<<गाळलेली हात भट्टीची>>

कुंदन's picture
कुंदन in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 7:27 pm

<<गाळलेली हात भट्टीची>>

लेवुन तवंग नवसागराचा,
दारु होती तेलकट||

न पोलिसांचे डोंगर आडवे
न एक्साईज चे किल्ले रासवट||

देशीच्या बारची दारं उघडी सताड
उद्याचा दिवस आहे रात्रीच्या पल्याड||

बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची
खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा||

शिलगावुनी सिगारेट
मारला एक झुरका||

सोडा/पाणी टाकुन घेणे
मला कधी ते जमणेच नाही ||

फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी
दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Mar 2009 - 7:29 pm | अवलिया

वा!
या विडंबक पंथात तुम्हीच बाकी होते....

--अवलिया

दशानन's picture

13 Mar 2009 - 2:26 pm | दशानन

हेच म्हणतो.

बाकी .. लैभारी कुंदन... ! लगे रहो !

घाटावरचे भट's picture

16 Mar 2009 - 10:01 am | घाटावरचे भट

सहमत. देर से आये, लेकिन आये तो सही!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2009 - 7:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी
हाहाहा, मानलं हो कुंदनभौ तुम्हाला!

(अवांतरः ही घ्या उपकारांची परतफेड!)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 7:30 pm | बिपिन कार्यकर्ते

कुंदनशेठ, तरीच तुम्ही सात्विक कट्ट्याला का टांग देता ते आता कळलं. मैदानात स्वागत आहे. जबरदस्त.

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 7:34 pm | परिकथेतील राजकुमार

कट्टा का टाळला गेला ते आत्ता कळाले हो ;)
बाकी विडंबन झकासच हो कुंदनभौ !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शेखर's picture

12 Mar 2009 - 7:33 pm | शेखर

सुंदर विडंबन....
चला अजुन एका विडंबकाची एंट्री ....

बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची
खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा||

पेक्षा

बरोबर हवी खरी , साथ खारट मीठाची
खारे दाणे किंवा फुटाणे , अन ग्लास हवा काचेचा||

असे बरे वाटले असते. ;)

कुंदन's picture

12 Mar 2009 - 7:34 pm | कुंदन

दारुची चव खराब करायची आहे का तुला? ;-)

शेखर's picture

12 Mar 2009 - 7:35 pm | शेखर

देशी कधी घेतली ( पिली ) आहे का? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 7:46 pm | परिकथेतील राजकुमार

खरे तर देशी आणी हातभट्टी ह्यामध्ये खुप फरक आहे.
खारे दाणे , फुटाणे वगैरे माल मिळतो देशी थर्र्या मध्ये आणी हातभट्टीच्या अड्ड्यावर फक्त सुकलेल्या मिरच्या आणी काळे मिठ असते.

प्यासा चा शेजारी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मदनबाण's picture

12 Mar 2009 - 7:33 pm | मदनबाण

उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!! ;)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

अनिल हटेला's picture

16 Mar 2009 - 8:35 am | अनिल हटेला

उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!!

आणी पीउन झाल्यावर विडंबन ही करतो उंट !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनायक प्रभू's picture

12 Mar 2009 - 7:38 pm | विनायक प्रभू

विडंबनकारांची संख्या दिवसेदिवस अशीच वाढत राहो.

निखिल देशपांडे's picture

12 Mar 2009 - 7:40 pm | निखिल देशपांडे

अजुन एक विडंबन.... चालु द्या मस्तच मज्ज्या येत आहे.....

बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची
खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा||

वा क्या बात है

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2009 - 10:07 pm | प्रकाश घाटपांडे

फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी
दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||

लज्जत कशी आहे बघावी म्हंतो? कवा बसायच?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कुंदन's picture

16 Mar 2009 - 4:54 pm | कुंदन

तुम्ही बिल भरणार असाल तर, लवकरच बसुयात......

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2009 - 5:00 pm | प्रकाश घाटपांडे

बिलाची लज्जत तुमी चाका आमी भट्टीच पघतो. फारतर लिज्जत पापड आमी पघतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

जयवी's picture

12 Mar 2009 - 10:51 pm | जयवी

अरे वा...... एक से बढकर एक चल रहा यहा तो :) मज्जा येतेय सॉलीड !!

दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी........ हे तर झकासच ......!

लगे रहो लोक्स :)

मृगनयनी's picture

13 Mar 2009 - 10:42 am | मृगनयनी

मस्त! कुन्दन जी.....
:)

बाकी, उन्टालाही मदिरेची तहान लागते.... हेच खरं! ;) ;) ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

धमाल मुलगा's picture

13 Mar 2009 - 12:57 pm | धमाल मुलगा

कुंदन....यु टू??????????

=))
आयला, काय लिहलंय, काय लिहलंय! अशक्य आहेत बॉ मंडळी!!
लढ बाप्पू लढ!

अवांतरः आयला, ह्या कवितांना एक अप्पर सर्किट लावा बॉ! ट्रेड व्हॉल्युम गपागप वाढत चाललाय आणि पंगा असा की बोंबलायला त्यातलं काडीभरही कळत नाय आमच्यासारख्या दगडांना :(

-(बी ग्रुपमध्ये चवल्या-पावल्या गुंतवणारा) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 2:20 pm | विसोबा खेचर

जबरा..!

मान गये भिडू...

आपला,
(मदिराप्रेमी) तात्या.

टारझन's picture

15 Mar 2009 - 12:05 am | टारझन

वा !!!

आपला
(कोक ऑण द रॉक्स प्रेमी) टार्‍या भयंकर
आता मार खायच्या आत पळायला हवे

भडकमकर मास्तर's picture

13 Mar 2009 - 5:27 pm | भडकमकर मास्तर

भारी झालंय विडंबन ... :)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Mar 2009 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll

वाहवा झकास जमले आहे विडंबन. :) एक लंबर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984