एचआयव्ही एडस ह्या विषयावर जागरूकतेसाठी सायकल मोहीम

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 Nov 2018 - 3:49 pm

नमस्कार! गेल्या वेळी जेव्हा योग प्रसारासाठी सायकल प्रवास केला होता, तेव्हा एक माध्यम म्हणून सायकलीची क्षमता दिसली होती. सायकलिंग तर नेहमीच करतो, पण जर एक माध्यम म्हणून सायकल इतकी उपयुक्त आहे, तर एखाद्या सामाजिक विषयासाठी सायकलिंग करावं असा विचार मनात आला. हा विचार करत होतो तेव्हा माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या. माझी बायको आशा एचआयव्ही- एडस ह्या विषयावर रिलीफ फाउंडेशन संस्थेसोबत अनेक वर्षांपासून काम करते. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे सहाय्य असलेली रिलीफ फाउंडेशन एचआयव्हीविषयी जागरुकता आणि मायग्रंट वर्कर्स अशा विषयांवर काम करते. त्याबरोबर परभणीचे माझे सायकल मित्र डॉ. पवन चांडक अनेक वर्षांपासून एचआयव्ही असलेल्या मुलांच्या बाल गृहांना मदत करतात. ह्या दोन्ही बाबींना समोर ठेवून एका सोलो सायकल मोहिमेची योजना बनवली. रिलीफ फाउंडेशन ह्या सायकल मोहीमेचे समन्वयन करणार आहे.

मोहीमेत दररोज सकाळी सुमारे ८०+ किलोमीटर सायकल चालवेन. एचआयव्ही असलेल्या मुलांची बाल गृहे चालवणा-या चार संस्थांना भेट देईन. तिथे सुरू असलेलं काम, तिथल्या कार्यकर्त्यांचे अनुभव ह्यावर चर्चा होईल. त्याशिवाय मुलांसोबत गप्पा व संवाद होईल. तसंच दुसरी भेट कार्यकर्त्यांसोबत त्यांचे अनुभव, सक्सेस स्टोरीज ह्याविषयी होतील. ह्या चार संस्था अशा आहेत- पंढरपूर- पालवी प्रकल्प, बीड- इन्फँट इंडिया संस्था (इथल्या दत्ता बारगजेंनी पाच वर्षं हेमलकसाला काम केलं आहे), हसेगांव (लातूर)- सेवालय रवी बापटले आणि अकोला- सर्वोदय एडस बालगृह ही आहेत.

ह्या संस्थांमधलं अंतर मोठं आहे, त्यामुळे प्रवासात अनेक टप्पे होतील. वाटेतल्या ह्या विषयावर काम करणा-या स्थानिक कार्यकर्त्यांना भेटेन, एचआयव्ही एडससंदर्भात जागरूकतेची पत्रकं लोकांना देईन. जिथे संधी मिळेल, तिथे छोट्या ग्रूपसोबत चर्चा करेन. एचआयव्ही असलेल्या लोकांना त्यांच्या ट्रीटमेंटचे चांगले लाभ कसे मिळू शकतात, त्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी जीवनशैली कशा प्रकारची असावी, योग व फिटनेस त्या संदर्भात कसा महत्त्वाचा आहे, ह्यावर बोलेन. माझ्या सायकल डायरीतून हे अनुभव समाजापुढे मांडेन. किती बिकट परिस्थितीत लोक काम करतात, हेही समाजापुढे येणं गरजेचं आहे.

उद्दिष्टे:

१. चांगलं काम करत असलेल्या लोकांचे अनुभव ऐकणे, त्यांना भेटणे व त्यांच्यासोबत बोलणं, हासुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठा 'पॉझिटिव्ह स्ट्रोक' असतो.
२. एचआयव्ही असलेल्या मुलांसोबत त्यांना रिफ्रेश करणारा अनौपचारिक संवाद.
३. ह्या विषयाचे विविध पैलू, त्यातील अडचणी व समस्या समोर ठेवणे आणि समाजाची जागरुकता वाढवण्यावर भर देणे.
४. वेगवेगळ्या प्रकारच्या सक्सेस स्टोरीज व अडचणींमधून सुरू असलेला संघर्ष समाजापुढे आणणे.

मोहिमेचा रूट

१४ नोव्हेंबर ला बाल दिन आहे. त्या दिवशी पंढरपूरच्या बाल गृहात पोहचण्याची योजना आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबरला निघेन. ह्यामध्ये दहा जिल्ह्यांमध्ये सायकल चालवेन.

दिवस १ : १२ नोव्हेंबर, सोमवार: चाकण ते केडगांव: ८४ किमी
दिवस २ : १३ नोव्हेंबर, मंगळवार: केडगांव ते इंदापूर: ८५ किमी
दिवस ३ : १४ नोव्हेंबर, बुधवार: इंदापूर ते पंढरपूर: ७२ किमी
दिवस ४ : १५ नोव्हेंबर, गुरुवार: पंढरपूर ते बार्शी: ८२ किमी
दिवस ५ : १६ नोव्हेंबर: शुक्रवार: बार्शी ते पाली, बीड: १०४ किमी
दिवस ६ : १७ नोव्हेंबर: शनिवार: बीड ते अंबेजोगाई: ९० किमी
दिवस ७ : १८ नोव्हेंबर: रविवार: अंबेजोगाई- लातूर- हसेगांव: ८४ किमी
दिवस ८ : १९ नोव्हेंबर: सोमवार: हसेगांव ते अहमदपूर: ७५ किमी
दिवस ९ : २० नोव्हेंबर: मंगळवार: अहमदपूर ते नांदेड: ६७ किमी
दिवस १० : २१ नोव्हेंबर: बुधवार: नांदेड ते हिंगोली: ९२ किमी
दिवस ११ : २२ नोव्हेंबर: गुरुवार: हिंगोली ते वाशिम: ५१ किमी
दिवस १२ : २३ नोव्हेंबर: शुक्रवार: वाशिम ते अकोला: ७६ किमी
दिवस १३ : २४ नोव्हेंबर: शनिवार: अकोला ते रिसोड: ९७ किमी
दिवस १४ : २५ नोव्हेंबर: रविवार: रिसोड ते परभणी: १०० किमी

एकूण १४ दिवस आणि एकूण अंतर: सुमारे ११६५ किमी.

२५ नोव्हेंबरला हा प्रवास पूर्ण होईल. जागतिक एचआयव्ही दिवस अर्थात् १ डिसेंबरला एखाद्या कार्यक्रमात माझे अनुभव शेअर करेन. हे काम कशा प्रकारे सुरू आहे, काय अडचणी आहेत ह्यावर लिहेन (उदाहरणार्थ, कार्यकर्त्यांना लोकांनी केलेली मारहाण किंवा संस्थेची पाडलेली इमारत व इतर). एचआयव्ही म्हणजे काही लोकांना माहिती असलेल्या चार गोष्टीच नाही, तर त्यात अनेक जटील समस्या असतात व त्यावर उपायही असतात (जसे एआरटी थेरपीसोबत 'पॉझिटिव्ह' जीवनशैलीचा अंगीकार) हे सर्व समाजापुढे आणता येईल. आणि कोणत्याही सामाजिक समस्येच्या मुळाशी अज्ञान, गैरसमज, जागरुकता व जवाबदारीचा अभाव असतो. त्यावरही चर्चा होऊ शकेल.

जर आपल्या माहितीत ह्या मोहीमेच्या रूटवर एचआयव्ही विषयावर काम करणा-या संस्था/ ग्रूप्स असतील, तर आपण त्यांची माहिती देऊ शकता. प्रवास सुरू झाल्यावर अपडेटस देईनच. खूप खूप धन्यवाद!

माझ्या आधीच्या मोहीमांचे अनुभव- माझा ब्लॉग (माझा मोबाईल नंबर निरंजन: 09422108376)

ह्या सायकल मोहीमेचे समन्वयन रिलीफ फाउंडेशन, भोसरी, पुणे करत आहे. संपर्क: 07350016571

समाजजीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

अक्षय देपोलकर's picture

10 Nov 2018 - 5:55 pm | अक्षय देपोलकर

अभिनंदन आणि खुप शुभेच्छा..

सविता००१'s picture

10 Nov 2018 - 6:05 pm | सविता००१
सविता००१'s picture

10 Nov 2018 - 6:05 pm | सविता००१
सविता००१'s picture

10 Nov 2018 - 6:05 pm | सविता००१
डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2018 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभिनंदन आणि आभार ! तुमच्या प्रशंसनिय उपक्रमांचे आणि सायकप्रवासाचे नेहमीच कौतूक वाटते.

मार्गी's picture

10 Nov 2018 - 7:57 pm | मार्गी

खूप खूप धन्यवाद! मलाही इथल्या सगळ्यांपासून प्रेरणा मिळते.

चष्मेबद्दूर's picture

10 Nov 2018 - 10:05 pm | चष्मेबद्दूर

अतिशय छान उपक्रम. अनुभवलेखनाची वाट बघत आहे.

जावई's picture

10 Nov 2018 - 10:18 pm | जावई

आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

निशाचर's picture

11 Nov 2018 - 4:59 am | निशाचर

उपक्रमाला शुभेच्छा!

