२३ डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन
शेतीतल्या 'श' ची देखिल माहिती नसलेल्या माझ्यासारख्या सामान्याने याबाबत कसंमांडावं म्हणुन बिचकत होतो.
कामानिमित्त माती, पर्यावरण आणि हौसेपोटी 'Own Grown' म्हणजे स्वत:च अन्न स्वत: पिकवा या प्रवासा थोडा अभ्यास होतोय.
कृषीक्षेत्रातील किटकनाशकांचा वापर, आरोग्यावरचे दुष्परिणाम याचबरोबर अजुनही म्हणावा तसा चर्चिला न गेलेला एक मुद्दा आहे.
किटकनाशकांसोबतच शेतीमध्ये तणनाशकांचा वापर वाढलाय. गवत कुळातील या वनस्पती पुर्वी हाताने उपटुन बांधाच्या बाहेर टाकल्या जात. यातील सुमारे ५० ते ६० प्रकारच्या वनस्पती आयुर्वेदीय औषधी निर्माणात वापरली जातात. पारंपारिक पद्घतीत या वनस्पतींची लागवड केली जात नाही. जुने जाणकार शेतकरी भारे बांधुन स्थानिक बाजारात व पुढे वैद्यवर्गापर्यंत किंवा व्यापार्यांपर्यंत पोहोचवत असत. या वनस्पतींची ओळख, वर्गिकरण, वाळवण, साठवण पर्यंतचा पारंपरिक मार्ग हळुहळु खुंटतोय.
तणनाशकांचा वापर करुन या वनस्पती वाढुच न देण्याकडे शेतकर्यांचा कल वाढतोय. नाशिकसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किमान २०० वैद्य कार्यरत असतील. प्रत्येकाच्या दवाखान्यात वापरात असलेल्या वनस्पती द्रव्यांची उपलब्धता अबाधित राखण्याची नैतिक जबाबदारीदेखिल वैद्याचीच आहे. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, गवत, झुडपे ओळखुन त्याचा व्यावसायिक वापर करण्याच्या क्षमता शेतकर्यांपर्यंत पोहोचवता येतिल का, यासाठी हा पोस्ट प्रपंच !!!
सेंद्रिय शेती, परसबागेतील भाजीपाला लागवड, ओल्या कचर्यापासुन कंपोस्ट व त्यावर बहरलेले टेरेस गार्डन, याचसोबत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवांच्या उपजिविकेची साधने असेही अजुन काही किडे आहेतच डोक्यात. ते पुन्हा कधीतरी.©
प्रतिक्रिया
23 Dec 2018 - 5:56 pm | विशुमित
जुने जाणकार शेतकरी भारे बांधुन स्थानिक बाजारात व पुढे वैद्यवर्गापर्यंत किंवा व्यापार्यांपर्यंत पोहोचवत असत
===)) पहिल्यांदाच ऐकत आहे.
....
शेतकरी "दीन" हे शिर्षक वापरण्याचे प्रयोजन नाही समजले ?
23 Dec 2018 - 7:29 pm | आनन्दा
दिन काय आणि दीन काय.. अर्थ पोचल्याशी मतलब नाहीका?
एक वेलांटी एक उकार
संस्कृत चे अत्याचार सहन नाही करणार!!
23 Dec 2018 - 7:34 pm | विशुमित
तुम्हाला नक्की कशाचा त्रास झाला ?
23 Dec 2018 - 7:38 pm | आनन्दा
गांगल आठवले उगीचच :)