चौकशी

मेडीक्लेम / इन्श्यूरन्स - एक अनुभव.

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
30 May 2013 - 12:50 am

राम्राम मंडळी.. एक प्रामाणिक शंका आहे - शक्य झाल्यास उत्तर शोधण्यास मदत करावी.

**************

नुकतेच घरातले एक आजारपण पार पडले. आठवडाभर हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट व एक अत्यावश्यक ऑपरेशन असे आजारपणाचे स्वरूप होते. (हृदय व मेंदू प्रकारातले गुंतागुंतीचे ऑपरेशन नव्हते.)

हाफिसच्या कृपेने मेडीक्लेम / इन्श्यूरन्सची काळजी नव्हती..

माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य

saishwari's picture
saishwari in काथ्याकूट
25 May 2013 - 1:17 pm

नमस्कार
ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी.
काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू.

L B T म्हंजे नक्की काय आहे?

निश's picture
निश in काथ्याकूट
13 May 2013 - 3:52 pm

सध्या L B T वरुन फार गोंधळ चाललेला आहे. व्यापारी व सरकार ह्यांच्यातील वादावादीत आम जनता फार मोठ्या प्रमाणात भरडली जात आहे. तर L B T म्हंजे नक्की काय आहे? तो कश्या प्रकारे लागु होणार आहे. जकात मग साफ बंद होणार आहे का? आम जनतेला ह्याचा काही उपयोग होणार आहे का? अस कानावर आल आहे की L B T मुळे वस्तुंच्या दरात वाढ होणार आहे ते कितपत खर आहे. ह्याबद्दल माहीती मिळाली तर हवी आहे. L B T चा भरणा कसा करावा लागेल ह्या बद्दलही माहीती हवी आहे.

अ‍ॅलर्जी कशी टाळावी?

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
28 Apr 2013 - 9:32 pm

सध्या सहा महिन्यापासून मुख्यत्वे डाळ, पनीर, पालक, शेंगदाणे, काजू, असे पदार्थ खाल्ले की किंवा इतर वेळी देखील नि/अथवा नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे. अर्धा तास राहते नि जाते.
हाताची बोटे सुजतात. एक दोन वेळा खांद्याजवळ साधारण छोट्या वाटी एवढं वर्तुळ सूज आली होती.
आठ दिवस गोळ्या खाऊन २ वेळा कमी झालं. गोळ्या संपल्या की पुन्हा सुरु. (जास्त गोळ्या खाऊन भविष्यात हाडं ठिसूळ होण्याचा संभव आहे असं ऐकिव आहे)
काय क्रावं ब्रं? मिपाकर काही उपाय सुचवतील का?

नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट बाबत

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
25 Apr 2013 - 5:01 pm

नमस्कार,
आम्ही एक नवीन मराठी वधु-वर सुचक वेबसाईट सुविधा चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
सध्या आंतरजालावर सतराशे साठ वेबसाईट असतांना अजून एक नवी वेबसाईट कशाला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या वेबसाईटवर अनेक त्रुटी / कमतरता आहेत / असू शकतात ज्यांचा अभ्यास चालू आहे आणी त्या आम्हाला दूर करावयाच्या आहेत.

आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे ती नोंदणी करणार्‍याच्या माहितीची सत्यता पडताळणे आणी गोपनीयता राखणे.

"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in काथ्याकूट
20 Apr 2013 - 9:39 am

बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो.

पुस्तक खरेदी - मदत

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
17 Apr 2013 - 9:52 pm

येत्या १९, २० आणि २१ तारखेला मी मुंबईत आहे. त्यावेळी काही मराठी पुस्तकांची खरेदी करण्याचा विचार आहे. मिपाकरांना कृपया मुंबईत जरा बर्यापैकी सवलत देणार्या पुस्तकांच्या दुकानांची माहिती द्यावी, ही विनंती.. तसेच काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावेही सुचवावीत. फ्लिपकार्टवर हवी तशी मराठी पुस्तके मिळत नाहीत, असे मला वाटते.. :-( चारोळी धाग्यासाठी क्षमस्व..

राजकीय पक्ष आणि संरचना

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
1 Apr 2013 - 4:12 pm

काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे.

राजकारणमाहितीसंदर्भचौकशी

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
31 Mar 2013 - 9:34 pm

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.

निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.

शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!

निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?

कलासंगीतविनोदमौजमजाप्रकटनअनुभवचौकशीप्रश्नोत्तरेविरंगुळा

गणपतीला जानवे कोणी घातले ?

शरद's picture
शरद in काथ्याकूट
14 Mar 2013 - 1:28 pm

गणपतीला जानवे कोणी घातले ?
आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू.