चर्चा (काथ्याकूट)

वेगे वेगे धावू किती ??

शेर भाई's picture
शेर भाई in काथ्याकूट
11 Oct 2021 - 9:10 pm

फार पूर्वी म्हणजे ज्या काळात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता त्या काळात आपले पोलिसमामा सिग्नल तोडणाऱ्या चालकांना बाजूला घेऊन दंड वसूली (तोड-पाणी) करत असत. आता काळ बदलला त्याप्रमाणे आपले पोलीस-दल एकदम जागरूक झाले आहे, एक अनुभव:

गणपतीचे रहस्य

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
8 Sep 2021 - 9:02 pm

गणेशोत्सव दोन दिवसा वर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या गणपतीचे रहस्य या शीर्षकाखाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने एक लेख प्रसिद्ध होत आहे. यावर कोणी प्रकाशझोत टाकू शकेल का ?

Investment म्हणून दुकान गाळा

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
14 Aug 2021 - 10:25 am

नमस्कार मंडळी

Investment म्हणून दुकान गाळा घेणं कितपत योग्य आहे. फ्लॅट पेक्षा दुकान गाळा ला रेंट जास्त मिळतो म्हणून दुकान गाळा घ्यावा असा काही लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात अशा investment मधे कोणत्या अडचणी येतात. या विषयी मार्गदर्शन हव आहे.
ज्यांनी अशी investment केली आहे त्यांचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

कॅनन फॉडर! "सिख सारे लाडले"

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
16 Feb 2021 - 4:23 pm

कॅनन फॉडर!
अरिफ आजाकीया आणि रामनिक सिंग मान
सर्व "अतिउदारमतवादी" लोकांना या विडिओ चा ढोस रोज पाजला पाहिजे
एका "भारतीय " शिखाची प्रामाणिक मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=rQ9CGbWHTdQ

सद्यपरीस्थितीत परीक्षा घेणं योग्य की अयोग्य

urenamashi's picture
urenamashi in काथ्याकूट
4 Jun 2020 - 3:24 pm

सध्या परीक्षेवरून राजकारण चालू आहे. या परिस्थिती मध्ये परीक्षा घेणं ही अवघड गोष्ट आहे. मी एक संस्थेत काम करते. माझ्या संस्थेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत सोशल डीसस्टिंग पाळुन परीक्षा घेणं केवळ अशक्यप्राय आहे.

तसेच एक पालक म्हणून ही मी माझ्या मुलांना अशा वातावरणात बाहेर सोडू शकत नाही. परिक्षे साठी पण नाही की शाळा चालू झाल्यावरही नाही. जर कोव्हीड 19 वर लस निघाली तरच ठीक अन्यथा नाही. भलेही त्यांचे एक वर्ष वाया गेलं तरीही मला चालेल.

तर मला वाटतं की एक वर्ष वाया गेलं तर भविष्यात त्यांचे काही नुकसान तर होणार नाही ना?

शिकणे आणि शिकविणे

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
16 Oct 2019 - 4:49 pm

शिक्षण दोन प्रकारे होत असतं - औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे शाळा व महाविद्यालयात होणारे. ह्या प्रकारात शिस्त असते आणि ते आखीव पद्धतीने दिले जाते. पण याची एक मर्यादाही असते. ती म्हणजे " ऐका, पाठ करा आणि परीक्षेत उतरवा" या त्रिसूत्रीवर ते चालते. त्यात निरीक्षण आणि चौकसपणा यांना फारसे स्थान नसते. हे शिक्षण ठराविक वयोमर्यादेत होते.

याउलट अनौपचारिक शिक्षणाचे आहे. ते समाजात वावरताना सतत होऊ शकते. त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही; किंबहुना ते आयुष्यभर चालू राहते. ते घेण्यासाठी इच्छाशक्ती हा एकच गुण पुरेसा असतो.

आता या धाग्याचा हेतू सांगतो.

चला चहा पिऊयात

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
16 Sep 2019 - 6:00 pm

रेड लेबल चहाच्या जाहिरातीवर मिपा वर चर्चा झाली आहे का?
माझंव ३ पैशाचे मत असे,
मूळ मुद्दा / आशय हा समाजातील , मनुष्यस्वभातील थिटेपणा दाखवून देण्याचा होता आणि तो प्रभावी पणे मांडला हि गेला या जाहिरातीचे आहे (पिके चित्रपटाचा )
हे मनोहर असले तरी अनेक लोक नाराज झाले होते/ आहेत .. का?
जरूर पाहावे
https://www.youtube.com/watch?v=जफ९जन्तुड्ल७ई

कौतुक? चुकून कधीतरी !

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
18 Jul 2019 - 11:14 am

मानवी मन हा फार गूढ प्रकार आहे. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा थांगपत्ता लागणे कठीणच. त्याचे अनेक पैलू आपल्याला समाजव्यवहारात दिसून येतात. अनेकांबरोबरच्या संवादातून आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तसेच स्वतःच्या वैशिष्टयांची देखील जाणीव होते. अशा एका वैशिष्ट्याकडे या लेखात लक्ष वेधत आहे. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ते आहे -
‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे.प्रथम हे लक्षात घेऊ की ही अगदी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती आपल्या सर्वांत अस्तित्वात आहे. फक्त तिचे दृश्य परिणाम मात्र कमीअधिक स्वरूपात व्यक्त होतात.

हवामान अंदाज

Rajesh188's picture
Rajesh188 in काथ्याकूट
12 Jun 2019 - 3:03 pm

हवामानाचा अंदाज हा विषय लोक विनोदी दृष्टीने बघ तात .
तेव्हा मी स्वतः अनुभव ghayche ठरवले आणि सर्व हवामान विषयी अॅप डाऊन लोड केले आणि अंदाज आणि त्या जागेचा खरे वातावरण चेक केले .
आणि माझ मत पक्क झालं हवामानाचा अंदाज हे किती तरी प्रमाणात चुकीचे असतात .
अजुन सुद्धा हवामान हा विषय मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे

चालू घडामोडी - मार्च २०१९

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Mar 2019 - 11:14 pm

एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत.