वाळवीची पावसाळी रात्र.

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
25 Jun 2018 - 4:38 pm

संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता.

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती. म्हणून विचाराअंती शेवटी तिने मांडीमाथा घडी करून ओढकात ठेवला. ओढक बंद करून तिने अडसराची कुंजी फिरवली, एकदा पटकन लुगृहात जाऊन आली, आणि धाडकन कार्यालयातून बाहेर पडली.

उद्वाहकाने खाली येतायेता तिने मनात कामांच्या जंत्रीची पुन्हा एकदा उजळणी केली. तिला आठवलं की वाटेत गोदरेज निसर्गपरडी किंवा कमालशहर यापैकी एका विपणिस्थानातून आंबडुक्करमांसनळ्या घ्यायच्या होत्या. किमान आंबकुक्कुटमांसनळ्या तरी हव्याच होत्या. शिवाय गुंडाळीपाव आणि खट्टपनीर घ्यायचं होतं.

निशाभोजनात किंवा नाश्त्याला उष्णकुत्रे बनवण्याची तिच्या दोन्ही मुलांची आणि पतीची तिला खूप दिवसांपासूनची आग्रही सूचना होती.

मुळात वाळवी गोंय राज्यातली. . किरिस्ताव घरातली. तिचा प्रेमविवाह शुद्ध तुपातल्या परागशी झाला होता. ती गोंय क्षेत्रीय कार्यालयात आबंटन विभागात असताना परागच्या संपर्कात आली. पराग तसा फुकटमनाचा असला तरी त्याचे वडील मराठीअण्णा (हे त्यांना मिळालेलं लाडकं टोपणनाव) अतिशय कर्मठ होते.

मराठीवर त्यांचे नितांत प्रेम. मटिमवा (मराठी टिकावा मराठी वाढवा) मंडळाचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष. मंडळ मराठी असल्याने वादांमुळे ते अध्यक्षपदावरून तीनच महिन्यांत पायउतार झाले होते म्हणून माजी. नंतर फुटून सात साठ मंडळे आणि उपमंडळे स्थापन झाली. त्यातली एकूणसाठ अमेरिकेत आणि एक दिल्लीत अशी विभागणी झाली. तेव्हा महाराष्ट्रात यांच्या एका तरी शाखेने मूळ धरावं या इच्छेने एक शिखर संघटना बनवण्यात आली. वयज्येष्ठतेनुसार मराठीअण्णा त्या शिखर संस्थेचे अध्यक्ष झाले. नूतन मराठी शब्दकोश रोजच्यारोज अद्ययावत करण्याचं काम ते मुंबईत बसून आंतरजालाद्वारे निष्ठेने विनामानधन करत असत.

सुनेचं सँडी हे नाव मराठीअण्णांना सहन होणं शक्य नव्हतं. तेही घरात रोज उच्चार होणार असल्यावर खूपच खुपलं असतं. त्यांना वाळू या शब्दावरून एक स्त्रीवाचक शब्द बनवायचा होता. वाळू + ई असं जोडून वाळई, वाळी आणि वाळवी असे तीन पर्याय पुढे आले. त्यातला वाळवी हा पर्याय अण्णांनी निवडला.

तर.. वाळवी कार्यालयासमोर पथावर उतरली. अंगावर हलकासा वाराफसवक चढवला. तो अगदीच पातळ होता आणि पावसापासून संरक्षणासाठी त्याचा शून्य उपयोग होता. रस्त्यात पाणी भरलं होतं.

आता आमटीपथ स्थानकापर्यंत पोचायचे कसे ? पुढेही विद्युतरथमार्ग पाण्याखाली असण्याची आणि शीर्षस्थ पंचालेख तुटण्याची घटना घडलेली असणं याचीही शक्यता होतीच. तेव्हा स्थानिकेचा नाद सोडून थेट श्रीस्थानकापर्यंत भाडतैलरथ घ्यावा असा तिने विचार केला. अन्यथा ते न जमल्यास तिची योजना ब तयार होती. भाडतैलरथ शीवपर्यंत घेऊन पुढे पुदृमाने निसर्गवायुत्रिचक्री घ्यायची.

स्रीझोळीत हात घालताच तिच्या लक्षात आलं की रोख रक्कम संपली होती. पतपत्र किंवा खर्चखातीपत्र यांचा भाडतैलरथ किंवा निसर्गवायुत्रिचक्रीसाठी उपयोग नव्हता.