अनन्त्_यात्री's picture

11 Nov 2018 - 9:53 am | अनन्त्_यात्री

शुभेच्छा!

मार्गी's picture

12 Nov 2018 - 2:26 pm | मार्गी

पहिल्या दिवसाचं अपडेट- आज ८४ किलोमीटर सायकल चालवून केडगांव चौफुल्याला आलो. इथे संस्था/ ग्रूप नसल्यामुळे काही जणांशी व्यक्तिगत संवाद करेन.

मार्गी's picture

13 Nov 2018 - 3:22 pm | मार्गी

दुसऱ्या दिवसाचं अपडेट- आज केडगांव चौफुल्यावरून इंदापूरला आलो. ८५ किमी झाले. संध्याकाळी इंदापूर शासकीय महाविद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम आहे.

मार्गी's picture

14 Nov 2018 - 5:12 pm | मार्गी

आजचं अपडेट-आज ७९ किमी सायकल चालवून पंढरपूरला पालवी संस्थेत आलो. संस्थेचं काम बघत आहे व रात्री मुलांसोबत संवाद आहे. आजचा दिवस खूप शिकवणारा आहे. एचआयवीवर काम करणारे इतर लोकांचीही भेट झाली.

मार्गी's picture

15 Nov 2018 - 4:44 pm | मार्गी

काल पालवी संस्थेत मुलांशी छान भेट झाली. एक वेगळं जग जवळून बघता आलं...... आज पंढरपूरातून ८८ किमी सायकल चालवून बार्शीला आलो. एडसवर काम करणाऱ्या रेड लाईट एरियातल्या संस्थेला भेट दिली.

मार्गी's picture

16 Nov 2018 - 5:33 pm | मार्गी

आज पाचव्या दिवशी बार्शीवरून बीडला आलो. आज ९५ किमी झाले व ५ दिवसांमध्ये ४२९ किमी. फार जबरदस्त अनुभव मिळत आहेत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Nov 2018 - 4:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

भ्रमंती संपली की या मोहीमेतल्या अनुभवांबद्दल विस्ताराने लिहाच.
उर्वरीत मोहीमेसाठी हार्दिक शुभेच्छा.
पैजारबुवा,

मार्गी's picture

17 Nov 2018 - 7:06 pm | मार्गी

आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी's picture

17 Nov 2018 - 7:07 pm | मार्गी

आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी's picture

18 Nov 2018 - 4:10 pm | मार्गी

अपडेट- आज अंबेजोगाईवरून लातूरजवळ सेवालय बालगृहात आलो. ७५ किमी सायकल चालवली. इथल्या संस्थेचं काम जाणून घेत आहे.

मार्गी's picture

19 Nov 2018 - 5:47 pm | मार्गी

अपडेट- लातूरजवळ सेवालय संस्थेला भेट देऊन आज अहमदपूरला आलो. ७६ किमी सायकल चालवली. अहमदपूरला महाविद्यालयात एक छोटा कार्यक्रम झाला.

मार्गी's picture

21 Nov 2018 - 5:06 pm | मार्गी

अपडेट- काल अहमदपूर- नांदेड ७४ किमी आलो. अनेक संस्था व टीम्ससोबत चर्चा झाली. आज नांदेड- कळमनुरी ६८ किमी आलो. इथेही खूप छान संवाद झाला. १० दिवसांत एकूण ८०७ किमी झाले. चार दिवस बाकी.

मार्गी's picture

23 Nov 2018 - 5:40 pm | मार्गी

अपडेट- काल कळमनुरी- वाशिम ६५ किमी आलो. वाशिमचा कार्यक्रम छान झाला. सायकलिस्टही भेटले. आज वाशिम अकोला ८५ किमी आलो. आज सूर्योदय बालगृहात भेट देत आहे. एकूण १२ दिवसांमध्ये ९५७ किमी झाले. आता दोन दिवस बाकी.

शुभेच्छा! अनुभव नक्की लिहा.

मार्गी's picture

25 Nov 2018 - 6:57 pm | मार्गी

ही मोहीम आज पूर्ण झाली. काल अकोला रिसोड १०५ किमी व आज रिसोड परभणी १०३ असे मिळून १४ दिवसांमध्ये ११६५ किमी पूर्ण झाले. खूप खूप गोष्टी बघता आल्या, खूप शिकायला मिळालं. लवकरच लिहायला सुरुवात करेन. धन्यवाद.

प्रसाद_१९८२'s picture

25 Nov 2018 - 7:06 pm | प्रसाद_१९८२

या मोहिमेत आलेले बरे वाईट अनुभव नक्की लिहा.