दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Apr 2019 - 4:20 am

एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???

पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.

चौकीदाराला मिठी मारून झाले ... चोर म्हणून झाले
मंचावर सर्वांसोबत हात गुंफून उंचावणे झाले
गंध- टिळा लावून पूजेला बसणे झाले
जानवे धोतर लेऊन मंदिरात जाणे झाले
बहात्तर हजाराची पुंगी वाजवत बाह्या सरसावणे झाले
... पण चौकिदार अडिग, अजिंक्य आहे.

तिकडे माया ममता केज्रू शर्दू चंद्रू आणि कोणकोण ...
सिंहासनावर डोळे गाडून बसलेत
आणि तो शुभ्रमणि-यम-स्वामी वक्र दृष्टीने बघतो आहे.
त्याने तर पूर्वी मम्मीला पण सिंहासनावर बसू दिले नव्हते...
मग तिने उभारलेले बुजगावणे ...
मोडीत काढल्यानंतर तरी सिंहासन मिळायला हवे होते
.... हीच तर घराण्याची रीत होती, सिंहासनावर भारीच प्रीत होती
पण तो चौकीदार मधेच कडमडला ... सगळेच मुसळ केरात गेले.

अरे कुठे आहे तो सपिल किब्बल ? कुठे आहे डिग्गीराजा, कुठे गेला मोतिरादैत्य ?
झोपा काढायला ठेवलेय का त्यांना ?
सांगितलेच पाहिजे मम्मीला, आता त्यांचे नाव

विचारानेच कसेतरी होत रहाते ...
डोके हरवलेला पप्पू
दाराआडून बघत रहातो...
बघतच रहातो ...

आता मला वाटते भितीइशाराकालगंगाकाहीच्या काही कविताचाटूगिरीजिलबीबालसाहित्यहट्टकरुणसंस्कृतीइतिहासबालकथाबालगीतविडंबनविनोदसमाजजीवनमानकालवणव्यक्तिचित्रणराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

29 Apr 2019 - 4:33 am | चामुंडराय

हा हा... मस्त जमलय...

आणि मी पयला

यशोधरा's picture

29 Apr 2019 - 4:43 am | यशोधरा

=))))))

मोदी विरोधी विडंबन येणार याची खात्री बाळगा !

थेट उल्लेख केलाय. सूचक हवं होतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2019 - 9:45 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

चित्रगुतांचा धागा आणि सुंदर सुंदर चित्रे नाहीत ! प्रगाढ निषेढ ! :)

नाखु's picture

29 Apr 2019 - 11:27 am | नाखु

या"भक्ताला" माफ कर!!!

भक्त सर्टिफाईड नाखु वाचकांची पत्रेवाला

सोन्या बागलाणकर's picture

29 Apr 2019 - 11:49 am | सोन्या बागलाणकर

लय म्हणजे लयच भारी!

शब्दा-शब्दाला हाणलंय पप्पूरावांना. तेवढा छोटा भीम किंवा डोरेमॉनचा उल्लेख राहिला.

हा पप्पू काही बदलणार नाही

जोपर्यंत त्याच्या गळ्यात वरमाला पडत नाही

आपल्या देशावर तोच राज्य करू शकतो

ज्याचे लग्न झालेय

इथे पप्पूला कोणी पुढे भेटेल असे दिसत नाही

त्याचे वय आता वयपण झालेय

अजून कोण कोण येणार आहेत दाराबाहेर

ते देवच जाणे

सद्यस्थितीत चौकीदारच भला दिसतोय

कोई माने या ना माने

हाती धनुष्यबाण घेऊन

थेट गोल मारून आलोय

सुट्टी काही मिळाली नाही

सरळ कामावर चाललोय

निकाल लागेल तेव्हा लागेल

मनात घर केलंय चौकीदारानं

घरात घुसून कधी कुणी मारलं नव्हतं

तेच करून दाखवलं या वाघानं

जालिम लोशन's picture

23 Jun 2019 - 5:43 pm | जालिम लोशन

+1

कंजूस's picture

23 Jun 2019 - 8:32 pm | कंजूस

एवढं खरं होतं लेकाचं तर मम्मी ने अध्यक्षपद स्वतः कडे परत का घेतलं?

चौथा कोनाडा's picture

29 Jun 2019 - 11:38 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ......
आता पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा हट्ट दाराआडून चाललाय ते आठवलं !

हा घोळ २०२४ च्या इलेक्शन च्या आधी पर्यंत चालाणार , मग आहेच दारा आडची ताई जबाबदारी घ्यायला !