क्रिडा जगत

वपाडाव's picture
वपाडाव in क्रिडा जगत
4 Mar 2011 - 16:58

आपण कुठे आहोत?

कुणाला याचं सोयरसुतक आहे कि नाही याची कल्पना नाही पण जागृती म्हणून हा धागा.

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in क्रिडा जगत
2 Mar 2011 - 22:58

खरा दंगा आज झालाच...!!!

व्वा....जियो आयर्लंड !!!

धमाल म्हणजे काय हे आज आयर्लंडने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हजर असलेल्या मूठभर क्रिकेटप्रेमींना दाखवून दिले....आणि हे मूठभरच खरे नशिबवान ठरले....कारण त्याना याची देही याची डोळा पाहायला मिळाला विश्वचषक २०११ मधील पहिलावहिला सेन्सेशनल 'चमत्कार....'

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
2 Mar 2011 - 20:43

पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!

पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in क्रिडा जगत
1 Mar 2011 - 20:28

'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

टिप :
सदर लेखात क्रिकेट आणि भारतीय संघाविषयी काही टोकाची आणि प्रामाणिक मते आढळतील, ती वाचुन आपल्याला अस्वस्थ वाटत आहे असे वाटल्यास त्या क्षणी लेखाचे वाचन थांबवावे अशी आग्रहाची विनंती.
----------------------------

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in क्रिडा जगत
27 Feb 2011 - 02:33

क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - २ : गरोदरपणा, टाय मॅचेस व वितरणं

क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - १ : तोंडओळख.

गेल्या लेखात जाताजाता एक प्रश्न विचारला होता.
'या विश्वचषकात एकोणपन्नास चुरशी होणार आहेत. तर या एकोणपन्नासांपैकी बरोब्बर एक मॅच टाय होण्याची शक्यता किती? बरोब्बर दोन मॅच टाय होण्याची शक्यता किती?'

त्याचं उत्तर बघण्याआधी विजूभाऊंनी दिलेला प्रतिसाद उद्धृत करावासा वाटतो.

धोणी's picture
धोणी in क्रिडा जगत
25 Feb 2011 - 14:17

आशीर्वाद

महेंद्र

नमस्कार मित्रांनो,

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in क्रिडा जगत
22 Feb 2011 - 14:28

'धोबीघाट' विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ...

सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
20 Feb 2011 - 21:39

मेरा सचिन महान

विश्वचषक सामन्यात सचिनचा पराक्रम!
सचिन जरी पाच विश्वचषक स्पर्धांत खेळला असला तरी तो फक्त ३६ सामने खेळलेला असून त्यात त्याने सर्वात जास्त म्हणजे १७९६ धावा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर नंबर लागतो रिकी पाँटिंगचा! तो जरी चारच विश्वचषक स्पर्धांत खेळला असला तरी त्याला एकूण ३९ सामने खेळायची संधी मिळाली व त्यांत त्याने आतापर्यंत १५३७ धावा केलेल्या आहेत.

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in क्रिडा जगत
20 Feb 2011 - 06:28

क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - १ : तोंडओळख

स्टॅटिस्टिक्स - हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण होतात. बऱ्याच लोकांना सर्वात प्रथम मनात येतं ते 'देअर आर लाइज, देअर आर अटर लाईज अँड देन देअर इज स्टॅटिस्टिक्स', 'स्टॅटिस्टिक्स हे बिकिनीसारखं आहे, बरंच काही दाखवतं, पण महत्त्वाचं तेवढं झाकून ठेवतं'वगैरेसारखे क्लिशे. हे अर्थातच दुर्दैवाचं आहे. कारण योग्य पद्धतीने वापरलं तर स्टॅटिस्टिक्स खोटं बोलत नाही.

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 22:51

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग २

वारंवार ’गुदमरण्या’साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९९-उपांत्य फेरीचा सामना (एकदिवसीय सामना क्र. १४८३)
बर्मिंगहॅममधील ’एजबॅस्टन’ मैदान

रमताराम's picture
रमताराम in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 22:12

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?

