गाणे

तू पहाट ओली

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
2 Mar 2018 - 9:35 am

तू पहाट ओलीसांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन

उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून

पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा

ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा

झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली

गाणेकविता

एक कविता

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
7 Dec 2017 - 3:49 pm

अरे ,
उधार माग ,
देतो ना चार करकरीत नोटा
कधी देणार परत असं न पुटपुटता ...
अरे,
हिशोब माग ,
देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत ,
पण उंबरठ्यावर अडकण घालून ,
एक गाणं दे ,
एक गाणं दे
असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला
कसं माघारी पाठवायचं ??

गाणेकविता

पागोळ्या

निराकार गाढव's picture
निराकार गाढव in जे न देखे रवी...
5 Mar 2017 - 7:23 pm

मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं

मला बी पान्यात खिळू द्या की

अंगात वारं भिन्नू द्या की रं

मला बी पावसांत भिंजू द्या की

——-

(चाल क्र. १)

गच् झाकून टोपलं भाकार पिठलं

शेताकडं चालूया लप् लप्

लुगाड टाचून धोतार खोचून

लावनी करतिया लग् बग्

इरल्याखाली गानं घुमूं द्या SS

इरल्याखाली गानं घुमू द्या की रं,

मला बी कामावर यिऊं द्या की

——-

(चालीत बदल – चाल क्र. २)

सातारंगाचा पदर ओढून

आई अंबेगत लुगाड नेसून

बाप्पे डोंगर बाया जाले वो

नव्या नवरीचा शिणगार क्येला वो

गाणेकविता

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
26 Feb 2017 - 12:13 pm

तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं

बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं

खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं

नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं

झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं

पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं

गाणेकविता