दररोजच्या भाजीच्या कटकटीपासून मुक्ती

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
17 Mar 2009 - 2:08 pm

घरातील ग्रूहीणी होणे म्हणजे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात नोकरी करणारी स्री म्हणजे तारेवरची कसरतच. दररोज घर आवरणे, लहान मुलांचे करणे, घरातल्यांची मर्जी सांभाळणे ह्या फार अवघड गोष्टी आहेत. त्यात भर म्हणजे दररोज जेवणात / डब्यात काय भाजी करावी ही कटकट.

या भाजीच्या काळजीवर मी माझ्या परीने (वतीने) मी खालील उपाय सांगत आहे.

एक पदार्थांची यादी बनवायची. (मेनु कार्ड नव्हे.) त्यात सगळ्या भाज्या / न्याहारीचे पदार्थ / बनवण्याच्या पध्दतीनुसार वर्गीकरण (नुसत्या भाताचे १५० च्या वर प्रकार आहेत.) यानुसार एक यादी बनवायची. या यादीत पदार्थांची रेसीपी नाही तर फक्त पदार्थांची नावे पाहिजे.

सगळ्या भाज्या, त्यांचे वर्णन इ. माहीती कुठल्याही पदार्थांच्या ४/५ (रेसीपी बुक) पुस्तकात मिळेल.

{

नंतर यादीतला पहिला पदार्थ (करायला) घ्यायचा. (समजा मेथीची भाजी ही पहिली आहे.)

त्याची सर्व सामुग्री आहे का ते पहावे.( भाजी/ इतर ingredients (भर ??) )आपल्या घरात आज आहे का हे पहावे.

घरातील इतर सदस्यांचे तो पदार्थ आज करण्याबद्दल मत घ्यावे. (मी माझ्या घरी म्हणतो की काही पण चालेल. त्यामुळे हे घरी मला कोणी हिंग लावून विचारत नाही. )

ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला दुसर्‍या क्रमांकाचा पदार्थ घेणे.
नंतर...
ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला तिसर्‍या क्रमांकाचा पदार्थ घेणे.
नंतर...
ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , पाहुणे , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला चौथ्या क्रमांकाचा पदार्थ घेणे.
(हा कापुस कोन्ड्या सारखा किंवा if - then - else सारखा लुप- loop होउ शकतो.)

दुसर्‍या दिवशी दुसर्‍या क्रमांकापासुन सुरुवात करावी. (आणि तो वरील loop मधुन टेस्ट करुन घ्यावा. )

}

भाजी / पदार्थ करतांना फ्रिज मधील उपलब्ध भाजी किंवा घरातील उरलेले पदार्थांचापण विचार करावा. (उदा. उरलेला भात फोडणी लावुन छान लागतो.)

ही यादी फार मोठी होऊ शकते. (आपले भारतीय पदार्थ फार आहेत.) त्यामुळे एका वहीत ही यादी बनवलीतर फार चांगले. ही वही स्वयंपाकघरात ठेवावी. तिला प्लास्टिक चे कव्हर लावावे म्हणजे स्वयंपाकघरात हात लागून खराब होणार नाही.

(हा लेख सुचण्याचे श्रेय एका मि. पा. सदस्याला आहे.)

धोरणपाकक्रियातंत्रविचार

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

17 Mar 2009 - 2:54 pm | चिरोटा

सर्व ग्रुहिणी जेवणखाण बनवताना हाच algorithm मनातल्या मनात वापरतात, नाही का?
मी तरी कधि कधि जेवण बनवताना हेच करतो.

विंजिनेर's picture

17 Mar 2009 - 3:00 pm | विंजिनेर

स्वयंपाक/भाज्यांचे प्रकार आणि त्यांतले नाविन्य टिकवून सोपेपणा आणण्याचा प्रयत्न उत्साहवर्धक आहे :) आपल्याला शुभेच्छा!
पण माझ्या मते असे ठोकताळ्यांमधे बसविणारे प्रयोग उत्साहाच्या भरात सुरू होतात खरे पण नंतर बारगळतात.
ह्याचे कारण, कुठलिही गृहिणी स्वतःच्या अनुभवावरून आणि ("आज काही तरी वेगळं कर बुवा !!" असे रोज म्हणणार्‍या) नवरा/मुलांच्या त्या दिवशीच्या स्वभावावरून पदार्थ ठरविणे अधिक सोयिस्कर समजेल ;) कदाचित घर आणि एखादी कारखान्याची खानावळ ह्यात असणारा फरक ह्याला कारणीभूत असेल का?

पाषाणभेद's picture

17 Mar 2009 - 3:09 pm | पाषाणभेद

>घरातील इतर सदस्यांचे तो पदार्थ आज करण्याबद्दल मत घ्यावे.
>ह्या पदार्थांची सामुग्री नसेल (किंवा इतर काही कारणास्तव बदल, जसे उपवास, रविवार , बाहेरुन 'आनंद' घेउन येणे इ.) तर यादीतला दुसर्‍या क्रमांकाचा पदार्थ घेणे.

खरंय , पण काही म्हणा आपणाला खाणावळीत किंवा कारखान्याच्या कँटिन्मध्ये अशी आवडनिवड ठेवता येत नाही किंवा कोणी आपल्याला विचारत नाही. शेवटी घर ते घर. त्याची सर बाहेरील जेवणाला येणार नाही.
-( सणकी )पाषाणभेद

स्वाती२'s picture

17 Mar 2009 - 5:59 pm | स्वाती२

त्या पेक्षा १५ दिवसांचा मेनू बनवावा. मेनू करताना मुले, नवरा यांचा सहभाग असावा. घरातील आजी-आजोबांच्या पथ्यपाण्यानुसार पर्यायी पदार्थही लिहून ठेवावा. आठवड्याची खरेदी त्यानुसार करावी. सुट्टीच्या दिवशी काय फर्माईश असेल ती देखिल शक्यतो दोन दिवस आधी विचारुन घ्यावी कारण काही पदार्थाना भिजत घाला, वाटा वगैरे पूर्वनियोजन लागते. शक्यतो पदार्थ दुप्पट शिजवावा. म्हणजे त्याचा नवा makeover झटपट होतो. भाताचा fried rice ,चिकन्/मटन/कोलंबी रस्सा वापरुन पुलाव वगैरे. इडल्या, बनाना ब्रेड, मफिन्स, कोफ्ते,चटण्या, वाटण छान फ्रीझ करुन ठेवता येतात. चिकन फिंगर्स पण एकदम करुन फ्रीझ करावेत. मी गेली ३-४ वर्षे असे करतेय. फारशी धावपळ न करता नवरा आणि लेकाचे चोचले पुरवले जातात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2009 - 6:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यापेक्षा घरातल्या सगळ्यांनीच घरातलं काम करण्याची सवय लावली की सगळ्यांना हवं ते खायला मिळतं आणि एकाच्या जीवावर बाकीचे सगळे बोटं चाटत बसत नाहीत.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

रेवती's picture

17 Mar 2009 - 6:25 pm | रेवती

सहमत.

रेवती

लवंगी's picture

17 Mar 2009 - 8:30 pm | लवंगी

अगदि सहमत

चतुरंग's picture

17 Mar 2009 - 8:41 pm | चतुरंग

घरातल्या पुरुषवर्गाने स्वयंपाकात आणि इतर घरकामात मदत करणे हे आता बर्‍यापैकी अंगवळणी पडलेले असायला हरकत नाही.
भाजी निवडून, धुवून, चिरुन देणे, कांदे, टोमॅटो चिरुन देणे, वरण भाताचा कुकर लावणे, मुगाची खिचडी करणे, इडलीचे पीठ वाटून देणे, आले-लसणाची पेस्ट करुन देणे, बटाटे उकडून सोलून देणे अशा छोट्याछोट्या वाटणार्‍या कामांनी मुख्य कामाचा बराचसा भार हलका होतो आणि स्वयंपाकामागचे कष्टही ध्यानात येतात! नाहीतर बसल्याजागी ह्यात मीठ कमीच आहे अन तिखट जास्तच आहे असले चोचले सुचतात! ;)
शिवाय सर्वांनी मिळून केलेल्या पदार्थाची लज्जत न्यारीच असते! :)

चतुरंग

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 11:30 pm | भाग्यश्री

बापरे , इतकी कामं करता तुम्ही??
रेवतीशी बोललं पाहीजे एकदा.. :)

पण मिळालीच आहे संधी तर म्हटलं चार कामं जास्त टंकली तर कुठे बिघडलं! शिवाय स्त्री वर्गाच्या बाजूने बोललोय म्हटल्यावर पाठिंबाही मिळणार! ;)

चतुरंग

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 8:44 pm | लिखाळ

अदिती,
सहमत आहे.

