आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 3:21 pm

प्रेरणास्थान-
इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी.
फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत?
कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं. कंपनीची मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापकीय भागीदार आणि गुंतवणूकदार हे मर्यादित हक्क असलेले भागीदार. कंपनीच्या वाढीबरोबर मॅनेजमेंट आणि गुंतवणूकदार दोघांचाही फायदा.
कंपनीचा शेअर म्हणजे कंपनीची भागीदारी. कोणत्याही गोष्टीला स्वतःचे मूल्य असते. त्याला आत्ता आंतरिक मूल्य म्हणू. गोष्टीची किंमत आणि तिचे मूल्य यात फरक असतो. किंमत ही दिल्या गेलेल्या पैशाच्या रुपात मोजली जाते, त्या बदल्यात मिळालेली गोष्ट म्हणजे मूल्य. कंपनीच्या शेअर्सची (किंवा कोणत्याही अॅसेट क्लासमध्ये) किंमत कशी ठरवायची हा एक खूप मोठा विषय आहे. जर (कोणत्याही अॅसेट क्लासमध्ये) किंमत मुल्यापेक्षा कमी असेल तर त्यात पैसे बनतील अन्यथा नाही हे सहज मान्य व्हावे.
नवखा उद्योजक कंपनी सुरु करतो तेव्हा सुरुवातीच भांडवल एंजल इन्व्हेस्टर्स कडून पुरवलं जातं. नंतर प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेन्चर कॅपिटल ग्रुप्स येतात. या दोघांचाही हेतू बिझनेस पुरेसा मोठा झाला, त्याला योग्य भाव मिळाला की त्यातून सटकायचं असा असतो. ते त्यात पैसा कमावण्यासाठीच उतरले असतात. त्यांचा स्टेक आयपीओ मधून ओपन मार्केट मध्ये कसा विकता येईल याच्या संधी ते शोधत असतात. तगड्या व्हॅल्युएशन्ससाठी वाट बघण्याची त्यांची तयारी असते आणि इक्विटी मार्केट्समध्ये त्यांना अशा संधी मिळतात.
जुन्या काळात कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज (the Controller of Capital Issues(CCI)) अशा प्रकारच्या सामान्य गुंतवणूकदारांना पहिल्या प्रथम दिल्या जाणार्‍या समभागाची किंमत ठरवत असे. अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणा बरोबर या वरील प्रतिबंध काढले गेले. आणि समभागांची किंमत मागणी पुरवठा तत्वाप्रमाणे ठरू लागली. आयपीओ अवास्तव किमतीला उतरवले जाऊ लागले. आयपीओ च्या किमतीवर निर्बंध राहिले नाहीत. परिस्थिती खूप बदली असली तरी ही कोणत्याही आयपीओ मध्ये फटकन पैसे बनवता येऊ शकतात असा समज होता तो तसाच राहिला आहे.
ओपन मार्केटमध्ये सेकंड हॅन्ड मारुतीला पन्नास लाखात कोणीतरी विकायला निघतं आणि लिलावात पाच कोटी ऑफर होऊ शकतात. गाडीची किंमत मागणी-पुरवठा समीकरणाने पन्नास लाख ठरवली गेली असली तिचं मूल्य बदलत नाही.
“It’s almost a mathematical impossibility to imagine that, out of the thousands of things for sale on a given day, the most attractively priced is the one being sold by a knowledgeable seller (company insiders) to a less-knowledgeable buyer (investors).” Warren E Buffet
इनिशिअल ऑफर तर फारच पूर्वी झालेली असते. एक्स्चेंजवर पहिल्यांदा ते आयपीओ नंतर दिसतात. त्यात इनिशिअल असं काहीच राहिलेलं नसतं.
इन्व्हेस्टमेंट बँकर्स आयपीओ बाजारात आणतात. कंपनी करवी इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केला जातो. त्याला मिळणारा पैसा बाजारभावात इक्विटी कितपत प्रीमियमला विकली जाईल यावर ठरतो. त्या कंपनीचे चकचकीत रिपोर्ट्स बनवले जातात आणि दुर्दैवाने बहुतांश गुंतवणूकदार त्यांचे निर्णय कंपनीच्या एजंटा करवी बनवल्या गेलेल्या रिपोर्टवर घेतात.
थोडं जवळच्याच इतिहासाकडे पाहू.
२००१ आयटी बुल रन - टेक कंपन्यांचे आयपीओ मार्केट मध्ये धुमाकूळ घालत होते. कंपनीच्या नावामध्ये डॉट कॉम असलं की पाहिजे तशी किंमत मोजायला गुंतवणूकदार तयार होते. आज पंधरा वर्षानंतर त्यातले कितपत समभाग मार्केटमध्ये आहेत? पेन्टामिडीया, डीएसक़्यु सोफ्टवेअर नावं तरी आज कोणाला आठवत आहेत? बऱ्याच कंपन्यांचं डी लिस्टिंग*6 झालय, ज्या मार्केट मध्ये ट्रेड होतायत त्यांनी गुंतवणूकदाराला पुरेसा फटका पोहोचवला आहे. इतकं मागे कशाला, २००५-०७ इन्फ्रा, पॉव्हर बुल रन पाहू. बदाबदा आयपीओ आले आणि गेले. डीएलएफ ६०० रु इश्यू वरून १२०० ला गेला आणि मार्केट फॅन्सी संपल्यावर १५० ला आला. एचडीआयएल, पार्श्वनाथ डेव्हलपर्स ही अजून काही नावं (उत्साही मंडळी बाकी नावं स्वतः शोधून पाहू शकतात.) .
“A fool and his money are soon invited everywhere.”
मार्केट जसं जसं तापत जातं, तसा येणारा पैसा वाढत जातो. संस्थात्मक परदेशी आणि किरकोळ गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते. मागणी जोरदार असतांना आयपीओ मार्केट मध्ये येतात, मागणी जास्त असल्याने अत्यंत महागडे, प्रीमियम प्रायसिंग आणि अर्थात वाईट परतावा. दोन हजार तीन साली ३०००च्या जवळपास असलेला सेन्सेक्स सात-आठ साली सातपट होत २१००० च्या जवळ पोहोचला. २००७-८ मध्ये आलेल्या आयपीओची संख्या आदल्या वर्षांच्या तुलनेत दुपटी- तिपटीने वाढली.
1
२००८-
रिलायन्स पॉव्हर-
मार्केट तापलेलं असतानाचीच अनिल अंबानी यांनी एक नवीन वीज निर्मिती कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. रिलायन्स एनर्जी ही वीज निर्मिती करणारी कंपनी अनिल अंबानींच्याच ग्रुपमध्ये होती, तिच्या नावाने नवीन पैसा उचलता येणं अवघड होतं. व्यवस्थापनाने एक नवीन कंपनी उघडायचे ठरले. अंबानी यांनी पंचेचाळीस टक्के मालकी स्वतःकडे घेतली, रिलायन्स एनर्जी वगैरे होल्डिंग कंपन्यांकडे पंचेचाळीस टक्के समभाग दिले गेले. त्यांच्यासाठी किंम्मत होती १० रु प्रती समभाग! रिटेल इन्व्हेस्टरला हा समभाग चारशे-साडेचारशे रुपये किमतीला ओपन करण्यात आला.
2

या संपूर्ण कंपनीचा नफा १६ लाख रुपये होता. (ही कंपनी आहे की किराणामालाचं दुकान? फकस्त १६ लाख वार्षिक नफा? फ्रेशर्स कदाचित खुश होतील या पॅकेज मध्ये.) प्रती शेअर नफा-गणित पाहिलं , तर साडेचारशे रुपयाच्या एका शेअर मागे एक पैसा नफा कंपनी कमावत होती. पीई रेश्यो ?*१० साडेचार हजार!
नफा नसला म्हणून काय झालं, कंपनीकडे रिलायन्स हा ब्रँड होता. पॉव्हर ऑन-इंडिया ऑन अशा प्रकारची जाहिरात जोरदार सुरु होती. कंपनीकडे दाखवण्यासाठी जाहिरातच होती कारण दाखवण्यासारखी वीज निर्मिती क्षमता अजिबात नव्हती. २०१६-१७ पर्यंत अठ्ठावीस हजार मेगावॉट वीज बनवण्याची क्षमता बनवू असं प्रोजेक्शन होतं. (२०१५च्या वार्षिक अहवालात साडेचार हजार मेगावॉट बनवत आहोत असं अगदी अभिमानाने म्हणतायत!)

जाहिरात

हा इश्यू ७३ पट ओव्हर सब्स्क्राईब झाला. असं या मार्केटमध्ये काय होतं?
ग्रीडी इन्व्हेस्टर? ब्रँड रिलायन्स? बुलीश मार्केट्स?
एनटीपीसी, पॉव्हर ग्रिड, भेलच्या समभागा चढत्या दरात विकले जात होते. पॉव्हर ग्रिडचं इश्यू प्राईजच्या ९३% वर लिस्टिंग झालेलं होतं. एनटीपीसी पण इश्यू प्राईसच्या पुरेसा वर लिस्ट झाला होता. पण या दोन्ही कंपन्यांना पुरेसा मोठा इतिहास होता. एनटीपीसीची तर मजबूत मोठी वीजनिर्मिती क्षमता होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाजवी दराने यांना बाजारात उतरवण्यात आले होते.
तुलना-
3

अजून काही तुलना-
4

सरकारी कंपन्यांत इतका पैसा? प्रायव्हेटमध्ये याच्यापेक्षा जास्त कसाही मिळेल.
this time its different;
You cant go wrong with infra and power companies.
India is growing, we need lot of power to grow. india will only survive only if these power companies survive.
काय वाट्टेल ते स्पष्टीकरण ऐकण्याची लोकांची तयारी होती.
ही फार चांगली कंपनी आहे? नाही, मग का आयपीओ मध्ये का जावे?- मार्केट पैसा कमावण्यासाठी आहे. सहज सरळ मिळणारा पैसा का सोडा? व्हॅल्युएशनकडे कशाला बघा. सगळे शेअर्स चढत आहेत, हे का चढणार नाहीत? बी विथ ट्रेंड, ट्रेंड इज युवर फ्रेंड.
काही प्रमाणात लोकांना ओव्हर व्हॅल्युएशन्स लक्षात आले होते. पण लिस्टिंगला लगेच काढून टाकू. फुकटचा पैसा आहे बॉस! आणि ग्रे मार्केट प्रीमियम पाचशेच्या आसपास होता. अगदी प्रत्येकाने विकला तरी साडे चारशे रुपयांवर पन्नास-सत्तर रुपये फायदा कसापण मिळेल असे त्यांचे म्हणणे होते.
२००३ साली सुरु झालेली पार्टी संपण्याच्या बेतात आलेली होती. लोलकाने दिशा बदललेली होती. बेअर झोनची सुरुवात, मार्केट करेक्शन का बुल ट्रॅप की काय असणार आहे ते इतक्यात समजणं अवघड होतं. सेन्सेक्स महिन्याभरात बराच पडला होता.
एकवीस फेब्रुवारी २००८, इतिहासात पहिल्यांदा रिलायन्सची जादू फिक्की पडली. काही क्षण वीस टक्के चढून शेअर ५३८जवळ पोहोचला, आणि खाली आला तो परत न चढण्यासाठीच. दिवसाअखेर इश्यूच्या सतरा टक्के खाली ३७२ वर तो पोहोचला होता. व्हॅल्युएशन समजणाऱ्या संस्थात्मक परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे सर्व समभाग मार्केट बेलच्या काही क्षणात बाजारात उतरवले होते. चार बिलियन डॉलर मार्केट कॅप पहिल्या दिवसभरात भस्म झालं होतं. या गोष्टी इथे थांबणार नव्हत्या. काही दिवसात अजून पाच बिलियन डॉलर मार्केट कॅप गेलं. बोनस, बाय बॅकच्या घोषणासुद्धा शेअरची घसरण थांबवू शकल्या नाहीत. इन्व्हेस्टरला जोरदार नुकसान पोचवलं गेलं होतं.
मार्केट फॅन्सी, सेक्टर काहीही या पासून वाचवू शकलं नाही. आजही हा शेअर इश्यू च्या ८०-९०% खाली आहे. कोणत्याही कंपनीमध्ये किंवा आयपीओ मध्ये पैसे गुंतवण्याआधी त्यांचे हेतू पाहणे अत्यंत आवश्यक आहे. You can never make good deal with bad person. चार्ली मंगरने सांगितलेले काही फिल्टर्स इथे पहा.

या पार्श्वभूमीवर आयटी बुल रन पूर्णपणे संपल्यानंतर टीसीएसला योग्य भावात मार्केटमध्ये उतरवणाऱ्या रतन टाटांची नैतिकता ठळकपणे दिसून येते (११ वर्षात ११.५ पट आणि डीव्हीडंट वेगळा). पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे (पाच वर्षे- तिप्पट), माइंड ट्रीचे सुब्रोतो बागची (सात वर्षे -साडेचार पट ) हे अजून काही उदाहरणं. इन्फोसिसचा आयपीओ आयटी रनच्या फार आधी १९९३ दरम्यान आलेला होता.
कोणताही आयपीओ घेण्याआधी त्याच्या मागची कंपनी, त्यांचा बिझनेस, व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्हॅल्युएशनकडे पाहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा लॉंग टर्म मध्ये हा शुअर शॉट पैसे गमावण्याचा राजमार्ग नक्कीच आहे. एकंदर पाहता आयपीओ इंडेक्स सेन्सेक्सला सुद्धा बीट करू शकत नाहीये.
पंचवार्षिक तुलना –बीएसई सेन्सेक्स (निळ्या रंगात) आणि बीएसई आयपीओ (पिवळ्या रंगात)
6

संदर्भ- बीएसई संकेतस्थळावरील ऑफ़िशिअल आकडेवारी

जाता जाता- “take care of your loosers, winners will take care of themselves” –Howard Marks

Investing is not debate club. You don't get points for having a strong argument. You only win if you're right. Never lose sight of that. याची मला जाणीव आहे. मूळ लेख पाहिल्यावर काही पॉइन्ट्स लिहून ठेवले होते. टाकायला उगाच उशीर झाला. मतांचे/ विरोधी मतांचे स्वागत आहे.

काही संज्ञा-
*1- IPO- Initial public offer- is the first sale of a company's shares to the public, leading to a stock market listing. This is done by listing the shares on a stock exchange of the company's choosing such as the Bombay Stock Exchange.
*2- आंतरिक मूल्य-Intrensic Value- intrinsic value refers to the value of a company, stock, currency or product determined through fundamental analysis without reference to its market value. It is also frequently called fundamental value.
*3- Open Market- 'Open Market' An economic system with no barriers to free market activity. An open market is characterized by the absence of licensing requirements, subsidies, unionization and any other regulations or practices that interfere with the natural functioning of the free market.
*4-Investment Banker- An investment banker is an individual who works in a financial institution that is in the business primarily of raising capital for companies, governments and other entities, or who works in a largebank's division that is involved with these activities, often called aninvestment bank.
*5-Bull Run- A financial market of a group of securities in which prices are rising or are expected to rise. The term "bull market" is most often used to refer to the stock market, but can be applied to anything that is traded, such as bonds, currencies and commodities.
*6- Delisting- Delisting involves removal of listed securities of a company from a stock exchange where it is traded on a permanent basis. Delisting curbs the securities of the delisted company from being traded on the stock exchange. It can be done either on voluntary decision of the company or forcibly done by SEBI on account of some wrong doing by the company. There are certain norms which a company needs to follow while listing on the stock exchange.
In case the company fails to do so, then SEBI takes the action which generally leads to delisting of the company from the stock exchange.
*7-Bear Run -'Bear Market' A market condition in which the prices of securities arefalling, and widespread pessimism causes the negative sentiment to be self-sustaining. As investors anticipate losses in a bear market and selling continues, pessimism only grows.
*8-Bull Trap- Bull trap is an inaccurate signal that shows a decreasing trend in a stock or index has reversed and is now heading upwards, when in fact, the security will continue to decline.
6

*9- Gray Market-An unofficial market where securities are traded. Gray (or “grey”).When new securities are bought and sold before official trading begins. The gray market enables the issuer and underwriters to gauge demand for a new offering because it is a “when issued” market, i.e. it trades securities that will be offered in the very near future. The grey market is an unofficial one, but is not illegal.

*10 -PE ratio-PE ratio is one of the most widely used tools for stock selection. It is calculated by dividing the current market price of the stock by its earning per share (EPS). It shows the sum of money you are ready to pay for each rupee worth of the earnings of the company.PE = Market price / EPS= Mkt cap/Profits

सर्व व्याख्या गुगलवरून साभार.

मुख्य संदर्भ-
पराग पारेख यांचे लेख आणि पुस्तकं
The Economics of IPO (and other) Markets- prof sanjay bakshi
Debacle of Reliance Power IPO – A Case study, Dr. Biraj Kumar Mohanty, Pradip Banerjee
आंतरजालावरील इतर फुटकळ पाने आणि वर्तमान पत्रातील काही जुने लेख.

Happy investing!

इतिहासवाङ्मयसमाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारप्रकटनविचारसमीक्षालेखबातमीअनुभवमतमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

थोडा विस्कळीत वाटला ..पण लेख आवडला.

DEADPOOL's picture

6 Dec 2015 - 5:54 pm | DEADPOOL

लेख आवडला!

भंकस बाबा's picture

6 Dec 2015 - 6:01 pm | भंकस बाबा

लेख आवडला,पण पुष्कळदा मार्केट डोक्याने नाही तर हृदययाने चालते.

अनुप ढेरे's picture

6 Dec 2015 - 7:30 pm | अनुप ढेरे

छान लेख!
२००६-०७ साली जसं इन्फ्रा शिवाय काही नाही. भारताला मोठं व्हायचं असेल तर या कंपन्या लागणारच वगैरे आर्ग्युमेंट्स होती तशीच आत्ता फार्माबद्द्ल ऐकायला मिळतात. 'अर्थव्यवस्था कुठेही जाओ लोकांना औषधं तर लागणारच' अशी जेनेरिक विधानं ऐकून फार्मा सेक्टर फंड्स, फार्मा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला जाउ नये असं वाटतं.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 8:07 pm | संदीप डांगे

बरोबर! शेवटी पैसे देऊन शेअर आपण कंपनीचे घेतो, सेक्टरचे नाही.

सुबोध खरे's picture

7 Dec 2015 - 10:23 am | सुबोध खरे

उत्कृष्ट लेख
रिलायंस पॉवरचे समभाग घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती कित्येक लोकांनी आपल्या मुदत ठेवी मोडून चार दिवसात भरपूर पैसा कमावण्याच्या नादात भरपूर पैसा गमावलेला पाहिला आहे. मी मागच्या लेखाच्या प्रतिसादात (दुव्यासह) लिहिले आहे कि २/३ IPO ची किंमत आज उघडलेल्या किमतीपेक्षा कमी आहे( म्हणजे नुसतेच सात वर्षांचे व्याज बुडाले असे नव्हे तर मुदलात खोट आली आहे).
वित्त बाजारात हाव आणि झटपट पैसे मिळवण्याचा लोभ या पायी भरपूर पैसे बुडवून घेणारे भरपूर लोक पाहीले आहेत आणि पाहतो आहे.

ज्ञानव's picture

7 Dec 2015 - 10:44 am | ज्ञानव

अभ्यासपूर्ण लेख आणि सोप्या भाषेतली मांडणी आवडली

मोहन's picture

7 Dec 2015 - 11:26 am | मोहन

सहमत आहे. रिलायंस पावरचा फटका खाल्ल्यावर मी आयपीओ मधे गुंतवणूक बंद केली.

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Dec 2015 - 3:51 pm | लॉरी टांगटूंगकर

जेपी, DEADPOOL, भंकसबाबा, ढेरेशास्त्री, सुबोधसाहेब, ज्ञानव, मोहन खूप धन्स!

pacificready's picture

8 Dec 2015 - 12:26 am | pacificready

मस्त लेख आहे.
काही गोष्टी मुदलातच समजलेल्या नाहीत हळूहळू माहिती करुन घेईन.

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Dec 2015 - 8:28 am | लॉरी टांगटूंगकर

धन्यवाद,
काय लक्षात आले नाही सांगा, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

शेखरमोघे's picture

8 Dec 2015 - 11:23 am | शेखरमोघे

सुन्दर लेख - रिलायन्सची (आणि इतर ऊर्जा उत्पादकान्ची) पिछेहाट चालूच आहे. ज्या "अति भव्य ऊर्जा उत्पादन" UMPP बद्दल बरीच प्रसिद्धी झाली होती, त्यातल्या एकातून रिलायन्स परवानग्या surrender करून मागे हटत आहे आणि इतर UMPP स्पर्धक ऊर्जा विकण्याच्या किमती कशा वाढवून घ्याव्यात या खटाटोपात आहेत.

सुबोध खरे's picture

8 Dec 2015 - 12:36 pm | सुबोध खरे

तिलैया प्रकल्प स्थिती
http://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/jharkhand-want...
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-04-28/news/61615877_1_...
दादरी प्रकल्प स्थिती
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-17/news/54024789_1_...
पाच वर्षे ते दहा वर्षे जमीन हातात येत नाही तर कोणताही उद्योग काय करू शकेल. सरकारी अनास्थेचे आणि उर्जा क्षेत्रातील राजकारण याचे परिणाम
अर्थात अंबानी काही हरिश्चंद्राचे वंशज नाहीतच.

बेकार तरुण's picture

9 Dec 2015 - 12:27 pm | बेकार तरुण

मला फारसा लेखनाचा अनुभव नाही, तरि एक दोन माझे अनुभव लिहितो.
शेअर बाजार म्हणजे शेवटी भिती आणी हाव ह्या मिश्र समुहाच्या मानसिकतेचा खेळ असतो. जेव्हा रीलायन्स पॉवर चा आय पी ओ आला होता, तेव्हा प्रचंड तेजी होती आणि हाव ही एकच भावना सगळ्यांना गुंतवणुक करायला ढकलत होती. मी तेव्हा ईन्स्टिट्युशनल सेल साईडला काम करत होतो (पॉवर सेक्टर नाही). तेव्हा आमच्या ईथल्या अ‍ॅनालिस्टने १५ वर्षानंतरचा आर पॉवरचा कॅश फ्लो काय असेल हे एस्टिमेट करुन त्याला डिस्काउंट बॅक करुन उपसाईड (आजची गुंतवणुक किंमत आणि टारगेट प्राइस मधला फरक) काढली होती. आणि हा रीपोर्ट मार्केट करायला त्याला काहीच अडचण आली नाही. सगळे फंड मॅनेजर्स आधीच मानसीक तयारी करून बसले होते - "वी कॅन नॉट अफोर्ड टू मिस धिस"
हेच जर आज स्टील सेक्टर बाबतीत सांगायला गेल, तर तेच फंड मॅनेजर म्हणतील की २५ वर्ष जाउदे, मला पुढल्या तिमाहित काय होईल ते सांग फक्त :)
जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल). ते स्मार्ट आहेत आणी गुंतवणुकदार मूर्ख आहेत. जो आपल्या घामाचा पैसा न बघता गुंतवतो, तो नक्कीच चूक करत आहे.

प्रसाद१९७१'s picture

9 Dec 2015 - 4:31 pm | प्रसाद१९७१

जेव्हा मार्केट मधे भयंकर तेजी असते तेव्हा पोळ्या भाजुन घ्यायला चोर कंपन्या येणारच (त्यात मला तरि फारस काही चुकीच वाटत नाही, अनलेस दे आर डूईंग एनिथिंग ईलिगल).

ह्यात काहीच चुकीचे नाही. आपला माल कोणत्या भावाला विकायचा हे विक्रेता ठरवेल, आणि त्याला त्या किमतीला ग्राहक मिळत असतील तर तो किंमत का कमी करेल.

जर आयपीओ किमतीच्या पेक्षा बरीच जास्त किंमत लिस्टींग ला मिळत असेल तर त्या आयपीओ चे कंसंलटंट, मॅनेजर फेल झाले असे म्हणायला पाहीजे.

डॉट कॉम चे पीक जोमात असताना एस कुमार या कापड बनविणार्‍या कंपनीने भरमसाठ झैरात करत एसकुमार डॉट कॉम नावाचे बी टु सी कंपनी काढली होती. त्यासाठी बाजारातून फ्रांचायझीसाठी बरेच अर्ज मागवले होते. काहितरी दोन अडीच लाख फी सुद्धा लावली होती. त्याचे पुढे काय वाजले कोन जाणे?

एस's picture

8 Dec 2015 - 11:12 pm | एस

आयपीओच्या फुग्याला टाचणी लावणारा लेख.

मी-सौरभ's picture

8 Dec 2015 - 11:46 pm | मी-सौरभ

फसणारे आहेत म्हणून फसवणारे आहेत
गुंतवणूक करताना डोळे आणि डोके वापरले तर नुकसान कमी होऊ शकते.

बोका-ए-आझम's picture

9 Dec 2015 - 11:09 am | बोका-ए-आझम

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये या विधानाची त्रिकालाबाधित सत्यता पटवून देणारा लेख.

मार्मिक गोडसे's picture

9 Dec 2015 - 11:43 am | मार्मिक गोडसे

दोन आठ्वड्यापुर्वी एका बिझिनेस चॅनलवर दिल्लीतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचे भांडे कसे फोडले ह्याचे चित्रिकरण दाखवले होते व त्यावर चर्चाही दाखवली. त्यानंतर मागच्या आठवड्यात मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबचा विषय वृत्तपत्रांतून चर्चीला जावू लागला. नेमके ह्याच दरम्यान डॉ.लाल पॅथचा (महागडा) आयपीओ बाजारात आला. १० तारखेला इश्यू बंद होत आहे. संबंधीत लॅब दिल्ली व उत्तरेत फेमस आहे. मुंबईतही बर्‍यापैकी जम बसलेला आहे. ह्या बातम्यांचा आणी ह्या इश्यूचा काही संबंध आहे का?

मार्मिक गोडसे's picture

23 Dec 2015 - 12:48 pm | मार्मिक गोडसे

महागडा वाटलेल्या लाल पॅथने ४५% पार केले.
अल्केमही चांगला चाललाय.

प्रसाद भागवत's picture

23 Dec 2015 - 1:02 pm | प्रसाद भागवत

Whatsapp च्या माध्यमांतुन मी Alkem ची शिफारस केली होती.( माझ्या WA समुहांत सामिल येथील बरेच सभासदांना हे माहित आहे) माझ्या क्लायंट्सपैकी बहुतेकजणांना 14 शेअर्स मिळाले. पैकी आज 11 शेअर्स 1360 ला विकुन भांडवल मोकळे केले. उर्वरित शेअर्स 'चकटफु' सदरात जमा रहातील.

मार्मिक गोडसे's picture

23 Dec 2015 - 1:12 pm | मार्मिक गोडसे

हे ज्याला जमतं तोच मार्केटमध्ये टिकू शकतो व मजा घेऊ शकतो.

भंकस बाबा's picture

24 Dec 2015 - 4:33 pm | भंकस बाबा

लाल पैथ धोकादायक वाटत आहे. त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे. हां भाव काहीतरी गड़बड़ वाटते.

डायग्नोस्टिक फर्म मधील एक जाणकार!

मार्मिक गोडसे's picture

24 Dec 2015 - 10:40 pm | मार्मिक गोडसे

त्यांचा बिझनेस संशयास्पद आहे.

आम्हालाही कळू द्या त्यांच्या बिझनेसचा खरा चेहरा.

भंकस बाबा's picture

24 Dec 2015 - 10:57 pm | भंकस बाबा

लाल लैबचा बिझनेस म्हणजे डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही. सध्या गळेकापू स्पर्धेत ४०% इतकी कट द्यावी लागते. शिवाय स्टाफ सैलरी , इतर खर्च आहे. आता यात कंपनी फायदा किती कमवणार व् भागधारकाना किती देणार? मला वाटते व्यवसायवृद्धिचे गाजर दाखवुन ही कंपनी बाजारात भाव वाढवत आहे.

मार्मिक गोडसे's picture

25 Dec 2015 - 5:48 pm | मार्मिक गोडसे

४०% कट अधिक ४०% इतर खर्च पकडला तरी २०% नफा धोकादायक वाटत नाही. कंपनीच्या शेअरचा बाजारातील भाव हा वेगळा विषय आहे.

डायग्नोसिस, हा धंदा कट प्रैक्टिस शिवाय होत नाही

औषधाच्या कंपन्याही अशा प्रकारचा धंदा करतात. त्यांचेही शेअर तितकेच धोकादायक असायला पाहीजेत.

भंकस बाबा's picture

25 Dec 2015 - 10:23 pm | भंकस बाबा

फार्मा कंपन्याचे रॉ मटेरिअल भलतेच् स्वस्त असते. इतके की चने शेंगदाने महाग वाटावेत.
डायग्नोसिस कम्पनीपैकी रैनबैक्सी ने सुरु केलेला बिज़नेस बघा. इतकी वर्षे मार्केटमधे राहून देखिल त्यांनी विशेष काही केले नाही. प्रमोटर कमावतील हो, इन्वेस्टरचे काही खरे नाही.

मार्मिक गोडसे's picture

29 Dec 2015 - 10:31 am | मार्मिक गोडसे

औषधी कंपन्यांचा नुसते रॉ मटेरिअल स्वस्त आहे म्हणून प्रॉफीट भरपूर असा हिशोब नसतो. आर अँड डी वर केलेला खर्चही वसूल करायचा असतो.

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 4:22 pm | भंकस बाबा

आर एण्ड डी भारतात फ़क्त बड्या कंपन्या करतात. तरिही त्यांचा जास्त भर पेंटन्ट संपत आलेल्या ओषधांच्या निर्मितीवर असतो. शिवाय त्यांना सगळे जग मोकळे असते. डायग्नोसिस कंपनीला मर्यादा असतात. वेळच सांगेल लाल लैब कुठे जाईल ते!

आनंदराव's picture

9 Dec 2015 - 2:10 pm | आनंदराव

नुकताच आलेला सी सी डी चा आय पी ओ
३५०/- कि काय प्राईस होती
कंपनी जमा केलेले निम्मेपैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे.
सध्या शेअर चा भाव २५०/- आहे.

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 4:09 pm | प्रचेतस

उत्तम लेख.
आयपीओ मध्ये कधीच गुंतवणूक केली नाही आतापर्यंत.

प्रसाद भागवत's picture

9 Dec 2015 - 5:45 pm | प्रसाद भागवत

करा... Alkem Laboratories Ltd. चा उद्या शेवटचा दिवस आहे. आज दिवसखेर रीटेल कॅटेगरीत पुर्ण भरणा झाला आहे. लिस्टिगच्यावेळी पुर्ण भांडवल काढुन घ्यायचे ह्या ईराद्याने अर्ज करावा. अर्थातच नफ्याची हमी कधीच नसते व येथेही नाही तरीही माझ्या मते तरी, शेअर मिळाल्यास रिस्क/रिवॉर्ड रेशो अनुकुल आहे. .

रिलायन्स पॉवर बद्दल गळे काढण्यापेक्षा समोर आहे ती संधी साधणे अधिक महत्वाचे.

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 5:52 pm | प्रचेतस

धन्यवाद.
विचार नक्कीच करतो ह्याचा आज.

प्रसाद भागवत's picture

23 Dec 2015 - 12:31 pm | प्रसाद भागवत

प्रचेतस साहेब...अल्केम करिता अर्ज केला होता काय ??...

प्रसाद भागवत's picture

9 Dec 2015 - 6:06 pm | प्रसाद भागवत

जेथे आळंदीच्या वारीत सगळेच आध्यात्मिक भावनेने सामील झालेले वारकरी नसतात आणि काही पाकिटमारही असतात, तेथे शेअर बाजार हा साधुसंताचा मेळा आहे ही भावना ठेवणेच मुळात चुकीचे आहे. आपणही त्यात पैसे मिळवायलाच भाग घेत असतो, उखळ पांढरं झाले की 'पाहिलत, मी कित्ती हुषार...आणि हात पोळले की 'काही नाही हो, जुगार आहे सगळा...' असा बहुतेक जणांचा खाक्या असतो.

येथे बाजारांत भोळे, खरेतर अनपेक्षितपणे घबाड मिळालेले अलिबाबा आहेत, केवळ दुसर्याचा सल्ला ऐकुन अर्धवट माहितीवर योजना आखणारे लोभी कासिम आहेत. चोर तर बहुसंख्येने आहेतच आहेत मात्र त्याचबरोबर खरे खोटे चांगले वाईट यांची पारख असणारी मॉर्जियानाही आहेच की... आपण तिचा रोल करण्याचा प्रयत्न करावा.. जरी चोरांची मेजॉरिटी असली, तरी शेवट सुखांत झाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी एवढेच मी सुचवेन

मदनबाण's picture

10 Dec 2015 - 8:25 pm | मदनबाण

लेखन आवडले !
असेच लिहीत रहा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference