चौकशी

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 10:19 pm

भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे.

तंत्रमाहितीचौकशीप्रतिभा

अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 11:14 am

मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही.

तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्‍यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात.

समाजजीवनमानचौकशीमदत

मंगळ कार्य !

साळसकर's picture
साळसकर in काथ्याकूट
28 Feb 2014 - 12:03 am

आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:18 pm

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी विकिपीडिया प्रकल्पातील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्यापी पुरेसा अद्ययावत नाही काही माहिती शिळी सुद्धा झाली आहे आणि काही माहिती कमतरता (इन्फर्मेशन गॅप) पण आहेत.

काही प्रश्न सतावणारे...

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
7 Feb 2014 - 7:42 pm

१. असे वाचले आहे कि औरंगजेबाच्या काळात (किंवा त्या आधीही कदाचित)भारत युरोप ह्यांच्यात व्यापार होता ..म्हणजे भारतीय व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात युरोपात ये जा करत... हे खरंय? असेल तर कसा कोणता ?
२. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ?
२.१ भारतात आलेला पहिला पाश्चात्य कोण? तो व्यापाराकार्तच आला कि अजून काही..

रिंकू पाटील १९९०

देव मासा's picture
देव मासा in काथ्याकूट
24 Jan 2014 - 3:52 am

काल एक कविता वाचनात आली . त्यात हि ओळ होती
“कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द.
भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ? ''

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jan 2014 - 11:52 am

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.

मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Jan 2014 - 1:30 pm

खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर

कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.

गविकाकाचा सल्ला.

मन's picture
मन in काथ्याकूट
10 Jan 2014 - 2:26 pm

पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.

कु.सुमार केतकर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Jan 2014 - 11:01 pm

कु. सुमार केतकर
यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?)
त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
१) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात.
२) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात
३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो
४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात