लागली कुणाला कुणाची उचकी; ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Oct 2014 - 8:23 pm

:मूळ गीत: मला लागली कुणाची उचकी (चित्रपट: पिंजरा गीतकार- जगदीश खेबूडकर ) या मूळ गीताचे गीतकार आणि रसिकांची सादर माफी मागून. व प्रेरणा

आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट जाहीर ना सांगण्याजोगि !
कुनी त्या चिन्हावर मारली टिचकी
लागली कुणाला कुणाची उचकी

कुणाला गं कुणाला ? ह्याला का त्याला ? लाजू नको, लाजू नको !

तरणीवाकाठी, नार न पोरटी, नजर हुद्यावर
फोडून सांधा, चतूर फंडा, जनता वार्‍यावर
फडामध्ये चाहुल, वाजंल कुणाचं पाऊलं
उरांत भरली धडकी

निजले उजव्या कुशी, हातगेला घशी, करु आता काशी
इंदराच्या लाटा, बेरजेचा काटा, मनसे झाली नकुषी
कमळात आला, धनुष छेडलं नाराजची कला
तोळ्याचा मासा, बाजार कसा थरके

फुटून वेगळी, कइ येरीवाळी, झाली ठेंगेकरी
मना डसले हात, हाताच बोट जातीला गुदगुल्या करी
नाण्यामध्ये धर्माधर्म दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं सार्‍यांचीच घेतली फिरकी

रात दिसं सांगते, वाट मुख्यमंत्रीपदाची बघते, किती मी घालू साद
झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाई ना सत्तेची याद
भेटीसाठी आले मनी, कासाविस झाले मी, माझी मलाचकी परकी !

लावणीसांत्वनाहास्यराजकारण

प्रतिक्रिया

जेपी's picture

19 Oct 2014 - 8:27 pm | जेपी

चांगलय. आवडल.मस्तच.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Oct 2014 - 8:31 pm | माम्लेदारचा पन्खा

असं म्हनायचं राहिलं की जेपीराव....

जेपी's picture

19 Oct 2014 - 8:40 pm | जेपी

बास का ?
हम जहाँ खडे होते हय लाईन वहींसे शुरु होती हय.
हांय हांय SSSSSS हांय

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2014 - 9:12 pm | टवाळ कार्टा

:)

विवेकपटाईत's picture

22 Oct 2014 - 5:52 pm | विवेकपटाईत

वाट मुख्यमंत्रीपदाची बघते, किती मी घालू साद.....कुणालाच ऐकू येणार नाही आता.

मस्त आवडले