नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो. बर्याचदा स्वतःच्याच दुसर्या एखाद्या आयडीची मदत घ्यावी लागते. तर कधी आपल्यासारखाच एक आपदग्रस्त पकडून स्वतःच्या धाग्यावर एकमेकांचे मनोरंजन करावे लागते.* (ह्या वाक्याचे श्रेय मकी)
अशा सदस्यांना ह्या सर्व अडचणीतुन मुक्ती देण्यासाठी 'परा-नाना प्रोत्साहन मंडळातर्फे' 'शेड्युल प्रतिक्रीया' हे पॅकेज सादर करण्यात येत आहे. ह्या पॅकेजमुळे आपल्या अनेक अडचणी अगदी सहज सुटू शकतील आणि लेखनाला प्रतिक्रीयांचा पाऊस पडेल तो वेगळाच. म्हणजे अगदी 'एक दाम दो काम' असे झाले.
पॅकेजची वैशिष्ठे :-
१) ठरलेल्या शेड्युल नुसार आपल्या धाग्यावर एक अथवा लागोपाठ २ प्रतिक्रीया दिल्या जातील.
२) धाग्यावर प्रतिक्रीया देताना फोटु अथवा वर्तमानपत्रातील दुवे वापरल्यास त्याचे वेगळे चार्ज पडणार नाहीत.
३) आपला धागा दुसर्या पानावर गेल्यास रक्कम दुप्पटीने परत करण्यात येईल.
४) आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया देताना आपल्याच जुन्या लेखांचे संदर्भ वारंवार देण्यात येतील. जेणेकरुन ते लेख देखील वर आणण्यास मदत होईल.
५) एकदम ५ धाग्यासाठी हे पॅकेज घेतल्यास २ कौले काढण्यास मोफत मदत पुरवली जाईल. व त्या कौलांवरील पहिल्या २ प्रतिक्रीया फुकट असतील.
६) चलचित्र (व्हिडो) प्रतिक्रीया उपलब्ध. (मागणी नोंदवताना सजहराव का मदनबाण ह्याचा योग्य निर्देश द्यावा)
७) धाग्यावर अतिरिक्त रक्कम आकारुन नाना-पुपे / धम्या-पुपे असे दुरंगी सामने तसेच नाना-परा-पुप्या-धम्या असा चतुरंगी सामना देखील खेळवता येईल.
८) मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध.
९) आपल्या धाग्यावर दंगा होउन पोपकॉर्नची दुप्पट विक्री झाल्यास नफ्यातील काही हिस्सा आपणास देण्यात येईल.
१०) Give and Take प्रतिक्रीया उपलब्ध.
काही अटी :-
१) धाग्याचे काश्मिर करावयाचे असल्यास स्वतंत्र चार्जेस पडतील.
२) तुमच्या धाग्यावर कायम तुमची खिल्ली उडवणार्या सदस्यास नडावयाचे असल्यास त्याचे दर सदस्याच्या मिपासदस्यकालावधीवर अवलंबुन असतील.
३) संपादकांशी वैर घेतले जाणार नाही.
४) स्त्रिया / धर्म / लता मंगेशकर / भिमसेन जोशी इत्यादी विषयावर टिपणी करावयाची असल्यास प्रत्येक ओळीला वेगळा दर पडेल.
५) धाग्यावर वैयक्तिक वाद-विवाद घडवायचे असल्यास समोरची पार्टी जे दर लावेल ते ग्राहकास बंधनकारक असतील.
६) मिभोकाका , इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया हव्या असल्यास चार दिवस आगोदर मागणी नोंदवावी. डोन्रावांसाठी ८ दिवस आधी.
७) मिभोकाका व प्रभुगुर्जी ह्यांच्या प्रतिक्रीयांची जबाबदारी सर्वस्वी लेखकाची राहिल. धाग्यालाच विरजण लागल्यास अथवा धागा क्रिप्टिक बनल्यास आम्ही जबाबदार असणार नाही.
८) अवलिया यांच्या प्रतिक्रीयांना कायमच पंख लागत असल्याने त्या प्रतिक्रीयांचे स्क्रिन शॉट पुरावा म्हणुन पाठवले जातील.
९) कलंदर आणि विक्षिप्त प्रतिक्रीया हव्या असल्यास दोन दिवस आधी कळवावे. कलंदर प्रतिक्रीयेमध्ये स्वतःच्या उद्योगांचे फोटु देणे, माहिती देणे असे प्रकार घडून धागा हायजॅक झाल्यास आम्ही जबाबदार नाही. हेच नियम डॉन्रावांच्या प्रतिक्रीयेला देखील लागु.
