पॅरलल पार्किंग
गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो.
पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं.