आपण कुठे आहोत?

वपाडाव's picture
वपाडाव in क्रिडा जगत
4 Mar 2011 - 4:58 pm

कुणाला याचं सोयरसुतक आहे कि नाही याची कल्पना नाही पण जागृती म्हणून हा धागा.

बांगलादेशची पिसं काढली हो या विंडीजकरांनी.
जरा हा धावफलक बघा म्हणजे लक्षात येईल.
अक्षरश: ५८ धावांत जीव घेतला त्यांचा. तेही फक्त १९ षटकामध्ये आणी पुन्हा वरून १२ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात जिंकले सुधा. बांगलादेशची फक्त २ मंडळी दोन आकडी धावा करू शकले.
हाच बांग्ला परवा आपल्यासंगे २८० धावा काढून बसला होता.
परवा आयर्लंडने इंग्रजांना धूळ चारली. आणि इंग्रजासोबत आपला सामना अनिर्णीत राहिला.
हॉलंड सुद्धा ३०० धावा बनवतोय.
या सर्वामध्ये भारत कमकुवत आहे असे वाटत नाही का? (विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीतून)
आपण जो विश्वास भारतीय संघावर ठेवतोय/दाखवतोय तो खरच योग्य आहे का?
का आपण मूर्ख आहोत? डोळे बंद ठेवून समर्थन देतोय. खेळाडू/संघ विश्वासार्ह आहेत का?
कुठले विभाग आहेत ज्यात संघ कमी पडत आहे?
कोणत्या बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे?
हे आणि इतर बरेच प्रश्न सध्या घोंघावत आहेत.
एक साधी-सुधी चर्चा / आदानप्रदान झाले पाहिजे हाच उद्देश.

क्रिकेट

प्रतिक्रिया

बॅटींग मध्ये भारताने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले आहे.
अनुक्रमे ३७० आणि ३३८ धावा हे चांगल्या फलंदाजीचे लक्षण आहे.

परंतु येव्हड्या भक्कम धावसंख्याचे रक्षण करण्यास गोलंदाजी कमकुवत वाटते आहे. विरुद्ध संघावर दबाव टाकण्यात गोलंदाजी कमी पडत आहे.
अनुक्रमे २८०+ आणि ३३८ म्हणजे ६२० पेक्षा जास्त धावा गोलंदाजांनी दिल्या आहेत अआणि ते ही आपल्या होम पीच वर.
ही गोष्ट नक्कीच धक्का देणारी आहेच.
फक्त बॅटींग चांगली असुन काही होत नाहि ..

काही संघ तर चुकुन कमी धावा झाल्या तर क्षेत्ररक्षणातुनही सामना खेचुन आणतात .. असो
बॅटींग सोडुन सर्व क्षेत्रात कामगिरी उंचावण्याची गरज आहे...

विरुद्ध संघावर दबाव टाकण्यात गोलंदाजी कमी पडत आहे.

यासाठी जबाबदार कोण?
यावर काही उपाय आहे का?

माझीही शॅम्पेन's picture

4 Mar 2011 - 11:33 pm | माझीही शॅम्पेन

पहिल्या चौदा मद्ये ..काळजी नसावी :)

पिवळा डांबिस's picture

5 Mar 2011 - 12:52 am | पिवळा डांबिस

या सर्वामध्ये भारत कमकुवत आहे असे वाटत नाही का? (विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीतून)
कोन रं त्यो भारत कमकुवत हाय म्हनतोय?
ओ नीलकांत, जरा ह्यो वडापाव खाऊन ढेकर द्या बगू!!!
:)

का आपण मूर्ख आहोत? डोळे बंद ठेवून समर्थन देतोय. खेळाडू/संघ विश्वासार्ह आहेत का?
आता ह्याचं उत्तार देऊन काय पराच्या हातनं मरायचंय आमाला?
:)