सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.
आता तुम्ही म्हणाल की काही आफ्रिकन आणि इतर अरबी देश क्रिकेट खेळतात आणि शिवाय ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि खुद्द इंग्लंडचा पण संघ इथे खेळतो.
अरबी देशाचेम काय हो, त्यांच्याकडे मनोरंजन व्हावे म्हणुन कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती पासुन ते थेट माणसांच्या ( पक्षी : विकत घेतलेल्या गुलामांच्या ) झुंजी लावतात, मग मला सांगा क्रिकेट खेळवणे ही काय त्यांना अवघड बाब आहे का ?
बाकी त्या शारजाच्या मैदानात मॅच पहायला जमलेले ( काळा गॉगलवाले) रसिक पाहुन आजही आम्हाला ह्या 'जंटलमेन गेम'चे आश्चर्य वाटते बरं.
( बाकी सध्या काही लक्ष्मीपुत्रांनी "आय पी एल" नामक स्पर्धेत असेच प्लेयर्स 'विकत' घेऊन ते आपापल्या गावात मनोरंजनासाठी खेळवणार असल्याचा घाट घातला आहे, ह्यावरुन एका कॅबिनेट मंत्र्याला आणि बीसीसीआय मधल्या एका दिग्गज आसामीचा गुल्ल व्हावे लागले ह्यावरुन आम्हाला ह्या स्पर्धेच्या 'स्पिरीट्'ची अंधुकशी कल्पना येते आहे, असो पण सध्या विषय तो नाही, नंतर ह्यावर सविस्तर भाष्य करु )
असो, भारताने म्हणे १९८३ साली ही स्पर्धा जिंकुन हा विश्वचषक भारतात आणला होता, नाही नाही, ही गोष्ट अभिनंदन करण्यासारखीच आहे त्याबद्दल वाद नाही, त्या संघाचे अभिनंदन आहेच.
अहो पण त्यानंतर त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडु, मैदानात बाटल्या उचलायला असणारा दुय्यम खेळाडु, सपोर्ट स्टाफ, त्यावेळी मैदानाबाहेर गोळ्या-बिस्कीटे विकणारे ह्यापासुन ते थेट तो सामना झाडावर बसुन फुक्कट पाहणारे हे सगळेच आजकाल मिशीला तुप लाऊन 'क्रिकेट एक्सपर्ट' म्हणुन हिंडतात व काहीही मुक्ताफळे उधळतात ह्याचे आम्हाला मनोसोक्त हसु येते.
आणि बरं का, सन १९८३ नंतर दर ४ वर्षांनी आपल्या इथल्या जनतेला "विश्वचषक विजेते" होण्याची स्वप्ने दाखवुन जो बेमालुम चुना लावण्याचे कार्य इथल्या 'इव्हेंट मॅनेजर्स'नी हाती घेतले आहे त्याला तोड नाही.
असो, पैसा म्हटले की हे आलेच नै का ...
अजुन एक किस्सा सांगु का, मागच्यावेळी की नै आपण ना ( पक्षी : भारत ) पहिल्या फेरीतच धुळ खात गारद झालो ( भेंडी काय दमदार वाक्य होते हे ) असे एका पेप्रात वाचले होते, मग काय हो, धंदाच बसला की ह्या क्रिकेटवाल्यांचा. कारण ह्या पराभवानंतर भारत आणि पाकीस्तान ( ते ही आपले भावंड, पडले पहिल्याच फेरीत बाहेर ) मधले तमाम रसि भयंकर निराश झाल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या.
मग काय झाले तर एक गंमतच घडली, २०-२० नामक ह्या क्रिकेटचे एक छोटेसे पिल्लु जन्माला घालण्यात आले, त्याचाही अचान्क विश्वचषक भरवण्यात आला आणि त्यात ना भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवण्यात आली ( हो हो, खेळवण्यात आली हे बरोबर आहे ) आणि बरं का त्यात ना भारत जिंकला, पुन्हा इथे क्रिकेटचे रोपटे जोमाने फोफावले व पुन्हा पैशाच ओघ सुरु झाल. कालांतराने मग लोकांना हा '२०-२० नशेचा डोस' फार आवडला असे उत्पादकांचे मत झाले व त्यासाठी खास त्यांनी 'आय पी एल' नामक स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे ठरवले, बघा लेको किती क्रिकेट बघताय ते................................. परफेक्ट बिझीनेस, नै का ? ;)
असो, आम्ही एकदा लिहीत गेलो मी मुळ विषय हरवुन काहीतरी तिसरेच लिहण्याची आम्हाला ( राऊतांसारखी ) सवय आहे, सबब आता आम्ही 'बॅक टु विषय' येतो.
सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे,पुन्हा असोच.
आमचा तसा ह्याला विरोध वगैरे नाही बरं का पण ह्या निमित्ताने जे 'रान पेटवले' गेले आहे ते पाहुन आम्हाला अंमळ काळजी वाटत आहे की ह्या आगीत आपले किती महत्वाचे विषय उगाच भक्षस्थानी पडणार आहेत.
ह्या महान देशातले लोक आता कामंधंदे सोडुन जिथे मिळेल तिथे क्रिकेट बघत बसणार आणि बाकीचे विषय आपोआप फाट्यावर मारले जाणार.
- आता युनियन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना ह्याच कालावधीत घडतील व आपण आणि मिडिया (ह्यांना क्रिकेटचेही देणे नाही आणि बजेटशीही घेणे नाही, पैसा बोल्ता है साब ) ह्याकडे चक्क दुर्लक्ष करु.
- आता सरकारी कार्यालये, खासगी कचेर्या, इतर महत्वाच्या सेवा इथले कर्मचारी 'ऑनड्युटी' मॅच बघत बसणार व कामे तुंबणार
- जे लोक आधीच रिकामटेकडे आहेत ते आता चौकाचौकात टीव्ही लाऊन किंवा एखाद्या दुकानासमोर रस्त्यावर उभे राहुन मॅच बघणार, आरडाओरडा करणार व त्यामुळे काय नुकसान होते ते तुम्हीच सांगा, आम्हाला सांगण्याची इच्छा नाही.
- मार्च / एप्रिल म्हणजे परिक्षांचा सिझन हो, आता कसला अभ्यास आणि कसल्या परिक्षा ? मारुन मुटकुन अभ्यासाला बसवणे म्हणजे त्रासच ना ?
- मेन म्हणजे आता ह्या कालावधीत 'वेळ आणि सेवेची गणिते' धडाधड चुकणार
( ( आमची तक्रार नाही, आम्हाला केवळ गंमत वाटते हे आधीच कबुल करतो ) किस्सा पहिल्या दिवशीचा, शनिवारी दुपारनंतर आमच्या भागातली बहुसंख्य दुकाने उगाच बंद किंवा इनअॅक्टिव्ह झाली, इतर सेवापुरवठादारांनी हक्काची 'मॅच बघायची सुट्टी' घेतली, बाहेर निघालो असतो २-३ ठिकाणी रस्त्यावरच टीव्ही लाऊन भारत्-बांग्लादेश ह्यांच्यातले महायुद्ध(?) पाहण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात चालु होता, त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकच्या गमतीत आम्हाला उशीर झाला, नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )
असो, उगाच जास्त वितंडवाद घालत नाही !
क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघयचो व तो आता 'बघवेना' असा झाला म्हणुन ही ४ वाक्ये.
बाकी ही सुरवात आहे.
आम्ही आमच्या ह्या आवडत्या खेळावर असेच भाष्य करत राहु, स्पर्धा अजुन ४० दिवस आहे म्हणतात ;)
मध्यंतरी 'धोबीघाट' हा अत्यंत प्रगल्भ, सामाजिक जाणिवा असणारा, आंतरिक संवेदनांना हात घालणारा, आधुनिकोत्तर साहित्यात मानाचे पान असणारा असा लै भारी अभिजात सुंदर चित्रपट आहे असे ऐकले होते ( व म्हणुनच आम्ही तो पाहिला नाही हा भाग वेगळा ).
म्हणुनच आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.
पुढचे आकर्षण : 'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत
धन्यवाद !
प्रतिक्रिया
22 Feb 2011 - 2:47 pm | टारझन
हा हा हा .. तुफान फटकेबाजी ...
=)) =)) अगदी खरंय .. सबा करिम , मनिंदर सिंग , भिषणसिंग बेदी , मोहिंदर अंबरणाथ , णिखिल चोप्रा, समिर दिघे पासुन ज्यांची नावं ही माहित नाही ह्या सर्वांनी मिशा वाढवल्यात म्हणे .. तुपात बुडवायला =))
बाकी अभ्यासु प्रतिक्रीया चावण्यास उत्सुक :)
- (क्रिकेट एक्स्पर्ट) टारझन
22 Feb 2011 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख फक्कड जमला आहे. कुठे गेले आमचे राको असं म्हणायच्या आता डान्राव बोर्डावर हजर.
शुद्धलेखनाचा धोबीघाट थोडा कमी करणार का डान्राव?
22 Feb 2011 - 2:49 pm | सहज
कांद्याने, नक्षलवादाने शेतकर्याला व गोरगरीब जनतेला रड रड रडवले. जनतेचे दु:ख डान्रावांना बघवलं नाय. त्यांच्याकरता काहीतरी उपाय शोधणं गरजेचं होतं. एखाद्या लहान मुलाला देखील रडताना कडेवर घेउन 'तो बघ उंदीर पळालां' करुन उगी उगी करतात. आमची जनता कशी भोळी, भाबडी. त्यांना मग सचिन, पीटरसन, पाँटींग, लोकांचा खेळ दाखवलां पाहीजे. लोकांचे दु:ख हलके केले पाहीजे. बजेट, परिक्षा हे तर सगळे दरवर्षी येते.
सामाजीक जाणीवा जोपासणारा, द्र्ष्ट्या नेत्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाचे प्रदर्शन करणारा, आबालवृद्धांची निखळ करमणूक करणारा हा नितांत सुंदर सोहळा आमदार श्री श्री डानराव यशस्वी करणार यात आता कोणतीच शंका नाही.
22 Feb 2011 - 6:46 pm | रमताराम
सहजरावांशी सहजपणे बाडिस होण्यास काहीही प्रत्यवाय नसावा असा आमचा समज आहे.
22 Feb 2011 - 2:58 pm | विजुभाऊ
या धोबीघाटावर कोणाकोणाला धुणार आहात ?
हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या संख्येने खेळाणार्या देशांचा वर्ल्ड कप.
तरी बरे यात चिअर लीडर नाचत नाहीत. ( खरेतर हा बारबालाम्वर अन्याय आहे. त्याने चिअरलीडरचे अनुकरण केले की ते बेकायदेशीर ठरते. )
डानराव तुम्ही फक्त काही आवडत्या देशाबद्दलच बोललात
हाँगकोंग सिंगापूर वगैरे देशांचा देखील ए सी सी क्रिकेट वर्ल्ड कप असतो हे ऐकून होतो. त्यात मलेशिया नेपाळ सौदी अरेबिया अफगाणीस्तान मालदीव यू ए ई ओमान हे देश भाग घेतात.
इ.स. दोनहाजार चार मध्येच यानी ए सी सी प्रीमीयर लीग टुर्नामेन्ट भरवल्या होत्या . आपल्या शेजार्यापेक्षा आपण मागास आहोत हे इथे देखील कळते.
हाँगकाँग क्रिकेट फेस्टीव्हल भरवते.
आयर्लंड स्कॉट्लंड हे देश सुद्धा स्वतन्त्र टीम करून खेळतात
आयसीसी चे असिसीएट मेम्बर असणारे एकुण २७ देश आहेत. यातील काही नावे पाहून डोळे पाणावतील
Argentina
Bermuda
Canada
Denmark
Fiji
France
Germany
Gibraltar
Hong Kong
Ireland
Israel
Italy
Kenya
Malaysia
Namibia
Nigeria
The Netherlands
Nepal
Papua New Guinea
Scotland
Singapore
Tanzania
Uganda
United Arab Emirates
United States of America
Zambia
Cayman Islands
या प्रत्येक देशात दर महिन्याला स्पर्धा भरवण्याचा विचार करा भरपूर स्कोप आहे. बारामतीच्या काकाना सांगून तुमचा ग्वातेमाला आनि सुरीनाम क्रिकेट प्रमोशन दौर्यावर वर्णी लावून घ्या.
22 Feb 2011 - 3:01 pm | गणपा
बर तरी बर मिपावर विश्वचषक पेश्शाल उभारण्याच स्वप्न डॉण्रावंनीच आम्हाला दाखवल. नाही तर अजुन ही इंचा इंचाने मागे जात, नक्षलवादी बँका आम्हाला कश्या लुबाडतात या दु:खात प्रगल्भ संस्थळांच्या भांडणात पिचलेले आम्ही लकडी पुलावरुन उडीच मारण्याच्या बेतात होतो. :)
22 Feb 2011 - 3:12 pm | छोटा डॉन
>>बर तरी बर मिपावर विश्वचषक पेश्शाल उभारण्याच स्वप्न डॉण्रावंनीच आम्हाला दाखवल.
=)) =)) =))
गल्लत होते आहे मालक, मिपाच्या विश्वचषक विभागावर आमचा आजही तेवढाच जीव आहे, उलट नेहमीचे रटाळ वर्णने सोडुन इतके वैविध्यपुर्ण लेख येत आहेत ह्याचे खरोखर कौतुक आहे.
त्याला आम्ही सपोर्ट करत राहुच ...
पण मनातुन आम्हाला क्रिकेटची धु धु धुलाई करु वाटते त्यापासुन का हात मागे घेऊ ?
आम्ही धुणारच ...
क्रिकेटला, संघांना, प्लेयर्सना, तज्ज्ञांना आणि जे जे संबंधित आहे त्या सर्वांना ...
- डॉन्या राव
22 Feb 2011 - 4:07 pm | गणपा
अच्छा क्युरेटर बनुन, पाटा विकेट तयार करुन, त्यावर स्वतःच शेंचुरी ठोकायचा मनसुबा आहेत तर :)
चालु द्या.
22 Feb 2011 - 7:10 pm | रमताराम
नाही तर अजुन ही इंचा इंचाने मागे जात, नक्षलवादी बँका आम्हाला कश्या लुबाडतात या दु:खात प्रगल्भ संस्थळांच्या भांडणात पिचलेले आम्ही लकडी पुलावरुन उडीच मारण्याच्या बेतात होतो.
=)).
22 Feb 2011 - 3:57 pm | अवलिया
जोरदार सुरवात !!
>>>>आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.
वाचलास गड्या! आठवा भाग तुझ्यावर लिहून तयार होता... आता दुसरा बकरा शोधतो
22 Feb 2011 - 4:00 pm | छोटा डॉन
त्यात आम्हाला जे गिफ्ट मिळणार होते ते व्यनी करावे.
बाकी हरकत नाही, चालु द्यात.
- छोटा डॉन
22 Feb 2011 - 4:05 pm | मेघवेडा
तद्दन भिकार लेख. फुटबॉलचा वर्ल्डकप आला की नुसता उदोउदो आणि आता आमच्या क्रिकेटच्या वर्ल्डकपच्या वेळेला धोबीघाट होय रे गड्या? आता "डान्या हा पक्षपाती लेखक आहे काय?" असा लेख टाकतोच आहे.
-- रम, तारा रम पम.. रम.
22 Feb 2011 - 4:37 pm | गणपा
चालायचच रे मेव्या परवा चेल्सी हरली नाही का पेनल्टी शुट आउट मध्ये.... कुठे तरी वाफ निघायलाच हवी होती ;)
पळा च्यायला डॉण्राव येतय आता काठी घेउन ;)
22 Feb 2011 - 6:35 pm | निखिल देशपांडे
चालायचेच रे मेव्या...
लेखमालेची संकल्पना उत्तम आहेच येउ द्या..
बाकी जगभरातल्या लोकांचा पैसा घेउन (आमच्या कडला कुकुट्टपालन करणारे सुद्धा यांचा टिम विकत घेतात राव..), जगभरातले प्लेयर्स भाड्याने घेउन त्या फुटबॉल च्या इंग्लिश स्पर्ध पेक्षा आमची आय पि एल बरी. निदान आमचे संघ तरी भारतीय कंपन्याचा मालकीचे आहेत.
22 Feb 2011 - 6:40 pm | छोटा डॉन
फुटबॉल आणि स्पेश्शली 'चेल्सी'द्वेष करण्यासाठी वेगळा धागा काढा असे सुचवतो, इथे जळजळ व्यक्त केली की मी पुढचे लिखाण थांबवेन असे गैरसमज नसल्यास उत्तम ...
- ( ई पी एल च्या शानौशौकतचा फॅन ) छोटा डॉन
22 Feb 2011 - 7:22 pm | रमताराम
त्याचं काय आहे मेव्या, लाथा घालायला लोकांना आवडतात...नि सोप्याही असतात. म्हणून फुटबॉल बरा पडतो. क्रिकेट खेळायल लै ताप असतो, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण करावे लागते, पाचपन्नास नियम लक्षात ठेवावे लागतात (एका डकवर्थ-लुईसनेच अनेकांची विकेट काढली आहे) त्यापेक्षा लाथा मारा गोल करा हे सोपे आहे समजायला, नाय का?
"डान्या हा पक्षपाती लेखक आहे काय?" असा लेख टाकतोच आहे.
टाका टाका, आम्हीही कळफलक परजून तयार आहोत.
(रम आणि रमच... तारा नाही कि रमा पण)
23 Feb 2011 - 11:04 am | घाशीराम कोतवाल १.२
+१ मेव्याशी सहमत
फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या वेळेस मारे उदो उदो करित होते
आता का गळे काढताय ;)
तेव्हा मारे मिपाची फुटबॉल टीम वैगेरे संकल्पना आणल्या त्या रुजवल्या
मग क्रिकेट विश्वचषकाच्या वेळेस हा दुजाभाव काय डॉनराव उत्तर द्या
23 Feb 2011 - 11:13 am | छोटा डॉन
मिपावर किंवा इतरत्र चालणारा क्रिकेटोत्सवाला माझा पाठिंबा आहे पण त्यामागचे कारण असे आहे की ह्यामुळे उत्तमोत्तम साहित्य येत आहे आणि अनेक लोकं लिहती होत आहेत.
हे सर्व उत्तमच आहे.
मात्र माझीही क्रिकेटविषयी काही मते आहे, ती इथे मांडण्यास विरोध का असावा ?
सगळ्यांनाच क्रिकेट आवडावे असा नियम आहे का ?
'सध्याच्या' क्रिकेटविषयी मला जे काही वाटते ते मी लिहणार, कॄपया त्याचा संबंध माझे 'फिफा/फुटबॉल/चेल्सीप्रेम' ह्याच्याशी जोडु नये, त्या अत्यंत भिन्न बाबी आहेत.
धन्यवाद
- छोटा डॉन
22 Feb 2011 - 4:33 pm | मृत्युन्जय
आयला लैच भारी. कोणाला सोडु नका तुम्ही. २०-२० चे राजकारण तर भारीच आवडले आपल्याला. अशीय यावेळची फायनल भारत - पाकिस्तानमध्ये खेळवता येइल का हो?
22 Feb 2011 - 4:56 pm | अमोल केळकर
अहो पाकिस्तानला फायनलला आणून कशाला उगाच साहेबांची डोकेदुखी वाढवताय ??? :)
अमोल केळकर
22 Feb 2011 - 10:55 pm | श्रावण मोडक
लई उत्साहात आलो इथं. डान्रावांच्या मुद्यांची चिरफाड केली असेल पब्लिकनं असं वाटत होतं. पण साला, इथं लोकांना विनोद कळू लागला दिसतंय. म्हणजे डान्रावांचा लेख विनोदी आहे असे मला म्हणायचे नाही. आता बघा ना, "मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत" या वाक्यातील कंस जर शी या शब्दानंतर पडला असता तर...? नसता झाला मस्त विनोद? पण तोही विनोद न करताही पब्लिक इथं इतकं कसं शांत? असो. पुढच्या लेखाची वाट पाहतो आता.
23 Feb 2011 - 2:37 pm | गोगोल
कुठून आली असावी ते खालील वाक्यांवरून कळते :P:
"नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )"
वेलकम टू वर्ल्ड .. ईट ड्झ नॉट रिवॉल्व अराऊंड यू :)