मिपाकरांसाठी खुषखबर

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
11 Oct 2010 - 12:21 pm

नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो. बर्‍याचदा स्वतःच्याच दुसर्‍या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.* (ह्या वाक्याचे श्रेय मकी)

अशा सदस्यांना ह्या सर्व अडचणीतुन मुक्ती देण्यासाठी 'परा-नाना प्रोत्साहन मंडळातर्फे' 'शेड्युल प्रतिक्रीया' हे पॅकेज सादर करण्यात येत आहे. ह्या पॅकेजमुळे आपल्या अनेक अडचणी अगदी सहज सुटू शकतील आणि लेखनाला प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल तो वेगळाच. म्हणजे अगदी 'एक दाम दो काम' असे झाले.

पॅकेजची वैशिष्ठे :-

१) ठरलेल्या शेड्युल नुसार आपल्या धाग्यावर एक अथवा लागोपाठ २ प्रतिक्रीया दिल्या जातील.

२) धाग्यावर प्रतिक्रीया देताना फोटु अथवा वर्तमानपत्रातील दुवे वापरल्यास त्याचे वेगळे चार्ज पडणार नाहीत.

३) आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.

४) आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आपल्याच जुन्या लेखांचे संदर्भ वारंवार देण्यात येतील. जेणेकरुन ते लेख देखील वर आणण्यास मदत होईल.

५) एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.

६) चलचित्र (व्हिडो) प्रतिक्रीया उपलब्ध. (मागणी नोंदवताना सजहराव का मदनबाण ह्याचा योग्य निर्देश द्यावा)

७) धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच नाना-परा-पुप्या-धम्या असा चतुरंगी सामना देखील खेळवता येईल.

८) मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध.

९) आपल्या धाग्यावर दंगा होउन पोपकॉर्नची दुप्पट विक्री झाल्यास नफ्यातील काही हिस्सा आपणास देण्यात येईल.

१०) Give and Take प्रतिक्रीया उपलब्ध.

काही अटी :-

१) धाग्याचे काश्मिर करावयाचे असल्यास स्वतंत्र चार्जेस पडतील.

२) तुमच्या धाग्यावर कायम तुमची खिल्ली उडवणार्‍या सदस्यास नडावयाचे असल्यास त्याचे दर सदस्याच्या मिपासदस्यकालावधीवर अवलंबुन असतील.

३) संपादकांशी वैर घेतले जाणार नाही.

४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल.

५) धाग्यावर वैयक्तिक वाद-विवाद घडवायचे असल्यास समोरची पार्टी जे दर लावेल ते ग्राहकास बंधनकारक असतील.

६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी.

७) मिभोकाका व प्रभुगुर्जी ह्यांच्या प्रतिक्रीयांची जबाबदारी सर्वस्वी लेखकाची राहिल. धाग्यालाच विरजण लागल्यास अथवा धागा क्रिप्टिक बनल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.

८) अवलिया यांच्या प्रतिक्रीयांना कायमच पंख लागत असल्याने त्या प्रतिक्रीयांचे स्क्रिन शॉट पुरावा म्हणुन पाठवले जातील.

९) कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे. कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही. हेच नियम डॉन्रावांच्या प्रतिक्रीयेला देखील लागु.

१०) डॉन्राव आणि इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया ह्या सहसा धाग्यापेक्षा मोठ्या असल्याने, त्यांच्या प्रतिक्रीया धाग्यावर हव्या असल्यास धाग्याचा कच्चा मजकुर ४ ते ८ दिवस आगोदर पाठवुन ठेवावा.

मग आता विचार कसला करताय ? उचला किबोर्ड आणि टंका नाना अथवा पराला व्यनी.

कलाधोरणमांडणीविनोदसमाजजीवनमानतंत्रराहणीशिक्षणमौजमजामतसंदर्भबातमीशिफारससल्लामदतमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

तुला पोपकॉर्नच्या विक्रीतुन किती पैसे मिळणार याचा विचार करीत आहे.

;) :D ;)

मी-सौरभ's picture

11 Oct 2010 - 6:39 pm | मी-सौरभ

ह्या सोयी पुरवण्यासाठी च्या वेळा नाहीयेत ;)

पुणेकर असून वेळ लिहिलेला नाही असे कसे???

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Oct 2010 - 2:35 am | जाई अस्सल कोल्हापुरी

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार परा यांना भन्नाट स्किम्च्या आयड्यासाठी साठी"नोबेल" जाहिर करणेत आले आहे.

मृत्युन्जय's picture

12 Oct 2010 - 10:59 am | मृत्युन्जय

कशासाठी नोबेल? साहित्यासाठी की शांतीसाठी? (कदाचित अर्थशास्त्रासाठी सुद्धा असु शकेल)

ज्ञानेश...'s picture

11 Oct 2010 - 12:33 pm | ज्ञानेश...

व्यनि केला आहे.
कृपया दरपत्रक लावावे.

स्पा's picture

11 Oct 2010 - 12:33 pm | स्पा

चान चान ..................... ;)

भलतंच खर्चिक प्रकरण दिसतंय !!

नव्या लोकांना काही टक्के सूट मिळणार आहे का ?
नीट भाव सांगा भौ..

आपले धागे एखाद्या सदस्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे असतील, तर त्यास सर्वस्वी धागा काढणारा सभासद जबाबदार असेल, मंडळ नाही.

सहज's picture

11 Oct 2010 - 12:40 pm | सहज

कोण म्हणते मराठी तरुण पालथे धंदे करण्यात मागे पडतो!

सर्वसाक्षी's picture

11 Oct 2010 - 1:19 pm | सर्वसाक्षी

सहजराव,

तरुण आणि धंदे या दोन शब्दांमध्ये बरीच मोकळी जागा आहे, यामागचे रहस्य काय?

एक विनंती - 'व्यवसाय' वा 'उद्यमशिलता' म्हणा हो, 'धंदे' म्हणजे जरा.... असो.
कलोआ
साक्षी

मृत्युन्जय's picture

11 Oct 2010 - 12:41 pm | मृत्युन्जय

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो ठ्ठो ठ्ठो ठ्ठो

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Oct 2010 - 12:43 pm | ब्रिटिश टिंग्या

फाट्यावर मारला आहे! (कोणाच्या हे विचारुन स्वत:चा अपमान करुन घेउ नये)

गांधीवादी's picture

11 Oct 2010 - 12:46 pm | गांधीवादी

मिपा सेन्सेक्स २५,००० च्या वर ! ! ! ! ! !

मस्त कलंदर's picture

11 Oct 2010 - 12:54 pm | मस्त कलंदर

तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.*

हे मी कुठे म्हटले होते रे???? चिसौंकां परा, नसती श्रेयं देऊ नका हो.

कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही.

जळजळ पोचली.

बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 1:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे.

कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे.

तरीही त्या मिळणार नाहीत कारण कलंदर आणि विक्षिप्त यांनी केकपाककुशल मिपाकर स्वाती यांच्या समोर केकवर हात ठेवून शपथ वाहिल्याप्रमाणे त्या आता सर्व पुणेकरांना .... हॅ हॅ हॅ

तरीही परा हे आमचे पूर्वीचे कंपूतील मित्र असल्यामुळे आम्ही स्वतः या लेखाला चान चान म्हणत आहोत.

चिर्कुट's picture

11 Oct 2010 - 4:35 pm | चिर्कुट

>>चिरकुट आणि सौंदर्यप्रेमी कुजकटकुमारांची जळजळ या धाग्यातून ओतप्रोत दिसून येत आहे.

विनाकारण जळजळीसारखे आरोप करून आमचे नाव बदनाम केल्याबद्दल आणि आमचे नेहमीचे सिंहासन (वरून तिसरी फांदी, मिपाचे सुप्रसिद्ध झाड) सोडून प्रतिक्रिया द्यायला प्रवृत्त केल्याबद्दल ३_१४ यांचा तीव्र शब्दांत निषेध!!! :-)

बाकी लेख मात्र बेष्ट..आवड्या!!

(ब्याक टू झाड) चिर्कुट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या निषेधाला कचराकुंडी दाखवली आहे हे तुम्हाला कळलं असेलच, हॅ हॅ हॅ! ;-)

चिर्कुट's picture

11 Oct 2010 - 5:41 pm | चिर्कुट

>>तुमच्या निषेधाला कचराकुंडी दाखवली आहे

हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध काड्यांचा भारताने निषेध केल्यावर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया असते तसं वाटलं.. :-)

हे म्हणजे पाकिस्तानच्या विविध काड्यांचा भारताने निषेध केल्यावर पाकिस्तानची जी प्रतिक्रिया असते तसं वाटलं.. >>>

हा हा हा !!चिरक्या , लवकरच तु आपल्या कर्माची फळ भोगशील असा आशीर्वाद देत आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 6:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडक्यात चिर्कुट हे पाकिस्तानी आणि ॥काड्यावाले॥ आहेत असं मला समजलं!

चिंतामणी's picture

12 Oct 2010 - 9:04 am | चिंतामणी

बाकी, या धाग्याने शंभरी पार केल्यास मिभोकाका आणि मी प्रतिसादशतक पार करणारा अभिनंदनपर धागा काढू.

काढला का नवीन धागा?????? सेंचुरी झाली. आज बहुधा सचीन आणि परा दोघेही ड्बल सेंचुरी मारणार.

विंजिनेर's picture

11 Oct 2010 - 12:59 pm | विंजिनेर

मितानशी सहमती!

शिवायः

१. दिवाळी-धमाका योजनेखाली सवलतीचे दर आकारण्यात यावे(जसे महापालिका दिवाळीत सवलतीच्या दरात बुंदी लाडू/चिवडा इ. स्वस्तात विकते तसेच).
२. तुमच्या फायद्याचा काही % भाग लोककल्याणासाठी (म्हणजे सौं.फु. च्या नवीन शाखेच्या/नूतनीकरणासाठी) देण्यात यावा.
३. श्क्येड्यूल ऐवजी शेड्युल असा म्हर्‍हाठी आणि देसी शब्द वापरून तुम्ही हिरव्या माजाची कोंडी केली आहे त्या बद्दल एक निषेध. संपादकांकडून योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी.

ऋषिकेश's picture

11 Oct 2010 - 1:14 pm | ऋषिकेश

किबोर्ड उचलला.. मग व्यनी टंकता आला नाही.. तेव्हा म्हटले जाऊ दे ;)

छोटा डॉन's picture

11 Oct 2010 - 2:07 pm | छोटा डॉन

श्री. परा / नाना,

आपल्याशी झालेल्या करारानुसार ही केवळ नमुन्यादाखल प्रतिक्रिया देतो आहे.
सविस्तर वाचण्यासाठी आधी पेमेंट करा ...

बाकी कल्पना उत्तम, निदान ७०-८० प्रतिसादांना मरण नाही.
आम्ही आहोतच, बाकी चालु द्यात !

- छोटा डॉन

असे नकली प्रतिसाद मिळणार असतील तर बंद करा लेको हे दुकान! साला डान्याचे प्रतिसाद छापायचे असतील तर किमान वीस पंचवीस ओळीतरी छापा. उद्या इन्द्रांचे एकोळी प्रतिसाद द्याल, परवा मिभोंचे चान चान प्रतिसाद द्याल लेको! देणार असाल तर अस्सल द्या नाय तर आवरा तुमचं चंबुगबाळ आता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, आणि नायल्याचे उत्साहवर्धक कन्स्ट्रक्टीव्ह प्रतिसाद द्याल!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार

तुला काय आता ट्रेलरमध्येच सगळा शिणिमा दाखवु काय रे हिरव्यामाजोर्ड्या ? ;)

किती पैसे जमा झाले रे आत्ता पर्यंत ?