"ओह फ*...! " तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडला. अचानक ब्रह्माण्ड आठवावे तसे तिला सासरे आठवले आणि तिने तातडीने तो उद्गार बदलून "ओह .. झ* ...!!" असा पुन्हा उच्चारला.

जवळपास कुठे सधयंत्रही नव्हतं. पाण्यातून रपारप चालत तिथपर्यंत पोचावं तर त्यामध्येही अशा अतिपावसात रोख रकमेऐवजी चूकसंदेश येण्याची शक्यता दाट होती. पुन्हा पुन्हा स्रीझोळी धुंडाळून पाहिल्यावर तळाशी पाचशे रुपयांच्या दोन पत्रिका आर्द्र अवस्थेत एकमेकींना बिलगलेल्या आढळल्या.

एक काळेपिवळे वाहन पाण्यातून पथ कापत येताना दिसले. वाळवीने जोरात ओरडून भाडतैलरथ भाडतैलरथ असा पुकारा केला. एरवी तो वाहनचालक निघूनच जावयाचा, पण ते शब्द ऐकून त्याने जोराने अवरोधक मारून तिच्यासमोर वाहन थांबवले. तो उत्तर प्रदेशातील बंधु प्रकारचा निघाला. त्याने परकीय उत्तरीय भाषेत "मला शिव्या द्यायचं काम नाही" अशा आशयाचे उद्गार वाळवीला उद्देशून काढले.

त्याचा गैरसमज दूर करून वाळवी आत बसली आणि त्याने गतिवर्धकावर पाय दाबला. काही अंतरानंतर वाळवीने त्याला उद्देशून म्हटले "बंधु, आपण भाडेमोजक खाली करण्यास विसरलेले दिसता. असे चालणार नाही. स्त्री पाहून आपण फसवू शकत नाही."

शेवटी हो ना करता करता ठराविक भाडे घेण्याचे मान्य करून बंधु तंबाखू खाऊ लागला. वाळवी काहीशी सैलावून पार्श्वबैठकीवर रेलून बसली आणि पुढे मार्गात कोठेही वाहतूकमुरांबा नसावा अशी प्रार्थना करू लागली. भाडतैलरथात वारंवारितांविरुपित आकाशवाणी संच चालू होता. आकाशवाणीस्वार समकालीन गरम आणि लोकप्रिय गाण्यांच्या मधेमधे वाहतूकस्थितीच्या घोषणा करत होता. वाहतुकीत खोळंबलेल्या लोकांना आपापल्या स्थितीबद्दल सरळभ्रमणध्वनीसंदेश करण्यासाठी त्याने एक विनाशुल्क क्रमांक उद्घोषित केला होता. संपर्क तुटलेल्या आपल्या कुटुंबियांशी संपर्क करवून देण्याचं कार्यही तो करत होता.

अचानक निळ्यातून वाळवीला आपल्या नवऱ्याचं म्हणजे परागचं नाव ऐकू आलं . त्याने आकाशवाणी केंद्राद्वारे वाळवीला संदेश पाठवला होता. "आशा आहे तू आहेत उत्तम, मी आहे पोचलो घरी" अशा आशयाचा तो आंग्ल संदेश होता. वाळवीने दचकून आपल्या भ्रमणध्वनीकडे नजर टाकती. त्याची विजेरी संपून तो मृत झाल्याचं तिच्या लक्षात आलं. अण्णांनी हा आंग्ल संदेश ऐकला असेल तर घरात काय युद्ध सुरु झालं असेल याची तिला चिंता लागली. त्यावर आणखी चिंता म्हणजे आता परागला उलट संदेश कसा पाठवायचा.

तिने संकोच बाजूला ठेवून बंधूला विचारले "बंधू, तुमचा भ्रमणध्वनीसंच चालू असल्यास मला पळभरासाठी देता का? आपले उपकार होतील."

बंधूने भ्रमणध्वनीसंच हा शब्द ऐकून "आपण तासाला माल जवळ बाळगत नसल्याचे" उत्तरीय परभाषेत सांगितले. शिवाय "आपण विभागातील गुप्त तपासणी अधिकारी वगैरे आहात का महोदया ?" अशीही परभाषेत हळूच नम्र विचारणा केली. शेवटी नाईलाजाने वाळवीने आंग्ल भाषेत भ्रमणध्वनी मागून घेतला. परंतु त्यात तराजू उरला नसल्याचे बंधूने सांगितले. आत येणारे साद येऊ शकत होते पण बाहेर जाणारे साद दांडा झाले होते. हताशपणे वाळवीने डोळे मिटले.

बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. आता कसले निशाभोजनात उष्णकुत्रे ? आता घरी पोचून साधा डाळभाताचा शिजवक वायूवर चढवता आला तरी पुष्कळ झालं असा विचार तिच्या मनात आला. अंधारही मिट्ट झाला होता. त्यात जवळच कुठेतरी रोहित्र उडाल्याचा फाड असा आवाज झाला आणि सर्वोत्तमची वीज जाऊन मिणमिणते चार पथदिवेही विझले. श्रीस्थानकात सर्वोत्तमची वीज नसल्याने कदाचित आपल्या घरी अंधार नसेल अशी आशा करून वाळवी पुढे येणाऱ्या कालहरणासाठी तयार होऊ लागली.

(क्रमशः भाग अन्य वाचक लिहितील का ? कृपा होईल. येऊद्या तर मग वाळवीची चित्तरकथा अट फक्त एकच... कोणती ? ...ओह कमॉन .. डू आय नीड टू टेल यू ड्यूड्स ?)

मांडणीप्रकटनप्रतिसाद

प्रतिक्रिया

सोपे शब्द न घेता अवघड शब्द घेतले आहेत अशी टीका करू नये अथवा मनावर घेऊ नये. हा "खुर्च्या" टाईप प्रकार समजावा. ;-)

सस्नेह's picture

25 Jun 2018 - 4:45 pm | सस्नेह

=)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2018 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेलो, वारलो, खपलो, उचला आता. लेखन वाचतांना केवटीमेंदूवर ताण आल्यामुळे बोबड़ी वळली आहे, लेखकाने मराठी भाषा जपण्यासाठी जी अलौकिक प्रतिभा त्यांनी वापरली आहे, त्याला सलाम.

-दिलीप बिरुटे
(शुद्ध मराठी शब्द भाषा चळवळ उपाध्यक्ष)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2018 - 5:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

खी खी खी... वाळवी, मांडीमाथा, आमटीरस्ता, आंबडुक्करमांसनळ्या, निसर्गवायुत्रिचक्री, भाडतैलरथ, इ इ इ.... =)) =)) =))

तुम्हाला उष्णकुत्रे चावले असल्याचा संशय येतोय ;) ;) ;) =)) =)) =)) (हघ्याहेवेसांन)

सोमनाथ खांदवे's picture

25 Jun 2018 - 5:26 pm | सोमनाथ खांदवे

वाचताना डोक्याला शॉट लागत होते , अस वाटत होतं की नाकाने गाइच्छाप ओढतोय .

नि३सोलपुरकर's picture

25 Jun 2018 - 6:05 pm | नि३सोलपुरकर

खी खी खी...
"मंडळ मराठी असल्याने वादांमुळे ते अध्यक्षपदावरून तीनच महिन्यांत पायउतार झाले होते म्हणून माजी" .
__/\__सलाम.

दुर्गविहारी's picture

25 Jun 2018 - 6:40 pm | दुर्गविहारी

LOL !!!! हसून हसून मेलो. आपल्या प्रतिभेला दंडवत. _____/\__________

गावठी फिलॉसॉफर's picture

25 Jun 2018 - 8:29 pm | गावठी फिलॉसॉफर

असली भाषा वाचली तर डोक्यातले फ्यूज कायमस्वरूपी मृत व्हायचे..... आमची आंग्ल आणि हिंदी मिश्रित भाषाच बरि.

अध्यक्ष:- मिळून मिसळून वर भाषा शुद्धीकरणाचे टोमणे खाणारी संघटना.

उपयोजक's picture

25 Jun 2018 - 9:44 pm | उपयोजक

आवडलं.पण ते 'वाहनगमनआगमननियामकरक्तपितहरितवर्णदीपपट्टीका' किंवा 'दुग्धशर्करायुक्तशीतलघनगोलगट्टू' असे अजून लांबलचक शब्द वापरले असते तर अजून हसू आलं असतं.

'उष्णकुत्रे' :) :) :)

तुम्हीच छोटे करा म्हणालात. म्हणून आम्ही किंचित पाऊल त्या दिशेने उचललं. पुढील कोश अद्यतन होईल तेव्हा होतील हळूहळू आणखी छोटे. मग काय, त म्हटल्या ताकभात. ट म्हटल्या टाकभात..

उपयोजक's picture

26 Jun 2018 - 12:24 am | उपयोजक

मला वाटलं हसायचं आहे.म्हणून मी आधी हसून घेतलं की हो!

रच्याकने कोष नाही कोश

षिट.. चूक झाली. कोश असं दुरुस्त करतो.

कोषातून बाहेर पडतो.

अंंहं. नीट जमलेले नाही. मुंबापुरीकरांना जमणारही नाही. 'शिल्लक' ऐवजी 'तराजू'? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!

असंका's picture

26 Jun 2018 - 10:03 am | असंका

ब्यालन्स..

वरुण मोहिते's picture

26 Jun 2018 - 12:08 am | वरुण मोहिते

लै भारी

पिवळा डांबिस's picture

26 Jun 2018 - 2:10 am | पिवळा डांबिस

बाकीचं सगळं क्षणाभर विचार करतां समजलं
पण ते "वाळवी" काय असेल ते समजण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण येईपर्यंत थांबावं लागलं.
थोडक्यात, 'वाळवी'ने मेंदू पोखरला! :)
_/\_

गामा पैलवान's picture

26 Jun 2018 - 2:22 am | गामा पैलवान

गवि,

तुमचं शुद्ध मराठी वाचून बेशुद्ध पडायला होईल ! :-D

काही शब्द खरंच छान आहेत. स्त्रीझोळी, पंचालेख, पत्रिका, इत्यादि.

आ.न.,
-गा.पै.

निशाचर's picture

26 Jun 2018 - 3:11 am | निशाचर

=)) =))
नको तिथे एकेक शब्द आठवून फिसकन हसू नाही आलं म्हणजे मिळवलं!

चित्रगुप्त's picture

26 Jun 2018 - 3:12 am | चित्रगुप्त

भयानक आवडली कथा.
सहकामी ....तिच्या मांडीमाथ्याचा पडदा........ मांडीमाथाथैली भिजली असती...... भारीच.
(अश्लील अशील)

चावी, कुलूप, दुकान, निकाल असे फारसी शब्द वापरल्याबद्दल निषेध.

अर्रर्र. विटाळ झालाच का ?

सुधारून घेतो.

किल्ली, ... , विक्रीस्थान, परिणाम

कुलूपला सुचत नाहीये. कलप असा घेऊया. अपभ्रंश करून शुद्धी चालू शकते.

प्रचेतस's picture

26 Jun 2018 - 8:39 am | प्रचेतस

परत विटाळ

किल्ली हा पण फारसी शब्द. किला (बंदिस्त /फोर्टीफाइड स्थान) ह्यातून उत्कांत झालेला शब्द. विक्री हा पण फारसी किंवा अरबी. योग्य शब्द विपणि हा यावा. कुलुपाला पर्यायी शब्द अडसर हा घ्यावा. तुमच्या वरील लेखात रस्ता हा सुद्धा परकीय शब्द आहे. त्याला पर्यायी शब्द पथ असा घ्यावा.

मेल्या चावी नको, किल्ली नको तर मग काय म्हणू?

कुंजी ? की तोही हिंदी?

कसं वाचवू माझ्या लोणच्याच्या बरणीला या परकीय पाबळीपासून?

उपयोजकांना एक साद घाला आणि मग बघा तुमचे लोणचे कसे मुरते ते.

तुम्हाला कोकणातील योजक उत्पादने म्हणायचंय का?

जयंत कुलकर्णी's picture

26 Jun 2018 - 2:02 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते कुंजिका हा शब्द असावा....
:-)

मला अगोदर गोंय म्हंटल्यावर टोळी गोंय आठवली.

रंगीला रतन's picture

26 Jun 2018 - 10:27 am | रंगीला रतन

मी केवळ एक उदाहरण म्हणून लिहीलील्या परिच्छेदाचा आपण कथारुपी विस्तार केलात त्याबद्दल. हसून हसून पुरेवाट झाली.
परत शेवटी क्रमशः लिहून कहर केलात. :)

गामा पैलवान's picture

26 Jun 2018 - 11:59 am | गामा पैलवान

प्रचेतस,

चावी, कुलूप, दुकान, निकाल असे फारसी शब्द वापरल्याबद्दल निषेध.

चावी पोर्तुगीज आहे ना ? : https://dictionary.cambridge.org/dictionary/english-portuguese/key

कुलूप बहुतेक क्लृप् धातूवरनं आलेलं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

गवि's picture

26 Jun 2018 - 12:04 pm | गवि

पोर्तुगीज..? हे धूतपापेश्वरा. आता स्नान करूनच येतो.

अनन्त अवधुत's picture

26 Jun 2018 - 1:04 pm | अनन्त अवधुत

मग उष्णकुत्रे शब्द आल्यावर परत एकवार वाचायला सुरुवात केली.
हसून हसून वारल्या गेलो आहे .. __/\__

खिलजि's picture

26 Jun 2018 - 3:04 pm | खिलजि

हे असे प्राकृतिक वाचून आम्हाला स्वतहाला "" पेशवे बाजीराव "" झाल्यासारखे वाटत आहे .. का कुणास ठाऊक , पण आज ती , आमची ऐतिहासिक वाड्यावरची सुंदरानी ( मस्तानी ) राहून राहून आठवत आहे .. त्या आठवणींच्या हल्लकल्लोळात आम्ही थेट उभ्या उभ्या अश्वदलनाकडे चालत गेलो .. तिथे जाताच क्षणी अदमासे तीनजणी भोवळ येऊन पडल्या . कारण नंतर समजले आणि खूप वाईट वाटले .. आम्ही सुंदराणीच्या आठवणींमध्ये रममाण होऊन असेच निर्वस्त्र अश्वदालनाकडं चालत गेलो .. ह्या शुद्ध लेखनाला ,, आम्हा पेशव्यांकडून बारा तोफांची सलामी काबुल करा गविसाहेब .. हेच स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुन्हा जन्माला आलो आहोत ,, आता सुंदरानी नाही मिळाली तरी चालेल पण आपली मराठी भाषा अशीच बहरत गेली पाहिजे ... तिच्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...

च्या वृद्धीकरणासाठी लाखो जन्म घ्यावयास लागले तरी बेहत्तर ...

या हिषेबाने अगदी पॅशिव अ‍ॅव्हरेज काढून पाहिले तरी किमान ३० लाख वर्षे मराठीवरच्या अन्यायाचे रडगाणे गावे लागेल

मांडी माथा एकवार उमजले नाही.
पण रीडताना जसजसे प्रोग्रेसत गेलो तसतसे मांडीमाथ्याचा कृतीकर्ता जागृत होऊन एक एक शब्द कृतत होता.
@ गवि : "वाड्यात " एकदा पूर्ण होऊन जाऊद्या की भौ.

चांदणे संदीप's picture

27 Jun 2018 - 8:22 am | चांदणे संदीप

क्ळासिक!

वाळवी

नंदन's picture

27 Jun 2018 - 10:34 am | नंदन

एक नंबर!

स्वधर्म's picture

27 Jun 2018 - 1:11 pm | स्वधर्म

.

नीळा's picture

27 Jun 2018 - 2:28 pm | नीळा

मस्त

आता कोणीतरी पुढे लिहा राव. नुसते हसू नका.

नाखु's picture

27 Jun 2018 - 9:15 pm | नाखु

मज दिधले "हसायदान"हे.
ज्ञानेश्वर माऊलींचा २१ व्यावसायिक शतकातील रेडा नाखु

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jun 2018 - 5:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

मार्मिक
पेरणा द्यायची राहिली का?
पैजारबुवा,

पावसाळा आहे. आमच्या कोंकणात पेरणी चालूच आहे. अन्य पेरणा वगैरेकडे लक्ष देण्यास तूर्तास सवड नाही. धन्यवाद.

-आपल्या शेतातले भात आणि आमसूल सार खाणारा, कोणाचा मिंधा नसलेला ("तुम्ही तुमच्या घरी शहाणे, आम्ही आमच्या घरी शहाणे, कोणाचं ऐकून नाय घेत" फेम) गवि कोंकणकर.

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2018 - 1:33 pm | धर्मराजमुटके

उदेका म्हणजे काय ?

उत्तर देण्याचा कालावधी. (TAT)