तिसरी घंटा
आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान.