चौकशी

मनमोहन सिंग - हे तुम्हाला जमेल का हो ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
30 Aug 2013 - 7:05 pm

गेले दहा एक वर्षे भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणून कार्यरत असणारे. गेले तीन वर्षे " आता महागाई कमी " होईल असा
सूर लाउन रड्णार्‍या जनतेला " उगी उगी" म्ह्नणणारे शेतकर्‍याना ५०००० कोटी कर्ज माफी देणारे, जादूची कांडी माझ्याकडे नाही
असे म्हणणारे व तरीही जादूची काडी वाटेल असे अन्न सुरक्षा बिल आणणारे मनमोहन सिंग हे एकदा बोलते झाले.

स्वीडनमध्ये राहण्याबाबत माहिती हवी आहे...

शिद's picture
शिद in काथ्याकूट
21 Aug 2013 - 9:33 pm

नमस्कार मिपाकर,

हा माझा मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. मला मिपावरच्या सर्व जाणकार मंडळींकडुन थोडीशी माहिती हवी आहे व आशा करतो कि तुम्ही सगळे मला पुर्णपणे मदत करतील.

मी सध्या कामानिमित्त लंडन येथे आहे आणि लवकरच काम संपवून भारतात परत जाणार होतो. पण, आज अचानक सकाळीच डिलीवरी मॅनेजरचा फोन आला कि मला एका नवीन प्रोजेक्टसाठी Stolkholm, स्वीडन येथे जावे लागेल. माझे जाणे नक्की झाले तर माझ्यासोबत बायको आणि मुलगा (वयः १ वर्ष) सोबत येतील.

वाक्प्रचार, म्हणी,रूपकातील प्राणीवाचक उल्लेखांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असांसदीयतेच्या नेमक्या सीमारेखा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Aug 2013 - 2:38 pm

नमस्कार,

मराठी वाकप्रचार आणि म्हणींमध्ये बर्याच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राणी वाचक उल्लेख येतात आणि दुसर्र्या बाजुची व्यक्ती आमचा प्राणी वाचक उल्लेख केला गेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणू शकते.असे काही वेळा इतर रूपकांमुळेही होऊ शकते.दुसर्र्या बाजूस मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांना लिहिणार्या व्यक्तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सांभाळावयाचे असते.

१)"वा अबकडराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? हळक्षज्ञराव ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ? " - हि एका तिसर्या व्यक्तीची प्रतिक्रीया ज्यावरून वाद झाला

मदत हवी आहे.

बन्याबापू's picture
बन्याबापू in काथ्याकूट
17 Aug 2013 - 11:30 am

नमस्कार मिपाकरानो,
मला ऑनलाईन मराठी कादंबरी पीडीएफ,ई-बुक स्वरुपात डाऊनलोड करायची आहे.मराठीतील वाचनीय कादंबरी डाऊनलोड करायचे संकेतस्थळ किंवा काही लिंक्स असतील तर सुचवा.धन्यवाद !
(संपादक मंडळीना विनंती आहे कि त्यांनी हा धागा लगेच तोडू नये.काही दिवसानंतर तोडला तरी चालेल.)

मदत हवी

उर्मिला००'s picture
उर्मिला०० in जनातलं, मनातलं
11 Aug 2013 - 1:48 pm

नमस्कार मिपाकर!

खूप दिवसांनी लिहीत आहे. मला कोणी मदत करू शकेल का?

राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवीन, छान अशी नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे.
कुणी लेखक असाल किंवा कुणाला चांगले पण फारसे प्रयोग न झालेले नाटक माहित असेल तर कृपया मदत करा.

धन्यवाद!

नाट्यचौकशी

मला एका कवितेच्या ओळी कुणी सांगू शकेल का?

वाचक्नवी's picture
वाचक्नवी in जनातलं, मनातलं
28 Jul 2013 - 11:34 pm

अचानक मला लहानपणच्या पाठ्य पुस्तकात असलेली जुनी कविता आठवली. अधल्या मधल्या ओळी आठवल्या, पण पूर्ण आणि सलग ओळी नाही. ती कविता कुणाच्या स्मरणात असेल तर, किंवा कुणी शोधून सांगेल? एक वडारीण किंवा तत्सम जातीची बाई आपला संसार घेऊन एका गावाहून दुसर्‍या गावाला जात आहे तिचे वर्णन या कवितेत आहे. कवितेच्या सुरुवातीच्या ओळी अशा.

मूल पाठिवर विणीत चटई
पेंगत पेंगत बाई जाई
घोड्यावरती फुटकी भाणडी
त्यावर फडफड करी कोंबडी, वगैरे.
....वाचक्नवी

कविताचौकशी

मराठी इतिहासाचा मागोवा !!

ब़जरबट्टू's picture
ब़जरबट्टू in काथ्याकूट
27 Jun 2013 - 11:07 am

खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत.
कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…

ITR संबंधी मदत हवी आहे

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
22 Jun 2013 - 7:01 pm

माझा गेल्या वर्षीचा Form-16 रिटर्न फ़ाइल केल्यावर जो ITR मिळतो तो दुसर्याच कोणाच्या नावाचा मिळाला. हा माझा वेन्धळेपणा की ITR घेताना मी नाव चेक नाही केले. (ज्या agent कडे Form-16 दिलेला त्याच्या घोळामुळे माझा ITR दुसर्या कोणाकडेतरी पोहोचला…agent ला विचारले असता त्याने सांगीतले १ वर्षानंतर ITR शोधणे शक्य नाही)
सध्या भावाच्या उच्चाशिक्षणासाठी माझे गेल्या ३ वर्षांचे ITR बैंकेमधे दाखवायचे आहेत.

मिपावर कोणाला या संबंधी माहिती आहे का? आधीच्या वर्षीच्या ITR ची डुप्लिकेट मिळवणे शक्य आहे का?

ग्रीन टी

स्मिता चौगुले's picture
स्मिता चौगुले in काथ्याकूट
30 May 2013 - 12:34 pm

काही महिन्यापासून वाढत्या वजनाने आणि त्याच्या दुष्परिणामाने(गुढगेदुखी) त्रस्त झाल्यावर वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . गुगलून काही माहिती मिळवली त्यात ग्रीन टी चे सेवन हा देखील एक मुद्दा आहे

ग्रीन टी हे आरोग्यास आणि परिणामी वजन कमी करण्यास(part of balanced/healthy diet) लाभदायक असते असे आढळले

त्याचे पुढील उपयोग देखील जालावर मिळाले

ग्रीन टीच्या सेवनाने कॅलरी (मराठी शब्द?) जळण्याचा वेग वाढतो

ग्रीन टी पचन क्रियेला मदत करतो आणि शरीराचा मैटाबॉलिज्म रेट वाढवतो