मागील दूवा
जपान लाईफ http://misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) http://misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) http://misalpav.com/node/8647
जपान लाईफ (४) http://misalpav.com/node/8724
जपान लाईफ (५) http://misalpav.com/node/8754
जपान लाईफ (६) http://misalpav.com/node/8787
जपान लाईफ (७) http://misalpav.com/node/8916
अशा लोकांची एक यादी करा.त्याना सांगा की तुम्ही एक नवा व्यवसाय सुरु करणार आहात तुम्हाला त्यांचा सल्ला हवा आहे....सल्ला ही अशी एकच गोश्ट आहे की लोक ती न मागताही देतात आणि कोनी मागितली तर एकदम आनन्दीत होतात.
मला लोकेशच्या फोनवरच्या सम्भाषणाची आठवण झाली.
लोकेशने मला बरोब्बर पकडले होते आणि सावज म्हणून जाळ्यात स्वतःहून चालत आलो होतो. दहा हजारापेक्षा ज्याची किम्मत एक कपर्दीकही जास्त नसेल अशी एक गादी मी एक लाखात घ्यायला निघणार होतो.
मानसशास्त्राचा एवढा चांगला उपयोग गोबेल्सनेही करून घेतला नसेल
एकदा यात अडकला की ! हो अडकला हाच शब्द योग्य आहे. उत्तम ब्रेन वॉशिंग आणिमिट्ठास बोलणॅ यावर भुलून लोक लाख लाख रुपये देतातही. आणि अडकतात. स्वतःचे अडकलेले पैसे काढण्यासाठी मित्र नातेवाईक यांचे खुशाल बळी देतात.
माझ्या पहाण्यातही जपान लाईफच्या गाद्या विकून पैसे मिळवलेले एक दोघे आहेत. त्यान मिळणारे पैसे पाहुन भारावून जाणारे मात्र बरेच आहेत. मल्टी लेवल मार्केटिंगच्या बाबतीत सुरुवातीला असे म्हंटले जाते की हा पार्ट टाईम व्ययसाय आहे यात रेसीड्यूअल इनकम मिळते.
मी काही डोक्टर्स ना या व्यवसायात आलेले पाहिले आहे. एके ठीकाणी तीन डॉक्टर्स नी तर गादी घेण्यासाठी चक्क एक पतसंस्था सुरु केली होती.
या किंवा अशा व्यवसायात आलेल्यांचे नन्तर काय होते ते आपण पुढे पाहु पण त्या अगोदर अशीच आणखी एक कंपनी पाहु.
अमेरीकन ड्रीम या संकल्पनेने एके काळी अमेरीकेत धुमाकूळ घातला होता. अजूनही ती एक स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे.
तुम्हाला एक छानशी बायको असावी .तुमच्या मुलाना चांगल्या कॉलेजात शिक्षण मिळावे. तुम्हाला रहायला एक प्रशस्त बंगला असावा . त्या सभोवती सुंदर बाग असावी. घरात एक मस्त लांबसडक गाडी असावी. आणि कोणतीही गोष्ट हवी असेल तेंव्हा उपलब्ध व्हावी . आणि त्या गोष्टीची गोडी चाखायला मनासारखा वेळही असावा हे ते अमेरीकन ड्रीम.
थोडक्यात रहने को एक घर होगा खाने को हलवा होगा. सोने को बिस्तर होगा कपडा पंखा सब होगा......... बर्रोब्बर हा त्या माय फेअर लेडी तल्या एलेझाबेथ डूलिटल चा डायलॉग.....
सर्वसामान्य माणसाचे स्वप्न...
हे तुमचे स्वप्न आहे का हा प्रश्न सामान्यतल्या सामान्य माणसाला विचारला किंवा अगदी अनील्/मुकेश ना विचारला तरी ते होच म्हणतील.
पैसे हवेत त्यांचा उपभोग घ्यायला वेळ हवा आणि आनन्दी कुटुंब हवे. हे ते ड्रीम.
हे आम्ही तुम्हाला मिळवून देण्यात मदत करु असे कोणी म्हणला तर हेमेलीनच्या पाईड पायपरसारखे त्याच्या मागोमाग सगळी जनता धाव्त सुतेल.
एक कंपनी आहे अगदी शुद्ध अमेरीकन. अॅम वे. त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत साबण टुथपेस्ट आणि तत्सम वस्तु. एखाद्या ठीकाणी प्रवासात तुमची एखाद्या हसर्या आनन्दी व्यक्तीशी ओळख होते. तो/ती तुमचे नाव लिहुन ठेवते साधारण चार दिवसानी त्या व्यक्तीचा फोन येतो. काय कसे आहात तुम्ही त्या दिवशी भेटलात वेळ छान गेला तुमच्या सारखी व्यक्ती भेटून खूप बरे वाटले/ कोणी आजारी असल्याचे त्या जुन्या संभाषणाच्या वेळेस उल्लेखले असेल तर अजारी माणसाची तब्येत कशी आहे याची हमखास चौकशी होते.
तुम्हाला बरे वाटते. त्या माणसाने आपल्याला आवर्जून फोन केला किती चांगला माणुस आहे असे तुमचे मत बनते.
दुसर्या दिवशीही त्याच माणसाचा फोन येतो. ती व्यक्ती आणि तिची पत्नी तुम्ही रहता त्याच भागात येणार असतात किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ आहे का अशे विचारणा होते. तुम्ही अगोदरच त्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे प्रभावीत झालेले असता. नाही म्हणणे एकदम तोडून टाकणे जमत नाही तुम्ही कहितरी सबब सांगता. वेळ मिळेल की नाही सांगता. तुमची सबब नोंदवुन घेतली जाते.
किंवा तो माणूस आणि त्याच्या मित्रांचे एक छोटेसे गेट टुगेदर आहे त्यात तुम्हाला बोलावले जाते. तुम्ही एकदम खुश होता. नेवे वातावरण नव्या ओळखी व्हाव्यात म्हणून गेटटुगेदर केले आहे .
तुम्हाला कसे यायला जमेल असे विचारले जाते. ठीकाण जर दूर असेल तर ती व्यक्ती आणि त्याची बायको आम्ही तुम्हा नवरा बायको दोघानाही पिक अप करु . त्या निमित्ताने वहिनींची माझ्या बायकोशी ओळख होईल. तुमच्या पेक्षाही तुमच्या पत्नीला या न पाहिलेल्या व्यक्तीबद्दल एकदम फॅमिली फ्रेन्ड सारखे घट्ट ऋणानुबंध वाटायला लागतात.
असे भक्कम जाळे विणून ठेवले जाते . हे जाळे कस विणायचे हे ठरवून दिले त्या इसमाचे नाव "बील ब्रीट्स " ब्रीट्स सिस्टीम बद्दल आपन पुढे बोलुच.
आपण त्या गेटटुगेदरमिटींगला जातो. एका वेगळ्याच दुनियेत आपण पाऊल ठेवतो. ही दुनिया असते
'व्हेअर द माईड इज विदाऊट फीअर अॅन्ड द हेड इस हेल्ड हाय" या रविंद्रनाथांच्या कवितेत वर्णिल्या सारखी.
जाळ्यात आपले पाऊल पडलेले असते.
( क्रमशः)
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 11:44 am | निखिलराव
येउ द्या... वाचतोय.............
31 Aug 2009 - 11:47 am | अवलिया
नुस्तेच येवु द्या असे नाहि...
गुरुवारी टाकायचे.. .मनाजोगत्या प्रतिक्रिया नाही आल्या की डिलीट मारुन परत सोमवारी टाकायचे... प्रतिक्रिया येतातच ;)
चालु द्या विजुभाउ ! लगे रहो !!! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Aug 2009 - 12:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विजुभाऊ, (आम्ही सर्व) गादी घेतो पण लेखमालिका आवरा. नाहीतर गेला बाजार गोष्टतरी पुढे सरकवा.
अदिती
ओवीपेक्षा ओवाच जास्त उपयोगी ठरतो. (सौजन्य - पुल)
31 Aug 2009 - 1:01 pm | कपिल काळे
हेहे हेहे
अदितीशी सहमत
१ लाख कोणी कर्ज देइल का?
31 Aug 2009 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते
नानासाहेब आणि अदितीताईंशी सहमत. दोन लेखात अंतर पडले तरी ठीक पण जरा मोठे भाग लिहा. किती ताणणार? संपवा की लवकर. हे असेच भाग येत राहणार? का याला अंतच नाहीये? ;)
तुमच्या या वाक्याशी केवळ असहमतच नाही तर ते अत्यंत चुकीचे आहे असे म्हणावेसे वाटते. हाच न्याय जर का सगळीकडे लावायचा झाला तर जगातले सगळे साहित्य, कला, चित्रपट, नाट्य वगैरे समीक्षक एका फटक्यात बेकार होऊन रस्त्यावर येतील. आणि प्रत्येक साहित्यकृती ही रसिकांना आवडलीच पाहिजे असे होईल. आत्ता हे वाक्य तुम्ही वैतागून म्हणले असावे असे वाटते. थोडा विचार केलात तर तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय ते.
बिपिन कार्यकर्ते
31 Aug 2009 - 1:38 pm | दशानन
+३
असेच म्हणतो...
31 Aug 2009 - 10:35 pm | टुकुल
बोलु कि नकी विचार करत होतो...पण वरती सर्वानी मनातल लिहिल आहे..
--टुकुल
31 Aug 2009 - 1:33 pm | कानडाऊ योगेशु
मी काल दिलेला लंबाचौडा प्रतिसाद गायब कसा काय झाला बुवा? :O
मी तर त्यामध्ये काही आक्षेपार्ह असे तर लिहिले नव्हते? :S
(गोंधळलेला)योगेशु
31 Aug 2009 - 1:39 pm | अवलिया
हा हा हा
मी वाचला होता तो प्रतिसाद आणि मुळ लेख ! :)
म्हणुनच आज परत तोच लेख पाहुन मी माझी वरची प्रतिक्रिया दिली ! ;)
नवी कल्पना मिळाली आहे लेख हिट करण्याची !
थेंकु हं विजुभाउ ! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Aug 2009 - 11:47 am | कपिल काळे
सुद्धा येतील निखीलराव!
31 Aug 2009 - 12:06 pm | विजुभाऊ
९....१०.....११......
प्रेषक निखिलराव ( सोम, 08/31/2009 - 11:44) .
येउ द्या... वाचतोय.............
ह्या लेख मालीकेचा उद्देश मल्टी लेवल मार्केटिंग कंपन्या त्यांच्या जाळ्यात लोकाना कसे अडकवतात काय टेक्नीक वापरतात या संदर्भात माहिती देणे हा आहे,
अवांतरः स्वतः चे असे काहीही लेखन न करता केवळ टीका करणे हाच ज्यांचा धर्म आहे त्याना परोपजीवी वनस्पतींप्रमाणे मानावे.
31 Aug 2009 - 12:22 pm | पर्नल नेने मराठे
आज मला पण एका MLM च्या Confy ला invite केलय 8|
चुचु
1 Sep 2009 - 11:23 am | निखिलराव
विजुभाउ,
९....१०.....११......
प्रेषक निखिलराव ( सोम, 08/31/2009 - 11:44) .
येउ द्या... वाचतोय.............
हि टीका नव्हती.
31 Aug 2009 - 2:06 pm | कानडाऊ योगेशु
विजुभाऊ!
४ थ्या भागापर्यंत लेख वाचनीय होता कारण तोपर्यंत तुम्ही लेखामध्ये स्वानुभव लिहित होता त्यामुळे विजुभाऊंच्या बाबतीत पुढे काय झाले?त्यांना बकरा बनविले गेले का? वगैरे प्रश्न पडुन पुढच्या लेखाची उत्कंठा वाढली होती.पण भाग ५ पासुन लेखाचे तोपावेतो सांभाळलेले बेअरिंग निसटले आहे असे जाणवते.त्यांनंतरचे भाग फारच तांत्रिक झाले आहेत.
हे म्हणजे महाभारताच्या युध्दावरचा चित्रपट पाहायला म्हणुन जावे आणि पूर्ण चित्रपटभर गीताच ऐकावी लागावी असे झाले.
पुढचा भाग उत्कंठावर्धक (तुमचा अनुभव,तुम्हे हे सर्व प्रकरण कसे हाताळले? आणि त्यासोबत सध्या लिहिताय तसे विश्लेषण) असेल अशी आशा करतो.
(वाचक) योगेश
31 Aug 2009 - 2:43 pm | योगी९००
हे म्हणजे महाभारताच्या युध्दावरचा चित्रपट पाहायला म्हणुन जावे आणि पूर्ण चित्रपटभर गीताच ऐकावी लागावी असे झाले.
हे बेस्टच..
मागचे २-३ भाग साधारण सारखेच वाटले. पण ही लेखमाला मला आवडली. MLM वाल्यांचे कसे फावते, ते मानसशास्त्राचा कसा उपयोग करतात हे छान लिहीले आहे.
मला तरी अजून कंटाळा आलेला नाही. थोडे मोठे भाग हवेत आणि गोष्ट पुढे सरकली पाहिजे असे वाटते.
खादाडमाऊ
1 Sep 2009 - 10:46 am | शिशिर
मल्टीलेव्हल मार्केटींग म्ध्ये खरे तर वस्तु ची गरज असो अथवा नसो ती गळ्यात मारली जाते. निस्वार्थ प्रेम, एकमेकांना मदत करण्याची भावना कॄतद्न्यता(क्षमा करा शब्द टायपिंग चुकत आहे) बुध्दी ह्या गुणांना तिलांजली
देवून सर्व प्रकार च्या नाते संबंधांची किंमत पैशा च्या रुपात करणेहा एकमेव आमेरीकन विचार आहे. धंदा करण्याचा हा नवीन आविष्कार सामान्य भारतीयां च्या गळी उतरणे जरा कठिणच आहे.
आवक्यात असल्यास वस्तु लाजे खातर घेणे आणि आवाक्यात नसल्यास त्या व्यक्ति ला टाळणे हाच पर्याय उरतो.
1 Sep 2009 - 7:33 pm | कानडाऊ योगेशु
आवक्यात असल्यास वस्तु लाजे खातर घेणे
अहो वस्तु घेतल्यानंतरच (किंवा पैसे गुंतविल्यानंतर) तर खरी पीडा मागे लागते.ज्याच्यामार्फत तुम्ही ह्या नेटवर्क मध्ये गुंतला तो अजुन नवीन मेंबर्स आण अशी सारखी भुणभुण लावत बसतो.माझ्यासमोरच घडलेले अशी दोन उदाहरणे मी पाहीली आहेत.नेटवर्क मध्ये गुंततोतोवर बर्यापैकी मित्र असलेल्या दोन मंडळीत त्यानंतर मैत्रीची जागा अचानक एम्प्लॉयर-एम्प्लॉयी (मराठी शब्द? मालक-नोकर चुकीचा वाटतोय.)ह्या व्यावसायिक संबंधाने घेतली.
एकात दोघांमध्ये संबंध जवळपास बिघडले आणि दुसर्यात एकाने शहरच बदलले.
31 Aug 2009 - 2:21 pm | विजुभाऊ
माझ्या सुदैवाने त्या॑वेळेस मला दोनचार दिवसात पैसे उभे करता आले नाहीत. त्यामुळे वाचलो. नंतर माझ्या त्या मित्राचा राग आला की तो आपल्याला गिर्हाईक बनवु पहात होता
पण त्यानन्तर माझा उत्साह थन्ड पडत गेला. अर्थात मी माझ्या मित्राना असेच उल्लु बनवले असते आणि त्यानी त्यांच्या मित्रानातेवाईकाना.....
अॅमवे ने लोकाना बनवण्याची एक मस्त पद्धत बनवली आहे. ब्रिट्स सिस्टीम हे त्याचे नाव.
त्या सिस्टीम वरुन प्रेरणाघेऊन बर्याच जणानी नव्या कम्पन्या बनवल्या
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
31 Aug 2009 - 3:19 pm | कानडाऊ योगेशु
हाच तर लाखमोलाचा अनुभव आहे सर्र!! :D .तुम्ही त्यावर लिहा ना.मित्र कसा मागे लागला? तुम्ही त्याचा पिच्छा कसा सोडवला? इ.इ. आणि मध्ये मध्ये हे सायकॉलॉजिकल विश्लेषण येत राहु दे. :?
(मलाही असा अनुभव आला होता पण माझ्याकडे तुमच्याइतके लेखनकौशल्य नसल्याने त्याला शब्दबध्द करु शकत नाही. :''( )
31 Aug 2009 - 2:40 pm | चतुरंग
कंटाळा आला बुवा.. (|:
(झोपाळू)चतुरंग
1 Sep 2009 - 11:40 am | अभिज्ञ
हाऽऽऽ! मस्त ताणून द्यावीशी वाटते आहे!
काका,
आतातरी ऐका माझे.
विजुभाउंकडून जपान लाईफची एक गादी घेउनच टाका. तुमच्या झोपेची उत्तम सोय होईल.
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
1 Sep 2009 - 5:52 pm | अशोक पतिल
हे म्हणजे महाभारताच्या युध्दावरचा चित्रपट पाहायला म्हणुन जावे आणि पूर्ण चित्रपटभर गीताच ऐकावी लागावी असे झाले.
विजुभाऊ!
४ थ्या भागापर्यंत लेख वाचनीय होता कारण तोपर्यंत तुम्ही लेखामध्ये स्वानुभव लिहित होता त्यामुळे विजुभाऊंच्या बाबतीत पुढे काय झाले?त्यांना बकरा बनविले गेले का? वगैरे प्रश्न पडुन पुढच्या लेखाची उत्कंठा वाढली होती.पण भाग ५ पासुन लेखाचे तोपावेतो सांभाळलेले बेअरिंग निसटले आहे असे जाणवते.त्यांनंतरचे भाग फारच तांत्रिक झाले आहेत.
------------- :H अशोक
29 Jan 2019 - 3:37 am | पुष्कर
विजुभाऊ, या मालिकेतले पुढचे भाग टाकले होतेत का? सापडत नाहीयेत.
29 Jan 2019 - 2:43 pm | विजुभाऊ
मलाही सापडले नाही. लिहीले होते हे अंधूक आठवतय. पहातो इतर कुठे पोस्ट केलं असेल तर.
नसेल तर नव्याने लिहीतो.
29 Jan 2019 - 2:35 pm | बाप्पू
नेमका हाच प्रश्न विचारायचाय.. पुढचा भाग कधी टाकणार??????
29 Jan 2019 - 5:42 pm | पंतश्री
मागचे भाग उघडत नाहि आहेत
30 Jan 2019 - 12:04 am | विजुभाऊ
अनुक्रमणीकेत जाऊन उघडा.
मिपा अप ग्रेड झाल्यामुळे धाग्यांच्या लिंक मधे http या ऐवजी https लागलंय.
जपान लाईफ https://www.misalpav.com/node/8488
जपान लाईफ (२) https://www.misalpav.com/node/8575
जपान लाईफ (३) https://www.misalpav.com/node/8647
भाग ४ https://www.misalpav.com/node/8724
भाग ५ https://www.misalpav.com/node/8754
भाग ६ https://www.misalpav.com/node/8787
भाग ७ https://www.misalpav.com/node/8916