पानिपत बद्द्ल थोडेसे (२)

प्राध्यापक's picture
प्राध्यापक in जनातलं, मनातलं
12 May 2012 - 2:24 pm

नमस्कार मित्रहो,
मागच्या माझ्या लेखात पानिपतची पुर्व पिठीका मी मांडली ,मागचा लेख निश्चीत पणे छोटा होता त्याबद्दल क्षमस्व .
तसेच मागच्या लेखामधील प्रतिक्रीया वाचताना काही मान्यवरांच्या प्रतिक्रीया खटकल्या ते उगाचच या लेख मालीकेला ब्राह्मण विरोधी असे लेबल लावताना आढळले,त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट करु इच्छीतो .
पानिपत ही घटना तत्कालिन मराठी राजकारणावर मोठा परीनाम करणारी ठरली,या पराभवाला आज २५० वर्षांपेक्षा जास्त काळ होउनही या घटनेची लोकांवर अजुनही मोठी मोहीनी आहे,या पराभवाची कारणमिमांसा अनेकांनी केलेली आहे,व अजुनही होत आहे.त्याचाच विचार करुन मिपा च्या व्यासपिठावर याची गंभीर चर्चा व्हावी हीच प्रामाणिक इच्छा आहे.
सदर विषय व्यापक तर आहेच तसेच वादग्रस्तही आहे, विषयात संघर्ष तर आहेच,त्याच बरोबर नाट्यही आहे ,ही मराठ्यांच्या लक्ष बलिदानाची शोकांतिका आहे ,त्यामुळेच आजही ही घटना लाखो मराठी मनांमध्ये घर करुन बसली आहे ,युध्दाच्या कथा नेहमीच रम्य असतात त्यामुळे अनेक कादंबरीकारांना हा विषय आवड्तो.
अशा मुळेच मला वाटले की पानिपत ची माहीति मिपाकरांसाठी थोडी विस्ताराने व आतापर्यंत फारशी पुढे न आलेल्या माहीती मधुन द्यावी ,म्हणुन हा प्रयत्न आहे .
मात्र काही सन्माननीय मिपाकरांना असे वाटते आहे तुम्ही काहीही लिहा मात्र त्यामधे ब्राम्हणांबद्दल काही लिहले तर ते आम्हाला मान्य नाही , मुळात या पराभवाच्या काळात पेशवाइ असल्याने ,पानिपत च्या पराभवाच्या अनेक कारणांमधे पेशव्यांच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवले जाते,जशी सगळ्या मुद्द्यांची चर्चा होते तशी याचीही व्हायला नको का?पण काहींना त्यामुद्द्याकडे कोणी वळले की लेखणी परजण्याची हुक्की येते,ते ही झाले पाहीजे किंबहुना त्याची साधकबाधक चर्चा व्हावी याच हेतुने हा धागा काढलेला आहे ही नम्र सुचना आहे .त्यामुळे लेखातील कोणत्याही मुद्द्यावर आक्षेप असल्यास आपण त्याचे सप्रमाण खंडन करु शकता त्याचे स्वागतच केले जाइल,मात्र उगाचच या गंभीर विषयाला फालतु प्रतिसाद देउन जातिवाचक वळण देण्याचा जे लोक प्रयत्न करीत आहेत ,त्यांना त्याच भाषेत प्रतिवाद करण्याची ही क्षमता आम्ही निश्चीत बाळगतो याची खात्री देतो.

पानिपत पुर्व उत्तरेकडिल राजकारण

पानिपत पुर्व उत्तरेतील घडामोडि पाहताना तेथील मराठा सरदारांचे अर्थकारण,तसेच पुर्ण मराठी सत्तेचे अर्थकारण समजणे आवश्यक आहे .मराठी सत्तेचा अर्थप्राप्तीचा मुख्य मार्ग हा विविध प्रांतातुन त्यांना मिळणारी चौथाइ हा होता.साहजीकच उत्तरेतील वेगवेगळ्या सत्ताधीशांशी जे करार मराठ्यांनी केले त्या मागे चौथाइ हेच महत्वपुर्ण कारण होते.या चौथाइ मधील काही भाग स्वतःला ठेउन उर्वरीत भाग केंद्र सत्तेकडे जमा करणे हे आवश्यक होते.मात्र बाजीरावानंतर हा भरणा केंद्र सत्तेकडे करण्यास सरदार फारसे उत्सुक नव्हते.तसेच केंद्र सत्तेकडुनही या रकमेचा विनियोग मराठी सत्तेच्या उभारणी साठी कितपत होत होता याबद्दल शंकाच होती.
या चौथाइ साठी तसेच आपली स्वसत्ता बळ्कट करण्यासाठी उत्तरेतील काही स्वधर्मीय शास़कही दुखावले गेलेले आढळतात ,१७५२ चा पेशवे -मुघल बादशहा यांच्यातील करार हा पानिपत ला खर्या अर्थाने कारणीभुत ठरला असे मानले जाते् हा करार पेशव्यांतर्फे शिंदे-होळ्कर तर मुघल बादशहा तर्फे वजीर सफदरजंग याने केला.या कराराला पार्श्वभुमी अब्दाली च्या स्वारीची होती. या कराराने मुघल बादशहा ची बाहेरच्या शत्रुंपासुन संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली ,तसेच पेशव्याला आग्रा,अजमेर,लाहोर्,मुलतान,सिंधव रोहीलखंड या प्रदेशांची चौथाइ मिळाली.जो प्रदेश मराठ्याना मिळाला होता त्यातील आग्रा जाटांच्या तर अजमेर राजपुतांच्या ताब्यात होते,म्हणजे जो प्रदेश मराठ्यांना मिळणार होता तो मुघलांच्या ताब्यात नव्हता तर मराठ्यांना जाट व रा़जपुतांशी लढवणयाचा हे मुघलांचे कारस्थान होते .मात्र हे रजकारण समजुन न घेता रघुनाथ रावाच्या उत्तरेच्या स्वारीत आग्रा घेण्यास जाटांबरोबर लढा द्यावा लागला.
मराठ्यांनी सुरजमल जाटाच्या कुंभेरी च्या किल्ल्याला वेढा दिला,या वेढ्यात मल्हारावाचा मुलगा खंडेराव हा तोफगोळ्याच्या माराने ठार झाला.मल्हारावाने संतापुन कुंभेरीची माती खणुन यमुनेत टाकेन अशी प्रतिज्ञा केली .मल्हारावाचा लढाइचा आवेश वाढला,होळ्करी सैन्य सुडाच्या भावनेतुन त्वेषाने लढु लागले,जाट घाबरला त्याने मराठ्यांशी संधी ची बोलणी सुरु केली ,मात्र आता मल्हारराव संधीच्या विरोधात होता.त्याच्या सारख्या वयवृध्द सेनानीचा सल्ला डावलणे राघोबाला ही अश्यक्य होते.परीनांमी सुरजमल जाटाची पत्नी हंसिया जाट जी जयापा शींदेला भाउ मानत होती ,तिने जयाप्पाला राखी पाठवुन मदतीची याचना केली ,साहजीकच शिंद्यांनी मध्यस्थी केली आणी जाट व मराठे यांच्यात तह झाला.
या तहातच शिंदे -होळ्कर यांच्यातील दुही निर्माण झाली जी पुढे अब्दालीच्या स्वारीच्या वेळि मराठ्याना फार महागात पडली ,कारण शिंदे-होळकर हे उत्तरेतील मराठ्यांच्या सत्तेच्या रथाची दोन चाके होती ,मराठ्यांच्या सामर्थ्याचा दबदबा हे दोन सरदार एकत्र रहण्यानेच होता.या मात्तबर सरदारांमधील फुट संपुर्ण मराठेशाहीलाच ग्रासणारी ठरली,पानिपत हे तर एक निमित्त होते,कोणत्याही मोठ्या संघर्षाला सामोरे जाताना आपआपसातील मतभेद असल्यास एकदिलाने लढणे अवघड होते. या शिवाय उत्तरेतील जाट राजाची नाराजी मराठ्यांनी ओढवुन घेतली ते वेगळेच हाच जाट अब्दालीच्या स्वारीच्या वेळी मराठ्यांचा पक्ष सोडुन ऐनवेळी निघुन गेला वेळी मराठ्यांचा पक्ष सोडुन ऐनवेळी निघुन गेला.थोडक्यात मुघलांच्या या राजकारणामुळे सुरजमल जाट मराठ्यांचा शत्रु झाला.मुघलांचे हे राजकारण समजावे इतकी दुरदृष्टी त्या काळात मराठा नेतृत्वात नव्हती हेच दुर्दैव होते.