मिसळभोक्ता's picture

11 Oct 2010 - 10:46 pm | मिसळभोक्ता

आयपीओ होईल तेव्हा प्रेंड्स-अँड-फ्यामिली डिस्काउंट द्यायला विसरू नका शेठ.

उपक्रमास शुभेच्छा.

(मनातः साला, माझी आयड्या ढापतो, आणि पैशे कमावतोस का ?)

बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमाल मुलगा,मेघवेडा,प्रकाश घाटपांडे आणी प्रसन्नदांशी सहमत !!

बिपीनदा,श्रामो,केसुगुर्जी,धमाल मुलगा,मेघवेडा,प्रकाश घाटपांडे, प्रसन्नदा आणि सुहास यांच्याशी सहमत!

--असुर

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 3:18 pm | सुहास..

असुर आणी पुण्याचे पेशवे यांच्याशी सहमत !

पुपे आणि परा यांच्याशी सहमत!

--असुर

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 5:24 pm | सुहास..

मस्त कलंदर आणी निखील देशपांडेशी सहमत

"निदेंशी सहमत" असल्याचा खोटा दावा केल्याबद्दल सुहास यांचा जाहीर णीसेद!! :-)

बाकी या बाबतीत मेव्याशी सहमत!!

--असुर

मस्त कलंदर's picture

11 Oct 2010 - 7:17 pm | मस्त कलंदर

मी पराशी एकदम असहमत!!!

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 7:19 pm | सुहास..

मी रंगाशेठशी अगदी सहमत आहे.

कधीही न आवरलेलं घर ही बायको घरी नसल्याची खूण आहे!!!!

मक पराशी असहमत असल्याच्या विधानाशी सहमत!
परंतु मी स्वतः पराशी सहमत असल्याने मकीच्या असहमतीशी असहमत! थोडक्यात, मकीच्या विधानाशी अंशत: सहमत, बराचसा असहमत!

--असुर

इन्द्र्राज पवार's picture

11 Oct 2010 - 2:48 pm | इन्द्र्राज पवार

धागा वाचून माझी तर पंचाईत नव्हे तर चक्क जिल्हा परिषद झाली आहे. कारण 'किर्ती' ला जागायचे असेल तर एकोळी प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, अन् दिली तर शेअर बाजार गडगडला म्हणून सदस्य धागाकर्त्याचे जानवे धरणार.....त्यांच्या जानव्याची फिकीर खुद्द प.रा. ना असेल नसेल पण ते इतके प्रेम आमच्यावर करतात म्हटल्यावर काहीबाही लिहून (कोल्हापुरी भाषेत ~ रश्श्यात पाणी वाढवून...) ट्रेड मार्क प्रतिक्रिया दिली पाहिजे.

"...महत्वाची अडचण म्हणजे केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते...."

~~ हे निरिक्षण बाकी फारच नेमके असल्याने आणि अपेक्षित (संख्येने नव्हे....तर मनात जे सदस्य आहेत त्यांच्या) प्रतिक्रिया आल्या नाहीत तर, खरंच थोडेसे/वा बरेच, हिरमुसलेपण येतेच येते. पण ठीक आहे, सदस्यसंख्या दिवसेदिवस वाढत आहे आणि त्यामुळे धाग्यांची संख्याही त्यानुसार वाढणार असल्याने 'आपला धागा दोन नंबरच्या पानावर गेला' म्हणण्यातही काही अर्थ नाही.

मग असे जर होऊ नये असे वाटत असेल तर श्री.प.रा. यांच्या 'रामबाण जडीबुटी' चा असर कामी येईल यात तीळमात्र संदेह नाही. रोखठोक दरपत्रक अजून दिसत नाही, पण ज्यावेळी होईल आणि व्यवसायाची अंमलबजावणी सुरू होईल, त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.

याला म्हणतात नीच विचार ... अरे किमान विचारतरी मोठा करा. Low aim is crime, Indra!

इन्द्र्राज पवार's picture

11 Oct 2010 - 4:19 pm | इन्द्र्राज पवार

अगं तसं नाही.... ते आशाताईंचं एक प्रसिद्ध गाणं आहे ना..."जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना...", त्याच धर्तीवर सेव्हिंग्ज अकौंटही होल्ले होल्लेच जावू दे....उगाच तीनवरून एका रात्रीत पाच आकडी झाला तर त्या बिचार्‍या भटिंडावालीलाच चक्कर यायची ना. म्हणून...!

"Low aim is crime...." ~~ Definitely, I agree, but in these days let the aim starts walking in first place.

(बघं, यालाच म्हणतात दूरदृष्टी ठेवून पावले टाकणे..)

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 6:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बल्ले बल्ले नव्हे चांगभले म्हणा!

इन्द्रा, भटिंडेवालीला चक्करपण ... वा, वा, चान, चान!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार

ऑ ऑ ऑ ??
नुसते बघुन बघुन ?? =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 6:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्द्रा नक्कीच पुराणपुरूष* असणार! ;-)

* आठवा पुराणातल्या** चित्रविचित्र कथा!
**पुराण म्हणजे वेद, पुराण, आणखी काही ज्यात काहीही अतर्क्य कथा असतात ते सगळं!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 6:51 pm | परिकथेतील राजकुमार

मग आता लेख लिहायला सांगायचे का आपल्या विनायकाला ? 'पांडव कोल्हापुरात'.

"भटिंडाच्या द्रौपदीला अनावृत्त पत्र" कसे वाटते?

मिसळभोक्ता's picture

11 Oct 2010 - 10:39 pm | मिसळभोक्ता

अर्र, मी चुकून "भटिंडाच्या अनावृत्त द्रौपदीला पत्र" असे वाचले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आताश्या फार चुका व्हायला लागल्या आहेत हो काका?

मिसळभोक्ता's picture

11 Oct 2010 - 11:14 pm | मिसळभोक्ता

मिपा वाचताना चाळशी विसरलो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2010 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वय विसरून तुम्ही मिपा (आणि त्यातही पर्‍याचे लेख) वाचता, कमाल आहे ही अगदी!!

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2010 - 9:48 am | बिपिन कार्यकर्ते

मिपा वाचताना चाळशी विसरलो.

मटा वाचताना नाही विसरत हो तुम्ही चाळशी!!! काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जुळे उडवा

मृत्युन्जय's picture

11 Oct 2010 - 10:56 pm | मृत्युन्जय

तुमचा पार दु:शासन झाला हो काका?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 6:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'आपल्या' विनायकाला?
चालू देत, चान चान!! आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी सुपारी आणि उत्पन्नाचा सवाल आहे ना!!!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही देऊच प्रतिसाद, शेवटी सुपारी आणि उत्पन्नाचा सवाल आहे ना!!!

चान चान. किती समंजस मुलगी आहेस तु. लोक आपले उगाच काय बाय बोलतात हो. सहजकाका आले की तुला पुन्हा एकदा एक मस्तानी फिक्स.

मस्त कलंदर's picture

11 Oct 2010 - 7:20 pm | मस्त कलंदर

आणि मला रे मस्तानी???

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 7:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं, त्या पर्‍याकडून एक मस्तानी सुटते आहे तर आपण आणखी चार घेऊ गं!

इन्द्र्राज पवार's picture

11 Oct 2010 - 7:45 pm | इन्द्र्राज पवार

अदिती (दीर्घ 'ती'.... र्‍हस्व नव्हे...) जवळ असलेल्या कल्पना-कंपनी पतंगाच्या भरार्‍या पाहून मी अहिल्येसारखी शिळा झालोय...! नशीब भटिंडा बँकवालीची ओळख ज्या मित्राने करून दिली त्याला मराठी संस्थळावरील घडामोडी समजत नाही....भले तो कितीही आयटी प्रवीण असो....अन्यथा माझी धडगत नव्हती.

