वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे.
आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई अशा अनेक 'जाली' नावांनी वावरणाऱ्या अदिती यांना अमेरिकेचा व्हिसा मान्य झालेला आहे, इतकंच नव्हे तर अमेरिकन सरकारने काही कारवाई केली नाही तर या शुक्रवारी त्या अमेरिकेत येऊन ठाकतील देखील.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर जनसामान्यांत एकच गदारोळ उठला. कीप अमेरिका नॉइज पोल्यूशन फ्री डॉट कॉम ने सर्वात मोठा 'आवाज' उठवला आहे. वी लव्ह काम अॅंड क्वाएट डॉट कॉम वरही अशीच बोंब सुरू आहे. 'काहीच वर्षांपूर्वी इंग्लंडमधल्या एका शांत खेड्याचं काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला ते इथे व्हायला नको.' 'गो बॅक अदिती' अशा पोस्ट्स तिथे सर्रास दिसू लागल्या आहेत. अदिती यांच्या काड्यालावू कारवाया अमेरिकेत सुरू होऊ नयेत याबद्दल लोकांमध्ये एकमत आहे. अशा व्यक्तीला मुळात व्हिसा मिळतोच कसा असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. अमेरिकन सरकारने मुद्दामच त्यांना आमंत्रण दिलेलं असून हा प्रकार जगजाहीर होऊ नये यासाठी ते गोपनीयतेच्या वेष्टनात गुंडाळून ठेवलं असा एकंदरीत सूर दिसतो. किंबहुना अदिती यांच्या भारतातल्या कारवायांना अमेरिकेतील उच्चपदस्थांचा सक्रीय पाठिंबा होता असाही आरोप होतो आहे. अमेरिकेतील काही उच्चपदस्थांचा अदिती यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे हीही बाब आता उघड झाली आहे.
या सर्व प्रकरणामुळे अमेरिकन सरकारची चांगलीच भंबेरी उडाली असून प्रकरण राज्यसचिव (गृहमंत्री) हिलरी क्लिंटन यांपर्यंत पोचलेलं आहे. त्यांनी आमच्या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा विकीलीक्सचा निषेध केला. 'राष्ट्रीय महत्त्वाची गोपनीय कागदपत्रं प्रकाशित केल्याने सुरक्षेला धोका' हा मंत्र म्हणून दाखवला. मात्र राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या अशा गोष्टी दडवून का ठेवल्या गेल्या हे विचारल्यावर मात्र त्यांनी सारवासारव केली. 'अदिती यांना कदाचित नजरचुकीने व्हिसा दिला गेला असावा. त्यांनी व्हिसासाठी अर्ज करताना 'संहिता जोशी' या नावाखाली केला. त्यामुळे ही गफलत झाली असावी. सरकार युद्धपातळीवर या घटनेचा मागोवा घेत आहे' असं सांगितलं. अदिती यांना व्हिसा मिळण्यातल्या धोक्याची कल्पना आहे का, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या 'अर्थातच. अमेरिकन जनतेची शांतताप्रियता मला ठाऊक आहे. किंबहुना बराक ओबामा भारतात गेले होते तेव्हा महिनाभर आधी व त्यानंतरही अदिती हा शब्द असलेल्या मेल्स, फोनसंभाषणं, व चॅट मेसेजेस आम्ही टॅप करत होतो. पण दुर्दैवाने आमचा सर्व्हर तेवढ्यानेच भरून गेला व ओबामांच्या सुरक्षिततेसाठीच्या कारवायांना जागा कमी पडणार की काय अशी भीती वाटली. म्हणून आम्ही काही काळापुरते भारतातले सर्व्हरच बंद पाडून टाकले' (मिपाचा सर्व्हर चारपाच दिवस बंद पडण्यास नक्की जबाबदार कोण यावर आता कदाचित प्रकाश पडेल!)
दरम्यान भारतात या बातमीमुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेषतः पुण्यात तर जल्लोष सुरू झालेला आहे. 'अदिती गावकुसाबाहेर राहतील अशी व्यवस्था केली होती, पण तरीही त्या पूर्णपणे दूर जाणार हे ऐकून सुटकेचा निश्वासच टाकते' अशी प्रतिक्रिया मिळाली. कुठच्याशा पूज्य व्यक्तिमत्वाबद्दल हीन लेखन करण्यास एका पाश्चात्य लेखकाला पुणे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीची मदत झाली होती त्याबद्दल शिक्षा म्हणून कुठच्याशा सेनेने त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी द्यायला लावली होती, असं आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. 'खरं तर आम्ही त्यावेळी - यापेक्षा युनिव्हर्सिटीची थोडी तोडफोड वगैरे करा - असं म्हणत होतो' पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. 'पण हरकत नाही. हा काळा काळ संपला एकदाचा. यावर्षी नव्या वर्षाचं स्वागत समारंभ ३ डिसेंबरलाच सुरू होईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व स्टाफला आठवड्याची सुटी जाहीर करण्यात आलेली आहे.' सर्वसामान्य लोकांनीही गावभर दिवाळीचे उरलेले - सचिनचं पन्नासावं शतक होईल तेव्हा वापरायचे म्हणून ठेवलेले - फटाके वाजवायला सुरूवात केली आहे. 'आदर्श घोटाळा, टु जी घोटाळा वगैरे छप्पन्न घोटाळे या चांगल्या बातमीवर कुर्बान' असंही काहींनी म्हणून दाखवलं - अर्थातच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर.
आम्हाला आतल्या गोटातून मिळालेल्या बातमीनुसार अदिती यांचं भावी अमेरिकागमन हे मुळीच गुप्त नव्हतं. किंबहुना अदिती यांनीच मी जाणार, जाणार असा धोषा लावला होता. आपलं व्हिसा प्रोसेसिंग कसं चालू आहे याबद्दलच्या बित्तंबातम्या काहीशा अनाहुतपणेच त्या आसपासच्या लोकांकडे जाहीर करत होत्या. तो अर्थातच 'आपणही अमेरिकेला चाललो हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न' होता याबद्दल कोणाला शंका नाही. पण इतकं उघड गुपित अमेरिकन सरकारला ठाऊक नसावं हे विश्वासार्ह वाटत नाही.
एकंदरीत अमेरिकन सरकारचं - काड्याघालू कारवाया करणाऱ्यांचा जाहीरपणे धिक्कार करायचा पण प्रत्यक्षात त्यांना मदतच करायची - असं दुटप्पी धोरण पुन्हा उघडकीला आलं आहे यात वाद नाही. यामुळे गोपनीयता व सरकारची लबाडी याबद्दलचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. इतक्या उच्चपदस्थांचे हितसंबंध गुंतले गेले असल्यामुळे आम्हाला सरकार काहीही कारवाई करणार नाही व अदिती अमेरिकेत येऊन पोचणार याबद्दल काडीमात्र शंका नाही. तेव्हा आम्हीही त्यांचं आगाऊ(पणे) अभिनंदनच करतो. पण या राजकीय साठमारीत सामान्य हिरवं गवत भरडलं जावं तशी हिरवी जनता भरडली जाते. पण ते तर कायमच होत आलं आहे. कालाय तस्मै नमः - आणखीन काय लिहिणार?
तुम्हाला व्यक्तिशः या घटनेविषयी काय वाटतं ते जरूर लिहा.
प्रतिक्रिया
30 Nov 2010 - 7:25 am | मिसळभोक्ता
वाईट झाले.. खूप वाईट झाले...
:-)
असो, पण लेक टाहो च्या पूर्वेला आम्ही कोकणातले लोक अमेरिका म्हणत नाही. त्यामुळे प. पू. मां अदिती ह्या अमेरिकेत येत नाहीत.
30 Nov 2010 - 7:58 am | चिंतामणी
:D
:D
:D
30 Nov 2010 - 8:05 am | शिल्पा ब
आली का कटकट आता? दिवस काही ठीक नाहीत म्हणायचे !!
30 Nov 2010 - 8:13 am | Pain
हाहाहा :) मस्त.
वादळाच्या संभाव्य मार्गाची मिसळभोक्ता, बेसनलाडू, सहज, विकास, चित्रा, प्राजक्ता, शुचि, शिल्पा ब वगैरे अमेरिकास्थित मिपाकरांना कल्पना द्यावी.
30 Nov 2010 - 8:16 am | मिसळभोक्ता
वादळाचा मार्ग टेक्सास/लुईझियाना वगैरे खेडवळांना माहिती असतो.
इथे कोकणात आलेच तर भूकंप येतात :-)
30 Nov 2010 - 11:25 am | शिल्पा ब
आम्ही सगळ्या संकटांना तोंड देण्यास तयार आहोत हे जाहीर करू इच्छिते.
30 Nov 2010 - 8:16 am | नितिन थत्ते
त्या कशासाठी अमेरिकेत जात आहेत ही माहिती गोपनीय आहे की ती सुद्धा विकीलीक्स मध्ये उघड झाली आहे?
30 Nov 2010 - 8:23 am | विकास
कदाचीत त्यांना हिरवा माज दाखवायचा असेल ;)
30 Nov 2010 - 8:39 am | क्रेमर
बातमी खरी असल्यास दुर्दैवी आहे. करावा तितका निषेध थोडाच आहे. परिणाम होईल किंवा नाही हे माहीत नाही पण जागरूक नागरिकांनी श्रीमती क्लिंटन व श्रीयूत ओबामा यांना निरोप पाठवून निषेध (शब्दमर्यादा पाहून निषेधाची लांबी ठरवावी) व्यक्त करावा. डिसेंबरात काही सन्माननीय अमेरिकास्थित भारतीय राजधानीत ठिय्या आंदोलन करणार आहे, असेही वाचनात आले आहे. सक्रिय नागरिक त्यातही सहभागी होऊ शकतील, असे वाटते.
30 Nov 2010 - 8:58 am | मुक्तसुनीत
"पुण्याची मैना : अनस्टॉपेबल : एक डोके उठवणारी ब्याद" - बराकसूर
"टेक्ससमधे भुताचा पाय ?" - चिंतातुर डुब्या
"आपण इंचाइंचाने टेक्सस मधून माघार घेत आहोत काय ?" - सुका बोंबिल
"अदिता - एक डेंजर मुव्ही" - विवाद
"संगीत नाटक - १७६० - कार्टी उसगावात घुसली"
"३_१४ खानसाहिबांचे टेक्ससप्रेम नव्याने जागे झालेले आहे" - निद्राशून्य.
"दडपलेल्या एनारायांची कहाणी" - नका बाई लाजू....
30 Nov 2010 - 9:07 am | मिसळभोक्ता
म्हणजेच " प्रतिसाद नं १"
30 Nov 2010 - 10:12 am | राजेश घासकडवी
'कधी सोडणार भारतवर्षा? : पुणेरी रडका' - आशाधरू कुठे
'३_१४ वाईच आवरा' - बडबडबिहारी
'शब्द भागती ते - किति बोले ही बाई' - मीउसात येने
'डेसिबेलचे ठणाणे वाजलेच पाहिजे...' - आत्ता बोललेतर
30 Nov 2010 - 9:08 am | Nile
बातमी वाचुन तुर्तास फक्त, "आयच्या गावात!" इतकाच उद्गार स्फुटतो आहे! इतर प्रतिसाद शॉक उतरल्यावर.
-लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ. ;-)
30 Nov 2010 - 9:18 am | राजेश घासकडवी
कोकणस्थ बनण्याचा क्षीण प्रयत्न! तुम्ही टाहो फोडला तरी त्या लेकाला ऐकू येणार नाही इतके लांब राहाता! आठशे मैल! त्यापेक्षा तुम्ही वादळाच्या केंद्रस्थानाला अधिक जवळ असाल.
30 Nov 2010 - 9:21 am | मिसळभोक्ता
हे लोक लेकाचे कुठेतरी टेक्सास बिक्सास मध्ये येतात, आणि घरी आईवडिलांना अमेरिकेत आलो म्हणून सांगतात. ह्यांच्यावर बंदी घालायला हवी.
30 Nov 2010 - 10:55 am | Nile
ओ कोब्रा काकांनो, जरा थांबा.
कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग.
30 Nov 2010 - 10:59 am | बेसनलाडू
कोकणस्थांची डेफिनीशन टाहोच्या पुर्वेकडील अशी दिली आहे ना? मग.
सनीवेलचे सूर्यनगर आणि फेअर ओक्स ची ओकवाडी करून तसेच महाराष्ट्र मंडळ काढून, त्यात फूट पाडून एकाची दोन मंडळे करून कोकणस्थांनी कॅलिफोर्नियाचा कोकण केला आहे (महाराष्ट्र सरकारने अद्याप कोकणाचा कॅलिफोर्निया केला नसला तरी) त्यामुळे टाहोच्या पश्चिमेकडे असलेला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया हीच कोकणास्थांची मायभूमी होय.
(सारस्वत)बेसनलाडू
30 Nov 2010 - 11:04 am | Nile
आर्र तिच्या, गलतीसे मिश्टेक हो गया, टाहोच्या पश्चिमेकडील म्हणायचे होते.
टाहोच्या किंचितच 'पुर्वेला' म्हणुन आसपास! ;-)
30 Nov 2010 - 9:40 pm | विकास
जर टेक्सास अमेरिकेत नसेल तर अमेरिकेचा मागचा राष्ट्राध्यक्ष हा विदेशी नागरीक होता! :-)
30 Nov 2010 - 9:16 am | ऋषिकेश
वा वा वा वा! विकिलिक्स जे करत आहे ते योग्यच आहे. आधी जनतेला एक सांगून दुसरेच निर्णय घ्यायचे आनि आता ओरड करायची हे चुकीचे आहे.
(भारतात (अचानक) शांतता अशी हेडलाईन असेल का? ;) )
30 Nov 2010 - 10:26 am | छोटा डॉन
खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत आहात ..
सर्व मनापासुन पटले .. एकदम बरोबर आहे ..
तुम्ही इतके जबरदस्त पद्धतीने लिहिले आहे की आम्हाला काय बोलावे तेच कळत नाहिये ..
अश्या लेखनामुळे आणि त्यातील विचारांच्या देवाणघेवाण करण्यामुळे ही नक्कीच समाजात उल्लेखनिय बदल घडतीलच घडतील.. आणि असे वैचारीक पद्धतीने समाजात सर्व ठीकाणी माहीती दिली गेली पाहिजे असे वाटते ..
अवांतर :
१.० कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा
२.० टॉप - ५ मध्ये येण्यासाठी चाललेली केवलवाणी धडपड
३.० तद्दन मसालेदार, धंदेवाईक आणि युसलेस माहिती देणारा धागा
४.० बाकी अजुन सुचेल तसे.
अति अवांतर :
कोण ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ. अदितीअम्मादेवी, ऊर्फ अदिती अवखळकर पाटील ऊर्फ जोजोकाकू ऊर्फ आज्जीबाई ऊर्फ दुर्बिटणेताई ?
धन्यवाद :)
- डॉन्या
30 Nov 2010 - 10:43 am | मिसळभोक्ता
आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद.
(ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. तेव्हा आपण "धन्यवाद" आहात.)
30 Nov 2010 - 10:49 am | छोटा डॉन
>>आपण कुठेतरी जर्मनीत जावे, म्हणजे आपल्या कळा शांत होतील.. धन्यवाद.
चुक, १० गुण कापले आहेत.
सध्या आम्ही 'ब्राझिल / स्पेन' मध्ये इंटरेस्टेड आहोत.
>>ता. क. आपल्या कपाळावरचा स्कार हा आदरणीय केसुंनी काही तरी केकसदृश खाऊन शमवलेला आहे असे कुणीतरी म्हणत होते. कुणीतरी म्हणजे नक्की कोण ?
आपल्यास सांगण्यास खेद होतो की आपले स्टेटमेंट सरकारसारखेच 'मोघम' आहे, उपयोगी माहीत आपण दाबुन ठेवली आहे असे सांगतो.
>>तेव्हा आपण "धन्यवाद" आहात.
छे, तुम्ही फारच अशक्य प्रचंड आहात.
30 Nov 2010 - 10:53 am | मिसळभोक्ता
झ
बाकी आपण सूक्ष्म आहात, शूद्र आहात, आणि त्यामुळे सावरकरांसारखे अतिक्शक्शक्श आहात, तेव्हा आपल्याला कळेलच.
30 Nov 2010 - 10:49 am | स्वानन्द
सहमत.
नुसती चमकुगिरी करते ही बाई. स्वतःच सांगत फिरायचं सगळीकडे. पब्लिसिटी स्टंट नुसता!
