टिचला बिलोरी आयना - भाग १

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
31 Oct 2009 - 8:11 pm

उन उतरत आले तेव्हा बाप्पा भट घरी आला.
पायर्‍यांच्या जवळ गराडा घालून वडारांची गर्दी.
दिवसभर बसून आसपास थुंकून सडा घातला होता. नागडी पोरं इकडे तिकडे नाचत होती.बाया कलकलाट करत होत्या.
बाप्प्पा भट आला म्हटल्यावर एकदम गलका एकदम बंद.
बाप्पानी नजर फिरवल्यावर दोघा तिघांनी तंबाखू गिळलीच. मग तात्या वडार पुढे झाला.
आता वडाराची जात. त्याला आब ती नाहीच.
"बाप्पा ,रायके नाही भेटले."
आतापर्यंत बाप्पा भटाची नजर थूकलेल्या सड्याकडे गेली.
झालं . त्यानी गड्याला हाक मारली.
गडी येईपर्यंत शिव्यांचा सडा.
बाप्पा भट म्हणजे शिवीगाळ करण्यात वडारांच्या वरताण.
"मादरचोदांनो. भटाच्या उंबर्‍यावर थुकता ?तुमच्या आय..."
पण आज वडारंही गप्प बसायला तयार नव्हती.
सारखा एकच ठेका
"रायके ...रायके.."गलबला परत चालू.
बाप्पानी तात्या वडाराला बाजूला घेतलं .
"भडव्या ,तुला पैशे कोन देणार सांगीतलं होतं ?"
"पण आड्याचा भट पैशे नाय देत "
"नाय देत..म्हणजे काय ?"
"किती रुमाल खोदाई झाली ?"
"अटरा."
"झरा लागला ?"
"लागन पन दाकवणार नाय."
"का ?"
"झरा लागल्यावर वडाराला पैशे कोन देनार ?"
बोटावर मोजून तात्या वडारानी सात दिवसाचे पैसे बाकी असल्याचं सांगीतलं .
बाप्पा भटाच्या कपाळावरची शिर उडायला लागली.
"म्हणून मादर..माझ्या उंबर्‍यावर थुंकत बसता काय ?"
गडी बाजूला उभा होता.
"जा रे आड्याच्या भटाकडे .घेऊन ये हिशोब."
गडी घुटमळत उभा राहील्यावर बाप्पाच्या अंगाचा तिळपापड.
"जाउन आलो बाप्पाजी."गडी तोंडातल्या तोंडात बोलला.
"मग ..?'
आड्याचा भट आजारी हाय .
"मेला नाही ना ? जा ..जा मरण्याच्या आधी घेऊन ये.."
गडी जागचा हलेना पण बोलेना पण.
आता बाप्पाच्या लक्षात आलं .
कोटाच्या खिशातून नोटा चिल्लर काढून वडाराच्या हातात दिली.
"चल आत्ता चल मादरचोद काढ झरा."
वडारी पुढे झाली पण आज अमावस्येला काढणार नाही म्हटल्यावर बाप्पाच्या संतापाचा कळस झाला.
आज अवस म्हटल्यावर बाप्पाची पंचाईत झाली.
वडारांनी आपल्याला कैचीत पकडलं म्हटल्यावर रागानी कापायला लागला
पण करतो काय .?
वडाराच्या जातीला सोडायचं असं?
मग आठवलं .
"जा आता जा. उंबरा साफ करा ."
असं म्हटल्यावर कुरकुरत वडारी कामाला लागले.
धाकट्या बावीतून पाणी काढून अंगण साफ झालं .
वडार्‍यांची पाठ फिरली आणि बाप्पा भट घरात शिरला.
********
बाप्पा भट आतल्या आत रात्रभर धुमसत राहीला. सकाळी आगीत तेल पडलं.
वडारी रात्रीच गाव सोडून पळाले.सकाळी गावातून आलेल्या गड्यानी बातमी दिल्यावर आणखी भडका उडला.
बाप्पा भटाला गुंडाळून वडारी गावाच्या बाहेर गेले ही गोष्ट गावात चर्चेचा विषय झाली होती. बाप्पानी एक गावात फेरी मारली .बाजार ओलांडून पुढे येता येता पिंपुटकरांचा म्हातार भेटला.बोळकं हलवत थेरडा हसत म्हणाला
बाप्पा दुसरीपण बाव कोरडी म्हण की..
या जागी दुसरा कुणी असता तर बाप्पानी त्याला मातीत घोळसला असता पण ...
गावातली सगळी थेरडी पंचा तोंडावर धरून हसत असणार हे बाप्पाला डोळ्यासमोर दिसत होतं.
म्हणजे दुसरी बावडी पण कोरडी.
आधीच्या बावेचं पाणी फक्त मार्गशिर्षापर्यंत पुरायचं .
आता सगळा राग आड्याच्या भटावर.आड्याच्या भटानी पैसे दिले नाहीत म्हणून बावडीचं काम खोळंबलं.
आड्याचा भट तसा भिकारच होता.बाप्पानी बाहेरगावाचा भट आणला म्हणून आधीच गाव रागावलं होतं.
बाप्पानी त्याला सरळगावातून सोडवून आणलं होतं .आड्याचा भट होता दशग्रंथी ब्राह्मण पण दिवसभर देवळाची घंटा बडवण्यात आणि चंदन उगाळण्यात त्याला रस नव्हता.
अधून मधून देवळाच्या दानपेटीत त्याचा हात जायचा.
काही वर्षांपूर्वी हात पेटीत अडकला आणि देवळाच्या विश्वस्तांनी भटाला चावडीवर बांधून ठेवलं होतं.रदबदली करून बाप्पानी त्याला सोडवून आणलं होतं.
बाप्पाला आणि भटाला एकच षौक.वडवलीच्या एकाच विधवेच्या मिठीत दोघंही जण आळीपाळीनी असायचे.भट गरीब आनि भामटा म्हणून त्याचा बोभाटा.बाप्पाच्या तोंडावर बोलण्याची पंचक्रोशीत तरी कुणाचीच हिंमत नव्हती.बाप्पाचं सुपीक डोकं चाललं आणि भट आड्याला येऊन राहीला.
बाप्पा भट उपकाराचं मोल पैन् पै वाजवून घेणारा.आड्याचा भट संसारानी गांजून गेला होता.
एक तर विधूर त्यात गळ्यात दोन पोरी.एक पायानी लंगडी आणि काळीविद्री.दुसरी गोरी नाजूक पण जरा खुळचटच.
बाप्पा भटानी वसूलीत काळ्यालंगड्या पोरीशी दुसरंपणी लग्न करून घेतलं.
बायको मरून अजून चार महीने व्हायचे होते पण बाप्पाला काही फरक पडत नव्हता.
घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी प्रसाद दाखवायला आणि अडीअडचणीला त्याची भूक भागवायला घरात कुणीतरी हवं होतं .
पहील्या बायकोच्या तेराव्यानंतर गावातलं कुणीही फिरकलं नव्हतं.
संपूर्णं गाव बाप्पा भटाला शिव्या घालायचं.पण सकाळी ताकाला बायकोला लोटी घेऊन वाड्यावर पाठवायचंच.
पण बायको गेल्यावर वाड्यावर बाया येईनाशा झाल्या.
बाप्पाच्या मनात एकच सल. मंदीराच्या विश्वस्ताला पूजेचा मान मिळायचा नाही.
मंदीर कोकणस्थांचं.बाप्पा देशस्थ. बाप्पानी डोकं लढवून पाहीलं .मंदीराच्या प्रसादाचे ब्राह्मण देवरुखे.बाप्पानी त्यांना फोडलं. वाड्यावर भाडं न घेता बिर्‍हाडांना जागा दिली.पण बाप्पाची बायको गेल्यावर एकेक करून त्यांनीही जागा सोडल्या.
बाप्पा भटाची सावली पडली तरी बाईला दिवस जातात अशी ख्याती. अर्ध्या वाटेतून बाप्पा मागे फिरला.
बाव कोरडी निघाली तर पोरीला परत पाठवायची बोली बाप्पा भटानी आड्याच्या भटाकडून करून घेतली होती.
शिव्यांची लाखोली वाहत बाप्पा आड्याला निघाला.
(क्रमश :)

भाग २

कथालेख

प्रतिक्रिया

नंदन's picture

31 Oct 2009 - 8:20 pm | नंदन

सुरेख, मस्त इ. लिहायची गरज नसावी. गोडबोले, धातुकोष, असली-नकली इ. दालनांची दारं तुम्ही किलकिली करावीत; आम्ही फेरफटका मारून यावा. तितक्यात दुसरा तिळा उघडावा. लई नाही मागणं, पण यात जरा अजून वेळ रेंगाळू द्या :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

31 Oct 2009 - 8:55 pm | मुक्तसुनीत

असेच म्हणतो. पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे.

घाटावरचे भट's picture

31 Oct 2009 - 9:05 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो. बाकीच्या ब्याकलॉगासह पुढील भागाची उत्कंठा आहे.

अनिल हटेला's picture

31 Oct 2009 - 9:15 pm | अनिल हटेला

अगदी सहमत ...:-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

मस्त कलंदर's picture

31 Oct 2009 - 9:25 pm | मस्त कलंदर

बाकीच्या बॅकलॉगासह पुढील भागाची उत्कंठा आहे....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चतुरंग's picture

31 Oct 2009 - 9:28 pm | चतुरंग

एकदम एवढ्या चविष्ट डिशेस तयार करायला घेतल्यात की जीव गुदमरतो हो! शिवाय नेमकं काय खावं तेही कळेनासं होतं! :(
पूर्ण करा ना एकेक डिश अलगदपणे! प्लिज, प्लिज, प्लिज!!

(आशाळभूत)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Nov 2009 - 10:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदास काका, तुमचं नाव पाहून क्रमशःची भिती वाटते म्हणून धागा उघडू नये असंच वाटतं. पण शेवटी धागा उघडला जातोच. आणि आता आणखी एक डिश पूर्ण करण्याची मागणी येणारच.

अदिती

प्राजु's picture

2 Nov 2009 - 5:32 am | प्राजु

+७
एकापेक्षा एक कथा!! काय वाचू आणि काय नको असं होतंय..
सुरूवात जबरदस्त झालिये.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

गणपा's picture

2 Nov 2009 - 1:25 pm | गणपा

सहमत.
रामदास काका त्यांच्या पोतडीतुन कधी काय काढतील कळत नाही.
सुंदर, अप्रतिम, वाह क्या बात है,आवडल,खल्लास, जबहर्‍या, कडक..
अशी विशेषण पण जुनी झाली..
बास बाकी एवढच म्हणतो की..... वाचतो आहे.
येउद्या लवकर पुढचा भाग..

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:49 am | प्रभो

सहमत.
रामदास काका त्यांच्या पोतडीतुन कधी काय काढतील कळत नाही.
सुंदर, अप्रतिम, वाह क्या बात है,आवडल,खल्लास, जबहर्‍या, कडक..
अशी विशेषण पण जुनी झाली..
बास बाकी एवढच म्हणतो की..... वाचतो आहे.
येउद्या लवकर पुढचा भाग..

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

Nile's picture

1 Nov 2009 - 2:25 pm | Nile

असेच म्हणतो. पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे.

असेच.

जादुची पोतडी.. काय काय हिरे निघतील याची प्रत्येकवेळी नवी उत्सुकता :)

मदनबाण's picture

31 Oct 2009 - 8:57 pm | मदनबाण

हा,,,हा,,, हा...

बाप्पा भटाची सावली पडली तरी बाईला दिवस जातात अशी ख्याती.
:D =)) =)) =)) =)) =)) =)) =))

बाप्पा लयं भारी माणुस दिसतोय !!! =)) =)) =))

(अजुन जास्त हसलो तर पोट दुखेल...) =))
मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

भडकमकर मास्तर's picture

1 Nov 2009 - 9:56 am | भडकमकर मास्तर

हेच म्हन्तो...
हेच वाक्य कॉपी करून खाली डकवावे म्हणत होतो.. तर आलेलेच वाक्य...
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

श्रावण मोडक's picture

31 Oct 2009 - 9:07 pm | श्रावण मोडक

हे तरी पूर्ण होणार का, हा प्रश्नच आहे.

दशानन's picture

1 Nov 2009 - 10:00 am | दशानन

मुख्य प्रश्न हाच आहे.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

अमोल खरे's picture

1 Nov 2009 - 1:24 pm | अमोल खरे

खरोखर अतिशय गहन प्रश्न आहे.

हर्षद आनंदी's picture

2 Nov 2009 - 7:36 am | हर्षद आनंदी

गुढ प्रश्न..

कोणत्याही गुढ कथेपेक्षा हा प्रश्न अधीक गहन आहे.

