द सियालकोट सागा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
20 Aug 2019 - 11:40 am

असतो मा सद्‌गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतम् गमय

बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28

म्हणजेच
मला असत्याकडून सत्याकडे ने
अंधाराकडून प्रकाशाकडे ने
मृत्यूकडून अमरत्वाकडे ने

अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात. कोलकात्यातील व्यापारी कमी शेयर ब्रोकर अरविंद बगाडिया आणि मुंबईचा नावारूपास येत असलेला डॉन टर्न राजकारणी अरबाज शेख यांच्या तीन पिढ्यांच्या पॉवर गेम ची हि गोष्ट म्हणजे 'सियालकोट सागा'. १९४७ साली सुरु झालेली गोष्ट पुढच्या ६० वर्षातल्या महत्वाच्या घटनांना ओझरता स्पर्श करून जाते. या बरोबरच स्टॉक मार्केट, शेल कंपन्याची उलाढाल असं बरंच काही वाचायला मिळतं. बऱ्याच राजकीय नेत्यांचे त्यांच्या घोटाळ्यांचे उघड उघड उल्लेख पण आहेत, त्यामुळे आपण कथेसोबत बऱ्यापैकी रिलेट होतो. एवढं सगळं असूनही फारसा ट्विस्ट नसल्यमुळे कथा बरीचशी अंदाज बांधण्याजोगी झालेली आहे. तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं. पण ते का आहे याचा उलगाडा उपसंहारात केलाय.

अगदी थोडक्यात सांगायचं तर पुस्तक अगदी एकदा वाचण्याजोगं असलेलं आहे.

abc

मांडणीवाङ्मयकथाप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वादलेखशिफारससल्लामाहिती

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

21 Aug 2019 - 4:56 am | सोन्या बागलाणकर

चांगला रिव्यू!
संग्रही आहे पण अजून वाचायला झाली नाही. आता वेळ काढावा लागेल.

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.

हो हे मला "द रोझबेल लाईन" वाचताना झालं होत. कुठ काय चाललय हेच कळत नव्हत, नंतर नंतर तर सगळे संदर्भच विसरायला होत होत. आता तर त्याची कथा पण आठवत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2019 - 8:50 pm | कानडाऊ योगेशु

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.

ही अश्विन सांघवी ची स्टाईल आहे. कृष्णा की मध्येही त्याने हा प्रयोग केला होता. मुळात दा विन्ची कोड नंतर अश्या कादंबर्यांचे पेव फुटले होते व ह्या सर्व कादंबर्या परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवुन लिहिल्या होत्या.

महासंग्राम's picture

22 Aug 2019 - 9:58 am | महासंग्राम

दा विंची कोड कित्येक पटीने सरस होती :)

राजाभाउ's picture

22 Aug 2019 - 11:09 am | राजाभाउ

हो. दा विंची मध्ये इतिहास हा प्रसंगानुरुप पात्रांच्या तोंडी संवादांच्या स्वरुपात घातला आहे बहुतेक ठिकाणी त्यामुळे कथेची लिंक तुटत नाही उलट कथा जास्त फुलते, पण इथ मध्येच प्रकरणेच्या प्रकरणे येतात त्यामुळे मुळ कथा हारवुनच जाते. या आधीचा संदर्भ काय होता हे मागे जाउन शोधावे लागते.

मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही पण इतीहासाच्या पार्श्वभुमीवरची मराठीतून लीहीलेली एक मस्त रहस्यकथा आहे. आगदी दा विंची च्या तोडीची नसली तरी मस्त आहे.

मराठी_माणूस's picture

22 Aug 2019 - 12:00 pm | मराठी_माणूस

शोध बद्दल सहमत.

महासंग्राम's picture

22 Aug 2019 - 1:41 pm | महासंग्राम

शोध बद्दल सहमत त्यात रहस्य शेवट पर्यंत टिकवून ठेवलंय.