लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !
:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा
आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि !
कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी
लागली कुणाला कुणाची उचकी
कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !
तरणीवाकाठी, नार न पोरटी, नजर हुद्यावर
फोडून सांधा, चतूर फंडा, जनता वार्यावर
फडामध्ये चाहुल, वाजंल कुणाचं पाऊलं
उरांत भरली धडकी