डरकाळ्या : -
बायको ही बायको असते..
एरवी नॉर्मल असली तरी..तुमच्यासाठी सायको असते.. :T
साडीचोळी साठी तिची
सारखि धावाधाव असते..
तुमच्या तुंटपुंज्या बॅंकबॅलन्समधला..
बायको शिरकाव असते.. ~X(
घरामध्ये नववधुसारखी..
ओलांडुनी ती माप येते..
आयुष्यभर पुढे मग..
तुमचेच माप काढत बसते.. @)
बायको बंदीस्त रिंगणातला..
हेवीवेट फायटर असते..
तुम्हाला कसरती करायला लावणारी..
बायको हंटरवाली..रिंगमास्टर असते..
बायको ही बायको असते..
अख्खं निंदकाचं घर असते..
डोळ्यांत नाटकी अश्रु अन्..
भावनांचा चक्काचुर असते..
महागड्या फ्रिजजवळचा..
बायको खापरी "माठ" असते..
जीवनाच्या प्रवासातली..
बायको लागलेली "वाट" असते..
बायको ही बायको असते..
सदा..दुर्मुखलेली सुस्त असते..
मित्राचीच बघा कशी..
हिरवी टवटवीत ..मस्त असते...
बायको इथे तिथे.नको त्या वेळी..
दत्त म्हणुन हजर असते..
सेकंदा सेकंदाला जागवणारी..
बायको कर्णकर्कश्य गजर असते...
बायको म्हणजे..
ध्वनिप्रदुषण भरपुर असते.. :)]
मौनामध्ये हिटलर पेक्षा.. [(
कैकपटीने क्रुर असते... X(
बायको म्हणजे डोक्यात सोडलेला..
न पटणारा तर्क असते.. #:S
बायको म्हणजे घशात अडकलेला..
कडु औषधाचा अर्क असते.. :&
--- योगेशु (कागदी वाघ) >:)
म्यांव म्यांव : -
------------------------------
घनदाट जंगलामधली..
बायको हक्काची खोप असते..
काळरातीलाही पळवणारी..
बायको गाढ झोप असते.. I) (|:
नवर्याभोवती गुंडाळलेला..
बायको चंदेरी वर्ख असते..
जीवनाच्या दोन ओळींमधला..
बायको सुंदर अर्थ असते..
तुमच्या बटबटीत चेहर्यावरचे..
बायको मोहक हास्य असते..
चारोळीतही मावणारे..
बायको महाकाव्य असते..
तुमच्याभोवती लपेटलेली..
बायको हळवी वेल असते..
विस्कटलेल्या आयुष्यातला..
बायको ताळमेळ असते..
----------------------
मिठीमध्ये ती बाई असते..
पदराखाली ती आई असते...
---------------------
------ योगेशु (ताटाखालचे मांजर) :X
----------------------------------
--- कानडाऊ योगेशु (जोरु का गुलाम) :O)
8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8}
प्रतिक्रिया
25 Oct 2009 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महागड्या फ्रिजजवळचा..
बायको खापरी "माठ" असते..
जीवनाच्या प्रवासातली..
बायको लागलेली "वाट" असते..
=)) मेलो.
25 Oct 2009 - 2:33 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद :)
अवांतर :
वास्वववादी कविता छाणंच , एक्सलंट , जियो !!
-- ट्युलिप तरटे
25 Oct 2009 - 2:27 pm | अवलिया
सुटलो.
१.२.डिलीट करुदे
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Oct 2009 - 2:00 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु
25 Oct 2009 - 2:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"भयानक" रसातली असल्याने विशेष आनंद झाला! ;-)
आणि हो, कविता आवडलीच!
अदिती
25 Oct 2009 - 2:32 pm | ऋषिकेश
खपलो वारलो निवर्तलो!!!! =)) =)) =))
(बायकोपासून लपून फोडलेल्या? ;) )डरकाळ्या आवडल्या
------------------
ऋषिकेश
------------------
25 Oct 2009 - 2:49 pm | प्रशांत उदय मनोहर
तुमचं नेमकं मत कोणतं? वरच्या कवितेतलं की खालच्या? 8|
वरच्या कवितेकडे विनोदबुद्धीने पहावं असं आपल्याला म्हणायचंय का? गंमत असली तरी इतके हिणकस विचार खटकतात.
