अजुन तीन दिवस !!

सुहास..'s picture
सुहास.. in क्रिडा जगत
16 Feb 2011 - 11:45 am

अजुन तीन दिवस ...........सच्या चा स्ट्रेट ड्राईव्ह....वीरु चा उत्तुंग नराधमी षटकार...जहीर कमरेवर हात ठेवुन फलंदाजाकडे बघणे .....टर्बोनेटरचा दुसरा....गंभीर ची खुनशी नजर आणि रेप्युटेडे गोलंदाजाला दिलेला झणकेदार चौकार...युसुफने स्टेडियमच्या बाहेर पार्क केलेली छकडी...नेहराची सतरा ईंची बत्तीशी आणि तेव्हढीच लांब पिच जंप....श्रीशांत चा नावाच्या विपरीत आक्रस्ताळेपणा......युवी च हवेत उडणं....धोनी चा रायफल शॉट...मुनाफची लेझी बॉडी लॅन्गेज्व च्या विपरीत अंपायर समोर ची अपील....कोहली ची स्टाईल मारु खेळी...रैना चा ऑन साईडला खाली बसुन मारलेला पंच ...पियुष चावला चा ऑफ -कटर ...अजुन तीन दिवस..

अजुन तीन दिवस ...........हातातला घास जसाचा तसा....टिव्हीत खुपसलेले डोळे....एक ओव्हर बघुया अजुन ....घरात असुन 'आवज दे ' चा चित्कार...अपायरला शिव्या ....बायको कडे दुर्लक्ष ....मोबाईल स्विच ऑफ....कोण मॅनेजर ? ..क्रिक ईन्फो वर लॉगिन ...टपरीवर चर्चा....गार झालेला चहा....ऊन्हातान्हात टिव्ही च्या दुकानासमोर....आईशप्पथ!! कपाळावर हात......प्रत्येक रन ला टाळ्या....कसला क्लोज होता...छातीत धडधड...प्रत्येक श्वासाला स्स्स्स्सस्स...उत्साह उत्साह...मॅच किती वाजता....अग मी जरा मॅच बघतोय, नंतर बोलतो...मॅच च्या वेळेला कोण आलय दरवाजावर...किती आहे टारगेट ? ..... स्साला एक टिव्ही नाय ऑफीसात...काय थर्ड क्लास ऑफिस आहे ? ....हाय-लाईट्स किती वाजता ?

अजुन तीन दिवस ...........श्रीकांत ची अखंड बडबड......सिध्दुच हाय-क्लास ईग्रंजी......मंदिराचं थोबाड.....संदीप पाटील च कडक विश्लेषण......रवी शास्त्रीचा कॉलम.....सनीचा आवाज....कपीलची समीक्षा..... हाय लाईटस...अरे किती या अ‍ॅड्स.....ब्रेक थोडा लांबच झाला ना ? ...पॉवर-प्ले का घेत नाहीये हा ?.....ईट वॉज बिन पिचड-अप अ‍ॅन्ड डिसॅपियर्ड ईन द क्राऊड...बोल्ड...बेल्स ऑफ ....तिरंगाच तिरंगा ....चौकार, षटकारांचा हिशेब...व्हाट अ कॅच...व्हेरी वेल फिल्डेड....सर्टनली अ बॉऊन्ड्री सेव्हड...धिंगाणा ...एखादा गोड चेहरा.....मंत्री व्हिआयपी स्टॅण्ड मधे....जल्लोष जल्लोष ...स्पोर्ट्स बार फुल...हर्षा भोगले , काय म्हणतोस तु...मागच्या मॅचचा उट्टा.....ईन्जुरीची चिन्ता.....पिच चेंज .....स्विंग....गॅलरीतला कोच चा चेहरा...वर्ड-कप नंतर रिटायर्ड ...कॅप्टन्स नॉक...मॅन ऑफ द मॅच..मॅन ऑफ द सिरीज.... ही यादी कधीच संपणार नाही..अजुन तीन दिवस..अजुन तीन दिवस

क्रिकेट

प्रतिक्रिया

स्पा's picture

16 Feb 2011 - 11:51 am | स्पा

वा झकास .....

फक्त ७२ तास .....

नेहराची १७ इंची बत्तीशी !!!!!

हा हा हा हा
जाम हसलो

सहज's picture

16 Feb 2011 - 12:02 pm | सहज

काउंट डाउन लेख आवडला.

टारझन's picture

16 Feb 2011 - 1:32 pm | टारझन

वाचता वाचता खरोखर छातीचे ठोके वाढत गेले ..

साला , आपली घरबसुन बघताना एवढी घामाघुम होते .. त्या प्लेयर्स ची तिथे काय अवस्था असेल , जस्ट काण्ट इमॅजिन .. आणि हो .. सुहास जियो ;)

कमॉण इंडिया कमॉण ..

अवांतर : हॉकी सारख्या फडतुस खेळाला उगाच राष्ट्रीय खेळ बनवुन ठेवला आहे :) तिथे कधीतरी जिंकतात तर बर्‍याचदा सपाटुन मार खातात , बरं तो खेळ भारताच्या तळागाळापर्यंत पोचलाय असे ही नाही :) क्रिकेट ला राष्ट्रीय खेळ घोषित करावे , असे प्रतिपादुन सांगतो.

क्रिकेट सारखा फिव्हर कोणताच णाही ..

- टारेंद्रसिंग ढोणी

sneharani's picture

16 Feb 2011 - 12:03 pm | sneharani

छान लिहलं आहेस!
:)

मुलूखावेगळी's picture

16 Feb 2011 - 12:08 pm | मुलूखावेगळी

योssssssssssssssssssssssssss
sssssssssssss
ssssssssssssssssssssssssssss
मस्त फील आणलास क्रिकेटफीवरचा.
मी फक्त भरताच्या मॅचेसच बघते.प्रत्येक प्लेयर चे छान वर्णन.
पण

गंभीर ची खुनशी नजर आणि रेप्युटेडे गोलंदाजाला दिलेला झणकेदार चौकार..

यातलं खुनशी नजर दिसली नाही अजुन मला. कदाचित तुझा अभ्यास जास्त असेल.

अवलिया's picture

16 Feb 2011 - 12:11 pm | अवलिया

हात्तिच्या हे होय ! मला वाटले.. जाऊ द्या !

फारएन्ड's picture

16 Feb 2011 - 12:20 pm | फारएन्ड

मस्त! :)

एकंदर वातावरण मस्त तापु लागलय.
तिथे ही अन इथे ही :)

विजुभाऊ's picture

16 Feb 2011 - 6:06 pm | विजुभाऊ

गांगुलीचे डोळे मिचकावणे
सचिनचे मध्येच गुढग्यात वाकुन पॅड अ‍ॅड्जस्ट करणे.
हरभजनचे नखे खाणे.
हे देखील टाक रे त्यात.