर

मला असे वाटते की नाना पाटेकर आणि करिष्मा कपुरच्या शक्ती द पॉवर या सिनेमातला काही भागाचे इथे शुटिंग झाले होते. पैजारबुवा,

In reply to by गोरगावलेकर

चगलगु चशारहु चहेआ चहे चन्यचमा चहेआ. चणप चलात्या चचारुनवि चकडेइ चत्तरउ चहिण्यातलि चयका चशीलहा चहेआ? चनेज्या चया चगांनाजा चत्यक्षप्र चटभे चलीदि चहेआ चच्यात्या चडूनक चजूनअ चहितीमा चळालीमि, चजी चगलगु चरव चपलब्धउ चहीना, चरत चधिकअ चनंदआ चईलहो. चजारबुवापै

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गोरगावलेकर Mon, 04/15/2019 - 16:20
चपलेआ चरोबरब चहेआ चणप चत्यक्षप्र चऊनजा चल्यानेचआ चत्तरउ चगायचेसां चहेआ चका? चपलेआ चमका चटोफो चळखण्याचेओ. चत्तरउ चरोबरब चसेलअ चरत चत्यक्षप्र चऊनजा चलेल्यांनीआ चधिकअ चहितीमा चगावीसां.

अनिंद्य Tue, 04/16/2019 - 09:33
इतक्यांदा 'च च' बघून फोटोबद्दल कोणी चकार शब्द बोलले नाही असे म्हणायची सोय राहिली नाही :-) फोटो - नाहरगढ किल्ला जयपूर येथील पाणी साठवणुकीच्या तळ्याचाच आहे. मला तो पायऱ्यांचा पॅटर्न फार आवडला.

In reply to by प्रसाद_१९८२

फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस नाही. प्रथम पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन, मग त्याचा इमेज अ‍ॅड्रेस वापरून, तो इथे परत टाकला तर दिसू शकेल.

In reply to by प्रसाद_१९८२

चौथा कोनाडा Sat, 04/27/2019 - 13:00
बहुधा महाबलीपूरम (तामिळनाडू) येथील ओळक्कणेश्वरा हे शिवाचं मंदिर ? (हे महिषासूर मर्दिनी मंडप मंदिर असा सार्वत्रिक गैरसमज आहे) याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे !

In reply to by चौथा कोनाडा

गोरगावलेकर Sat, 04/27/2019 - 13:54
ज्या खडकात महिषासूर मर्दिनी मंडपाच्या गुफा आहेत अगदी त्यावरच ओळक्कानेश्वर मंदिर असल्याने असा गैरसमज होत असेल.

In reply to by चौथा कोनाडा

प्रसाद_१९८२ Mon, 04/29/2019 - 16:12
बरोबर ओळखलेय ! ---- याच परिसारात महाबलीपूरमचं विख्यात असं दीपगृह आहे ! -- या वरिल फोटोतील मंदिरातून घेतलेला दिपगृहाचा हा फोटो. -- -- 1

In reply to by तुषार काळभोर

अनिंद्य Mon, 06/03/2019 - 13:51
अरे हा धागा का सुस्त ? रचनेवरून बंगाल / आसाम भागातील वाटते आहे. अशी मंदिरे मी हरिपूर (बंगाल) आणि शिवसागर (आसाम) मध्ये बघितली आहेत, पण हे नक्की कुठले ते सांगा आता पैलवान.

In reply to by तुषार काळभोर

गोरगावलेकर Mon, 07/29/2019 - 14:46
पश्चिम बंगालमधील विष्णुपूर येथील टेराकोटा रचना व पंचरत्न शैलीतील "शामराई मंदिर " असावे. टेराकोटा -भाजलेली माती /वीटा पंचरत्न शैली - पाच शिखर असलेली

गोरगावलेकर Sat, 01/02/2021 - 22:16
ओळखा हे भव्य शिल्प कोणत्या देवतेचे आहे , कुठे आहे आणि या ठिकाणची महती काय? (फोटो क्रॉप केला आहे. मुद्दामच पूर्ण फोटो दिलेला नाही )

In reply to by गोरगावलेकर

प्रचेतस Sun, 01/03/2021 - 06:31
शिव - भैरव स्वरूपात. डाव्या हातात कपाल धारण केले आहे तर उजव्या हातात फूल वाटते आहे. कपालाच्या बाजूस शिवलिंग दिसते आहे. ठिकाण माहीत नाही पण उत्तर भारतीय नागर शैली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा ओरिसा.

गोरगावलेकर Mon, 01/04/2021 - 09:30
निरीक्षण अचूक. तरीही मूर्ती कुठल्या देवतेची या बाबतीतला अंदाज करणे केवळ अशक्य. गुगलल्याशिवाय सांगणे कठीण किंवा प्रत्यक्ष जाऊन आलेले लोकच सांगू शकतील. उद्यापर्यंत वाट पाहून उत्तर देईन

गोरगावलेकर Tue, 01/05/2021 - 00:34
आधी हा पूर्ण फोटो  हे शिल्प देवी पार्वतीचे आहे. (मी स्वत: सहमत नाही. कारण कुठल्याच अंगाने हि स्त्रीची प्रतिमा वाटत नाही) ठिकाण: बैजनाथ, उत्तराखंड. अशी वंदता आहे की भगवान शंकर व पार्वतीचा विवाह येथेच म्हणजे गोमती व गरुडगंगा नदीच्या संगमावर संपन्न झाला होता. जालावर बऱ्याच ठिकाणी शिल्पाचा उल्लेख पार्वती असाच केला आहे . पार्वतीच्या शिल्पाविषयी येथे वाचायला मिळते पण फोटो नाही. आम्ही २०१५ ला या मंदिरास भेट दिली तेव्हा हे शिल्प पहिले आहे. पण माहिती देणारी कोणतीही जाणकार व्यक्ती बरोबर नव्हती . त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे/संग्राहालयात ठेवायची असल्या कारणाने ही मूर्ती भांडारागृहात बंदिस्त करण्यात आली आहे. येथेही या मूर्तीचा पार्वती असाच संदर्भ आहे. बातमी फोटो ओळखण्यासाठी मी दिलेला असला तरी माझ्या उत्तरावर मीच ठाम नाही. प्रचतेस यांचेच म्हणणे बरोबर असावे.

In reply to by गोरगावलेकर

प्रचेतस Tue, 01/05/2021 - 09:14
पार्वती शक्यच नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले असता मूर्तीचा जवळून दिसणारा फोटो आहे. हातातील कपाल तर स्पष्टच आहे, शेजारी त्रिशुळ दिसत आहेत. शिवाय स्त्री मूर्ती ही नाहीच. भैरवच हा.

In reply to by तुषार काळभोर

प्रचेतस Tue, 01/05/2021 - 19:42
हत्ती हे वाहन फक्त इंद्राचे आहे ना?
नाही, इतर देवतांचेही आहे :) वज्र नाहीये, पण इतर लक्षणे आहेत. ही देवता इंद्र नाही.

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस Wed, 01/06/2021 - 17:17
नाही. हा कुबेर आहे. कुबेर हा मुख्यतः नरवाहन, पण मध्ययुगात त्याला हत्ती हे वाहनही चिकटले. कुबेर ओळखायचे प्रमुख लक्षण म्हणजे त्याच्या खांद्यावर असलेली धनाची पिशवी. कुबेराच्या काही शिल्पांत ह्या पिशवीचे तोंड मुंगसासारखे पण असते.

In reply to by प्रचेतस

चांदणे संदीप Wed, 01/06/2021 - 17:23
लोल! =)) मी तेच केल. आधी तुमचे धागे चाळले. अर्थात बरोबर म्हटल्यावरही सांगणारच होतो. पण हे बरोबर नाही. हाच प्रश्न हॉटसीटवर एक करोडसाठी वगैरे असता तर केवढा मोठ्ठा पोपट झाला असता. :प (तेवढं, धाग्यात बदलून घ्या) सं - दी - प

गोरगावलेकर Tue, 01/05/2021 - 22:50
हुश्श! सापडले एकदाचे. क्रमांक ४३ आणि त्यावरचा सुधारित उल्लेख. लक्षणांहून मला नाही ओळखता येत. पण शोधाशोध करण्याच्या निमित्ताने काही नवीन माहिती मिळते त्यातच आनंद.

In reply to by गोरगावलेकर

हा फोटो पाहून तिकोन्यावरचा चपेटदान मारुती आठवला, वासोट्यावर पण असाच एक मारुती आहे. वरचा फोटो कुठला आहे ते माहिती नाही. पैजारबुवा,

गोरगावलेकर Sat, 05/01/2021 - 15:56
३-४ दिवस झाले फोटो टाकून पण उत्तर आले नाही म्हणून मीच सांगते. @प्रचेतस . निश्चितच हा फोटो महाराष्ट्रातील नाही. @ ज्ञानोबाचे पैजार . तिकोना आणि वासोटा दोन्ही ठिकाणे पाहिलेली नाहीत. फोटोतील ठिकाण ओळखणे विशेष कठीण नव्हते. आपल्यापैकी बरेच जण येथे जाऊन आलेले असतील. मध्यप्रदेश व सातपुड्यातील हिल स्टेशन 'पंचमढी' येथील हा फोटो. येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'गुप्त महादेव'. भस्मासुराच्या भीतीने शंकर या गुंफेत लपले होते म्हणून हा गुप्त महादेव. साधारण ४० फुटाचा अतिशय चिंचोळा मार्ग असल्याने गुंफेत एका वेळी मोजकेच लोक जाऊ शकतात. याच गुंफेच्या बाहेर हा मारुती आहे. याची स्थापना कधी झाली वगैरे माहिती मला मिळू शकली नाही .