कोरडं रान

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 4:03 am

किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग
मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग

नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग
कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग

चालतांना चाल तुही लचकेदार ग
रानामधी धावती हारीणी नाजूक ग

सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग
तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग

किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग
पन बोलतांना वठी नाही काही येत ग

तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग
ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग

एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग
तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग

किती सांगू माझी रामकथा माह्याचं तोंडून ग
सारीकडं पावसाचं पानी पन माह्य रानं कोरडं ग

- पाषाणभेद
३/४/२०१९

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

3 Apr 2019 - 6:51 am | Nitin Palkar

आवडली....

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Apr 2019 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या कोरड्या रानात लवकरच मुळा मुठा उजव्या कालव्याचे पाणी पोचावे आणि तुमची होणारी ही काहिली कमी व्हावी ही सदिच्छा.

पैजारबुवा,

मनिष's picture

3 Apr 2019 - 5:57 pm | मनिष

आवडली!

किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग
मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग

https://www.youtube.com/watch?v=-yK6sb024D0

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Apr 2019 - 6:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जमलीये!

स्वोन्नती's picture

3 Apr 2019 - 10:41 pm | स्वोन्नती

मस्त

पाषाणभेद's picture

4 Apr 2019 - 12:09 am | पाषाणभेद

तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं ढेकूळ ग

ढेकूळ = दुरूस्ती