सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


मिपा क्रिकेट जल्लोष!!! भारत विरुद्ध बांग्लादेश.

Primary tabs

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 2:52 pm

विश्वचषकाचे बिगुल अखेर वाजले. अहो सुरुवात तर पहिल्याच बॉल वर चौकार मारुन जोरदार झाली. त्याच उत्साहात मिपावर क्रिकेट चा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत विश्वचषकाचे एक वेगळे पान. आज ह्या वेगळ्या पानाला सुरुवात केली आहेच पण त्यात आम्ही वेळोवेळी सुधारणा करतच राहू... मग देताय ना भेट या पानाला??? या पानावर तुम्हाला लाईव्ह स्कोअर सुद्धा पहाता येणार आहे. या पानाला भेट देण्यासाठी तुम्ही टॉप बार मधल्या क्रिकेट विश्वचषक २०११ हा दुवा ही वापरु शकता

चला मंडळी आता आजच्या सामन्याचा आनंद घेऊयात...
काय वाटतय तुम्हाला भारताच्या किती धावा होणार आज???

क्रिकेट

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

19 Feb 2011 - 2:59 pm | मस्त कलंदर

त्या वेड्या सेहवागमुळे आमचा सचिन आऊट झाला.... :-(

सचिन धावबाद (सेहवाग) २८

चतुरंग's picture

19 Feb 2011 - 4:30 pm | चतुरंग

सचिनने थोडी घाई केली. बॉल मिडॉनच्या जवळच होता फिल्डरपासून पुढे गेला नसल्यामुळे सेहवाग त्याच्याकडे बघून अंदाज घेत होता आणि नेमका डाईव मारुन बॉल फील्ड झाला....सचिनने एखादा क्षण थांबायला हवे होते पण ह्या शेवटी जर तर च्या गोष्टी झाल्या. सच्या अशा रीतीने रनआउट झाल्यावरही वीरु ज्या स्थिरतेने खेळला ते मला कौतुकास्पद वाटले.

बॉल सेहवागच्या पाठी गेला होता तेव्हा टेकनिकली त्यानं सचिनचा कॉल फॉलो करायला हवा.. आणि त्यात सचिन डेंजर एण्डला पळत असल्याने सचिनचाच कॉल महत्त्वाचा होता. पार्टनर सोडून बॉलकडे/फिल्डरकडे बघणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स! :)

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 5:58 pm | निखिल देशपांडे

पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स!

+१ सहमत रे..
सेहवाग भारीच खेळला, पण कोहलीचे क्रेडिटही कमी नाही.
बॉलर्स काय करतात आता पहायचे....

गणपा's picture

19 Feb 2011 - 6:02 pm | गणपा

भांगडा जिंदाबाद ;)

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2011 - 6:19 pm | भडकमकर मास्तर

ते तसं नाहीये, सेहवाग लवकर आत गेला असता ना, तर सचिनने त्याला तुडवला असता.. म्हणून तो घाबरून खेळत राहिलाअआणि चक्क १७५ मारला....

रमताराम's picture

19 Feb 2011 - 11:25 pm | रमताराम

कारणमीमांसा पटली ब्वॉ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तरांशी सहमत.

-दिलीप बिरुटे

सुरवात तर स्वप्नवर झाली. सच्या आत्ताच पाठवला गेला. :(
+२८५

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 3:10 pm | निखिल देशपांडे

३००+ व्हायला पाहिजे राव...

गणपा's picture

19 Feb 2011 - 3:30 pm | गणपा

येस सार
सामनावीर : सेहवाग
भारत : ३०० (+/- १०)
बांगलादेश : २५० (+/- १०)

स्पा's picture

19 Feb 2011 - 3:12 pm | स्पा

सेहवाग धु धु धुतय...
वा..
२००७ चा सगळा बदला घेणार असा दिसतंय

अमोल खरे's picture

19 Feb 2011 - 3:16 pm | अमोल खरे

२००७ चा सॉल्लिड बदला घ्यायला हवा. आत्त्ताच मागील वर्ल्डकप च्या मॅच मध्ये बांगलादेश जिंकल्यावरचा जल्लोष दाखवला. सचिनचा पडलेला चेहरा बघवत नव्हता. आज तर जिंकलच पाहिजे आणि ते पण दणदणीत.

मस्त कलंदर's picture

19 Feb 2011 - 3:38 pm | मस्त कलंदर

आहे हा रनरेट कायम राहिला तर ३५० धावा व्हायला हरकत नाही

प्रचेतस's picture

19 Feb 2011 - 4:09 pm | प्रचेतस

वीरेंद्र सेहवागचे शतक....!!!!!

चतुरंग's picture

19 Feb 2011 - 4:26 pm | चतुरंग

असाच खेळत राहिला तर ३५०+ नक्की.

विरु २०० मारणार वाटते. १६७ (१३३)

त्या येड** मांजरेकला सांगारे कुणी तरी की भारत खेळत आहे.
सारखा देल्ही बॉईज....देल्ही बॉईज ची टेप लावुन बसला आहे मुर्ख.

स्पा's picture

19 Feb 2011 - 5:18 pm | स्पा

आज या सामन्याची आठवण झाली

http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65213.html

मस्त कलंदर's picture

19 Feb 2011 - 5:25 pm | मस्त कलंदर

पण हरकत नाही.. ३५५+ झालेयत...
माझा आणि रंगाकाकांचा अंदाज खरा ठरला!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 5:24 pm | बिपिन कार्यकर्ते

सेहवाग गेला.... पण काम करून गेला... १७५!!! डबल झाली असती तर मजा होती.

मस्त कलंदर's picture

19 Feb 2011 - 5:35 pm | मस्त कलंदर

विराट कोहलीचं शतक होतं की नाही वाटत होतं.. झालं एकदाचं...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Feb 2011 - 6:15 pm | निनाद मुक्काम प...
शेवटच्या षटकात माती खाल्ली ( जेवढ्या जास्त धावा तेवढ्या तगडा रन रेट)
विराट ने ठरवले होते शतक पूर्ण करायचे म्हणजे कराचे .
मग एकेरी धाव हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय .
शेवटचे षटक म्हणून काय हल्लाबोल करायचा ?
(स्वताच्या विकेटची पर्वा न करता )
आता प्रतीस्पर्ध्धी संघ २५० च्यात गुंडाळला पाहिजे .
बाकी सामना वीर म्हणून विरू नक्की (पहिला बॉल ते शेवटचा कोणत्याही बॉलवर ह्याला जरा संधी दिसली कि तिचे सोने करणार .)
मेघवेडा's picture

19 Feb 2011 - 7:19 pm | मेघवेडा

एवढं करूनही माती खाल्ली? च्यायला काय एकेक अपेक्षा असतील लोकांच्या सांगता येत नाही!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2011 - 6:27 pm | बिपिन कार्यकर्ते

बांग्लादेश तोडायलेत भारी! :(

कुंदन's picture

19 Feb 2011 - 6:31 pm | कुंदन

पहिल्या २-४ षटकांमध्ये तोडतील रे.
मग बसतील गप.

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 6:50 pm | निखिल देशपांडे

मुनाफ ने काढली बुवा पहिली विकेट

भारताचे ३७० फॉर ४ होतील बघा ... मी सांगतोय ना ?

बाबुराव's picture

19 Feb 2011 - 7:24 pm | बाबुराव

म्हसोबाचा उपवास धरीन. देवा बागलादेसायच्या
दोन चार इकेटा पडू दे. लय जड जाऊ राह्यला म्याच.

-बाबुराव :)

चावटमेला's picture

19 Feb 2011 - 7:28 pm | चावटमेला

अरे, त्या तमीम्याला उडवा रे... लैच छळायलंय..

गणपा's picture

19 Feb 2011 - 7:57 pm | गणपा

अजुन एक गेला..
माताय बांगलादेशी फलंदाज आउट झाल्यावर असा आनंद होईल अस वाटल नव्हत =))

बाबुराव's picture

19 Feb 2011 - 9:02 pm | बाबुराव

=)) लय भारी

पुढल्या म्याचमधी श्रीसंतला नाय घ्याचं

बाबुराव :)

इन्द्र्राज पवार's picture

19 Feb 2011 - 10:04 pm | इन्द्र्राज पवार

जरी अपेक्षेप्रमाणे सामना जिंकला असला तरी बांगला देश सारख्या तुलनेने दुबळ्या समजल्या जाणार्‍या संघाने झहीर आणि को. यांच्या गोलंदाजीसमोर ३०० च्या घरापर्यंत पोचण्याइतपत धावा काढल्या म्हणजे आमच्या गोलंदाजांचाही त्यानी फेस काढला असे कबूल करावे लागेलच....शिवाय संघ पूरता बादही करता आलेला नाही.

असो....पुढील सामन्यासाठी आपल्या संघाला शुभेच्छा देऊ या.

इन्द्रा

सांगितलं होतं मी भारत जिंकेल म्हणून कुणी आधी विश्वासच ठेवला नाही.

हा सामणा भारत जिंकेल असे जाता जाता णमुद करते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)