असली-नकली. भाग २

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
27 Oct 2009 - 8:38 pm

काही वर्षापूर्वी वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीच्या आधारे ही कथा लिहीली आहे. गुन्हेगार-तुरुंग-पोलीस -बार डान्सर-कॉलगर्ल-अशी पार्श्वभूमी या कथेत आहे त्यामुळे शिव्या ,अपशब्द आणि घाणेरडे वाटू शकतील असे काही उल्लेख या कथेत आहेत.कथेचा अपरीहार्य भाग म्हणून वाचल्यास त्याची बिभत्सता वाटणार नाही.तरीपण वाचकांचे प्रतिसाद आणि संपादकांचे अधीकार याचा मान ठेवण्यासाठी मालीका खंडीत करावी लागेल याची लेखकाला जाणीव आहे.

http://www.misalpav.com/node/9918

आर्थर रोड जेलला भेटीची वेळ दुपारी तीन ते चार असते.
आदल्या दिवशी जाऊन एका बॉक्समध्ये ज्याला भेटायचे आहे त्याच्या नावानी एक चिठ्ठी टाकायची .
त्या चिठ्ठीत ज्याला भेटायचे आहे त्याचे नाव आणि ज्या कलमाखाली अटक केली असेल त्या कलमाचा कोड लिहायचा .