१०) डॉन्राव आणि इंद्र पवार ह्यांच्या प्रतिक्रीया ह्या सहसा धाग्यापेक्षा मोठ्या असल्याने, त्यांच्या प्रतिक्रीया धाग्यावर हव्या असल्यास धाग्याचा कच्चा मजकुर ४ ते ८ दिवस आगोदर पाठवुन ठेवावा.
मग आता विचार कसला करताय ? उचला किबोर्ड आणि टंका नाना अथवा पराला व्यनी.
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 4:56 pm | छोटा डॉन
कोण तुम्ही ?
जान ना पेहचान और मै तेरा मेहमान !
उगाच मध्येमध्ये किंवा पुढेपुढे करुन चहा-बिस्किट लाटता येईल ह्या भ्रमात राहु नका.
11 Oct 2010 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार
असे कोणाकडे जाताना मोकळ्या हातानी जाउ नये. येताना एक बाटलीपण आणा.
11 Oct 2010 - 5:02 pm | सुहास..
असे कोणाकडे जाताना मोकळ्या हातानी जाउ नये. येताना एक बाटलीपण आणा. <>>>
वायदे-आजमांकडुन असल्या थिल्लर अपेक्षा ठेवण्यार्या पर्याचा निषेध !!
11 Oct 2010 - 6:18 pm | मृत्युन्जय
चहाच्या बदल्यात बाटली हा आवळा देउन कोहळा काढायचा प्रकार झाला. बँगलोरकर उगाच धसका घेतील पुण्याचा (त्यांनी रिकामी बाटली आणली तर तुम्ही धसका घ्याल)
11 Oct 2010 - 6:26 pm | सुहास..
त्यांनी रिकामी बाटली आणली तर तुम्ही धसका घ्याल) >>
आधी चुकुन बादली वाचल .. असो ...ते अपेक्षितच आहे ..पुर्ततेची वाट बघण्यापलीकडे आमच्या हाती काही नाही.
11 Oct 2010 - 7:21 pm | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ. मी पण मूळ प्रतिसादात बादली असेच वाचले होते. आता डानराव काय आणतात कोणास ठावूक?
11 Oct 2010 - 6:32 pm | Nile
अहो सदाशिवपेठेतली बाटली वेगळी! डॉन्राव बंगळुरात जाउन बाटले, (माडते माडते करत नाचत होते म्हणे एक दिवस!!) त्यांची शुद्धी करायला बाटलीभर गोमुत्र आणावयास सांगितले असेल.
11 Oct 2010 - 7:20 pm | मृत्युन्जय
एक बाटली पुरायची का मग? आणि डान्रावांना काय मग ते सुहासभौनी लिहिल्याप्रमाणे गोमुत्र शिंपडुन "कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर................" (टींबटींब प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार भरुन घ्यावेत.) असे म्हणायचे की काय? आणि म्हणणार कोण? परा? वाट लागली. डान्राव अजुनच बाटायचे.
11 Oct 2010 - 7:24 pm | सुहास..
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर................" >>>
छ्या !! गाळलेल्या जागा ?
कालपर्यंत तु बेंगलोरकर होतास तिथेचा राहिलास तिथेच उतमात केलास पण आता पुण्यात आला आहेस तर ईथे ऑमॉर शूर तॉमॉर शूर चालणार नाही"
12 Oct 2010 - 2:42 am | जाई अस्सल कोल्हापुरी
लग्गेच नोबेल जाहिर! ताबड्तोपीनं मीटिंग घीउन परा यांना नोबेल जाहीर....!
11 Oct 2010 - 4:42 pm | नितिन थत्ते
>>नाना, अरे थत्ते चाचांच्या नावानी एक चेक काढ बाबा
व्यनि मधून सांगण्याच्या गोष्टी जाहीरपणे सांगितल्याबद्दल निषेध.
राण्यांसारखी हा शब्द राणे यांच्यासारखी असा समजून घेत आहे. :)
11 Oct 2010 - 4:34 pm | Nile
वरील पॅकेजातील वै. १, ४, ८ आणि अटी १, ४ आपल्या या धाग्यावरील प्रतिसादांत दिसल्याने शंका आली इतकेच. ;-)
11 Oct 2010 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार
निळ्या तुझा 'सत्कार' करु का आता मेल्या ?
11 Oct 2010 - 4:41 pm | नंदन
--- अतिशय उदात्त हेतू!
मात्र यामागची मूळ कल्पना मिभोकाकांची आहे, हे नमूद करायला हवे. त्यांनी याला 'अबक-प्रतिसादोत्तेजक मंडळ' असे नाव देऊन पंचवीस सदस्य जमा झाल्यास, प्रत्येक लेखाला (एकूण) पन्नास प्रतिसाद येतील अशी ग्वाही दिली होती हे आठवले ;)
अनिवासी वि. निवासी वादाची केवळ इत्यादींमध्ये गणना केल्याचे पाहून अंमळ हळवा झालो.
खी: खी: खी:, बेष्ट!
अवांतर - गुर्जींची ह्या (अंशतः) पुणेस्थित व्यवसायावरची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे ;)
11 Oct 2010 - 11:08 pm | राजेश घासकडवी
जे आम्ही फुकटात करत होतो त्याबद्दल पैशे मिळणार यासारखी आनंदाची बातमी कुठची? (प्रत्यक्ष मिळालेले नसले तरी आमिष तरी दाखवलंय, हेही नसे थोडके.) असली भन्नाट योजना पुणेरी दुकानदाराच्या कल्पक डोक्यातूनच निघणार! अहाहा, जेव्हा मिपाची मेंबरशिप एक कोटी होईल, तेव्हा दररोज चार हजार लेख पडतील. मग लेख वर काढण्यासाठी कोण काय नाही करणार... मस्त बिझनेस मॉडेल आहे.
अवांतर - हे असले धमाल धागे आम्ही झोपल्यानंतरच का निघतात? आम्हा मूठभर अनिवासी लोकांवर हा अन्याय आहे.
अतिअवांतर - या वाक्याखाली सही म्हणून (हिरवा) राजेश असं लिहिणार होतो, पण सद्यपरिस्थितीत त्याचा भलताच अर्थ निघेल म्हणून राहूदेत.
11 Oct 2010 - 4:41 pm | ब्रिटिश टिंग्या
हा लेख वाचुन फसलेल्या चांदणी योजनेची आठवण झाली! :)
11 Oct 2010 - 4:55 pm | प्रकाश घाटपांडे
परामुखे म्हणा! परामुखे म्हणा!
विणण्याची गणणा कोन करी!
12 Oct 2010 - 9:19 am | चिंतामणी
परामुखे म्हणा! परामुखे म्हणा!
विणण्याची गणणा कोन करी!
परामुखे म्हणा! परामुखे म्हणा!
छापण्याची गणणा कोन करी!
(छापण्याची= सु.अ.सां. न.ल. येथे सुद्यांची संख्या खुप असल्याने विस्ताराची जरूरी नाही.)
11 Oct 2010 - 4:42 pm | जागु
आयडीया चांगली आहे.
11 Oct 2010 - 4:43 pm | जागु
आयडीया चांगली आहे.
11 Oct 2010 - 5:22 pm | स्वाती२
छान आयडिया!
पूर्णवेळ गृहिणी म्हणून दरात काही सवलत आहे का? ;)
11 Oct 2010 - 6:56 pm | प्रभो
कॅफे बंद पडला का रे???
11 Oct 2010 - 6:58 pm | Nile
सौंदर्यफुफाट्याला कॅफे म्हणण्यार्या प्रभोची मला कीव येते.
11 Oct 2010 - 7:08 pm | प्रभो
हॅहॅहॅ....सौंदयफुफाटा 'कॅफे' समोर आहे बे....
11 Oct 2010 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार
हान ! दोन पेग झाले की हि अशी मळमळ बाहेर पडते आमच्या हितचिंतकांची.
11 Oct 2010 - 7:00 pm | अवलिया
सहमत आहे.
प्रभोचा आगामी लेख फ्लॉप केला जाईल ही खात्री आमच्यातर्फे.. !!
11 Oct 2010 - 7:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग त्या किलोमीटरवाल्या धाग्यांचीही 'काळजी' घ्या की!
11 Oct 2010 - 7:06 pm | अवलिया
कोणता हो? लिंक द्या
11 Oct 2010 - 7:11 pm | प्रभो
म्हणजे ५० प्रतिसाद नक्की ना बे नाण्या???
11 Oct 2010 - 7:12 pm | अवलिया
तु लेख तर टाक रे.. फक्त मी ऑनलाईन असतांना टाक.. मग बघु.. !! आधीच काही बोलत नाही..
11 Oct 2010 - 7:06 pm | सुहास..
अगदी अगदी सहमत आहे नाना आणी पर्याशी ..!!
एक प्रश्न : 'परा-नाना प्रोत्साहन मंडळात' शिरण्याची काही व्यवस्था आहे का ? काय खर्च लागेल ? टेबलाखाली किती पडतील ?
11 Oct 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग विचारायचे असतात सुहास शेठ ;)
11 Oct 2010 - 7:09 pm | अवलिया
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न पडता मग विचारायचे असतात सुहास शेठ Wink
11 Oct 2010 - 7:15 pm | सुहास..
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन न पडता मग विचारायचे असतात सुहास शेठ >>>
=))=))=))=))
नान्या , स्वानुभव काय रे ? आपण खंडीभर भेळीच्या भेळी संपवुन चर्चा करू हवे तर
11 Oct 2010 - 7:26 pm | अवलिया
ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच अवलंबुन नसते..दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते... :)
11 Oct 2010 - 7:33 pm | सुहास..
दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते >>
आपण बरच काही ऊघड ठेवता ईतकेच यावरून कळले=)) ..तरी आधीचे धुसर जरा स्पष्ट केलेत त्याबद्दल धन्यवाद !!
11 Oct 2010 - 7:37 pm | असुर
>>> ज्ञान हे केवळ स्वानुभवावरच अवलंबुन नसते.. <<<
१००% सहमत!
>>दोन डोळे, दोन कान उघडे ठेवुन पाहिले, ऐकले की बरेच काही कळते... <<<
अंशत: सहमत.
डोळे असल्यास /कान असल्यास (एक की दोन हा मुद्दा वेगळा आहे) पाहीले, ऐकले तर,, आणि असून सुद्धा वापर केला तर हे मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती!
--असुर
11 Oct 2010 - 7:40 pm | अवलिया
डोळे असल्यास /कान असल्यास (एक की दोन हा मुद्दा वेगळा आहे) पाहीले, ऐकले तर,, आणि असून सुद्धा वापर केला तर हे मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती!
सहमत आहे. परंतु सदर विषयातील अल्प ज्ञानामुळे आपण यावर अधिक विवेचन वेगळ्या धाग्यातुन करावे ही नम्र विनंती.
11 Oct 2010 - 7:10 pm | पाषाणभेद
काही एमएलएम स्किम असेल तर सांगा हो! अन प्रिपेड आहे की पोस्ट पेड ते ही सांगा.
11 Oct 2010 - 7:12 pm | परिकथेतील राजकुमार
योजनेला मिळणारा एकुण प्रतिसाद बघुन धागा अपडेटवला जात राहिल. चिंता नसावी.
11 Oct 2010 - 7:14 pm | प्रभो
स्वतःला संपादक समजतोस का रे भाड्या.....
11 Oct 2010 - 7:10 pm | सुहास..
हे प्रश्न टेबलाभोवती बसुन मग विचारायचे असतात >>
सध्या आपल्या नेहमीच्या टेबलापासुन लांब असल्याने ईथेच विचारून घेतल ..असो ..तपशीलात शिरायला टेबला भोवती असे म्हणायचे होते का ?
11 Oct 2010 - 7:23 pm | मृत्युन्जय
परा शतकी धाग्याची ट्रिक कळली राव तुला.
11 Oct 2010 - 7:26 pm | पैसा
घाऊक प्रतिक्रियांसाठी महिला आघाडीला विश्वासात न घेतल्याबद्दल धागाकर्त्यांचा निषेध!
11 Oct 2010 - 9:02 pm | योगी९००
एकदम मस्त.. लवकरच एक लेख टाकून परा-नानाला प्रतिक्रिया खेचण्याचे काम द्यावे असा विचार करतोय.
मिभो,घासुगुर्जी,प्रभुगुर्जी,इंद्र पवार अशा अभ्यासु + गर्दीखेचु प्रतिक्रीया रास्त दरात उपलब्ध.
क्लिंटन, धमु, पुपे, कानडाऊ ..यांचा काय दर आहे..? (म्हणजे पॅकेज मध्ये यांच्या प्रतिक्रिया येतील काय असे विचारायचे आहे, का वेगळा चार्ज पडेल..?)
12 Oct 2010 - 9:25 am | चिंतामणी
परा- किती जमा झाले रे?
फोनची वाट बघत आहे.
(संदर्भ माझा पहीला पोस्ट) ;)
12 Oct 2010 - 2:47 pm | अवलिया
मागच्या पानावर गेला होता.. वर आणला !
12 Oct 2010 - 2:58 pm | गांधीवादी
कितीत व्यवहार निपटला ?
12 Oct 2010 - 3:01 pm | अवलिया
वैयक्तिक प्रश्न. पण बरेच गांधी हस्तांतरण करुन गेले / आले