✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एचआयव्ही एडस ह्या विषयावर जागरूकतेसाठी सायकल मोहीम

म
मार्गी यांनी
Sat, 11/10/2018 - 15:49  ·  लेख
लेख
नमस्कार! गेल्या वेळी जेव्हा योग प्रसारासाठी सायकल प्रवास केला होता, तेव्हा एक माध्यम म्हणून सायकलीची क्षमता दिसली होती. सायकलिंग तर नेहमीच करतो, पण जर एक माध्यम म्हणून सायकल इतकी उपयुक्त आहे, तर एखाद्या सामाजिक विषयासाठी सायकलिंग करावं असा विचार मनात आला. हा विचार करत होतो तेव्हा माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या. माझी बायको आशा एचआयव्ही- एडस ह्या विषयावर रिलीफ फाउंडेशन संस्थेसोबत अनेक वर्षांपासून काम करते. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे सहाय्य असलेली रिलीफ फाउंडेशन एचआयव्हीविषयी जागरुकता आणि मायग्रंट वर्कर्स अशा विषयांवर काम करते. त्याबरोबर परभणीचे माझे सायकल मित्र डॉ. पवन चांडक अनेक वर्षांपासून एचआयव्ही असलेल्या मुलांच्या बाल गृहांना मदत करतात. ह्या दोन्ही बाबींना समोर ठेवून एका सोलो सायकल मोहिमेची योजना बनवली. रिलीफ फाउंडेशन ह्या सायकल मोहीमेचे समन्वयन करणार आहे. मोहीमेत दररोज सकाळी सुमारे ८०+ किलोमीटर सायकल चालवेन. एचआयव्ही असलेल्या मुलांची बाल गृहे चालवणा-या चार संस्थांना भेट देईन. तिथे सुरू असलेलं काम, तिथल्या कार्यकर्त्यांचे अनुभव ह्यावर चर्चा होईल. त्याशिवाय मुलांसोबत गप्पा व संवाद होईल. तसंच दुसरी भेट कार्यकर्त्यांसोबत त्यांचे अनुभव, सक्सेस स्टोरीज ह्याविषयी होतील. ह्या चार संस्था अशा आहेत- पंढरपूर- पालवी प्रकल्प, बीड- इन्फँट इंडिया संस्था (इथल्या दत्ता बारगजेंनी पाच वर्षं हेमलकसाला काम केलं आहे), हसेगांव (लातूर)- सेवालय रवी बापटले आणि अकोला- सर्वोदय एडस बालगृह ही आहेत. ह्या संस्थांमधलं अंतर मोठं आहे, त्यामुळे प्रवासात अनेक टप्पे होतील. वाटेतल्या ह्या विषयावर काम करणा-या स्थानिक कार्यकर्त्यांना भेटेन, एचआयव्ही एडससंदर्भात जागरूकतेची पत्रकं लोकांना देईन. जिथे संधी मिळेल, तिथे छोट्या ग्रूपसोबत चर्चा करेन. एचआयव्ही असलेल्या लोकांना त्यांच्या ट्रीटमेंटचे चांगले लाभ कसे मिळू शकतात, त्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी जीवनशैली कशा प्रकारची असावी, योग व फिटनेस त्या संदर्भात कसा महत्त्वाचा आहे, ह्यावर बोलेन. माझ्या सायकल डायरीतून हे अनुभव समाजापुढे मांडेन. किती बिकट परिस्थितीत लोक काम करतात, हेही समाजापुढे येणं गरजेचं आहे. उद्दिष्टे: १. चांगलं काम करत असलेल्या लोकांचे अनुभव ऐकणे, त्यांना भेटणे व त्यांच्यासोबत बोलणं, हासुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठा 'पॉझिटिव्ह स्ट्रोक' असतो. २. एचआयव्ही असलेल्या मुलांसोबत त्यांना रिफ्रेश करणारा अनौपचारिक संवाद. ३. ह्या विषयाचे विविध पैलू, त्यातील अडचणी व समस्या समोर ठेवणे आणि समाजाची जागरुकता वाढवण्यावर भर देणे. ४. वेगवेगळ्या प्रकारच्या सक्सेस स्टोरीज व अडचणींमधून सुरू असलेला संघर्ष समाजापुढे आणणे. मोहिमेचा रूट १४ नोव्हेंबर ला बाल दिन आहे. त्या दिवशी पंढरपूरच्या बाल गृहात पोहचण्याची योजना आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबरला निघेन. ह्यामध्ये दहा जिल्ह्यांमध्ये सायकल चालवेन. दिवस १ : १२ नोव्हेंबर, सोमवार: चाकण ते केडगांव: ८४ किमी दिवस २ : १३ नोव्हेंबर, मंगळवार: केडगांव ते इंदापूर: ८५ किमी दिवस ३ : १४ नोव्हेंबर, बुधवार: इंदापूर ते पंढरपूर: ७२ किमी दिवस ४ : १५ नोव्हेंबर, गुरुवार: पंढरपूर ते बार्शी: ८२ किमी दिवस ५ : १६ नोव्हेंबर: शुक्रवार: बार्शी ते पाली, बीड: १०४ किमी दिवस ६ : १७ नोव्हेंबर: शनिवार: बीड ते अंबेजोगाई: ९० किमी दिवस ७ : १८ नोव्हेंबर: रविवार: अंबेजोगाई- लातूर- हसेगांव: ८४ किमी दिवस ८ : १९ नोव्हेंबर: सोमवार: हसेगांव ते अहमदपूर: ७५ किमी दिवस ९ : २० नोव्हेंबर: मंगळवार: अहमदपूर ते नांदेड: ६७ किमी दिवस १० : २१ नोव्हेंबर: बुधवार: नांदेड ते हिंगोली: ९२ किमी दिवस ११ : २२ नोव्हेंबर: गुरुवार: हिंगोली ते वाशिम: ५१ किमी दिवस १२ : २३ नोव्हेंबर: शुक्रवार: वाशिम ते अकोला: ७६ किमी दिवस १३ : २४ नोव्हेंबर: शनिवार: अकोला ते रिसोड: ९७ किमी दिवस १४ : २५ नोव्हेंबर: रविवार: रिसोड ते परभणी: १०० किमी एकूण १४ दिवस आणि एकूण अंतर: सुमारे ११६५ किमी. २५ नोव्हेंबरला हा प्रवास पूर्ण होईल. जागतिक एचआयव्ही दिवस अर्थात् १ डिसेंबरला एखाद्या कार्यक्रमात माझे अनुभव शेअर करेन. हे काम कशा प्रकारे सुरू आहे, काय अडचणी आहेत ह्यावर लिहेन (उदाहरणार्थ, कार्यकर्त्यांना लोकांनी केलेली मारहाण किंवा संस्थेची पाडलेली इमारत व इतर). एचआयव्ही म्हणजे काही लोकांना माहिती असलेल्या चार गोष्टीच नाही, तर त्यात अनेक जटील समस्या असतात व त्यावर उपायही असतात (जसे एआरटी थेरपीसोबत 'पॉझिटिव्ह' जीवनशैलीचा अंगीकार) हे सर्व समाजापुढे आणता येईल. आणि कोणत्याही सामाजिक समस्येच्या मुळाशी अज्ञान, गैरसमज, जागरुकता व जवाबदारीचा अभाव असतो. त्यावरही चर्चा होऊ शकेल. जर आपल्या माहितीत ह्या मोहीमेच्या रूटवर एचआयव्ही विषयावर काम करणा-या संस्था/ ग्रूप्स असतील, तर आपण त्यांची माहिती देऊ शकता. प्रवास सुरू झाल्यावर अपडेटस देईनच. खूप खूप धन्यवाद! माझ्या आधीच्या मोहीमांचे अनुभव- माझा ब्लॉग (माझा मोबाईल नंबर निरंजन: 09422108376) ह्या सायकल मोहीमेचे समन्वयन रिलीफ फाउंडेशन, भोसरी, पुणे करत आहे. संपर्क: 07350016571
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
7785 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

अभिनंदन आणि खुप शुभेच्छा..

अक्षय देपोलकर
Sat, 11/10/2018 - 17:55 नवीन
अभिनंदन आणि खुप शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सविता००१
Sat, 11/10/2018 - 18:05 नवीन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सविता००१
Sat, 11/10/2018 - 18:05 नवीन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सविता००१
Sat, 11/10/2018 - 18:05 नवीन
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि आभार ! तुमच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/10/2018 - 18:20 नवीन
अभिनंदन आणि आभार ! तुमच्या प्रशंसनिय उपक्रमांचे आणि सायकप्रवासाचे नेहमीच कौतूक वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Sat, 11/10/2018 - 19:57 नवीन
खूप खूप धन्यवाद! मलाही इथल्या सगळ्यांपासून प्रेरणा मिळते.
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा

चष्मेबद्दूर
Sat, 11/10/2018 - 22:05 नवीन
अतिशय छान उपक्रम. अनुभवलेखनाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

जावई
Sat, 11/10/2018 - 22:18 नवीन
आपणांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उपक्रमाला शुभेच्छा!

निशाचर
Sun, 11/11/2018 - 04:59 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उपक्रमाला

अनन्त्_यात्री
Sun, 11/11/2018 - 09:53 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

पहिल्या दिवसाचं अपडेट

मार्गी
Mon, 11/12/2018 - 14:26 नवीन
पहिल्या दिवसाचं अपडेट- आज ८४ किलोमीटर सायकल चालवून केडगांव चौफुल्याला आलो. इथे संस्था/ ग्रूप नसल्यामुळे काही जणांशी व्यक्तिगत संवाद करेन.
  • Log in or register to post comments

दुसऱ्या दिवसाचं अपडेट

मार्गी
Tue, 11/13/2018 - 15:22 नवीन
दुसऱ्या दिवसाचं अपडेट- आज केडगांव चौफुल्यावरून इंदापूरला आलो. ८५ किमी झाले. संध्याकाळी इंदापूर शासकीय महाविद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments

आजचं अपडेट

मार्गी
Wed, 11/14/2018 - 17:12 नवीन
आजचं अपडेट-आज ७९ किमी सायकल चालवून पंढरपूरला पालवी संस्थेत आलो. संस्थेचं काम बघत आहे व रात्री मुलांसोबत संवाद आहे. आजचा दिवस खूप शिकवणारा आहे. एचआयवीवर काम करणारे इतर लोकांचीही भेट झाली.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
गुरुवार, 11/15/2018 - 16:44 नवीन
काल पालवी संस्थेत मुलांशी छान भेट झाली. एक वेगळं जग जवळून बघता आलं...... आज पंढरपूरातून ८८ किमी सायकल चालवून बार्शीला आलो. एडसवर काम करणाऱ्या रेड लाईट एरियातल्या संस्थेला भेट दिली.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Fri, 11/16/2018 - 17:33 नवीन
आज पाचव्या दिवशी बार्शीवरून बीडला आलो. आज ९५ किमी झाले व ५ दिवसांमध्ये ४२९ किमी. फार जबरदस्त अनुभव मिळत आहेत...
  • Log in or register to post comments

जबरा....

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 11/17/2018 - 16:56 नवीन
भ्रमंती संपली की या मोहीमेतल्या अनुभवांबद्दल विस्ताराने लिहाच. उर्वरीत मोहीमेसाठी हार्दिक शुभेच्छा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Sat, 11/17/2018 - 19:06 नवीन
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Sat, 11/17/2018 - 19:07 नवीन
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Sun, 11/18/2018 - 16:10 नवीन
अपडेट- आज अंबेजोगाईवरून लातूरजवळ सेवालय बालगृहात आलो. ७५ किमी सायकल चालवली. इथल्या संस्थेचं काम जाणून घेत आहे.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Mon, 11/19/2018 - 17:47 नवीन
अपडेट- लातूरजवळ सेवालय संस्थेला भेट देऊन आज अहमदपूरला आलो. ७६ किमी सायकल चालवली. अहमदपूरला महाविद्यालयात एक छोटा कार्यक्रम झाला.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Wed, 11/21/2018 - 17:06 नवीन
अपडेट- काल अहमदपूर- नांदेड ७४ किमी आलो. अनेक संस्था व टीम्ससोबत चर्चा झाली. आज नांदेड- कळमनुरी ६८ किमी आलो. इथेही खूप छान संवाद झाला. १० दिवसांत एकूण ८०७ किमी झाले. चार दिवस बाकी.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Fri, 11/23/2018 - 17:40 नवीन
अपडेट- काल कळमनुरी- वाशिम ६५ किमी आलो. वाशिमचा कार्यक्रम छान झाला. सायकलिस्टही भेटले. आज वाशिम अकोला ८५ किमी आलो. आज सूर्योदय बालगृहात भेट देत आहे. एकूण १२ दिवसांमध्ये ९५७ किमी झाले. आता दोन दिवस बाकी.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! अनुभव नक्की लिहा.

प्रभो
Fri, 11/23/2018 - 17:52 नवीन
शुभेच्छा! अनुभव नक्की लिहा.
  • Log in or register to post comments

अपडेट

मार्गी
Sun, 11/25/2018 - 18:57 नवीन
ही मोहीम आज पूर्ण झाली. काल अकोला रिसोड १०५ किमी व आज रिसोड परभणी १०३ असे मिळून १४ दिवसांमध्ये ११६५ किमी पूर्ण झाले. खूप खूप गोष्टी बघता आल्या, खूप शिकायला मिळालं. लवकरच लिहायला सुरुवात करेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

प्रसाद_१९८२
Sun, 11/25/2018 - 19:06 नवीन
या मोहिमेत आलेले बरे वाईट अनुभव नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा