जीवनमान
दिल्लीतील पहिला वहिला कट्टा
चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.
डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.
'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद
आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद
अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे.
कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे.
वेळः दुपारी ४ वाजता.
चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत
मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.
नॉस्टॅल्जिआ
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु खिडकीत आलीस
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?
'तेंडल्या'
ट्रंक, संदूक इत्यादी..
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे. पण आठवणींवरती खरंच ताबा नसतो, त्या कधीही-कुठेही येऊ शकतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )
अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी.
१. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल?