एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
23 Mar 2019 - 2:52 pm

एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम

एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये...
वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही.

मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. अनेक अपरिचित गाण्यांचा आणि त्या गाण्यांच्या अनुषंगाने बनलेल्या विविध कथानकांचां परिचय मिपावरच्या रसिकांना करून देण्याचा या सदरात मी प्रयत्न करणार आहे

पहिले गाणे आहे “चाहूँगा मैं तुझे हरदम”

चाहूँगा मैं तुझे हरदम, तु मेरी ज़िन्दगी
माँगू रब से तेरी खुशियाँ, ये मेरी बंदगी
जुनून मेरा तुझे पाना, संग जीना संग मरना
यही है दिल्लगी
ओ मेरे सनम मेरे हमदम, चाहता रहूँ जनम जनम

सगळे गाणे इथे लिहीत नाही.... ते तुम्ही ऐकाच... नाही तुमच्या मनात घर करुन राहिले तर पैजारबुवा नाव लावणार नाही.

मित्रांनो तुम्हाला अमर अकबर अंथोनी या सिनेमातला तो प्रसंग आठवतो आहे का? ज्यात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर तिघे जण निरुपा रॉयला रक्तदान करतात. असले गुरुत्वाकर्षणाचा नियम न पाळणारे रक्तदान एकदा पाहिल्यावर कोणी कसे बरे विसरू शकेल?

असाच वैद्यकीय पेशातल्या अनेक नीतीनियमांच्या ठिकर्‍या उडवणार्‍या एका भावपूर्ण गाण्याचा व्हिडिओ आहे.

व्हिडिओ संपेपर्यंत संवेदनशील मनुष्याचे हृदय पिळवटून निघते.

अतिसंवेदनशील लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये अशी नम्रतेची विनंती मी त्यांना या लेखाच्या माध्यमातून करतो.

ज्या कोणी हे कथानक रचले आहे तो मनुष्य मला कधी भेटला तयार त्याचे डोळेही मी अशाच पद्धतीने काढणार.

याच गाण्याचे दुसर्‍या पध्दतीने झालेले चित्रीकरण पहाताना पहिला व्हिडिओ फारच बरा होता असे अजाण दर्शकांना वाटू शकते. पण सुजाण लोक हा नक्कीच वेंजॉय करतील याची मला खात्री आहे.

पण ह्या व्हिडिओचा परमोच्च बिंदू खरतर याच्या शेवटात आहे. यातली हिरोईन शेवटी ज्या आर्ततेने हीरोला सांगते “वो मेरा भाई था” त्या वेळच्या अभिनयासाठी मी तिची शिफारस केवळ ऑस्कर करता करू शकतो.

आणि त्या नंतर हिरोचा अभिनय पहाताना मला सदमा मधला कमाल हसनने शेवटच्या सीन मध्ये केलेला अभिनय आठवला
तुमचा जास्त वेळ घेता नाही, पहाच हा पण व्हिडिओ

तिसरा व्हिडीओ थोडा मोठा आहे पण पहायला हवा असाच आहे ते म्हणतात ना “सब्रका फल मीठा होता हैं”

या व्हिडिओतला हिरो गरीब आणि अशिक्षित आहे, हे व्हिडिओत मोठ्या खुबीने दाखवले आहे पण त्याचे हिरवीणी वर अतिशय प्रेम आहे. हिरवीन पोळ्या करते ते दॄष्य पाहून माझ्या अंगाला दरदरुन घाम फुटला होता. पण त्यानंतर ती त्यापेक्षा भयानक चाळे करुन दाखवते.

सैराट मध्ये नागराज मंजुळे जिकडे कमी पडले त्या सगळ्या जागा इकडे दिग्दर्शकाने भरून काढल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही सैराट विसराल.
यात काय नाही? प्रेमी जीव त्यांची ताटातूट करणारा जुलमी बाप. यात व्हीलनला काही सेकंद काम आहे पण त्याने त्या वेळात बहार उडवली आहे

यात हिरो शेवटी कारला आपटून मरतो. ( नीट वाचा हिरो कारला आपटून मारतो. इतर सिनेमात माणसांवर कार येऊन आपटते, पण इथेच तर दिग्दर्शक बाजी मारतो इथे हिरोच व्हीलनाच्या कारला धडक मारतो) या हीरोला पण मरणोत्तर ऑस्कर द्यावे अशी माझी खटपट सुरु आहे.

चौथे कथानक हे पहिल्या तीनपेक्षा भयानक आहे पण चकचकीत आणि प्रेक्षणीय आहे. कथानक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मला किमान १० वेळा पहायला लागला. यातही हिरवीणी च्या अभिनायासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. विशेषत: शेवटी तिने जो वेड लागल्याचा अभिनय केला आहे त्याला तोड नाही.

एवढे चार झाल्यावरही तुमच्यात पाचवा व्हिडिओ पहायची खुमखुमी असेल तर हा घ्या पाचवा

हा सहावा

एकापेक्षा एक भारी कथानके अभिनय चित्रीकरण आणि दिग्दर्शन आहे या कर्णप्रिय गाण्याचे .

हे कमी वाटले तर अजूनही आहेत पण हे सहा सगळ्यात भारी आहेत .

सावधान :- पुढच्या वेळी अजून वेगळे गाणे घेउन येणार आहे

पैजारबुवा

इतिहासकृष्णमुर्तीअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2019 - 4:31 pm | चौथा कोनाडा

:-)))

काय खतरनाक आहेत राव ! व्हिडो बगुन हृदय पिळवटूनमेंदू बंद पडायची वेळ आली.
<हिरोच व्हीलानाच्या कारला धडक मारतो> हा तर सुपर ह्रुदय्स्परेशी शीण !

फिल्म मेकिंग कोर्सचे लैच विदयार्थी झालेले दिसताय, बेकारी दुसरं काय !
ज्ञानोबाचे पैजार, तुमच्या व्यासंगाला सलाम आमचा !
तुम्हाला या गाण्यावरच्या रिसर्च साठी गेला बाजर एखादे पीएचडी द्यायला हरकत नाही.

बायदवे, मजा आली ही गंमत बघताना (या गाण्याच्या मार्केटिंग चे काम मिळालेले असल्यास हार्दिक अभिनंदन ! )

अभ्या..'s picture

23 Mar 2019 - 4:57 pm | अभ्या..

एकच लंबर माऊली,
आपल्या व्यासंगाने दिपून गेलो अगदी.
फटकन " यारा 'तेरी यारीको मैने तो खुदा माना" हे आणि " ठुकराके मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी" ही रत्ने येऊ द्या.

तुषार काळभोर's picture

23 Mar 2019 - 8:42 pm | तुषार काळभोर

कुठं फेडताल ही पापं!

नाखु's picture

23 Mar 2019 - 11:06 pm | नाखु

असतय हेच माहीत नव्हते.
अगदी अडाणी आम्ही.
घरचाच कॅमेरा, होऊ दे खर्च असा मामला दिसतोय तर!!
पै बुवा अनवट रस्त्यांवरील रत्ने शोधून दिल्याबद्दल धन्यवाद.

मूळ कलाकृती पाहूनच फाफलल्याने द्वितीय, तृतीय पाहण्याआधिच गंडलेला नाखु पांढरपेशा

हा बघा वरीजनल, म्हणजे या व्हिडिओत तरी असे म्हटले आहे. पण वरच्या सहात जी मजा आहे तितकीशी मजा हा व्हिडो पहाताना येत नाही. म्हणून हा घेतला नव्हता.

पैजारबुवा,

भंकस बाबा's picture

24 Mar 2019 - 10:12 am | भंकस बाबा

है सगला बगावला टाइम कवां मिलतो ?
माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले.
हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी
आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात,
एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार?
तर गाणे होते
'कहा लाया मेरा यार बहारो में'
मेरा लेहंगा अटक गया झारो में'
गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने
बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी?
चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते.
अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

भंकस बाबा's picture

24 Mar 2019 - 10:13 am | भंकस बाबा

है सगला बगावला टाइम कवां मिलतो ?
माझ्या लहानपणी बघितलेले एक गाण आठवले.
हीरो चंकी पांडे ,हेरोईन मंदाकिनी ,पिच्चर अग्नी
आता है तीन आयटम , तीसरा मिठुन भी होता राव त्यात,
एकत्र आल्यावर शिनेमा क़ाय बनणार?
तर गाणे होते
'कहा लाया मेरा यार बहारो में'
मेरा लेहंगा अटक गया झारो में'
गाणे गायले होते सुरेश वाडकर आणि अलका याग्निक ने
बघा आणि एन्जॉय करा , कशासाठी?
चंकी पांडे गरज नसताना एक्सप्रेशन देतो आणि मंदाकिनी गरज असताना ठोंब्यासारखी पडद्यावर वावरते.
अशा अनेक आठवणी आहेत, फुरसत मधे टायपिंन

विजुभाऊ's picture

25 Mar 2019 - 11:11 am | विजुभाऊ

ते एक सुपरमॅन चे गाणे होते तु नळी वर
हा सापडले बघा

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Mar 2019 - 11:38 am | ज्ञानोबाचे पैजार

या अदभूत गाण्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. पण तरी सुध्दा आम्ही आमच्या कडून ह्या गाण्याचे रसग्रहण करण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला होता.

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

https://www.misalpav.com/node/26420

पैजारबुवा,

विजुभाऊ's picture

25 Mar 2019 - 2:01 pm | विजुभाऊ

हा हा हा

सोन्या बागलाणकर's picture

27 Mar 2019 - 2:52 am | सोन्या बागलाणकर

तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा हात कोणी धरू शकत नाही

आय टू आय
https://www.youtube.com/watch?v=_8Gx6AFMJ9U

एंजल
https://www.youtube.com/watch?v=GoCrbuM8wmc

यशोधरा's picture

27 Mar 2019 - 1:08 pm | यशोधरा

एंजल कहर आहे!!! =)))

सोन्या बागलाणकर's picture

27 Mar 2019 - 4:04 pm | सोन्या बागलाणकर

आणि त्यावरच्या कंमेंट्स तर जबरा... एकाने तर म्हटलंय (व्हिडिओमधील) त्या बिचार्या छकुल्याच्या बालमनावर परिणाम झाला असेल गाणं ऐकून. =))))

कमेंट्स उद्या वाचते. रोज थोडं थोडं पुरवून हसेन म्हणते! :D

गाण्यांपेक्षा त्या खालच्या कॉमेंट लै भारी आहेत. आता बघतोच याचे सगळे व्हिडिओ..

मला वाटायचे की फक्त हिंदीतच असले चाळे चालतात, इंग्रजी गाण्यांच्या कधी वाट्याला गेलो नव्हतो. पण ही दोन्ही गाणी पाहिल्यावर वाटले की व्यर्थ गेली आपली जिंदगी डबक्यामधे पोहण्यात.

आज तुमच्या मुळे माझ्या साठी एका नव्या मोठ्या खजिन्याची दारे उघडली गेली. तुमचे आभार कसे मानावे ते समजतच नाहीये.

तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा हात कोणी धरू शकत नाही

जसा पाकिस्तान कडे ताहेर शहा आहे तसे भारताकडे महागुरु आहेत. त्यांनी पण मुंबई अँथम मधे याला तोडीसतोड ट्क्कर दिली होती. कसले अशक्य हिडीस गाणे आहे ते पण. महागुरुंच्या अख्या करीयरचा सारांश त्यात ठासून भरला आहे. आणि त्यावर महागुरुंनी दिलेले एक्सप्लनेशन तर अजुनच महान आहे.

https://www.youtube.com/watch?v=12x0hYBQElQ

मला कंटाळा आला की मी मुंबई अँथम पहातो आणि मग खालच्या कॉमेंट्स वाचत बसतो, फुल टाइमपास होतो.

आता मुंबई अँथम चा कंटाळा आला की एंजल उघडणार आहे.

पैजारबुवा,

सोन्या बागलाणकर's picture

27 Mar 2019 - 12:41 pm | सोन्या बागलाणकर

हो पैजारबुवा, आपल्याकडे अशा रत्नांची कमी नाहीचे. मुंबई अँथेम माहित नव्हते पण आता बघितल्यावर वाटलं उगाच भाडीपा आणि चला हवा येऊ द्या बघत होतो. हा विडिओ आणि त्यावरच्या कंमेंट्सच बास आहेत.

गेला बाजार, ढिंचॅक पूजाने पण काही दिवस उत्तम एंटरटेनमेंट दिली पण ती थोडी शहाणी निघाली तिने व्हिडिओवर कंमेंटन्स ऑफ ठेवल्या.