बाकी बरंच झालं, ब्याद गेल्ली :) आता उसाचं काही खरं नाही!
1 Dec 2010 - 12:57 am | चिंतामणी
सहमत.
=)) =)) =))
30 Nov 2010 - 10:54 am | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
हे सर्व वाचुन आमच्या अॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला.
बाकी चालु द्या...
30 Nov 2010 - 10:58 am | छोटा डॉन
>>हे सर्व वाचुन आमच्या अॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला.
"आंतरजालावर सर्वांनाच सर्व गोष्टी समजतील आणि समजाव्यात असे आमचे अजिबात मत नाही" हे आमचे अतिशय प्रसिद्ध स्टेटमेंट आहे, बहुदा तुम्हाला ते माहित असेलच.
जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ?
- छोटा डॉन
30 Nov 2010 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार
त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ;)
30 Nov 2010 - 11:06 am | छोटा डॉन
>>त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही
ह्यासंबंधी आम्ही अजुन एक वाक्य सांगतो.
Leaked data are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.
मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ? ;)
- छोटा डॉन
30 Nov 2010 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार
उगाच त्या हिरव्या अदितीच्या धाग्यावर प्रतिसाद वाढुन तिची TRP वाढायला नको म्हणून पुढिल चर्चा खव अथवा व्यनीतुन करु.
30 Nov 2010 - 11:16 am | छोटा डॉन
मांडलेल्या उदात्त सुचनेला सहमती आहे असे सांगतो.
- छोटा डॉन
30 Nov 2010 - 12:57 pm | स्पा
सोंडेचा धागा सुद्धा एकदम झकास होता.........................\\\\
30 Nov 2010 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट व्हीजाविषयक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्हीजाव्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्हीजा व्यवस्था म्हणजे जिथे व्हीजा नाहीत, कुठल्याही सेना नाहीत, काड्या नाहीत ... मात्र जर आपल्या काड्या परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर विद्यापीठांमध्ये नोकर्या देणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. काड्या घालयलाही हव्यात आणि भांडणंही नकोत हे दोन्ही साध्य कसं करणार?
प्रश्न असा येतो की या रास्त व्हीजा अर्जातून मिळालेल्या व्हीजाचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार आंजासंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. हा एक प्रकारे अंतर्गत काड्याघालूपणाच आहे. काड्यांवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी काड्याघालूगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी आंजासंस्थांतर्फे काड्याघालूगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार त्याच काड्या योग्य व इतरांच्या (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही.
तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही काड्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची काड्या विषयक माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ आणि व्हीजा सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा.
मूळ काद्या काय स्वरूपाच्या आहेत याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही.
आदिमाया दुर्बिटणे
हिरव्या माजाचे सत्त्व माझ्या लाभु दे लिखाणा
काड्यांना येउं दे गा दुतोंडीची कसोटी
30 Nov 2010 - 10:56 am | मिसळभोक्ता
स्वारी, तलाक्ल तलाक तलाक !
30 Nov 2010 - 10:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्की कशापासून तलाक घेताय हो आदरणीय मिभोकाका?
30 Nov 2010 - 11:02 am | मिसळभोक्ता
तुला, नव्हे तुला सांगावे लागतेय ??????
सगळ्या अवचटांनो, मला पोटात घ्या. किंवा नकोच...
30 Nov 2010 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवचटांचा या धाग्यावर उल्लेख थोडा अस्थानी वाटतो आहे. तेव्हा तलाकचं काय करायचं?
30 Nov 2010 - 11:07 am | मिसळभोक्ता
बाबानुकर्णाला विचारुया..
ए, मला झोपू दे ना आता.. तुला काही मिमंबलटोनिया मिळाले कॉई विचार मग..
30 Nov 2010 - 11:09 am | आनंदयात्री
आता मराठी आंतरजालाचे काही खरे नाही !! एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार ..
म्याडमसाठी अमरिक्कन सरकारने ऑस्टिन पॉवर्स वापरुन लवकरच दुर्बिण बांधायला घ्यावी हीच ख्रिस्ताचरणी प्रार्थना ..
30 Nov 2010 - 9:34 pm | आमोद शिंदे
काय शब्द आहे!! हाहाहा आंतरजाल 'झिझवणे'!!
30 Nov 2010 - 11:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विचार करत्ये, तिथे आहेत त्यातल्या ऑप्टीकल टेलिस्कोप्समधे काम भागवून घ्यावं! ;-)
30 Nov 2010 - 11:15 am | मृत्युन्जय
तरीच मला कळेना दिवाळी संपलेली असतानाही काल पुण्यात सगळीकडे रोषणाई का केली होती.
30 Nov 2010 - 11:21 am | इन्द्र्राज पवार
ज्या कारणासाठी/कार्यासाठी अदिती 'अंकल सॅम' च्या गावी चालली आहे, त्यासाठी तिला हार्दीक शुभेच्छा !
इन्द्रा
30 Nov 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाबा रे, इन्द्रा, कसं समजावणार तुला? मी डिपेंडंट व्हिजावर जाते आहे ... ते काही काम नाहीये म्हणून! काम असतं (इथे किंवा तिथेही) तर का गेले असते?
30 Nov 2010 - 11:52 am | राजेश घासकडवी
याचा अर्थ अमेरिकेने हे कारस्थान खूप पूर्वीपासून प्लॅन केलेलं आहे. निरुपद्रवी वाटणारा डिपेंडंट व्हिसा राजरोसपणे देता यावा म्हणून नवऱ्यालादेखील नोकरी देववली आहे. खरं काम कोणाचं व काय आहे हे सर्वांना माहीत आहे. उगीच नाही एवढी लोकं विरोध करत.
मी आपला मुकाट्याने अदितीचं स्वागत केल्याचं पुन्हा एकदा लिहितो. अमेरिकन सरकारशी वाकड्यात जाणं मला एवढ्यात तरी परवडायचं नाही.
30 Nov 2010 - 12:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजेश, किती दिवस तू असं तुझं खरं रूप बदलणार आहेस? आता परासारख्या काही "चाणाक्ष" लोकांच्या लक्षात आलंच आहे की तू ही सरकारसाठी काम करतो आहेस आणि मी तिथे येण्याच्या कारस्थानात सामील आहेस ते!!
30 Nov 2010 - 11:54 am | कवितानागेश
म्हणजे तिकडे लगेच काम करता येणार नाही?
मग वेळच वेळ! इथे काड्याच काड्या!
...उगीच खूष होतायत सगळे.
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!
30 Nov 2010 - 12:00 pm | राजेश घासकडवी
त्यापेक्षा तुम्ही अदिती यांना ते ध्यान, मौन, विपश्यना वगैरे का शिकवत नाही? त्यांचं नाही तरी जगाचं तरी कल्याण होईल.
1 Dec 2010 - 9:17 am | कवितानागेश
अदितीला हे असले शिकवता शिकवता माझीच भिवंडी झाली म्हणजे??
....त्यापेक्षा तिला भवानी तिर्थंकरांच्या डायरीतली अजून थोडी पाने चोरून, लेख लिहू देत!
30 Nov 2010 - 12:54 pm | श्रावण मोडक
अर्रे? भरतकाम, विणकाम (पहिल्या अक्षराचे शुद्धलेखन, शुद्धलेखन...!) हीही खुषखबर आहे होय! वा... वा... ते काय म्हणतात ना दुधात साखर... तसं झालं हे! ;)
30 Nov 2010 - 1:26 pm | बेसनलाडू
हीही खुषखबर आहे होय! वा... वा... ते काय म्हणतात ना दुधात साखर... तसं झालं हे! ;)
अपत्याच्या जन्माने नागरिकत्त्वाची शिडी वापरून अमेरिकन नागरिकत्त्व मिळवायचा ही&हि प्रयत्न असला तरी आवडला म्हटले पाहिजे ;)
(भारतीय)बेसनलाडू
असे झाल्याने हिरवा माज आयताच जीवनाचे अविभाज्य अंग बनणार, हेही ओघाने आलेच. त्यामुळे आता अमेरिकास्थित हिरव्या माजोरड्यांकडून तो शिकायला नको ;)
(अमेरिकास्थित)बेसनलाडू
(सर्व संबंधितांनी ह. घ्या.)
1 Dec 2010 - 1:03 am | चिंतामणी
(अमेरिकास्थित)बेसनलाडू
(सर्व संबंधितांनी ह. घ्या.)
ह. घ्या????????? :(
द.सुध्दा घेतली. ;)
30 Nov 2010 - 11:23 am | शिल्पा ब
कशाला येताय इथे? नाही म्हणजे काय काम आहे असं प्रेमाने विचारलं हो!!!
( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)
30 Nov 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार
सहमत सहमत सहमत !
एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
1 Dec 2010 - 1:08 am | चिंतामणी
सहमत सहमत सहमत !
एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
सहमत सहमत सहमत !
त्याच बरोबर असे वाटले की..........................
जाउ दे. जाण्या-याला कशाला दुखवा.
शुभास्ते पंथानः संतु:
1 Dec 2010 - 7:18 am | शिल्पा ब
अहो फक्त भारतातून अमेरिकेत जाणार आहे...जगातून नाही....दुखवा इथेच काय दुखवायचं ते
1 Dec 2010 - 3:00 pm | राजेश घासकडवी
पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
1 Dec 2010 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्या, "तुझा भाव काय"?
1 Dec 2010 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार
बसु आणि बोलु एकदा.
अदिती... 'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड. 'रेट' म्हण ग ;)
1 Dec 2010 - 3:12 pm | नरेशकुमार
असं होय, मल्ला वाटे, तुझ्या भावाबद्द्ल विचारते आहे.
1 Dec 2010 - 3:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कार्पेटखालचा दांभिक कचरा बर्याच दिवसांत साफ न केल्यामुळे बहुदा असा मध्यमवर्गीय भावूक शब्द आठवला. असो.
बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
1 Dec 2010 - 3:10 pm | नरेशकुमार
पर्या तुझ्या भावाचे नाव सांग का मी सांगु ?
1 Dec 2010 - 3:15 pm | राजेश घासकडवी
पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं. फार भाव द्यायचा नाही. भाव करायचा. काही कष्टमर नुसते अय्या म्हणून पळून जातात. आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची. मग द्यायचे थोडे जास्त. शेवटी त्यालाही पोट आहेच ना.
1 Dec 2010 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार
नका विचारु. तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.
अशा लोकांना आम्ही रँबोकडे पाठवतो ;)
1 Dec 2010 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे मिळतात! खूपच उत्तम समाजसेवा सुरू आहे ही!!
1 Dec 2010 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार
customer satisfaction is our motto.
1 Dec 2010 - 3:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणेरी असूनही आपल्याला इंग्लिश येतं हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!
1 Dec 2010 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार
छे ! तु हिरव्या देशात निघालीस म्हणुन तयारी करुन घेतोय तुझी.
1 Dec 2010 - 3:45 pm | मेघवेडा
किती गो क्लेश देशील अजून पुणेकरांस? ;)
1 Dec 2010 - 4:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणेकरांना काहीही फुकट मिळालं की ते घेतात त्यात माझा काय दोष?
1 Dec 2010 - 4:06 pm | मृत्युन्जय
तसं नाही. तुम्ही काहीतरी फुकट देता आहात त्याचे अप्रुप आहे. ;) बाकी पुणेद्वेष्ट्यांचा खच आहे मिपावर. त्याचे एवढे कौतुक नाही.
1 Dec 2010 - 3:39 pm | राजेश घासकडवी
अगं, इतका घोटाळा कसा गं करतेस. पुण्यातले फेमस दुकानदार ते. आपण कष्टमर. (दुकानदाराने दिलेल्या कष्टाने मरतो तो)
1 Dec 2010 - 3:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी इतके कसे हो तुम्ही अडाणी? आता सर्कारी म्हटल्यावर घोटाळा होणारच ना?? अजून हिरवी झाले नाहीये मी!
1 Dec 2010 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार
आले आले.... फिरुन फिरुन पुणेद्वेष चौकात आले परत गुर्जी.
1 Dec 2010 - 3:58 pm | राजेश घासकडवी
मुळात या धाग्यावरच्या प्रतिसादांत पुण्याचा उल्लेख कोणी केला? ऑ? ऑ?
1 Dec 2010 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार
मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : पुणेद्वेष) उल्लेख केलेला आहे !!
विनाकारण अकारण केलेले आरोप सहन केले जाणार नाहीत.
1 Dec 2010 - 4:17 pm | राजेश घासकडवी
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एका विक्षिप्त पुणेरी दुकानदाराची कहाणी सांगितली तर शहरद्वेषाचा आरोप पदरात पडतो. तोही एका पुणेरी दुकानदाराकडून. विनाकारण + अकारण!
1 Dec 2010 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
बघा तुम्ही आता मला चोर म्हणत आहात. कित्ती कित्ती द्वेष भरलाय तुमच्या विषारी मनात.
अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ?
*आजकाल आपापल्या गावातल्या संपादकांना पकडून राहिलेले बरे असते. जल्ला कधी सदस्यत्वावर कुर्हाड आली तर उपयोग होतो.
1 Dec 2010 - 4:30 pm | राजेश घासकडवी
जबाबदार हे विशेषण पुणेकर साठी आहे की संपादक साठी? तुमच्या कोणाविषयी अतिरेकी अपेक्षा आहेत असं म्हणू?
मीही हाक मारतो ना हिरव्या संपादकांना. होऊनच जाऊदेत. कोण आहे रे तिकडे?
1 Dec 2010 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार
खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच पुणेकर संपादक. हि द्विरुक्ती आहे.
असो...
तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.
1 Dec 2010 - 4:37 pm | छोटा डॉन
=)) =)) =)) =))
और ये लगा सिक्सर !!!
दंगा बास करा रे आता ;)
- छोटा डॉन
1 Dec 2010 - 4:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या धाग्याचा ट्यार्पी वाढण्याची जळजळ पोहोचली हो डाण्राव.
1 Dec 2010 - 4:40 pm | राजेश घासकडवी
अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर... असं दुहीचं राजकारण खेळताय, ते महागात पडेल. वेळ जायला वेळ लागत नाही. अशीही वेळ येईल की तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल. आणि ते होईल तेव्हा पहिला वार....
1 Dec 2010 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार
हे बघा गुर्जी, सचिन जबाबदारीने खेळला असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा नेहरा खेळला नाही असा त्याचा अर्थ काढायचा नसतो. ते वाक्य सचिनच्या कौतुकापुरते सिमित असते. तुमच्यासारखे नारदमुनी उगाच अर्थाचे अनर्थ तयार करुन जालिय दंगली पेटवता आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजुन घेता. आत तरी जागे व्हा, निदान बिहारच्या उदाहरणावरुन तरी शहाणे व्हा !
असो...
डान्रावांनी दंगा नको म्हणल्याने आम्ही आता अंमळ विश्रांती घेतो.
देर इज आलवेज अ फस्ट टैम आलवेज अ नेक्स्ट टैम... (घासुगुर्जी) नेक्स्ट टैम...
दबंग परा पांडे
1 Dec 2010 - 4:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून सव्वा-दीड तासांत अंधारच होईल हो गुर्जी!
30 Nov 2010 - 11:27 am | बद्दु
बाकी काही असो...." पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाले. ".... हे वाक्य काळजाला भिडलं...
30 Nov 2010 - 12:01 pm | sagarparadkar
न्युझीलंड वासी --- किविस्थ
जपानवासी -- जपानस्थ किंवा नवसूर्यभूमिस्थ
ऑस्ट्रेलियावासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय
पूर्वयुरोपवासी -- जाणकारांसाठी थोडा खुराक म्हणून सोडलंय
ब्रिटनवासी -- आंग्लभूमिस्थ
अमेरिकावासी -- ईस्टकोस्ट्स्थ (पूर्वतटस्थ), मध्यभूमिस्थ, पर्वत्भूमिस्थ, वेस्ट्कोस्टस्थ (पश्चिमतटस्थ)
आखात वासी -- मरूभूमिस्थ / मध्यपूर्वस्थ / तैलभूमिस्थ
30 Nov 2010 - 1:34 pm | नरेशकुमार
एक शब्द कळला तर शप्पथ !
काय लिहितात ते, सगळ्यांसाठि लेख करा ना.
30 Nov 2010 - 3:10 pm | नावातकायआहे
३_१४ताइंचे हारदीक आभीनंदन.
आयला फ्लेक्सवाले कुट उलथले सगळे?
'तसा' तरुणी रुदय समराट स्टाइल एखादा टाकावा का काय?