इथे काहींना हे वाटेल की साम्राज्य विस्तार करताना संघर्ष हा अभिप्रेतच असतो,मात्र पानिपताच्या पार्श्व्भुमीवर जिथे नजीबाने या संघर्षाला धर्मयुध्दाचे स्वरुप दिले तिथे मराठ्यांनीही स्वधर्मिय शासकांना मैत्रीच्या भावनेने जोडणे गरजेचे होते.
मारवाड वारसा हक्काच्या प्रकरणातही शिंद्यानी माधोसिंगाची बाजू घेउन बिजेसिंगाशी वैर पत्करले ,परीनामी जयाप्पा शिंदे सारखा मोहरा मराठे गमावला,शिवाय राजपुतांची सहानभुती गमावली ते वेगळेच .जयपुर गादी प्रकरणातही इश्वरसिंग व माधवसिंगामधे पैशाच्या आमिषाने मराठ्यांनी मध्यस्थी केली परीनामी पानिपतच्या संघर्षात मारवाड,जयपुर्,बुंदि ,कोटा येथील राजपुत तटस्थ राहीलेले दिसतात.
या काळातील पेशव्यांच्या राजकारणाचा एक दुष्परीनाम म्हणजे जुने शत्रु समुळ नष्ट न करता आपल्या शत्रुत त्यांनी आणखी भर टाकली.
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला
ळातील पेशव्यांच्या राजकारणाचा एक दुष्परीनाम म्हणजे जुने शत्रु समुळ नष्ट न करता आपल्या शत्रुत त्यांनी आणखी भर टाकली.
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला.याच वजीराने राघोबा व होळकरांच्या मदतीने बादशहा अहमदशाह याला मारुन आलमगीर हा नवीन बाद्शाह बनवला
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला.याच वजीराने राघोबा व होळकरांच्या मदतीने बादशहा अहमदशाह याला मारुन आलमगीर हा नवीन बाद्शाह बनवला .व त्या मोबदल्यात मराठ्यांना ८० लाख रु.देण्याचे कबुल केले,जे प्रत्यक्षात त्याने कधीहि दिलेले दिसत नाहित्.उलट मराठ्यांच्या मदतीने त्याने बादशाही जनानखान्यावर हल्ला केला,त्याच्या पाठीशी मराठे असल्याने उत्तरेतील मुस्लीम सरदार वर्गही मराठ्यांच्या विरोधात गेला,शिवाय बादशाही जनानखान्याची प्रमुख मलीका जमानी हीच पुढे अब्दालीला हिंदुस्थानात बोलावण्याच्या कारस्थानात प्रमुख होती.
वजीर इमाद्ला पाठींबा देउन मराट्।यांनी काय साधले?उलट याचा तोटाच मराठा राजकारणाला झाला,इमाद्ला वजीर बनवण्याने शिदे -होळकरांचा उत्तरेतील राजकारणाचा पायाच उखडला गेला,कारण यामुळे मराठ्यांच्या विश्वासातील जुना वजीर सफ्दरजंग हा दुरावला गेला वजीर सफदरजंग हा अब्दालीच्या विरोधात होता किंबहुना अब्दालीच्या विरोधात मराठे-मुघलांची मोट बांधुन संघर्ष करण्याची त्याची तयारी होती,तो विचार आता मागे पडला,आणी सफदरजंग मराठ्यांच्या विरोधात गेला,साहजीकच त्याचा मुलगा सुजाउदौला हा मराठ्यांच्या बाजुने न येता अब्दालीला जाउन मिळाला .
शिवाय इमादने ८०लाख रु.तर दिलेच नाही त्यामुळे या स्वारीतही राघोबा कर्ज करुनच
वजीर इमाद्ला पाठींबा देउन मराट्।यांनी काय साधले?उलट याचा तोटाच मराठा राजकारणाला झाला,इमाद्ला वजीर बनवण्याने शिदे -होळकरांचा उत्तरेतील राजकारणाचा पायाच उखडला गेला,कारण यामुळे मराठ्यांच्या विश्वासातील जुना वजीर सफ्दरजंग हा दुरावला गेला वजीर सफदरजंग हा अब्दालीच्या विरोधात होता किंबहुना अब्दालीच्या विरोधात मराठे-मुघलांची मोट बांधुन संघर्ष करण्याची त्याची तयारी होती,तो विचार आता मागे पडला,आणी सफदरजंग मराठ्यांच्या विरोधात गेला,साहजीकच त्याचा मुलगा सुजाउदौला हा मराठ्यांच्या बाजुने न येता अब्दालीला जाउन मिळाला .
शिवाय इमादने ८०लाख रु.तर दिलेच नाही त्यामुळे या स्वारीतही राघोबा कर्ज करुनच परतला,शिवाय याच प्रकरणात इमादाचा हस्तक म्हणुन नजीबखान रोहीला उदय पावला.जो मराठ्यांच्या द्रुष्टीने पुढे फार त्रासदायक ठरला.

राघोबाच्या या स्वारीत तसे पाहीले तर मराठ्यांच्या द्रुष्टीने लाभदायक काहीच झाले नाही,उलट मराठे परत आल्यानंतर १९५६-५७ साली अब्दालीने दिल्ली लुटली.इकडे पुण्यास मात्र पेशव्याने ब्राम्हणांच्याआशिर्वादाने दिल्ली ताब्यात आली म्हणुन श्रावणमासात त्याना अमाप दक्षीणा वाट्ली.
उत्तरेत वरील सर्व घडामोडि होत असताना खुद्द नानासाहेब पेशव्याने वरील घडामोडीत लक्ष घालणे आवश्यक होते,ते न झाल्याने त्याचे एकत्रीत परीनाम मराठ्यांना पानिपतामधे भोगावे लागले.

क्रमशः

धोरणमांडणीसंस्कृतीइतिहासभाषासमाजराजकारणप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

वाचतो आहे.
धागा डकवताना चुका झाल्यात काय? त्याच त्या ओळी /परिच्छेद पुन्हा पुन्हा टाकल्या गेल्या आहेत.

निश's picture

12 May 2012 - 2:49 pm | निश

+१, सहमत

बरं ठिक - चला चर्चा करुच. होऊनच जाऊ द्या.
काय फलित काढणार आहात त्यातून ? ब्राह्मणांना दक्षिणा वाटली, शनिवार वाड्यात तमाशे केले , राजकारणात नीट लक्ष दिले नाही म्हणून पेशवे मूर्ख होते आणि ब्राह्मणही मूर्खच होते असंच ना?
मग आताच्या ब्राह्मणांनी तापायला काहीच हरकत नाही - कारण आत्ताचे ब्राह्मण ना दक्षिणा वाटत, ना तमाशे करीत. आत्ताचे ब्राह्मण राजकारणासह आणखी कुठेकुठे आहेत ते जगजाहीर आहे. ;-) सगळ्याच नसली तरी विचारी ब्राह्मणांनी ही सगळी मीमांसा मनोमन केली असेल, मग पुन्हा ती जाहीर करावी अशी तुमची इच्छा असेल तर खडाखडी झाली म्हणून नाराज होऊ नका.

काय फलित काढणार आहात तेवढं मात्र सांगाच.

आत्ता परवा गोडसे भटजींचं *'माझा प्रवास' वाचत होतो; एक लेख पण पाडून ठेवलाय अर्धामुर्धा - त्या वाचण्याचे परिणाम माझ्यावर कसे झाले ते लोक समजून घेऊ शकणार नाहीत म्हणून टाकलेला नाही. आणि हा प्रतिसाद तुमच्या लेखावर केलेल्या मननातुन नव्हे तर 'माझा प्रवास' वाचल्यानंतर आपोआप झालेल्या मननामुळे टाकला आहे. कारण वर जे काही लिहिलं आहे त्यातल्या बर्‍याच बाबी जुळतात. बिका तुम्ही 'डायरी ठेव' असं सांगितलंत ते शक्य झालेलं नाही - सगळं शब्दात बांधणं कठीण आहे. पण 'माझा प्रवास' सारखं बिगर आध्यात्मिक पुस्तक वाचून माझे सगळे प्रश्न कसे संपले ते शब्दबद्ध केलेला एक लेख वेळ मिळाला तर पुर्ण करीन. आणि हो, माझा प्रवास मध्ये '१८७५' च्या बंडाचा आंखो देखा हाल एका भिक्षुकानं शब्दबद्ध केला आहे. हा पानिपतच्या पुढचा उल्लेखनीय परिणाम - यातही माधवराव पेशवे, नानासाहेब, झाशीची राणी हे ब्राह्मण आहेत ;-) हे बंडही ब्राह्मण्य, हिंदुत्व यांना चिथावणी दिली म्हणूनच झाले होते - आणि त्याचा अभ्यास करुन वि. दा. सावरकर या ब्राह्मणानेच दिल्लीचे राज्य बुडाल्यानंतर आलेल्या इंग्रजी राजवटीला जेरीस आणले होते. तेव्हा ब्राह्मणांना उगीच तुम्हाला लहर आली म्हणून, ती जाहीर उघड करणे विपर्यस्त आहे हे तुम्हाला कळले नाही म्हणून छळू नका - त्यांनी नेहमीच विचार, चर्चा, मीमांसा केलेली आहे. ;-)

प्राध्यापक's picture

12 May 2012 - 6:58 pm | प्राध्यापक

यकु,
या लेखाच्या सुरुवातीलाच मी लिहल होत ,कुठल्याही एखाद्या जाती बद्द्ल टिका करण्यास हा धागा मी काढला नाही,पेशवे मुर्ख होते अस मी कुठही म्हणलेले नाही ,बाजीरावाचे कार्य आपल्यासमोर तर आहेच,फक्त एखादा विजय मिळाल्यानंतर जसे त्याचे श्रेय त्याच्या प्रमुखाकडे जाते तसेच पराभवाची जबाबदारी ही त्याच्याकडेच जाते,यात टीका कुठे आली?

बाकी
आपला(खडाखडीला नेहमीच उत्सुक असणारा)

(गोडसे भटजी चे "माझा प्रवास "हे अप्रतीम प्रवास वर्णन आहे तसेच समकालीन इतिहास म्हणुन त्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे)

या लेखाच्या सुरुवातीलाच मी लिहल होत ,कुठल्याही एखाद्या जाती बद्द्ल टिका करण्यास हा धागा मी काढला नाही.

छान ! :) मी पण माझा प्रतिसाद कुठल्यातरी जातीची बाजू घेण्यासाठी दिलेला नाही याची नोंद घ्या. मला जी तथ्ये दिसली ती वरील प्रतिसादात सांगितलीत, त्यावरुन 'अरे हा ब्राह्मण दिसतो, म्हणून होऊन ब्राह्मणांची बाजू घेतोय' असे वाटू देऊ नका म्हणजे झाले ;-)

पेशवे मुर्ख होते अस मी कुठही म्हणलेले नाही

नाही? उत्तम !

बाजीरावाचे कार्य आपल्यासमोर तर आहेच,फक्त एखादा विजय मिळाल्यानंतर जसे त्याचे श्रेय त्याच्या प्रमुखाकडे जाते तसेच पराभवाची जबाबदारी ही त्याच्याकडेच जाते

हे आम्ही आणि इथले सगळेच इतिहास शिकत असताना शिकले असतील.
मग गंभीर चर्चाही करायची नाहीय, टीकाही करायची नाही तर धाग्याचे प्रयोजन काय? तथाकथित क्वालिटी टैम्पास ? ;-)
हा अमुक कसा निर्णय घेण्यात चुकला, ते तमके किती चुकीचे होते, ही ही घटना यामुळे झाली आणि ते तमुक तसं होतं - मग हे अमके हे जे म्हणत आहेत ते चुकीचं आहे - आणि आम्ही अमुक हे म्हणतोय ते कसे बरोबर आहे - असल्या चर्चा करण्यात एकूण जिंदगी खलास झाली तरी राम नाही असं माझं मत आहे - म्हणून आपला चर्चा प्रस्तावक आणि प्रतिसादक यांच्याप्रति अत्यंत आदरपूर्वक पास. यावर उपप्रतिसाद देखील देऊ नये. :) म्हणजे माझे पुन्हा प्रतिसाद देण्याचे कष्ट वाचतील.

मुक्त विहारि's picture

12 May 2012 - 8:48 pm | मुक्त विहारि

क्रुपया तुम्ही जे वाचले आहे ते लिहा.
कारण प्रत्येकालाच ते पुस्तक वाचता येईल असे नाही आणि तूम्ही एक नि:पक्षपाती वाचक म्हणूनच लिहाल ह्याची खात्री पण आहे.

रणजित चितळे's picture

12 May 2012 - 3:04 pm | रणजित चितळे

राघोबाच्या या स्वारीत तसे पाहीले तर मराठ्यांच्या द्रुष्टीने लाभदायक काहीच झाले नाही,उलट मराठे परत आल्यानंतर १९५६-५७ साली अब्दालीने दिल्ली लुटली.इकडे पुण्यास मात्र पेशव्याने ब्राम्हणांच्याआशिर्वादाने दिल्ली ताब्यात आली म्हणुन श्रावणमासात त्याना अमाप दक्षीणा वाट्ली.

१९५६?

बाकीचा इतिहास सर्वांना माहित आहे.
पुढच्या भागाची वाट बघत आहे.

प्राध्यापक's picture

12 May 2012 - 7:01 pm | प्राध्यापक

चुक दाखवल्याबद्दल धन्यवाद,ते १७५६-५७ असेच क्रुपया वाचावे.

जयंत कुलकर्णी's picture

12 May 2012 - 3:57 pm | जयंत कुलकर्णी

तुमचे सगळे लिहून झाल्यावर प्रतिवाद करेनच.

आपण जे आत्तापर्यंत लिहिले आहे (दोन भाग) त्यात अर्धवट महिती आहे हे आत्ताच नमूद करून ठेवतो. इतरांनी प्रकट केलेली शंका खरी ठरती आहे की काय अशी रास्त शंका आमच्या मनात उभी राहिली आहे.

परंतू शाहू महाराज मोगलांच्या कैदेत अनेक वर्षे होते त्याचा मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणावर काय परिणाम झाला यावर प्रकाश टाकण्यास आपण सोयिस्कर रित्या टाळले आहे. तुम्ही विसरला असाल तर आठवण करून देतो आहे.

प्राध्यापक's picture

12 May 2012 - 7:10 pm | प्राध्यापक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ,
माझा लेखविषय हा पानिपत शी संबधीत आहे ,तरीही पहील्या भागात शाहु महाराजांच्या शांत व एशारामी स्वभावामुळे व बाजीरावाच्या कर्तबगारीमुळे हळुहळु पेशव्यांकडे सत्ता गेली हे नमुद केलेले आहे ,अगदी शाहु काळापासुन लिहायला घेतल तर पानिपत ला यायला बराच वेळ लागेल म्हणुन सुरुवातीचा भाग टाळला आहे ,त्यात सोयीस्कर रीत्या टाळण्याचे काहीही कारण नाही.

{बाकी तुमची शंका कोणती हे जरा विस्कटुन सांगीतले बरे होइल)

अस्वस्थामा's picture

12 May 2012 - 5:07 pm | अस्वस्थामा

जयंत काकांशी सहमत..

(लेखाचा हेतू ब्राह्मण-टीका नाही हे गृहीत धरून आणि मी ब्राह्मण नाही हे आधीच सांगून हे मत लिहितोय.. )
व्यक्तीशः (आत्तापर्यंत तरी) लेख आवडला नाही.. शाहू महाराज आणि साताऱ्याच्या गादीचे नाकर्तेपण टाळले आहे... ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या आणि मराठा सरदाराना दिलेल्या जहागिऱ्या कुठे गेल्या..(तसे तेव्हाही ज्यांना जसे जमेल तसे त्यांनी ओरबाडले आहे..!! )

चौथाई आणि त्यावरून जे काही सातारच्या गादीने केलेय (कोल्हापूरच्या गादीशी युद्ध भेद, ताराराणीच्या मुलाचा-छोट्या शिवाजीचा घात) हे सगळे टाळले आहे.. जरी शाहूचा वझीर तेव्हा बाळाजी होता, (कुणाला ब्राह्मण-टीका करायचीच असेल तर हे एक कोलीत देतोय..! ) तरी शाहूची जबाबदारी त्यामुळे टळत नाही... हा दक्षिणेतल्या राजकारणाचा इतिहास पण संलग्न आहे तो पण येईल अशी अपेक्षा होती...

शिंदे-होळकर आणि इतर मराठे सरदार ज्यांनी एक प्रकारे अराजकत्वाची स्थिती आणली उत्तरेत, त्याने बऱ्याच लोकांना मराठ्यांचे शत्रूच बनवले.. आणि बरेच लोकं मराठ्यांना 'लांडग्यांचे टोळके' अशा नावानेच बोलत..(संदर्भ मराठ्यांच्या बंगाल स्वाऱ्या) म्हणजे हा मराठा सरदार पण खंडणी मागतोय आणि तो पण खंडणी मागतोय.. याला दिली की तो येवून लुटतोय.. मग उत्तरेत कोण चांगले म्हणेल आणि (धर्माच्या नावाखाली तरी ) कोण स्वखुशीने मदतीस येईल..?
जे बाजीरावाने कमावले ते या बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून गमावले.. पानिपत त्याचा परिपाक ...

राजपूत आणि आग्र्याचे जाट मोघलांचे काही प्रमाणात मांडलिक होते त्यामुळे त्यांनी भांडणे लावली हा कांगावा झाला... राघोबाच्या स्वारीमध्ये फार काही लाभदायक पदरी पडले नाही याला एक कारण असेल ते म्हणजे राघोबा युद्धात चांगला असेल पण मुत्सद्देगिरीत नाही.. पण नक्की हेतू काय होता त्याच्या स्वारीचा? तो झाला का साध्य ? हे प्रश्न आहेतच..

पेशव्यांच्या काळात दिशाहीन आणि गलिच्छ राजकारण झाले हे खरंय पण इतर मोहरे पण तेवढेच जबाबदार होते ना मग थोडे त्याबद्दल पण अपेक्षित होते..
-------

बाकी शुद्धलेखन आणि पूर्व परीक्षण गंडले आहे.. गुगल IME वापरलेत तर मदत होईल .. अगदी गुगलचे http://www.google.com/transliterate वापरलेत तरी ऑनलाईन वापरता येईल..

नितिन थत्ते's picture

12 May 2012 - 5:13 pm | नितिन थत्ते

मोठ्या लेखातील फक्त शेवटच्या परिच्छेदावरच वाचकांचे लक्ष केंद्रित झालेले दिसते.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 May 2012 - 6:02 pm | लॉरी टांगटूंगकर

जयंतकाकांशी सहमत आहे .

अर्धवट माहिती दिली आहे,

सुरजमल जाट मराठ्यांना सोडून गेला याचे कारण वेगळे होते.भाऊसाहेब उत्तरेत पोहोचल्यावर त्यांची सैन्ये एकत्र सुद्धा आली होती पण जाट नंतर मराठ्यांना अर्ध्यातून सोडून गेला.
भाऊ चंबळ जवळ आल्यावर होळकरांच्या मार्फत जाटाशी बोलणी सुरु झाली. जाटाने पत्राद्वारे आपल्या अटी कळवल्या त्या अशा :- " आपल्या मुलखास उपद्रव न व्हावा, खंडणी किंवा नजर न मागावी, आमचे मुलखात गडकोट आहेत, त्यात आपले बुणगे जतन करू. चाकरीस दहा हजारांनिशी हरोळीस जेथे पुढे करून घेतील तेथे हजीर आहो. सर्व प्रकारे कृपा करावी. याविरहित दुसरा मुद्दा नाही. येविशी स्वामींनी आपल्या तर्फेने त्याची खात्री केली पाहिजे." यात आपल्या मुलखास उपद्रव न देणे, खंडणी व नजर न मागणे या जाटाच्या मुख्य मागण्या दिसतात . भाऊला या मागण्या मान्य असतील तर आपला प्रदेश मराठ्यांना लष्करी तळ म्हणून वापरून देण्यास व मराठ्यांचे बुणगे ठेवण्यास आणि रसद पुरवण्यास जाट तयार होता. त्याशिवाय प्रसंगी दहा हजार सैन्यासह मोहिमेत सहभागी होण्याचीही जाटाने तयारी दर्शवली होती.
दिल्ली मराठ्यांनी जिंकल्या नंतर गाजुद्दीनला वाजीरी द्यावी आणि दिल्ली चा ताबा आपल्या कडे द्यावा या त्याच्या मागण्या होत्या .भाऊने या मागण्या मान्य केल्या नाहीत, यावर पेशव्याची आज्ञा याविषयी पाहिजे असे भाऊने उत्तर दिले. यामुळे जाट भाऊवर रुष्ट झाला आणि आपल्या सैन्य सह राज्यात परतला. त्याला परत आणण्यासाठी भाऊने महिपतराव चिटणीस, गंगोबातात्या, रामाजीपंत यांना रवाना केले. परंतु जाटाने त्यांना जुमानले नाही. परंतु स्वमुलखात राहून शक्य तितकी मराठ्यांना मदत करण्याचे त्याने मान्य केले.

प्राध्यापक's picture

12 May 2012 - 7:24 pm | प्राध्यापक

मन्धाजी,तुम्ही सुरजमलजाटाच्या ज्या पत्राचा उल्लेख केला आहे ते पत्र १७५३ सालचे कुंभेरीचा वेढा पडण्यापुर्वीचे आहे ,या वेढ्या पुर्वीच जाटाचा वकील पेशव्यांकडे गेला होतात्यावेळेसचे आहे.
म्हणजेच जर त्यावेळी जाटाच्या मागण्याची दखल घेउन तो वेढा टाळला असता तर जाटाचे मत मराठ्यांबद्दल एवढे कलूषीत झाले नसते.

(सदर पत्र पेशव दप्तर २१,ले.१९०)

तुमचा अभ्यासपुर्ण प्रतीसाद आवडला अशाच आणखी प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

मागील भागावरून पुढे ( कमशः) लिहीत असाल तर मागच्या धाग्याचा दुवा (लिन्क) द्यावी अशी मिपा ची प्रथा आहे. फारतर हा प्रकारातील सिद्ध्हस्त लोकाना विचारून पहा.

शैलेन्द्र's picture

12 May 2012 - 11:13 pm | शैलेन्द्र

(पाणीपतकालीन महाराष्ट्र आजपेक्षा कदाचीत कमी जातियवादी होता.. ब्राम्हण पेशवे, धनगर होळकर, मुस्लीम ईब्राहीम, सगळ्यांना मराठेच म्हटल जायच)

या लढ्याचे जे मुळ कारण, त्याकडेच हा लेख दुर्लक्ष करतो.. आणी ते कारण आहे छत्रपती शाहु.. शाहुइतका प्रभावी पण मानसीकद्रूष्ट्या लुळा राजा, छत्रपतींचा नातु, व संभजीचा मुलगा असावा हा दैवाचा कुठला न्याय?

मराठ्यांनी २७ वर्षांच्या स्वातंत्र्यसमराने जे कमावले, ते औरंगजेबाच्या एका चालीने मातीमोल झाले. औरंगजेबाची मुत्सद्दी म्हणुन जी योग्यता आहे ती इथे दिसते. शाहु मणसबदारी मानसीकतेतुन कधी बाहेर आलाच नाही. निजामासारखा शत्रु मराठ्यांनी नुस्ताच जिवंत ठेवला नाही तर पोसत ठेवला.. मोगलांना नामषेश केले नाही, त्यांचे भांडण स्वत:च्या डोक्यावर घेतले. महाराजांनी अवलंबलेली पद्धत २७ वर्षात मागे पडली हे मी समजु शकतो, पण त्या ऐवजी जे काही स्विकारल गेल ते अत्यंत विपरीत होत. खरतर भारतावर एकछत्री कल्याणकारी राज्य स्थापण करण्याची चांगली संधी मराठ्यांना लाभली होती, ती हातातुन निसटली एवढ खर..

<<या लढ्याचे जे मुळ कारण, त्याकडेच हा लेख दुर्लक्ष करतो.. आणी ते कारण आहे छत्रपती शाहु.. शाहुइतका प्रभावी पण मानसीकद्रूष्ट्या लुळा राजा, छत्रपतींचा नातु, व संभजीचा मुलगा असावा हा दैवाचा कुठला न्याय? >>

...छत्रपती शाहू महाराजांबद्दल फारसा अभ्यास न करता केले गेलेले हे विधान दुर्दैवी आहे. हा राजा शहाणा व उदार होता. कर्तबगार लोकांना पुढे येण्याची संधी देणारा होता, दिलेले वचन मरेपर्यंत निभावणारा होता, दूरदृष्टीचा होता, शांत स्वभाव व आरामप्रिय दिनचर्या असली तरी राज्यकारभार व घडामोडींकडे बारीक लक्ष देणारा होता. बेरजेचे राजकारण करणारा होता...

शैलेन्द्र's picture

14 May 2012 - 2:08 pm | शैलेन्द्र

माझा अभ्यास कदाचीत कमी पडत असेल पण शाहुने कर्तबगार लोकांना संधी जरुर दीली(बहुदा तस करुन स्वतः आराम करणे त्याला आवडत असावे) पण त्यांना स्वता:च्या अयोग्य व कालविसंगत वचनांची वेसन घालुन बर्‍याच अंशी निष्प्रभ केले. स्वतःला त्याने नेहमीच मनसबदार मानले, राज्य करण्याऐवजी चौथाइ गोळा करण्याची अनिष्ट प्रथा त्याच्यामुळेच मराठ्यांनी सुरु केली. आज उत्तरेत मराठ्यांची ओळख दरवर्षी धाड टाकणारे लुटारु अशी आहे ती या प्रथेमुळेच.

नितिन थत्ते's picture

14 May 2012 - 8:47 pm | नितिन थत्ते

>>शाहुने कर्तबगार लोकांना संधी जरुर दीली(बहुदा तस करुन स्वतः आराम करणे त्याला आवडत असावे)

एकदम जे आर डी टाटांची आठवण झाली. :)

या धाग्याच्या अनुषंगाने विश्वास पाटील यांच्या "पानिपत" या कादंबरीबद्दल पण साधक -बाधक चर्चा व्हावी असे वाटते.मला जेवढे समजले त्यानुसार त्यांनी कादंबरी मध्ये कोणत्याही जातीकडे बोट ना दाखवता त्या अधिकारपदावरील व्यक्तीच्या गुण दोषांकडे लक्ष वेधले आहे.त्यामध्ये कोणाला अजून एखादी बाजू समोर यावी असे वाटत असेल तर मुद्द्यांच स्वागत आहे.

अर्धवटराव's picture

16 May 2012 - 2:10 am | अर्धवटराव

पानिपतावर जे काहि झालं त्यामागे हजारो तत्कालीन आणि दीर्घकालीन कारणे आहेत... त्या सगळ्यांचा अगदी १००% वस्तुनीष्ठ आढावा घेणं अशक्य आहे.
पानिपतावर आजवर जो काहि अभ्यास झाला त्यातलं एक पान म्हणुन या लेखमालेकडे बघतोय.
छान चाललीय लेखमाला.

अर्धवटराव

किलमाऊस्की's picture

16 May 2012 - 1:34 pm | किलमाऊस्की

लेख पुर्णपणे पटला नसला तरी आवडला. पानिपत जिव्हाळ्याचा विषय. आयुष्यात एकवार तरी त्या भूमिला पाय लागावेत अशी मनापासून इच्छा आहे.

>>>>उलट मराठे परत आल्यानंतर १९५६-५७ साली अब्दालीने दिल्ली लुटली. <<<<
कहितरी गडबड झाल्यासारखी वाटतेय.

लेखाच्या खाली संदर्भ दिलेत तर आवडेल. इतिहासाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन साधारपणे "बाप दाखव नाहितर श्राध्द घाल " असा आहे. त्यामुळे इतिहासातील बर्‍याच दंतकथांवर मी विश्वास ठेवत नाही. पण इतिहास कितीही महान असला तरी तो रोचक असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आणि दुर्दॅवाने या दंतकथा इतिहासापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवतात. असो.

पु.ले.शु.

अवांतर : दोन उतार्‍यांमधे थोडी जागा ठेवली तर लेख वाचायला सुसह्य होईल.