==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
आजच्या सहलीच्या पहिल्या भागात रावणाने सीतामाईला जेथे बंदी करून ठेवले होते त्या अशोकवनातून प्रवास करायचा होता.
आजच्या पाचव्या दिवसाचा कार्यक्रम असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : पाचवा दिवस : नुवारा एलिया --> सीता एलिया --> रावण एल्ला --> एल्ला गॅप
--> याला राष्ट्रीय उद्यान --> कातारागामा (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)
***************
सीता अम्मान कोविल (सीतामातेचे मंदिर)
नुवारा एलियापासून पाच किलोमीटरवर रस्त्याला लागून एका जलप्रवाहाच्या आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेत आधुनिक कालात बांधलेले दक्षिण भारतीय शैलीतले एक मंदिर लागते. हेच सीता एलिया (सीता पठार) नावाच्या गावात असलेले सीता अम्मान कोवील किंवा सीतामातेचे मंदिर. नाव सीतामंदिर असले तरी मंदिरात सर्वसाधारण राममंदिराप्रमाणे राम, सीता आणि लक्ष्मण या तिघांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या शेजारी एक आधुनिक कालात बांधलेले हनुमान मंदिर आहे.
या मंदिराजवळ शेजारच्या ओढ्याकाठी असलेल्या अजून एका छोट्या मंदिरात एक शतकापूर्वी सापडलेल्या तीन मूर्ती आहेत व त्यातील एक सीतेची आहे असे म्हणतात. स्थानिक लोकांच्या मते त्या मूर्ती येथे अनेक शतकांपासून पुजल्या जात आहेत.
मंदिराला लागून एक झरा वाहतो, त्याला सीता झरना असे म्हणतात. त्याच्या मंदिराशेजारच्या भागाला सीता पोकुना (सीता स्नानकुंड) असे म्हणतात. बंदिवासात असताना सीता येथे स्नानाकरिता येत असे व झर्याच्या मंदिरापलीकडील काठावर असलेल्या एका कातळावर बसून ध्यानधारणा करीत असे असे म्हणतात. झर्यातल्या व काठावरच्या कातळांत गोलाकार खड्डे आहेत. काहींच्या मते ते रावणाच्या हत्तींच्या पायाचे ठसे आहेत, तर काहींच्या मते ते हनुमानाच्या पायांचे ठसे आहे. खरे खोटे राम जाणे.
स्थानिक दंतकथेप्रमाणे, या परिसरातले हाक्काला वनस्पतिशास्त्र उद्यान (Hakgala Botanical Garden) या नावाने ओळखले जाणारे जंगल हेच, जेथे सीतेला रावणाने बंदी करून ठेवले होते ते, अशोकवन आहे. त्या जंगलात खरोखरच अनेक अशोकवृक्ष आहेत. अशोकवनातील सीतेच्या बंदिवासाची जागा समजल्या जाण्यार्या स्थानावरही एक सीतामंदिर बांधावे अशी या मंदिराच्या विश्वस्तांच्या इच्छा आहे. त्या स्थानाच्या पर्यटनस्थळ म्हणून असलेल्या मोठ्या महत्वामुळे, तेथे मंदिर व तीर्थक्षेत्राची विकासकामे करण्यासाठी श्रीलंकेच्या पर्यटन मंत्रालयाने १२.८ हेक्टर जागेची निश्चितीही केली होती. मात्र, काही बौद्ध संस्था आणि पर्यावरणवादी संघटनांच्या विरोधामुळे तो प्रकल्प स्थगित केला गेला आहे. धर्मकारण आणि धर्माआडून राजकारण खेळले जाणे वैश्विक वस्तूस्थिती आहे !
रस्त्याला खेटून आणि रस्त्यापेक्षा बर्याच खाली असलेल्या चिंचोळ्या जागेवर असल्याने या मंदिराचे फोटो काढणे थोडेसे जिकिरीचेच काम आहे. त्यातही वरूणराज मधूनच अचानक आपली हजेरी लावून आमची तारांबळ उडवीत होतेच !
हे त्या मंदिराचे काही फोटो...
सीतामंदिर ०१ : समोरून
.
सीतामंदिर ०२ : एका बाजूने
.
सीतामंदिर ०३ : कलश
.
सीतामंदिर ०४ : कलशपट्टीकेमधला एक मूर्तीगट
.
सीतामंदिर ०५ : मंदिराच्या सभामंडपातून दिसणारे गर्भागार
.
सीतामंदिर ०६ : गर्भागारातल्या मूर्तीचा जवळून घेतलेला फोटो
.
सीतामंदिर ०७ : सीताकुंड आणि तेथील कातळावरचे "रावणाच्या हत्तींच्या / हनुमानाच्या पायांचे ठसे"
.
सीतामंदिर ०८ : हनुमान मंदिर
.
सीतामंदिर ०९ : प्राचीन मूर्तीं ठेवलेले मंदिर
.
सीतामंदिर १० : मंदिराजवळून दिसणारा अशोकवनाचा एक भाग
.
मंदिरातला फेरफटका संपवून नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास एल्लाच्या दिशेने सुरू झाला....
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०१
.
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०२
.
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०३
.
एल्ला गॅप (एल्ला दरी)
सीतामंदिरापासून तासा-दीड तासाने येणार्या एल्ला गॅप नावाच्या ठिकाणी थांबलो. हे खास थांबून सृष्टीसौंदर्य पाहण्याचे ठिकाण आहे असे प्रवासी कंपनीने माहितीपत्रकात लिहिले होते. मला तसे काही विशेष सृष्टीसौंदर्य दिसले नाही...
एल्ला गॅप
उलट आतापर्यंतच्या प्रवासात अनेक उत्कृष्ट सृष्टीसौंदर्य असलेल्या निर्नावी जागा येऊन गेल्या होत्या हे वरच्या फोटोंवरून समजले असेलच. या जागेवर एक रेस्तराँ आहे हे कदाचित त्या थांब्याचे गमक असावे ! अर्थात, थंड हवेत गरम गरम कॉफी केव्हाही स्वागतार्हच म्हणा. तेव्हा ती घेऊन पुढे वाटचाल सुरू केली.
.
रावण एल्ला (रावण गुहा)
एल्ला गॅपपासून साधारण १०-१५ मिनिटात रावण एल्ला (रावण गुहा) असा फाटा येतो. गुहा मुख्य रस्त्यापासून पायवाटेने एक किलोमीटर आत जंगलात आहे. या जंगलात बोगद्यांचे एक जाळे आहे व ते रावणाने बनवलेले गुप्त मार्ग आहेत असे समजले जाते. रावणगुहेशेजारी कालुतरा नावाच्या ठिकाणी एक बुद्धमंदिर आहे. ही जागा रावणाच्या राजवाड्याची होती असे म्हणतात. एक दुर्लक्षित गुहा आणि त्यातल्या खास कोरीवकाम अथवा वैशिष्ठ्ये नसलेल्या मूर्ती असे त्या रावण गुहा मंदिराचे स्वरूप आहे असे मार्गदर्शकाकडून समजले.
तेथे असलेल्या माहिती देणार्या पाट्यांवरूनही पावसात भिजत एक किमी दूर पायवाटेने जाण्याइतपत काही असेल असे वाटले नाही. तेव्हा पाट्यांवरच्या फोटो व माहितीवरच समाधान मानले...
रावण एल्ला (रावण गुहा) ०१
.
रावण एल्ला (रावण गुहा) ०२
.
श्रीलंकेतल्या रामायणाशी निगडित स्थाने व पर्यटनात रस असलेल्यांना या दुव्यावर माहिती मिळू शकेल.
.
या पुढचा प्रवास पावसाची रिपरिप असलेल्या सुंदर निसर्गातून परत सुरू झाला. एका ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या धबधब्याशेजारी उतरून इतर पर्यटकांमध्ये मिसळून फोटो काढून घेतले...
रावणगुहा ते याला रस्त्यावरचा एक धबधबा
.
डोंगरउतार संपून सपाटीवर आल्यावर पावसाळी वातावरण संपून लखलखखीत ऊन पडले होते. मग मात्र पुढचा दोन एक तासांचा प्रवास मधून मधून डुलक्या घेत झाला. त्याचा फायदाच झाला कारण याला राष्ट्रिय उद्यानाजवळ पोहोचलो तेव्हा अभयारण्याच्या सफरीसाठी ताजातवाना झालेला होतो.
.
(क्रमश : )
===================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन... ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...
०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी... ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी... ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान... ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)... १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी... १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड... १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
१५ : याला राष्ट्रीय उद्यान... १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
१७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो... १८ : कोलंबो... (समाप्त)
==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================
प्रतिक्रिया
30 Dec 2015 - 12:02 am | बाबा योगिराज
सर्व फोटो आवडले, सोबत लेखही आवडला. सुंदर.
30 Dec 2015 - 12:07 am | रेवती
सितामाईचे मंदीर एकदम रंगीबेरंगी आहे.
30 Dec 2015 - 12:41 am | पद्मावति
वाह, खूप सुंदर मंदिर. वर्णन नेहमीप्रमाणे उत्तमच.
30 Dec 2015 - 2:22 am | राघवेंद्र
सर्व लेख वाचत आहे. पु. भा. प्र. !!!
30 Dec 2015 - 10:02 am | प्रचेतस
खूपच सुरेख.
हिरवंगार एकदम.
30 Dec 2015 - 11:16 am | अजया
अशोकवन,सीतामंदीर ! रामायणकाळात नेऊन आणलंत आज!
30 Dec 2015 - 11:25 am | सुमीत भातखंडे
रिफ्रेशींग. सीतामंदिर छान आहे.
30 Dec 2015 - 6:51 pm | शान्तिप्रिय
सर
खूप सुन्दर वर्णन आणि प्रकाशचित्रे.
आम्हिही आत्ताच श्रिलंकेला जाउन आलो असे वाटले हे वाचून.
30 Dec 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !
6 Jan 2016 - 8:55 am | सुधीर कांदळकर
छान टिपली आहे. आवडले. धन्यवाद.
6 Jan 2016 - 5:48 pm | पैसा
छान सहल