ऋषिकेश's picture

31 Oct 2009 - 9:10 pm | ऋषिकेश

वा! खास रामदास-शैलीतील गोष्ट!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

ऋषिकेश
------------------

सन्जोप राव's picture

1 Nov 2009 - 6:07 am | सन्जोप राव

हा असा छळ करु नका.
लिहा. आम्ही वाचू. इतकेच.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

पिवळा डांबिस's picture

1 Nov 2009 - 6:42 am | पिवळा डांबिस

आत्ता इतकेच!
सविस्तर अभिप्राय "संपूर्ण" नंतर...

(आयला, टायटल पण काय झकास काढलंय! टिचला बिलोरी आयना!!!! जियो!!!)

अवलिया's picture

1 Nov 2009 - 8:19 am | अवलिया

प्रतिसाद काढुन टाकला आहे....
"संपूर्ण" नंतर प्रतिसाद दिला जाईल...

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज's picture

1 Nov 2009 - 8:41 am | सहज

रामदास कथा म्हणजे एखाद्या साडीच्या दुकानात सेल्समन, एकाहुन एक सरस अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बाहेर काढून बघता बघता मोठा ढीग रचतो अश्या.
एकतर सगळाच माल पसंत पडावा असा पण ....एक जरा वेगळ्या रंगात, डिझाइन मधे घ्यायला गेलो तर स्टॉक नाही (पक्षी: फक्त डिस्प्ले पीस, सौदा पूर्ण करता येत नाही.)

असो हे विंडो शॉपिंग पण आवडते. :-)

भडकमकर मास्तर's picture

1 Nov 2009 - 9:59 am | भडकमकर मास्तर

अगदी अगदी..
उत्तम ग्रंथकारांच्या आगामी पुस्तकातली तीन पाने जशी रविवारच्या पुरवण्यांमधून वाचायला मिळतात तसं आहे हे...
... बाकीचं सारं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर...
पण कधी? प्रश्नच आहे.

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विंजिनेर's picture

1 Nov 2009 - 9:43 am | विंजिनेर

ह्म्मम्म... पूर्ण कधी होणार हा प्रश्नच आहे म्हणा... पण बाकी ठीक...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2009 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

मी_ओंकार's picture

1 Nov 2009 - 2:50 pm | मी_ओंकार

असेच म्हणतो.

धमाल मुलगा's picture

2 Nov 2009 - 12:49 pm | धमाल मुलगा

ना ही!
ही गोष्टपण लै लै भारी झालीये हे मी सांगणारच नाही...
तुम्ही गोष्ट वाचायची सवय लावता...आम्हाला त्यात गुंतवुन ठेवता आणि देता अर्धवट सोडुन..म्हणुन ही गोष्ट मी वाचणारच नाही!
[(

महेश हतोळकर's picture

2 Nov 2009 - 12:54 pm | महेश हतोळकर

माझा अल्गोरिदम
१. लेखक रामदास असतील तर पानाच्या शेवटी जा
२. "क्रमश:" दिससाठवा""वाचनखूण साठवा" वर टिचकी मारा आणि मुख्य पानावर जा.
३. "समाप्त" दिसल्यास मागच्या खुणा काढून पूर्ण लेखन वाचा आणि प्रतिक्रीया द्या.

sneharani's picture

2 Nov 2009 - 1:07 pm | sneharani

पुढचा भाग टाका लवकरात लवकर..!

दत्ता काळे's picture

2 Nov 2009 - 1:44 pm | दत्ता काळे

सुरेख लेखन ! प्रसंग डोळ्यासमोर घडतोय असे वाटते.

सुनील's picture

2 Nov 2009 - 1:54 pm | सुनील

रामदासांच्या पोतडीत काय काय दडले आहे कोण जाणे?

कथेची सुरुवात दमदार आणि शीर्षक तर मस्तच! पुढचा भाग लवकर टाका!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामपुरी's picture

2 Nov 2009 - 10:35 pm | रामपुरी

फक्त एक छोटीशी दुरुस्ती... कदाचित अनवधानाने राहून गेलेली...
"घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी प्रसाद दाखवायला" याऐवजी "घरच्या देवाला माध्यान्हीपूर्वी नैवेद्य दाखवायला" हे बरोबर वाटतं. देवाला 'नैवेद्य' दाखवल्यावर तो आपल्यासाठी 'प्रसाद' होतो.

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Nov 2009 - 11:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री रामदास, संवादातून कथानक उभे करतात. त्यांचे निरीक्षण आणि शब्दांची चपखलता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. प्रकाशकांनी क्रमश: सहन केले नसते पण फुकट्यांनी आणखी किती अपेक्षा ठेवायची? :)