कालच घरी आलो दसर्यासाठी. सकाळी सातला घरी पोहोचलो...मस्त एक-दोन तास झोप काढावी म्हणून लोळत पडलो...
साधारण सकाळी नऊ च्या सुमारास जाग आली....ती पण कशी तर पिपाणीच्या आवाजाने...
एक नंदीबैल वाला फक्त पिपाणी वाजवून लोकांकडून देणग्या (कोणता शब्द वापरावा याबद्दल थोडी चलबिचल झालिय माझी...म्हणून हा वापरलाय) मागत होता.
दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती..पण नंतर विचार करता करता वाटलं की आपण नेकरी, शिक्षणापायी बरचं काही गमावलयं.
मला लहानपणीचे दिवस आठवले...जेंव्हा नंदीबैल वाला 'गुबुगुबु' करत यायचा तेंव्हा आधी भिती वाटायची...नंतर अप्रुप...
त्याच्याबरोबरच मला बाकी असे न सांगता भेट देणारे आठवले....दारावर येणार्या बोहारिणी, कंगवे-पिना विकायला येणार्या पारधीणी, गळ्यात देवीचे फोटो अडकवून पैसे मागायला येणारे, भविष्य सांगणारे भोपे, जोगवे मागायला येणार्या बाया (ओळखीतल्या आणी अनोळखी),परडीला येणार्या बाया.......बरीच मोठी होईल ना लिस्ट.
प्रत्येकाची वागण्याची तर्हा वेगळी...मॉल मधे घेतलेल्या डिनर सेट ला बोहारिणी बरोबर घासाघीस करून घेतलेल्या वाडग्याची पण सर नाही येणार..
अशातच एक दिवस ईंजिनियरींग करायला पुण्याला आलो....सोलापूरचा बंगला सोडून भाड्याच्या फ्लॅटमधे रहायला.... :(
तेण्व्हा या सगण्या गोष्टी फार मिस करायचो मी....
हॉस्टेल वर तर एकदा आम्ही बोहारिणी ला जुने शर्ट देऊन सहा काचेचे ग्लास घेतले होते... (समजून घ्या :)) ..पण तो तेवढा एकच प्रसंग.
तर मंडळी सांगायचा मुद्दा असा की ...आजकालच्या आपल्या राहणीमानात झालेल्या बदलाने आपण ह्या सगळ्या आनंदाला मुकत आहोत असे मला वाटते..आपल्या काँक्रीटच्या जंगलात "फेरीवाल्यांना प्रवेश नाही" असे आढळते...
यात तुम्ही आणी मी किती चेंज आणू शकू ते माहीत नाही...पण मला एवढचं सांगायचं ...आय मिस ऑल धिस.....आय रियली मिस ऑल धिस...
प्रतिक्रिया
27 Sep 2009 - 3:49 pm | दशानन
:)
होतं रे.. अचानक घरी गेल्यावर मला पण असे खुप काही आपण मीस करत आहोत असे वाटतं राहतं :(
***
राज दरबार.....
27 Sep 2009 - 3:59 pm | सहज
नक्की कळतं नाही प्रभो काय मिस करतायत जुनी रहाणी की बोहारीण :?
27 Sep 2009 - 4:00 pm | श्रावण मोडक
यालाच जीवन म्हणतात. बदल होत असतोच.
मॉलमध्ये खरेदी करावंसं त्या मुलांना वाटत असेल जे आत्ता बोहारणीकडून काही घेत असतात.
27 Sep 2009 - 4:38 pm | अवलिया
नियतीचं चक्र असतं ... फिरत रहातं.
अमेरीकन अर्थव्यवस्था संपल्यावर (खरं तर अजुन चांगला शब्द होता, पण सार्वजनिक फोरमला खुप मर्यादा असतात) अमेरिकेत आणि इंडियात काय चित्र असेल हे पहाणं मनोरंजक ठरेल.
(भारतात रहाणारा) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Sep 2009 - 7:06 pm | लवंगी
इथल्या सुपरमार्केट मध्ये काचेत ठेवलेले थंड मासे घेण्यात काहिही आनंद नाहि .. :(
27 Sep 2009 - 8:03 pm | स्वाती२
प्रभो, तुम्ही ज्या गोष्टी मिस करताय त्या तुमच्या साठी तेव्हाची पाच मिनिटांची करमणूक होती पण नंदिबैल वाले, भोपे वगैरे यांची आयुष्यभराची फरपट आपण विचारात घेतलीत तर त्यांची पुढली पिढी अशी वणवण करत रहावी असे वाटणार नाही. आपण स्वतः २१ व्या शतकाच्या सर्व सुविधा उपभोगायच्या आणि नंदिबैल मिस करतो म्हणायचे हे पटत नाही. उद्या तुम्हाला नंदिबैल वाल्याचे आयुष्य आवडेल का?
28 Sep 2009 - 2:10 am | टारझन
तुझं स्फुट दोन मिनीट बाजूला ... पण हे टॅग्ज काय रं बाबा ?
असो .. असते एकेकाची चॉइस ... कोणी बोहारिण मिस करतोय .. कोणी कल्हई वाली मिस करतो ..
मी तर बाबा रुपालीला मिस करतो .. गेली बिचारी लग्न होऊन दुसर्या घराच्या समोर .. आता गॅलरीत उभं राहून कंगवे फिरवण्यात काही राम राहिला नाही !
-(एके काळी रुपालीवर लाईन मारणारा) टारझन रोमियो