पानगळीने रेखीव झालेल्या
त्या प्रचंड वृक्षातळी
ते दोघे होते मघामघाशी तर!
मी पाहीले त्यांना
बराच वेळ खाली मान घालून
एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना,
कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना,
अन् तेव्हा रस्ता हसताना...
मी पाहिले त्या दोघांना ,
हात हातात घेताना
'बाहों के बाहर
नजरों से ओझल होना ही
लकिरों पे लिखा है
तो वो लकिरे ही मिटा देते हैं'
त्याने एवढेच म्हणलेले
मला ऐकायला आले
नंतर मला ते दिसले नाहीत...
पानगळीने रेखीव झालेल्या
प्रचंड वृक्षामागे
मला नंतर कुणीच दिसले नाही...
-शिवकन्या
प्रतिक्रिया
16 Feb 2019 - 7:07 am | चांदणे संदीप
बऱ्याच दिवसानंतर मिपावर सुंगधी काव्यपुष्प उमललं आहे.
Sandy
16 Feb 2019 - 7:40 am | प्रचेतस
अप्रतिम काव्य