आम्ही हल्ली विचार करतो. नाही म्हणजे मोठेमोठे विषय झेपत नसल्याने जे सहज जमेल अशा त्यातल्यात्यात साध्यासुध्या विषयावर जरा सराव करतोय. एकदा जमले की मग थोडे गंभीर विषयांवर ट्राय मारूया असा विचार आहे. चला नमनाला घडाभर तेल नको. तर आजचा विषय आहे 'क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?' थोडंसं इस्कटून सांगतो.

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 17:32

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग १

जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग १
भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’

चावटमेला's picture
चावटमेला in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 16:14

विश्वचषक - काही प्रसंग काळजावर कोरून ठेवलेले..

मित्रहो,

आजपासून दहाव्या क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली, आताच बांग्लादेशने टॉस जिंकल्याचे ऐकले आणि आम्ही त्या शकीब्याच्या नावाने बोटे मोडत टंकायला बसलो.च्यायला, इंदिरा आ़क्कांनी बांग्लादेशला काय भारताच्या गळ्यात खोडा अडकवायलाच जन्माला घातले की काय असाच आम्हाला प्रश्न पडतो. असो, धोनी आणि कं ला २००७ चे उट्टे काढण्याच्या शुभेच्छा..

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 14:52

मिपा क्रिकेट जल्लोष!!! भारत विरुद्ध बांग्लादेश.

विश्वचषकाचे बिगुल अखेर वाजले. अहो सुरुवात तर पहिल्याच बॉल वर चौकार मारुन जोरदार झाली. त्याच उत्साहात मिपावर क्रिकेट चा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत विश्वचषकाचे एक वेगळे पान. आज ह्या वेगळ्या पानाला सुरुवात केली आहेच पण त्यात आम्ही वेळोवेळी सुधारणा करतच राहू... मग देताय ना भेट या पानाला???

रामदास's picture
रामदास in क्रिडा जगत
18 Feb 2011 - 22:13

अंदाज पंचे दाहोदरसे

उद्या पहीला सामना भारत विरुध्द बांगलादेश. यावेळी सट्टा बाजारात भारतात तरी फेव्हरीट मध्ये सगळेजण इंडीया -इंडीया म्हणत आहेत. भारतला विश्वविजेपद मिळण्याचा भाव आज सकाळी तीन रुपये वीस पैसे होता. श्रीलंकेचा पाच रुपये तर इंग्लंडचा साडेसात रुपये. जर इंग्लंड चषक घेऊन जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर लावा हजार रुपये. जर तसे झाले तर तुम्हाला साडेसात हजार मिळतील. भाव कमी म्हण्जे शक्यता जास्त.

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
18 Feb 2011 - 15:07

विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का?

असुर's picture
असुर in क्रिडा जगत
18 Feb 2011 - 05:10

चार सिंह

क्रिकेटच्या इतिहासातले चार सिंह, ज्यांनी जगातली प्रत्येक युद्धभूमी श्वास रोखायला लावणारा एल्गार करुन लढवली आहे, आणि जिथे अशक्यप्राय आव्हान आडवे आले तिथे तसलाच अशक्यप्राय प्रतिकार केलाय. आव्हानाला सामोरे जाणे आणि परिणामांची चिंता न करता लढत राहणे हा या सिंहांचा स्थायीभावच! आणि यांचा राजेशाही थाट तर अगदी पदोपदी जाणवतो. एकाच्या हाती तलवार आहे तर बाकी तिघांच्या माथ्यावर मुकुट!

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
16 Feb 2011 - 18:00

विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का?

सुहास..'s picture
सुहास.. in क्रिडा जगत
16 Feb 2011 - 11:45

अजुन तीन दिवस !!

अजुन तीन दिवस ...........सच्या चा स्ट्रेट ड्राईव्ह....वीरु चा उत्तुंग नराधमी षटकार...जहीर कमरेवर हात ठेवुन फलंदाजाकडे बघणे .....टर्बोनेटरचा दुसरा....गंभीर ची खुनशी नजर आणि रेप्युटेडे गोलंदाजाला दिलेला झणकेदार चौकार...युसुफने स्टेडियमच्या बाहेर पार्क केलेली छकडी...नेहराची सतरा ईंची बत्तीशी आणि तेव्हढीच लांब पिच जंप....श्रीशांत चा नावाच्या विपरीत आक्रस्ताळेपणा......युवी च हवेत उडणं....धोनी चा रा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
15 Feb 2011 - 20:46

विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो.