==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
डोंगरउतार संपून सपाटीवर आल्यावर पावसाळी वातावरण संपून लखलखखीत ऊन पडले होते. मग मात्र पुढचा दोन एक तासांचा प्रवास मधून मधून डुलक्या घेत झाला. त्याचा फायदाच झाला कारण याला राष्ट्रीय उद्यानाजवळ पोहोचलो तेव्हा अभयारण्याच्या सफरीसाठी ताजातवाना झालेला होतो.
याला राष्ट्रीय उद्यान (Yala National Park)
या श्रीलंकेच्या दक्षिणपूर्व किनार्यावर असलेल्या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ९७९ चौ किमी आहे. त्याला इ स १९०० मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. त्याच्या विशाल आकारात वर्षारण्ये, गोड्या पाण्याची पाणथळ जमीन व समुद्रकिनार्यावरील खारट पाणथळ जमीन यांच्यावर दाट जंगली प्रदेश, हिरवे गवताळ प्रदेश, कोरडे खुरट्या वनस्पतींचे प्रदेश, नैसर्गिक सरोवरे, इत्यादी विविध प्रकारचे पर्यावरणाचे प्रकार (ecosystems) सामावलेले आहेत. याशिवाय, "सूर्य आणि वाळू (सन अँड सँड)" आवडणार्या पर्यटकांसाठी सुंदर समुद्रकिनारेही आहेत.
आकारमानाप्रमाणे देशातील दुसर्या क्रमांकावर असलेल्या या उद्यानाचे पाच भाग आहेत, त्यातले फक्त दोनच पर्यटकांसाठी खुले केलेले आहेत. पण इतके क्षेत्रफळही चार एक तासांच्या सफारीला पुरेसे ठरते. येथे सस्तन प्राण्यांच्या ४४ प्रजाती आणि पक्षांच्या २१५ प्रजाती पहायला मिळतात. येथे ३००-३५० हत्ती, अनेक बिबटे, हरणे, सांबर, स्लोथ, अस्वले, कोल्हे, मोर, जंगली म्हशी आणि मगरी आहेत. त्या सफरीत पोहणे आणि सूर्यस्नानाची भर टाकली तर ही सफारी सहजच पूर्ण दिवसाची म्हणजे सात-आठ तासांची होऊ शकते.
भारताचा पश्चिम किनारा व भारताच्या पश्चिमेकडील देश आणि श्रीलंकेच्या पूर्वेकडील देश यांच्यातल्या सागरी व्यापारातला हा परिसर महत्त्वाचा थांबा असल्याने त्याला प्राचीन काळापासून ऐतिहासिक-सांस्कृतिक-व्यापारी महत्त्व राहीले आहे. येथील मगुल विहार हा स्तूप इ स ८७ मध्ये बांधला गेला. तसेच, पाचव्या शतकापासून येथे मानवनिर्मित जलप्रणाली वापरून शेती केली जात असल्याचे पुरावे आहेत.
इथल्या समुद्रकिनार्यावरच्या रावणकोट्टे या जागेवर रावणाच्या राज्याचे अवशेष होते व आता ते समुद्राच्या वाढत्या उंचीमुळे पाण्याखाली गेले आहेत असे म्हणतात. वसाहतकालात गालेचे व्यापारी महत्त्व वाढल्यावर या जागेचे महत्व कमी झाले व इथल्या संस्कृतीचा र्हास झाला.
मार्गदर्शक या उद्यानात फिरण्याचे तिकिट काढण्यात गुंतला असताना, तिकिटघराशेजारी एक छोटे संग्रहालय दिसले. तेव्हा त्यातून अर्धा एक तास चक्कर मारली. तेव्हा काढलेले काही फोटो...
याला राष्ट्रीय उद्यान संग्रहालय ०१
.
याला राष्ट्रीय उद्यान संग्रहालय ०२
.
याला राष्ट्रीय उद्यान संग्रहालय ०३
.
याला राष्ट्रीय उद्यान संग्रहालय ०४
.
संग्रहालयाची फेरी पुरी होताहोताच मार्गदर्शक आला आणि आम्ही जीपमधून उद्यानाच्या सफरीला बाहेर पडलो. कोडुल्ला उद्यानाच्या तुलनेत प्राणी व पक्षांच्या प्रजाती व संख्येच्या मानाने हे उद्यान जास्त समृद्ध आहे. सतत कोणते ना कोणते प्राणी नजरेस पडत होते. मुख्य म्हणजे इथले अनेक प्राणी एकमेकाशी सहजीवन करायला शिकले आहेत असे दिसत होते. शांतपणे बाजूबाजूला चरणारे प्राणी व पक्षी इथे सतत दिसत होते. हा गुण नक्कीच माणसाने शिकण्याजोगा आहे.
उद्यानात फिरताना काढलेले काही फोटो...
याला राष्ट्रीय उद्यान ०१
.
याला राष्ट्रीय उद्यान ०२ : घोरपड
.
...
याला राष्ट्रीय उद्यान ०३ व ०४ : जंगली रेडे
.
याला राष्ट्रीय उद्यान ०५ : नैसर्गिक पाणथळ (वॉटर होल) आणि त्याच्या काठावरचे प्राणी
.
याला राष्ट्रीय उद्यान ०६ : मोर
.
...
याला राष्ट्रीय उद्यान ०७ व ०८ : मोर
.
याला राष्ट्रीय उद्यान ०९ : हत्ती
येथील जंगली हत्तींना माणसांची फारशी फिकीर नसल्याचे दिसून आले. त्यातला एक तर कोणाची कदर न करता, किंबहुना केवळ जंगलावरचा त्याचा हक्क आमच्या मनावर ठसविण्यासाठी, आमच्या जीपच्या समोरून आपल्याच मस्तीत डुलत गेला. त्याच्या या अचानक केलेल्या कृतीने चालकाला घाईघाईत ब्रेक लावावा लागला. पण, महाराजांनी तिकडे ढुंकून पाहण्याचेही कष्ट घेतले नाही...
याला राष्ट्रीय उद्यान १० : आपल्याच मस्तीत आमचा रस्ता अचानक कापत गेलेले हत्तीमहाराज
.
याला राष्ट्रीय उद्यान ११ : नैसर्गिक जलाशयाच्या काठावर पहुडलेली मगर
.
याला राष्ट्रीय उद्यान १२ : दोन मगरी आणि दोन पक्षी
.
या उद्यानाच्या दक्षिण टोकाला पोहोचल्यावर आपण भारतीय महासागराच्या किनार्यावर पोहोचतो...
याला राष्ट्रीय उद्यान १३ : भारतीय महासागर
इ स २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये या जागेला ६.१ मीटर पर्यंत उंचीच्या लाटांचा समुद्रकिनार्यापासून ४०० ते १५०० मीटर आतपर्यंत तडाखा बसला होता. त्या दुर्घटनेत २५० जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या खाणाखुणा आजही इथल्या परिसरात दिसतात. त्सुनामीची आठवण म्हणून येथे एक स्मारक बांधलेले आहे...
...
याला राष्ट्रीय उद्यान १४ व १५ : इ स २००४ च्या त्सुनामीचे स्मारक
या स्मारकातील चार पट्ट्या त्सुनामीच्या सर्वात मोठ्या चार लाटांचे प्रतीक आहेत. प्रत्येक पट्टीची उंची ती प्रतिनिधित्व करत असणार्या लाटेच्या उंचीइतकी आहे.
.
याला राष्ट्रीय उद्यान १६ : या किनार्यावर पोहणारे परदेशी पर्यटक त्सुनामीच्या प्रकोपात बळी पडले होते
.
याला राष्ट्रीय उद्यान १७ : हरिणांचा कळप
.
याला राष्ट्रीय उद्यान १८ : मित्रभावाने एकत्र चरणारे हत्ती आणि जंगली म्हशी
.
याला राष्ट्रीय उद्यान १९ : मित्रभावाने एकत्र विहरणारी जंगली डुकरे आणि मोर
.
या उद्यानातही बिबट्याने आम्हाला चकवा दिला. तास दीड तास अनेक मार्गदर्शकांनी एकमेकाला सांगितलेल्या बिबट्या नजरेस पडल्याच्या खबरींच्या आधारावर जंगलात अनेक पुढेमागे चकरा मारल्या. तरीही त्याने दर्शन दिले नाही.
संध्याछाया पसरू लागल्यावर उद्यानाच्या नियमांचे पालन करून तेथून बाहेर पडून कातारागामाच्या दिशेने निघणे भाग पडले.
याला राष्ट्रीय उद्यान २० : संध्याराणीने उधळलेले रंग
.
(क्रमश : )
===================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
31 Dec 2015 - 9:10 pm | सुमीत भातखंडे
भारी आलेत सगळे फोटो.
मस्त
1 Jan 2016 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा
पुन्हा एकदा जब्बरदस्त!
समांतर:- हत्ती! हत्ती! हत्ती!
1 Jan 2016 - 1:33 am | रेवती
भारी फोटू. रस्ता क्रॉस करणार्या हत्तीचा फोटू गोड आलाय. मित्रत्वाने वागणारे प्राणी आवडले. त्सुनामी आल्यावर येथेही बरीच हानी झालेली दिसतिये.
1 Jan 2016 - 10:56 am | अमृत
पण ती नक्की घोरपडच आहे काय की कोमोडो द्रॅगन?
1 Jan 2016 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोमोडो ड्रॅगन, कोमोडो मॉनिटर किंवा मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड.
1 Jan 2016 - 12:16 pm | अजया
अपनीही धुनमें चालणारे गजराज आवडले!
1 Jan 2016 - 8:49 pm | पद्मावति
मस्तं!
2 Jan 2016 - 5:57 pm | विलासराव
हाही भाग आवडला.
2 Jan 2016 - 6:42 pm | प्रशान्त जोशी
छान
2 Jan 2016 - 6:42 pm | प्रशान्त जोशी
छान
3 Jan 2016 - 1:05 am | प्रचेतस
जबरी फोटो आहेत.
किनाराही अतीसुंदर.
6 Jan 2016 - 9:10 am | सुधीर कांदळकर
नायिकेची बहीण आमच्या मालवणजवळील घराच्या गडग्यावर नुकतीच दर्शन देऊ गेली.
6 Jan 2016 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद कळला नाही. फोटोही दिसत नाही.
7 Jan 2016 - 7:18 am | सुधीर कांदळकर
न दिसल्यामुळे मजा निघून गेली.
7 Jan 2016 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते चित्र तुम्ही पब्लिक शेअर न केल्याने इथे दिसत नसावे.