श्री.प.रा. ~ काढून टाका माझे नाव त्या संभाव्य 'कामगारां'च्या यादीतून आणि डॉन्रावांवरच भागवा. मी राहतो तीन आकड्यातच समाधानी.

इन्द्रा

धमाल मुलगा's picture

11 Oct 2010 - 7:56 pm | धमाल मुलगा

धर्म बुडाला हो, धर्म बुडाला...

काय ह्या आजकालच्या पोरी..दोघीजणी मिळून संगनमतानं कोण्या एका मस्तानीसाठी झुरताहेत.

छे छे छे!!!!
हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 8:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग काय फक्त लग्न झालेल्या पुरूषांनीच मस्तानीसाठी झुरावं काय?
बाकी तुझा पीसी कॉफीनी शुचिर्भूत होतोच, आता गोमूत्र ... काय फरक पडतो त्याला बिचार्‍याला?

धमाल मुलगा's picture

11 Oct 2010 - 8:21 pm | धमाल मुलगा

तुम क्या जानो? कुई!
हाय कंबख्त तूने पी ही नहीं...तुम क्या जानों?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 8:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाय कंबख्त तूने पी ही नहीं...तुम क्या जानों?

तू लग्नाबद्दल बोलतो आहेस का मस्तानीबद्दल? उई उई उई!

पैसा's picture

11 Oct 2010 - 8:22 pm | पैसा

काय काय पितो तो?

धमाल मुलगा's picture

11 Oct 2010 - 8:27 pm | धमाल मुलगा

अरे...
तो त्याचा प्रश्न आहे..तुम्हा लोकांना काय करायचंय? ;)

पैसा's picture

11 Oct 2010 - 8:34 pm | पैसा

ही बातमी नेटवरून पसरली तर आमचेपण पीसी मागण्या करायला लागतील.

मस्त कलंदर's picture

11 Oct 2010 - 8:47 pm | मस्त कलंदर

हे वाचल्यावर आता आख्खा पिसी गोमुत्राने शुचिर्भूत करुन घ्यावयांस हवां.

नाहीतरी तुला पीसी साफ करायला हाऊसकीपिंगच्या लोकांना (नक्की कुणाला ते उत्तर हवे असल्यास केवळ गरजूंना व्यनिमार्फत कळवले जाईल) बोलवायला कारणच हवं असतं ना!!! आम्ही उगीच निमित्तमात्र!!!

त्यावेळी आमच्याही सेव्हिंग्ज अकौंटवर तीन ऐवजी चार आकडी बॅलन्स दिसायला लागेल अशी आशा आहे.

बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!

इन्द्र्राज पवार's picture

11 Oct 2010 - 4:25 pm | इन्द्र्राज पवार

"....बँकेतल्या भटिंडावालीला भेटायचे निमित्तच शोधा तुम्ही!...."

~~ होय हे कबूल; पण तिला आमच्यासारखा 'परच्युटन' नकोय तर एखाद्या जानी 'राजकुमारा'सारखा 'सॉलिड' खातेदार हवाय; अन् तोही पुण्यनगरीतील किंवा मुंबापुरीतील. तो सध्या मी शोधतोय.

"तुका म्हणे उरलो उपकारापुरता...." असाच आमचा सध्या संक्रमणकाल चालू आहे...नाईल.

इन्द्रा

लेट नाईट किंवा अरलि मारनिंग प्रतिक्रिया सरविस ठेवनार असाल तर मी उमेदवार व्ह्यायला तयार हाय.
म्या आतापतुर फक्त प्रतिक्रिया आनि प्रतिक्रियाच देत आलोय.
४७ आठवड्याचा हितला अनुभव हाय आनि वर रिकामटेक्डापन हाय.
पटत आसल त व्य नी करा

Pain's picture

11 Oct 2010 - 3:09 pm | Pain

हाहाहा :)
लेख आवडला.

गांधीवादी's picture

11 Oct 2010 - 3:27 pm | गांधीवादी

आम्ही idea दिली, आम्हाला किती सूट ?
http://www.misalpav.com/node/14824#comment-246764

इंटरनेटस्नेही's picture

11 Oct 2010 - 3:29 pm | इंटरनेटस्नेही

मस्त आहे! गुड!

नितिन थत्ते's picture

11 Oct 2010 - 3:44 pm | नितिन थत्ते

१. सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?

२. येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का?

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार

सदर योजनेखाली सदस्यांकडून काही रक्कम मागितली जात आहे. प्रशासनाला हे मंजूर आहे का?

येथे रक्कम मागितल्याचा कुठे उल्लेख आहे हे थत्तेचाचांनी दाखवुन द्यावे अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुलुस्कानीनीचा खटला भरु. आधीच तुम्ही न्यायालयाचा अपमान केल्याचा एक खटला तुमच्यावर चालु आहे हे लक्षात घ्या.

मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे, त्यांच्यावर भलते सलते आरोप करणे हेच थत्ते चाचांचे काम आहे. कृपया प्रशासनाने लक्ष घालुन माझ्यासारख्या मराठी तरुणाला न्याय द्यावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Oct 2010 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिक्रियेत घाऊकपणे एका धर्माचा द्वेष आहे काय याचीही चौकशी करवून घे रे परा!

नितिन थत्ते's picture

11 Oct 2010 - 4:02 pm | नितिन थत्ते

योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत

  • 'एक दाम दो काम'
  • आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
  • एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
  • धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच

(स्वसंपादनाची सोय नसल्याने डीलकथेतील कॅशकुमार यांना मजकूर बदलता येणार नाही :) )

द केस रेस्टस् हिअर.

अधिक माहितीसाठी न्यायलयाच्या अपमानाचा खटला केव्हाच डिसमिस झाला आहे. :)

>>मराठी माणसाला व गांधी /नेहरु विरोधकांना सतत त्रास देणे
यातील दुसरा भाग मान्य असला तरी पहिला भाग मान्य नाही सबब पूर्ण वाक्य रद्द समजण्यात येत आहे.

(वकील)

समोरचा काही करत आहे तर खोडा कसा घालता येईल हेथत्ते यांनी दाखवुन दिले आहे

नितिन थत्ते's picture

11 Oct 2010 - 4:14 pm | नितिन थत्ते

आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्‍यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे.

(योजनेला विचारजंतांचा पाठिंबा मिळवून देण्याबाबत व्यनिने संपर्क साधावा).

बरोबर आहे. तो प्रतिसाद आपण नीट वाचावा.

आपल्या खोडसाळ पुर्वइतिहासामुळे तसा प्रतिसाद द्यावा लागला होता.

आता असा पराचा काय इतिहास आहे की आपण त्याला नाउमेद करत आहात?

आम्हीदेखील पूर्वी काही करू पहात होतो तेव्हा पहिला खोडा घालणार्‍यांकडून हा आरोप व्हावा? अरेरे. पब्लिक काहीतरी इज शॉर्ट" असं काहीतरी म्हणतात ते खरेच आहे. >>>

वरील प्रतिसादात 'पूर्वी' एवजी 'फार पूर्वी' असे असावे .

परिवर्तन संसार का नियम है !!- श्री संत सुहास बाबा (सेल्फ-डिक्लेयर्ड-सस्केसर टु जालिंदरबाबा)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार

योजनेच्या मजकुरात पुढील उल्लेख आहेत

'एक दाम दो काम'
आपला धागा दुसर्‍या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच

पण इथे कुठेही रक्कम मागितलेली दिसत नाही. कशासाठी काय खर्च येईल ते देण्यात आलेले आहे. ते देखील 'रक्कम' हा शब्द वापरुन. देणे न देणे सर्वस्वी सदस्यावर अवलंबुन.

उद्या मी तुम्हाला आमच्याकडे १०० रुपये डझन आंबे आहेत असे सांगीतले तर त्याचा अर्थ फक्त माहिती पुरवणे असा होतो. तुम्हाला १०० रुपये मागीतले असा होत नाही थत्ते चाचा.

बाकी नानाशी सहमत आहे. मिपावर काही चांगले घडायला लागले की थत्ते चाचा लगेच कुरबुर चालु करतात.

>>>> येथे धागे वर राहतील याचे उपाय करण्याच्या योजनांविषयी लिहिले आहे. इंचाइंचाने वर येणारे धागे फुटाफुटाने खाली घालवण्याचे काही उपाय आहेत का?

अरेरे ! एका स्वतःला विचारस्वातंत्र्याचा कैवारी म्हणवणार्‍या एका सदस्याकडुन विचारांची गळचेपी होत आहे आणि संपादक मंडळ शांतपणे कशावर तरी काहीतरी .. हो तेच ते..हातावर हात धरुन बसले आहे.. हा हंत !

@परा - थत्ते मियांच्या प्रतिसादांना असहमतीचे प्रतिसाद असा पण एक मुद्दा घे..

ट्यार्पी वाढवण्यात थत्तेचाचांचा वाढता सहभाग पाहुन पर्‍याने विरोधी पक्षनेते थत्तेचाचांनाही सामिल करुन घेतलेले आहे असे दिसते.

नितिन थत्ते's picture

11 Oct 2010 - 4:28 pm | नितिन थत्ते

सत्यकथनाची काही व्हॅल्यूच राहिली नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

थत्ते चाचा हे राण्यांसारखी आपली उपद्रवक्षमता दाखवुन देत आहेत अशी आम्हाला शंका आहे.

नाना, अरे थत्ते चाचांच्या नावानी एक चेक काढ बाबा :)

छोटा डॉन's picture

11 Oct 2010 - 4:40 pm | छोटा डॉन

चेकने पेमेंट ?
मायला धंदा करताय की ८०-सी खाली टॅक्स वाचवताय ?

नान्या, तु ह्या पराला धंद्यात बरोबर घेऊन फसणार असे भाकित सांगतो ( ह्यावरुन आठवले, घाटपांडेकाका कुठे आहेत आजकाल ? ).
असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.
"सल्लागार" म्हणुन घेतो काय मला ?

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

असे चेक ने पेमेंट करत बसलास तर एक दिवस 'सर्कारी पाहुणचार' घेणार असे सांगतो.

डान्राव तुम्ही शस्त्रानी खेळणारी माणसे ;) तुम्हाला हे डावपेच समजायला वेळ लागेल.

अहो पुण्यात 'अरे साहेबांना चहा सांग' आणि 'अरे साहेबांचा चेक काढ' ह्या दोन वाक्यात काही फरक नसतो ;) चहापण येणार नसतो आणि चेक पण निघणार नसतो.

आता आलाच आहात पुण्यात तर शिकाल हळुहळु...

सुहास..'s picture

11 Oct 2010 - 4:47 pm | सुहास..

आता आलाच आहात पुण्यात तर शिकाल हळुहळु... >>>

तरी बर आम्ही अजुन पाहुणचार केला नाही आपला

छोटा डॉन's picture

11 Oct 2010 - 4:49 pm | छोटा डॉन

सल्ला देणे हे आमचे काम, ह्याउप्पर तुमची मर्जी.
उगाच पुन्हा हातापाया पडायला लागु नये इतकीच आमची तळमळ

बाकी संध्याकाळी चहा घ्यायला येतो अड्ड्यावर

अड्ड्यात सामील केलेले नसतानाही उगात "आम्ही पण तुमच्यातले" असे दाखवणे अजिबात आवडले नाही.