आपण तुझ्या फोटुग्राफीला नेहमीच दाद देऊन राहिलेलो आहोत, तशीच आत्ताही देतो..
तुला फोटूग्राफीची प्रचंड आवड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच तू काढलेल्या काही उत्कृष्ट फोटुंपैकी काही फोटू तू मिपावर द्यावेस असे वाटते!
अवांतर - आम्ही 'त्या तिथे पलिकडे, तिकडे...' कार्यरत असताना आपलं ठाण्यात एक संमेलन झालं होतं तेव्हा तू काढलेल्या फोटुंचं एक छोटेखानी प्रदर्शन आपण भरवलं होतं तेही फारच सुरेख होतं!
'मावळत्या दिनकरा' चे फोटोज मस्त आलेत. विशेषकरुन शेवटच्या दोन फोटोजमध्ये आकाशाच्या चढत्या श्रेणीत गडद होत जाणार्या रंगछटांशी सूर्याच्या बिंबावरील छटांनी साधलेला मेळ अप्रतिम.
कुठूनही बघितला तरी मनात हुरहुर उत्पन्न करतो, अगदी काँक्रीटच्या जंगलातही! हे ह्या प्रकाशचित्रात अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.
साक्षीदेवा, फारच छान!
अजूनही येऊदेत.
ह्याला आमच्या कट्ट्यावरच्या भाषेत "फोटो "वेssड" आलेयत " अस॑ म्हणतात.
साक्षीराव, बाकी तुमचा तिसरा डोळा एकदम जबरा दिसतोय हा॑! काय सह्ही फ्रेम्स पकडल्या आहेत. ऍ॑गल पण खासच. आकाश फाडायला निघालेल्या इमारती, त्यातले तुरळक एखाद-दुसर्या खिडकीतले मिणमिणते दिवे अन् ह्या सगळ्या॑च्या वर "डॉमिनेटि॑ग" पिवळे-नारि॑गी सुर्यदेव !!! लाईट आणि कलर इफेक्टस् पण एकदम कल्ला !
ऋषिकेशची कविता
मी इथे नमुद करु इच्छितो ह्या सुंदर ओळी माझ्या नाहित. सुप्रसिद्ध "श्रावणमास" या कवितेतील या ओळी आहेत. मी हे ओळी लिहितानाच नमुद करायला हवं होतं. ह्या ओळी माझ्या आहेत असं वाटले असल्यास क्षमस्व!
ही सुंदर चित्रे बघताना ह्या ओळी आठवल्या इतकेच :)
प्रतिक्रिया
13 Feb 2008 - 12:55 am | विसोबा खेचर
साक्षीदेवा,
फोटू बाकी सुरेखच काढले आहेस..
आपण तुझ्या फोटुग्राफीला नेहमीच दाद देऊन राहिलेलो आहोत, तशीच आत्ताही देतो..
तुला फोटूग्राफीची प्रचंड आवड आहे हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच तू काढलेल्या काही उत्कृष्ट फोटुंपैकी काही फोटू तू मिपावर द्यावेस असे वाटते!
अवांतर - आम्ही 'त्या तिथे पलिकडे, तिकडे...' कार्यरत असताना आपलं ठाण्यात एक संमेलन झालं होतं तेव्हा तू काढलेल्या फोटुंचं एक छोटेखानी प्रदर्शन आपण भरवलं होतं तेही फारच सुरेख होतं!
तुझा,
(गाववाला) तात्या.
13 Feb 2008 - 1:18 am | नंदन
'मावळत्या दिनकरा' चे फोटोज मस्त आलेत. विशेषकरुन शेवटच्या दोन फोटोजमध्ये आकाशाच्या चढत्या श्रेणीत गडद होत जाणार्या रंगछटांशी सूर्याच्या बिंबावरील छटांनी साधलेला मेळ अप्रतिम.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
13 Feb 2008 - 1:22 am | धनंजय
माझी कल्पना की ३०० मिमि पेक्षा (३५ मिमि कॅमेर्याच्या तुलनेतला आकडा) कमी लेन्सने ही चित्रे काढणे केवळ अशक्य!
तंत्राच्या दृष्टीने उत्तम चित्रे!
13 Feb 2008 - 9:36 pm | सर्वसाक्षी
वा धनंजयराव,
आपण प्रकाशचित्रणातले जाणकार दिसता. हे चित्रण ऑलिंपस सी ७७० यु झेड च्या ३८० एम एम वर केले आहे.
अभिप्रायाबद्दल आभार
साक्षी
13 Feb 2008 - 1:22 am | चतुरंग
कुठूनही बघितला तरी मनात हुरहुर उत्पन्न करतो, अगदी काँक्रीटच्या जंगलातही! हे ह्या प्रकाशचित्रात अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.
साक्षीदेवा, फारच छान!
अजूनही येऊदेत.
चतुरंग
13 Feb 2008 - 1:22 am | ऋषिकेश
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखले सुंदरतेचे रूप महा
अश्या अनेक ओळी एकेका प्रकाशचित्रागणिक आठवत होत्या. अत्यंत नेटकी चित्रं खूप छान
-ऋषिकेश
13 Feb 2008 - 1:28 am | प्राजु
ऋषिकेशशी सहमत आहे मी.
- प्राजु
13 Feb 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश
क्लास चित्रे!
अस्ताचलीचा सूर्य आणि सांजवेळेची हुरहुर ... अगदी चतुरंगांसारखेच.
स्वाती
13 Feb 2008 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर
व्वा....व्वा.... अगदी मावळत्या सूर्याच्या 'साक्षी'ने गच्चीतील कॉफीपान म्हणजे अल्टीमेट रिलॅक्सेशन...
अतिशय अप्रतिम छायाचित्रे......
अभिनंदन....
13 Feb 2008 - 1:48 pm | धमाल मुलगा
ह्याला आमच्या कट्ट्यावरच्या भाषेत "फोटो "वेssड" आलेयत " अस॑ म्हणतात.
साक्षीराव, बाकी तुमचा तिसरा डोळा एकदम जबरा दिसतोय हा॑! काय सह्ही फ्रेम्स पकडल्या आहेत. ऍ॑गल पण खासच. आकाश फाडायला निघालेल्या इमारती, त्यातले तुरळक एखाद-दुसर्या खिडकीतले मिणमिणते दिवे अन् ह्या सगळ्या॑च्या वर "डॉमिनेटि॑ग" पिवळे-नारि॑गी सुर्यदेव !!! लाईट आणि कलर इफेक्टस् पण एकदम कल्ला !
आपला
-फोटुयेडा ध मा ल.
13 Feb 2008 - 9:39 pm | सर्वसाक्षी
सर्व रसिकांचे मनः पूर्वक आभार. सूर्यास्त मला नेहेमीच भुरळ घालत आला आहे.
साक्षी
14 Feb 2008 - 8:18 am | कोलबेर
क्षमस्व!
15 Feb 2008 - 8:55 pm | सुधीर कांदळकर
धनंजयचे तांत्रिक मत, ऋषिकेशची कविता
अस्ताचलीचा सूर्य आणि सांजवेळेची हुरहुर ... अगदी चतुरंगांसारखेच.
हे स्वातीचे शब्द.
माझे शब्द खुंटले.
अशीच छायाचित्रे अजून येऊ द्यात. मि.पा. वर रसिकांचा तोटा नाही.
16 Feb 2008 - 1:31 am | ऋषिकेश
ऋषिकेशची कविता
मी इथे नमुद करु इच्छितो ह्या सुंदर ओळी माझ्या नाहित. सुप्रसिद्ध "श्रावणमास" या कवितेतील या ओळी आहेत. मी हे ओळी लिहितानाच नमुद करायला हवं होतं. ह्या ओळी माझ्या आहेत असं वाटले असल्यास क्षमस्व!
ही सुंदर चित्रे बघताना ह्या ओळी आठवल्या इतकेच :)
-ऋषिकेश
15 Feb 2008 - 9:13 pm | कोलबेर
सर्वसाक्षीजी,
चित्र नं. २ ते ५ अतिशय आवडली . तुम्हाला कामाच्याच ठीकाणीच रोज हा देखावा बघायला मिळतो हे पाहून हेवा वाटला!!
अजुन येऊ द्यात..
-कोलबेर