आर्थर रोडच्या भल्यामोठ्या गेटजवळ एक लोखंडी ग्रील असलेली खोली आहे. त्या खोलीत दुसर्‍या बाजूला कैदी येतात.
मधे एक भक्कम काच आणि त्यावर परत एक जाळी असते. कैद्याचा चेहेरा जेमतेम दिसेल एव्हढाच झरोका उघडा असतो.
बाहेर एक पोलीस नावांची घोषणा करत उभा असतो. नावाची घोषणा झाली की त्याच्याकडे जायचं आणि एक विसाची नोट द्यायची.
आत शिरताना दुसरा हवालदार अंगझडती घ्यायला उभा असतो.आणखी एक विसाची नोट.
विस रुपयाची नोट नसली तर पन्नासाची पण चालते फक्त बाकीचे पैसे परत मिळत नाहीत.
रफीक जुमाणीला हा सगळा कार्यक्रम माहीती होता.आदल्या दिवशी चिठ्ठी टाकण्याची व्यवस्था झाली होती.
दुपारी बारा वाजता रफीक निघाला तेव्हा पावसाची कुरबुर सुरु झाली होती. आधी अंधेरी स्टेशन मग बांद्र्यापर्यंत रिक्षा .बांद्रा ते दादर एक टॅक्सी मग दादर टीटी पर्यंत चालत रफीक आला तेव्हा पाऊस वाढत चालला होता. हातातली छत्री सांभाळत रफीकनी टिळक पूल पार केला तेव्हा तो अर्धा भिजलाच होता पण एकाच टप्प्यात आर्थर रोडला जाणं त्याच्या स्वभावात नव्हतं.
**********
पंधरा सोळा वर्षं अशीच दबत दचकत काढली होती.
लहानपणी माहीमच्या दर्ग्याजवळ बारीक सारीक चोर्‍या करणारा नवाब मेमन आणि आताचा रफीक जुमाणी दोन वेगळी माणसं होती.
नवाब पहील्याच जेलयात्रेत बदलून रफीक जुमाणी झाला होता.
गांजाच्या पुड्या विकताना पकडला गेल्यावर जेलची पहीली जेलयात्रा .
त्या दोन वर्षाच्या काळात त्याची दोस्ती अशफाक खानशी झाली.
अशफाक कर्नाटक लॉटरीची बोगस तिकीटं विकताना पकडला गेला होता.
अशफाक आणि बरॅकचे इतर कैदी यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता.
रात्री अशफाकचे पाय चेपायची ड्युटी वॉर्डननी रफीकला दिली होती. आधी रफीकनी बंड करून बघीतलं.
मेमनचा बच्चा और पठाणके पांव दबाएगा .कितनी बडी तौहीन..पण दोन दिवसानी जेव्हा कोर्टाची तारीख आली आणि जामीन झाला नाही तेव्हा रफीकचा नाईलाज झाला .
पुढची तारीख दोन महीन्यानी .
अशफाकची गोष्ट वेगळी होती .वॉर्डन त्याला सलाम करायचा.अशफाकचा डबा बाहेरून यायचा. त्याला ताट वाढायला दोन पोरं .त्याचे कपडे धुवायला एक .त्याच्या बाजूला रात्री चार फूट अंतर ठेवून बाकीचे झोपायचे.
सकाळी अशफाक संडासला जाण्यापूर्वी एक पोरगा संडास धुवून साफ करायचा.जेल कँटीनमधून त्याच्यासाठी खास पार्सल यायचं.
रात्री चिलीम भरून अशफाक पाय पसरून बसायचा तेव्हा त्याचे चार शब्द कानाशी पडावे म्हणून पोरं त्याच्या आसपास घुटमळायची.
रफीक दुरून अशफाकला बघत होता. तारखेच्या दिवशी पोरं अशफाकला सलाम करायची तेव्हा अशफाक त्यांना खर्ची द्यायचा.
एका छोट्याशा चुकीनी अशफाक आत आला होता. तिकीटावरचं कर्नाटकचं स्पेलींग अशफाकनी चुकीचं छापलं होतं.
एक दिवशी रात्री रफीक पाय चेपत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अशफाकची सेवा करणारी सगळी पोरं गांडू होती.
रफीकला आपली चूक कळली.
गांजाच्या पुड्या विकून तो गटारातच लोळत होता.
फर्जी तिकीट छापणारा अशफाक मात्र चैन करत होता.
गाड्या चोरणारे मजेत होते.
खोट्या नोटा विकणारे ऐश करत होते.
एका जेल यात्रेत रफीक शहाणा झाला.गुन्हे करायचे ते पैशासाठी तर मग पैसेच का नाही छापायचे हे अशफाकचे तत्वज्ञान त्याला पुरेपूर समजले.
दुसर्‍या दिवशीपासून रफीकनी अशफाकची सेवा सुरु केली .सहा महीन्यात जेव्हा रफीक बाहेर पडला तेव्हा त्यानी एक कुरीअर कंपनी सुरु केली .
गुलबर्गा ते मुंबई.एकच कस्टमर .अशफाक खान.
त्यानंतर जमाना बदलत गेला.
नवाब मेमनचा रफीक जुमाणी झाला.
अशफाकला पॅरालीसीसचा अटॅक आला.
रफीक गुलबर्ग्याला गेला.प्रेस सुरु केली.
अशफाकच्या मरणानंतर त्याच्या बायकोशी लग्न करण्याखेरीज धंदा चालू ठेवायला दुसरा मार्ग नव्हता.

याच दरम्यान त्याची आणि इद्रीसची ओळख झाली. इद्रीस तेव्हा शमीम को ऑपरेटीव्ह बॅकेत कारकून होता.
पैशाच्या तंगीनी हैराण इद्रीस बॅकेत इकडे तिकडे हात मारत होता.
डोंगरीच्या पठाणांच्या व्याजाखाली मरायला आलेला इद्रीस रफीकच्या हातात आला जेव्हा रफीकचं कुरीअर पार्सल त्यानी चोरलं तेव्हा.
अशफाकच्या हाताखाली तयार झालेल्या रफीकनी त्याला जवळ ठेवलं.पठाणांच्या ताब्यातून सोडवलं .
त्यानंतर सगळी हलकी कामं करायला एक विश्वासू माणूस म्हणून इद्रीस रफीककडे काम करत होता.
त्याची रांडबाजीची सवय सोडली तर दोघांमध्ये भांडणं होण्याचं काही कारण नव्हतं.
************

