जीवनमान

तुमच्या देशात....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
13 Apr 2018 - 1:33 pm

मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'

धोरणसमाजजीवनमानविचारबातमी

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Apr 2018 - 10:13 am

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

जीवनमानआरोग्य

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 8:00 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या

गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच. किंबहुना त्या सगळ्या कुटुंबासाठीच ती शोकांतिका ठरते.

जीवनमानआरोग्य

अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 7:11 am

लोकहो,

काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे.

मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी...

-- युयुत्सु

ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D:

जीवनमानविचार

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
24 Mar 2018 - 11:14 am

(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).

धोरणजीवनमानविचार

तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० + )

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 12:33 pm

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

आपण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा अर्धशतक पूर्ण केल्याची एक सुखद भावना मनात असते खरी. पण त्याचबरोबर अजून किती काळ ‘नाबाद’ राहू याचीही हुरहूर लागते. समाजात आजारांचे प्रमाण एकूणच वाढलेले आहे. त्यात अनेक आजार प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयात होताना दिसत आहेत.
सध्या ५०+ वयोगटात एकही व्याधी अथवा औषध चालू नसलेली व्यक्ती दुर्मिळ झाली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काही चाळणी चाचण्या चाळीशीच्या दरम्यानच पार पडलेल्या असतात.

जीवनमानआरोग्य

एका अवलियाची भेट

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 11:06 am

नमस्कार.

२१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.

जीवनमानप्रवासबातमी

.... बाकी तुमचं चालू द्या।

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
19 Mar 2018 - 8:20 am

काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!

काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!

धर्ममुक्तकसमाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियाअनुभव

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ४

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Mar 2018 - 5:54 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ४ : (वयोगट १९-४९) : संसारामधी ऐस आपुला......

या भागात दोन उपविभाग पडतील – वय १९-२९ आणि ३०-४९. यांमध्ये सुचविलेली प्रत्येक चाचणी सर्वांसाठी करण्याची गरज नसते. गरजेनुसार अधिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये संबंधित चाचणी केली जाते. प्रथम या दोन्ही उपविभागांना समान असणाऱ्या चाचण्यांची माहिती घेऊ.
खालील ४ आजारांसाठी चाचण्यांची शिफारस केली जाते. त्यापैकी पहिल्या २ अर्थातच स्त्रियांसाठी आहेत:

जीवनमानआरोग्य