हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!

Primary tabs

रुस्तुम's picture
रुस्तुम in जनातलं, मनातलं
14 Jul 2018 - 12:35 pm

हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!

हिमा दासने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पटकावलं आणि माझ्या बकेट लिस्ट मधील एका गोष्टीवर अर्धी टिक आली (अर्धीच म्हणतोय कारण पूर्ण ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतरच होईल. तसे अभिनव बिंद्राने सुवर्ण जिंकलेले पण ते पाहण्यात नव्हते आले फक्त वाचण्यात आले होते). तशी ही गोष्ट बुकेत लिस्ट वर अचानकच आली म्हणजे २०१६ मधील ऑलिम्पिक बघताना.

बरेचसे इंग्लिश शब्द/वाक्य आपण अगदी सहजगत्या त्या शब्द/वाक्यांमागच्या भावनेचा विचार न करता फेकत (पक्षी:वापरत) असतो जसे की सॉरी, थँक यू आणि असेच.. त्याच पठडीतले एक वाक्य म्हणजे "U make us feel proud/feeling proud". त्या मागे बहुतेकदा औपचारिकताच जास्ती असते. खऱ्या अभिमानाची भावना फारच कमी वेळा असते. तर बोल्टचा त्या दिवशी इव्हेंट होता (अर्थात 100mtr ची पात्रता फेरी) म्हणून ऑलिम्पिक बघत होतो आणि मध्ये मध्ये थाळी फेक ही दाखवत होते. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा विजेता पोलंडचा मलचोवस्की हा पहिल्या 4 फेकीपर्यंत पुढे होता आणि त्याचे सुवर्ण पदक जवळपास निश्चित होते. पण जर्मनीच्या हर्टींगने शेवटच्या फेकीत 68 मीटर लांब थाळी फेकत जवळपास सुवर्ण निश्चित केले. मलचोवस्कीकडे अजून एक संधी होती पण त्या संधीआधी तो बहुदा पराभव पत्करून आलेला, त्याच्या हावभावावरुन जाणवत होते. तो मान हलवतच आला आणि अपेक्षेप्रमाणे हर्टींग च्या पुढे जाऊ शकला नाही आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हर्टींगचे नेत्रसुखद विजयाचे सेलेब्रेशन चालू होते. आता पदके प्रदान करण्यासाठी त्यांना पोडियम वर बोलावले (अजून पर्यंत ऑलिम्पिक मधील पदक प्रदान सोहळा मी थेट पाहिला नव्हता). तिघांना पदके दिल्यावर त्यांच्या देशाचे झेंडे फडकवण्यात आले आणि राष्ट्रगीत वाजवण्यात आले. जर्मनीचा झेंडा वर घेताना हर्टींगचे expressions आणि आपोआप रुंद झालेली छाती पाहून माझ्याही भावना त्या क्षणी उफाळून आल्या आणि अचानक त्या "feeling proud" ह्या वाक्या मागचा खरा अर्थ उमगला. जर एका दुसऱ्या देशातल्या खेळाडूला पदक स्विकारताना पाहून एवढे भरून येते तर आपल्याच देशातील खेळाडूला पदक स्विकारताना आणि तिरंगा वर येताना किती अभिमान वाटेल!!

हर्टींग राष्ठ्रध्वजाकडे अभिमानाने पाहताना

त्या क्षणापासून मग ही गोष्ट माझ्या बकेटलिस्ट मध्ये ऍड झाली. आणि एकंदरीतच स्पोर्ट्स ला येत असलेले अच्छे दिन बघता ही गोष्ट फार दूर नाही ह्याची जाणीव होतीच. किंबहुना त्या स्पर्धेतच सिंधू बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात मारिनशी थोडक्यात हरली अन्यथा त्याच ऑलिम्पिक मध्ये तो क्षण अनुभवता आला असता. २०२० मध्ये मात्र हे नक्कीच अनुभवता येईल ही आशा नव्हे खात्री आहे.

क्रीडाविचारसद्भावना

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

Golden girl Hima Das breaks records — and liquor vends

हिमा दास ही भारताची सुवर्णकन्या केवळ सर्वोत्तम धावपटूच नाही तर सामाजिक भान असणारी एक सजग नागरिकही आहे... तिने पुढाकार घेऊन तिच्या गावातली दारूची दुकाने बंद केली आहेत.

भारताच्या या सुवर्णकन्येस मानाचा मुजरा, हार्दीक अभिनंदन आणि तिची कामगिरी उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

पैलवान's picture

14 Jul 2018 - 9:05 pm | पैलवान

भारताच्या या सुवर्णकन्येस मानाचा मुजरा, हार्दीक अभिनंदन आणि तिची कामगिरी उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

रुस्तुम's picture

15 Jul 2018 - 1:44 pm | रुस्तुम

तिच्या दारूबंदीच्या पुढाकाराविषयी माहित नव्हते. मस्त. ब्रावो गर्ल . more power to her !!!

जेम्स वांड's picture

14 Jul 2018 - 2:36 pm | जेम्स वांड

कुठलंही फेक फेमिनिजम नाही. कुठलीही अतर्क्य लॉजिक फेकणे नाही, फुकट माज नाही. पोरगी आली तिने नारीशक्ती दाखवली अन ती सगळ्यांना अभिमान वाटावा असे क्षण देऊन गेली!. स्ट्रेट वर्क नो बुलशीट प्रकारचा हा परफॉर्मन्स प्रचंड आवडला.

रुस्तुम's picture

15 Jul 2018 - 1:45 pm | रुस्तुम

+१११

अर्जुन's picture

14 Jul 2018 - 7:49 pm | अर्जुन

खालिल लिन्क पहा , तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

https://vimeo.com/user87300812/review/279991156/898043b5c8

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

संपूर्ण ऐतिहासिक रेस...

(युट्युबवरून साभार)

अर्जुन's picture

14 Jul 2018 - 11:14 pm | अर्जुन

डॉक्टरसाहेब,

विडिओ कॉमेंटमधे कसा टाकायचा ? म ला पण टाकायचा होता पण जमले नाही . म्हणुन लिंक दीली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. व्हिडिओ सुरु करा.

२. चालू व्हिडिओवर राईट क्लिक केल्यावर "कॉपी एंबेड कोड" असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यास एंबेड कोड कॉपी होतो.

(तसा पर्याय न दिसल्यास ते संस्थळ तो व्हिडिओ इतर संस्थळावर दाखविण्याची परवानगी देत नाही असे समजावे... जे तुम्ही दिलेल्या vimeo.com या संस्थळावरच्या व्हिडिओच्या बाबतीत खरे आहे... असे बर्‍याच प्रोप्रायटरी संस्थळांच्या बाबतीत होते. तसे असल्यास : (अ) तुम्ही दिली तशी बाह्य व्हिडिओची लिंक द्या किंवा (आ) यु ट्युबवर तो/तत्सम व्हिडिओ शोधा व त्याचा एंबेड कोड कॉपी करा.)

३. कॉपी केलेला कोड मिपामध्ये जसाच्या तसा पेस्ट करा व खात्री करण्यासाठी "पूर्वपरिक्षण" करा.

४. समाधानकारक व्हिडिओ दिसत असला तर "प्रकाशित करा".

झाले काम !

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2018 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही आहे तुम्ही लिंक दिलेल्या व्हिडिओची युट्युबवरील कॉपी...

Nitin Palkar's picture

15 Jul 2018 - 6:50 pm | Nitin Palkar

प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असे यश. हिमा दास हिला पुढील कारकिर्दी करता अनेकानेक शुभेच्छा.

अत्यंत आभारी आहे, पुढ्च्या वेळेस उपयोग होइल.

अश्फाक's picture

15 Jul 2018 - 9:15 pm | अश्फाक

निरीक्षण रेस संपल्यावर सर्व प्रतिस्पर्धी थकलया होत्या पन हिमा मात्र पूर्ण ताजी तवानी दिसत होती पोरीत स्टेमिना आहे राव

हरवलेला's picture

15 Jul 2018 - 9:57 pm | हरवलेला

+1