मोहम्म्द इद्रीसच्या नावाची घोषणा झाल्यावर रफीक छत्री बंद करून आत घुसला. जाळीआड इद्रीस होता.
"सेठ बाहर मेन गेटपे दस मिनीटं बाद आ जाव. मैने सेटींग लगाया है. अंदर मिटींग करेंगे."
त्या गलबल्यात रफीकच्या कानावर एव्हढेच शब्द आले.
दहा मिनीटानी एक हवालदार रफीकला घ्यायला आला.
पाचशेच्या दहा नोटांची अदलाबदल झाली.
पहीलं गेट उघडलं.
आणखी काही नोटा .दुसरं गेट उघडलं.
सोबतच्या हवाल दारानी दरवाज्यातून रफीक आत गेला .
आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या .
आणि सतरा जुलैला मोंडलसाहेबांच्या केबीन मध्ये मिटींग सुरु होती तेव्हा आर्थुररोड जेला एक दुसरी मिटींग सुरु झाली.
या मिटींगला फक्त दोनच व्यक्ती होत्या.
मोहम्मद इद्रीस आणि रफीक जुमाणी.
रफीक खुर्चीवर बसून गांधींच्या फोटोकडे टक लावून बघत बसला होता.
गांधीबाबा .एकच ओळखीचा माणूस.
तिथे लावलेल्या चार पाच मोठ्या तैलचित्रांपैकी ते एकच चित्र रफीकच्या ओळखीचे होते.
दरवाज्याचा आवाज आला आणि रफीकनी मान वर करून बघीतलं.
इद्रीस दारात उभा होता. त्याच्या मागे बहुतेक त्याचा वॉर्डन होता.
मुळचा गोरा चिट्टा इद्रीस आता काळवंडला होता.
"सलाम .नवाबसेठ."
रफीकला या नावानी हाक मारणारा इद्रीस एकच.
"सलाम. खैरीयत ?" रफीकनी उत्तर दिलं.
"खाक खैरीयत.आप जुम्मेरात आनेवाले थे."
"हां. आनेवाला था लेकीन नागरे वकील दो दिन नही मिला."
इद्रीसच्या चेहेर्‍यावर राग आला आणि गेला. रागावून करतो काय .
त्याला बेलवर आता बाहेर काढू शकणारा रफीक एकच माणूस.
अचानक इद्रीसनी रफीकचे पाय पकडले.
सेठ मेरा बेल करवाओ.
रफीकनी वाकून त्याला उभं केलं
"यार ,तू बस आधी.आपला वकील करेल बेल."
"हे तर तुम्ही मागच्या वेळी पण सांगीतलं होतं ना."
"अपना वकील सबसे बेष्ट है"
"क्या बेष्ट.चार महीनेसे यहा सड रहा हूं."
"इद्रीस यार , मी काय कमी केलंय का ?"
"नागरे बोला होम वालेको पैसा दो " मी ताबडतोब पाठवले. आता जजची सेटींग झाली तर ..."
रफीकच्या बोलण्याकडे इद्रीसचं लक्षच नव्हतं .
कॉलरच्या मागे हात घालून तो काहीतरी शोधण्यात मग्न झाला होता.
"इकडे आलो आणि....
बराच वेळ इद्रीस कॉलरच्या मागे हात घालून खाजवत होता.आणि एकदम हातात काहीतरी सापडल्यासारखा चेहेरा करून त्यानी टेबलावर हात झटकले.
दोन पांढर्‍या रंगाच्या उवा तुरतुरत टेबलावर पळायला लागल्या.
रफीकनी डोळे मिटून घेतले.
पंधरा वर्षापूर्वी रफीकची जेलयात्रा झाली होती.
आत आल्यावर चार दिवसात शर्टाच्या शिवणीत उवा झाल्या होत्या.
जेल बदलत नव्हता.
"रफीक माझं ऐकतो आहेस ना ?"
रफीकनी इद्रीसकडे बघून मान डोलावली.
"नागरेशी बोललो आहे.तो बेल करील तोपर्यंत जरा तकलीफ सहन कर."
नागरेके मा की च्यू...इद्रीस रागावून बोलला.
रफीकला कंटाळा आला." अबे *वडे तेरे लिये क्या सोली सोराबजीको लेके लाउ क्या?"
"सोराबजी ला आण नाहीतर जेठमलानीला आण पण मला बाहेर काढ."
अचानक इद्रीसनी विषय बदलला.
"माझे लंगोट आणले ?"
"आणलेत.स्साला मला कळत नाही दुनीया जांग्या वापरते.तुला काय झालं ?"
इद्रीस थोडासा लाजला .
"रफीक ,मेरा आंडवा बहोत बडा हो गया है और यहा सबकी चड्डी चोरी होती है."
"धुवून वाळत घातली की सुकेपर्यंत कोणीतरी घालून मोकळं होतं ."
"छिन के लेना यार आता जेल काय नविन आहे तुला ?"रफीक म्हणाला.
"जेल तर तोच आहे पण चड्डी एकदा घातली की पोरं सातसात दिवस बदलत नाहीत आता सात दिवसानंतर काय मी..."
"सेठ मला एकच सांग बेल कसा होईल.मी पोलीसांचा पिटाई महीनाभर खाल्ली.माझा अल्सर आता रात्र रात्र दुखतो. बदनमे खुजली हो गयी है"
"इकडे आल्यावर तीन दिवसात पिछवाडा खाजायला लागला."
रफीकनी मान डोलावली.
"जेल के पानी मे किडे होतेच है.लेकीन तेरे गांदमे जादा है."
इद्रीसनी खिशातून बाटली काढली.जेलुसीलचा एक घुटका घेतला.
मोठ्ठ्यानी एक ढेकर दिली.
"सहार पोलीस स्टेशनमध्ये गावडे होता म्हणून वाचलो नाहीतर पहील्याच दिवशी माझ्या गोट्या चेचणार होते.गावडे म्हणाला एआययु केस आहे म्हणून वाचलो."
"सेठ सांगा ना बेल कधी होणार.आता मला नाही सहन होत.मेरीभी तो उमर हो गयी ना ."
आणि आतापर्यंत काय नाही केलं पेपर मी आणायचो.मशीनवर रात्रभर तुमच्या सोबत उभा रहायचो."
****
अचानक इद्रीसच्या पोटात कळ आली.पोट दाबून तो दोन मिनीटं गप्प बसला.
"इधर संडासभी साफ नही होता. " वार्‍यावर आलेल्या घाण वासानी रफीकच्या नाकातले केस जळले.
"तू हाजमेका खयाल नही रखता."
"क्या ,खाक खयाल रखू.एक तो संडास को दरवाजा नही है.
"सामने मू करके बैठू तो सब बच्चे आंडवा देखनेकू खडे रहते है .सामने गांड करके बैठू तो पिछूसे लाथ मारते ........सेठ आप बाहर मजेमे है."
इद्रीसच्या पोटात परत एकदा कळ आली.
यावेळी रफीकनी आधीच नाकाला रुमाल धरला होता.
इद्रीसनी नाडीच्या आतून हात घालून परत अंग खाजवायला सुरुवात केली होती.
रफीकला हा सगळा प्रकार आता सहन होईनासा झाला.
"मादरचोद तेरे गांडमे किडे है.मी पाठवलं तुला डिलीव्हरीसाठी मलकानी कडे आणि तू गेला एअरपोर्टला.आनेवाली होगी कोई नयी रांड."
इद्रीसचे सगळे शौक रफीकला माहीती होते.
"क्या बोलते सेठ. मलकानी को पूछो माल छोडके मै बादमे गया था."
"मलकानी बोलता है तू माल दियाच नही."
इद्रीसनी एक शिवी हासडली. "मेरे सामने लाव ना उसको.पूरा दस लाख का डिलीव्हरी दिया मै उसको."
फिर आप बोला था हैद्राबाद का टिकीट ले लो इसलीये एरपोर्ट गया "
रफीक बराच वेळ काहीच बोलत नाही बघीतल्यावर इद्रीसनी पायजम्याच्या मागे हात घालून तन्मयतेनी डिव्हायडर खाजवायला सुरुवात केली.
"स्साला मलकाणी ,त्याला तर माहीती आहे की आज नाहीतर उद्या तू बेलवर बाहेर येणार "
सेठ ,नवाब सेठ याचा अर्थ असा की मी बाहेर येण्याआधी तुम्ही आत येणार."
रफीकच्या अंगावर शहारा आला.
"सेठ एक शेवटची गोष्ट.या महीन्यात माझा बेल नाही झाला तर मात्र मी तोंड उघडीन.इथे आत मरण्यापेक्षा बाहेर तुम्ही माराल ते चालेल."
"मी मरीन पण जाताना तुमच्या कफनाचा तुकडा फाडून जाईन"
अचानक इद्रीस रडायला लागला. "सेठ माझा बेल करा ना"
त्यानी उठून रफीकला मिठी मारायचा प्रयत्न केला.
इद्रीसच्या अंगाला घाण वास येत होता. रफीकनी कसं बसं स्वत:ला सोडवून घेतलं.
हवालदार आत आला.इद्रीस त्याच्या सोबत आत गेला.
बाहेर आल्यावर रफीकला किळस आली .
पत्र्यावरून गळणार्‍या पागोळीत हात धुवत तो बराच वेळ विचार करत उभा राहीला.
इद्रीस की सुंदर मलकाणी.?

