जनातलं, मनातलं
मी आणि समुद्रकिनारा
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..
मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं
म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.
समाजमाध्यमांवरील निरागसता
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे.
हृदयसंवाद (३) : नाडी, रक्तदाब व ‘इसीजी’
भाग २ इथे
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी
पाकिस्तान - ११
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले.
अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी
प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत.
अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही.
जय रायरेश्वर
जय रायरेश्वर
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते.
सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ?
काही आम्ही आणि एक म्हातारा.
काही आम्ही आणि एक म्हातारा.
आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती.
डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात.
एक अनुभव
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात.
एक लघुकथा.
एक लघुकथा.
उन्हाळ्यातल्या एका संध्याकाळी ते त्याला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्याला पदुआ शहराचा देखावा दिसत होता. संध्याकाळ सरली आणि अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले. आकाशात सर्च लाईट टाकले जात होते. बरोबरचे दारुच्या बाटल्या आणण्यासाठी खाली गेले. गच्चीत आता फक्त तो आणि लुझ होते. लुझ बेडवर बसली होती. ती फुलासारखी टवटवीत दिसत होती.
हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य
भाग १
... .. .. ..
या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.
एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड
चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता.
कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन"
जैवज्ञाता श्लोक-१
सध्या मी एक कोर्स करत आहे.त्यात मी शांतीसाठी लिखाण करते आणि लिखाणाच्या फ्लोमध्ये एकरूप होते आणि बाकी सर्व भूत-भविष्य विसरते,असे नमूद केले आहे.तेव्हा मिळालेल्या सूचनेनुसार गीतेतील श्लोक वाचून समजून मी अर्जूनाला कसे समजवले असते.याप्रमाणे लिहायचे असं सुचलं.आधी मी केवळ मतितार्थ लिहिणार होते.बाजूलाच प्रगोचा अफलातून धागा आहे.तर म्हटलं आपणही जरा विज्ञान-अध्यात्म ब्लेंड करावा..
हृदयसंवाद (१) : प्रास्ताविक व स्वागत
सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले.
एक एकटा एकांत
यावेळी काही तू भावला नाहीस. . . दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा जणु विरक्त वाटला, की माझचं मन खट्टू असल्यानं लांबच राहीलास रे. . इतका कोरडेपणे वागलास जसं की सोपस्कारापुरतं तळव्यांना गुदगुल्या करत वाहुन जाणार्या वाळूशीच फक्त तुझी बांधिलकी. बोटांच्या बेचक्यातुन अलगद झिरपुन जाताना मागमूसही राखत नाही काही क्षणापुर्वीच्या आर्द्र आलिंगनाचा!
वटवृक्ष!
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं.
- ‹ previous
- 30 of 1009
- next ›