रोज डोके चालवून आजचे पदार्थ ठरवणे कंटाळवाणेच असते. घरातल्या इतर सदस्यांनी स्वयंपाकाला मदत करणे आणि काही दिवशी स्वतः पदार्थ निवडून बनवणे चांगलेच.
-- लिखाळ.

रेवती's picture

17 Mar 2009 - 6:30 pm | रेवती

घरात लहान मुले असताना अश्या यादीचा उपयोग होऊ शकतो.
माझा मुलगा लहान असताना आम्ही स्वयंपाकघरात अश्या वेगवेगळ्या याद्या लावलेल्या आठवतात.
सोमवारी कुठले पदार्थ (म्हणजे कुठली भाजी, कोशिंबीर, भाताचा प्रकार), तसेच मंगळवारी......
अश्या प्रकारच्या यादीमुळे घाई गडबड खूपच कमी होते. अजूनही अश्या याद्या आमच्या घरात असतात.
मुलांच्या वयाप्रमाणे प्रकार बदलत जातात.

रेवती

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 11:54 pm | भाग्यश्री

सहमत...(त्यासाठी घरात लहान मुलेच पाहीजेत असं काही नाही.. खवय्या नवरा बास होतो.. )
हा प्रकार इतका कॉमन आहे माहीत नव्हतं मला..
मला वाटलं आम्ही येडे आहोत , लिस्टा करून ठेवतो! :)
कडधान्यं भिजवत घालायला तर मी इतकी विसरते, की आता रूलच केलाय.. आठवड्यातून एकदातरी कडधान्य/उसळी करायचेच ,पालेभाजी, कोशिंबिरी/सॅलड आणि महीन्यात १-२ वेळा काही गोड, फिश/चिकन..

मराठमोळा's picture

17 Mar 2009 - 6:51 pm | मराठमोळा

शेवटी काय? ही कटकट न संपणारी आहे. हो कमी नक्की करता येईल.

भाजी कोणतीही असो ती थोडी चवदार आणी जरा अधुन मधुन नव्या पद्धतीने बनविली कि खपुन जाते.. सोबत कोणते लोणचे/चटणी अथवा काकडी टोमॅटो असावे ह्याला ही फार महत्व आहे असे मला वाटते.

आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

शशिधर केळकर's picture

17 Mar 2009 - 11:49 pm | शशिधर केळकर

सर्व मानवजातीच्या कल्याणाकरिता लिहिलेल्या या विषयाचे स्वागत!
पण...
सर्वाना हा उपाय आवडेल असे नाही. अनेक गृहिणी खूप मनापासून ही सगळी कामे बिनबोभाट, सहज, सवयीने, आनंदाने - वगैरे वगैरे - करत असतात.
कित्येक पुरुषमंडळी घरातल्या स्त्रीच्या जोडीने काम करीत हातभार लावत असतात.
ही अशी यादी बनविणे म्हणजे 'गिळायला चला' अशी जेवण्याबद्दल भावना निर्माण करणे होऊ शकते.
एकीकडे मिपावर इतक्या सुंदर सुंदर पाकृ - कधीमधी पुरुष मंडळीही - खुलवून सांगत असतात, ते उत्साहाने लिहिणे बंदच करावे लागेल.
१५० प्रकारचे भात बनत असतील आणि रोज भाताच्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात होणार असेल, तर कोणता पदार्थ करावा हे ठरवण्यासाठी एक कंप्यूटर प्रोग्राम लिहावा लागेल. कारण भाताचे १५०, पोळयांचे ४० प्रकार भाज्यांचे ७० प्रकार, मास मासळीचे २०० प्रकार घेऊन मग आज घरात जेवायला कोणकोण किती जण आहेत ते पाहून, ते लोक किती जेवतील ते बघून त्याना आजच्या मेनूतील काय खायला घालायचे ते ठरवून पक्के करायलाच दुपार उजाडेल. किंवा मग हे सगळे काम रात्री निजण्यापूर्वी करावे लागेल.
आणि मग असे होईल, की त्यापेक्षा एक स्वैपाकी/णच कामाला लावावी असे वाटू लागेल!

असो. मला वाटते, की मी मूळ विषयाला सोडून अवांतराच्या वाटेने फार दूर चाललो आहे. तेव्हा थांबतो. आणि मूळ संकल्पनेचे पुन्हा एकदा स्वागत करतो!

(स्वैपाकी) शशिधर