कथालेख

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 8:54 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री रामदास, उत्कंठा वाढत आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 8:58 pm | चतुरंग

बस्स इतकेच म्हणू शकतो! बाकी बोलती बंद!
---------------------------------------
अपशब्द आणि घाणेरडे वाटू शकतील असे काही उल्लेख या कथेत आहेत.कथेचा अपरीहार्य भाग म्हणून वाचल्यास त्याची बिभत्सता वाटणार नाही.तरीपण वाचकांचे प्रतिसाद आणि संपादकांचे अधीकार याचा मान ठेवण्यासाठी मालीका खंडीत करावी लागेल याची लेखकाला जाणीव आहे.

संपादकांच्या कानाखाली अशारीतीने मारू नये ही कळकळीची विनंती!
बाकी काही सांगण्याची आवश्यकता नसावी.

(गाल चोळणारा)चतुरंग

संपादक मुर्ख नाय हो मिपाचे एवढे...

पटले तर पुढचे वाचा नायतर चपला घाला आणि चालु पडा. मॅटर खतम...

प्रतिसाद म्हणाल तर - टिपिकल रामदास श्टाईल. आपण नुसते वाचायचे आणि हात जोडायचे...

धमाल मुलगा's picture

27 Oct 2009 - 8:59 pm | धमाल मुलगा

अँड द गेम बिगिन्स...............
:)

वाचतोय...गुंततोय...

वर म्हणताय की मुळ प्लॉट इंग्रजी कादंबरीआधारे आहे, पण त्याचं देशीकरण जब्बरदस्त होतंय!
येऊ द्या :)

प्रभो's picture

27 Oct 2009 - 9:00 pm | प्रभो

वाचतोय...गुंततोय...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

घाटावरचे भट's picture

27 Oct 2009 - 9:07 pm | घाटावरचे भट

क आणि ह आणि र!!
(आता अशी प्रतिक्रिया तरी किती वेळा द्यायची? जाऊ दे, मालिका संपली की एकच प्रतिक्रिया देतो फायनल) :)

श्रावण मोडक's picture

27 Oct 2009 - 9:30 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...

गणपा's picture

27 Oct 2009 - 9:42 pm | गणपा

रामदास काका मस्त गुंतत चाललोय..
लवकर टाका पुढचे भाग..

संदीप चित्रे's picture

27 Oct 2009 - 11:28 pm | संदीप चित्रे

आधीच्या भागाचा दुवा द्याल का?
लवकरच पुढचा भाग टाका ही रिक्वेष्ट :)

अवांतर -- धातुकोषचे पुढचे भाग कधी ?

गुंतागुंत वाढत चालली आहे

भडकमकर मास्तर's picture

28 Oct 2009 - 1:17 am | भडकमकर मास्तर

मस्त .. लै भारी चाल्लीय कथा...
चांगली समजतेय सुद्धा....

अवांतर :
कथानक पूर्ण होईपर्यंत रामदासकाकांचा ( ही तरी ) गोष्ट पुरी करायचा मूड टिकून राहूदेत अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

झकासराव's picture

28 Oct 2009 - 1:32 pm | झकासराव

अवांतर :
कथानक पूर्ण होईपर्यंत रामदासकाकांचा ( ही तरी ) गोष्ट पुरी करायचा मूड टिकून राहूदेत अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना...>>>>>>>>>>

सहमत आहे.
काका जबरदस्त सुरु आहे.

झकासराव's picture

28 Oct 2009 - 1:33 pm | झकासराव

अवांतर :
कथानक पूर्ण होईपर्यंत रामदासकाकांचा ( ही तरी ) गोष्ट पुरी करायचा मूड टिकून राहूदेत अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना...>>>>>>>>>>

सहमत आहे.
काका जबरदस्त सुरु आहे.

टुकुल's picture

28 Oct 2009 - 1:59 am | टुकुल

बोलती बंद !!
एकदम जबरदस्त.

--टुकुल.

पाषाणभेद's picture

28 Oct 2009 - 4:21 am | पाषाणभेद

जबरदस्त
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

सुनील's picture

28 Oct 2009 - 6:17 am | सुनील

वाचतो आहे...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

28 Oct 2009 - 3:17 pm | स्वाती२

वाचतेय. पुढचा भाग लवकर येऊ दे.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2009 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतीम लेखन.

काका हि कथा तरी निदान अर्धवट सोडू नका.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मदनबाण's picture

28 Oct 2009 - 7:59 pm | मदनबाण

भाग ३ लवकर टाका...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

रामपुरी's picture

28 Oct 2009 - 8:37 pm | रामपुरी

पुढे???

आनंदयात्री's picture

28 Oct 2009 - 10:18 pm | आनंदयात्री

जेल एवढे भयंकर असते ? अंगावर काटा आला ..
प्रचंड उत्कंठा वाढली आहे .. लवकर येउद्या पुढला भाग.

हर्षद आनंदी's picture

29 Oct 2009 - 10:00 am | हर्षद आनंदी

आठवड्याच्या खंडानंतर असे काही वाचायला मि़ळेल याची श्वाश्वती नव्हती. मन लावुन वाचतो आहे.

ही कथा लवकर पुर्ण करा, हीचपुनः विनवणी

अवातंर:-
काका.. धातुकोष पण पुरा करणार ना?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

30 Oct 2009 - 3:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

अवातंर:-
काका.. धातुकोष पण पुरा करणार ना?

+ १ सहमत

बाकी रामदास काका तुमच्या पोतडीतला अजुन एक नजराणा मस्त आहे

कस्टम क्लीअरींग एजंट घाशीराम कोतवाल
ला नं ११ / ९८६
११ / २४४

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

सुमीत भातखंडे's picture

30 Oct 2009 - 7:39 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम वातावरण निर्मिती.
आता पुढचा भाग कधी?

सन्जोप राव's picture

30 Oct 2009 - 9:22 pm | सन्जोप राव

तेंडुलकर, पानवलकर वगैरेंशी आधीच तुलना करुन झाली आहे. गप्प बसून वाचत राहातो.
सन्जोप राव
टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!

Rahul D's picture

27 Mar 2016 - 11:40 pm | Rahul D

पुढचा भाग कधी?

amit_m's picture

24 Mar 2019 - 8:20 pm | amit_m

पुढचा भाग कधी??