त्याबद्दल निषेध. X(
दुसरी कविता (म्याव म्याव) आवडली. ओळ न् ओळ सुरेख. :) विशेषत: शेवटच्या दोन ओळी. =D>
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
25 Oct 2009 - 2:55 pm | दशानन
ही वाघाची डरकाळी आहे की माजरांची म्याव म्याव =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
25 Oct 2009 - 3:02 pm | अवलिया
ही वाघाची डरकाळी आहे की माजरांची म्याव म्याव
नवीन कातडं विकत घेतलं असेल.. टेस्टींग चालु आहे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Oct 2009 - 3:56 pm | खादाड
घरामध्ये नववधुसारखी..
ओलांडुनी ती माप येते..
आयुष्यभर पुढे मग..
तुमचेच माप काढत बसते..
********************
बायको म्हणजे डोक्यात सोडलेला..
न पटणारा तर्क असते..
********************
मिठीमध्ये ती बाई असते..
पदराखाली ती आई असते...
******************
जास्त आवड्ल्या
बाकी पण छान आहे
25 Oct 2009 - 4:02 pm | कानडाऊ योगेशु
मिपावरच्या संधी-साधु..चुकलो..साधु-संत मंडळींना धाग्यावर पाहुन वारलो..मेलो..फुटलो..धन्य झालो... :D
----------------------------------------------
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com.
25 Oct 2009 - 5:36 pm | मॅन्ड्रेक
भट्टि जमली बरं का.
at and post : janadu.
25 Oct 2009 - 7:18 pm | प्रियाली
इतका खरे बोलणारा आणि सत्याला स्वीकार करणारा पुरुष आज प्रथमच पाहिला. ;)
9 Apr 2010 - 9:39 pm | पक्या
ज ह ब र्या ...डरकाळ्या आणि म्याव म्याव दोन्ही आवडले.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
9 Apr 2010 - 9:50 pm | अरुंधती
कौटुंबिक अत्याचाराचा हा एक लिखित [मूक] नमुना समजावा काय? :?
[ह.घ्या. B) ]
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
10 Apr 2010 - 1:45 am | शुचि
कविता क-ड-क (लक्ष्मी) ;)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 5:55 am | राजेश घासकडवी
मोठ्ठ्या लांबलचक डरकाळ्या आणि छोटीशी म्याव म्याव यातून कवीला काही सुचवायचं आहे का?
बाकी कविता छानच झाली आहे. कागदी वाघ व ताटाखालचं मांजर हा तर फारच छान टच आहे.
आता यावर झाडावर चढून बसलेल्या अल्प उत्क्रांतांपैकी कोणी काही लिहील काय?
10 Apr 2010 - 8:07 am | स्पंदना
साहेब एक दम घुमजाव?
काल पर्यन्त तर एकदम श्रुन्गार चालला होता?
कि आठ्वड्याच्या शेवटि तुम्हा लोकानना ???????
wondering wandering aparna :B
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
25 Dec 2010 - 12:41 am | रेवती
हे हे हे.
मजेशीर कविता.
25 Dec 2010 - 1:12 am | सुहास..
ए प्रसन्ना !!
तुला म्हणलो नव्हतो , हे म्हाराज ग्रेट कवी आहेत म्हणुन !!
नवर्याभोवती गुंडाळलेला..
बायको चंदेरी वर्ख असते..
जीवनाच्या दोन ओळींमधला..
बायको सुंदर अर्थ असते.. >>>
बा स !! ज ह ब ह रा !!
अर्थच रे, अजुन काय ?
थांब ! उद्या बि.टी.एम. ला येउन धडकतो बघ !!
म्यांव म्यांव करुन ही " डरकाळी " ला न घाबरणारा ,
वाश्या !
अवांतर : ए शुचे , तुला मज्जीम निकाय रूपी उत्तर कॅन्सल !! वरच्या कवितेत या योगेशने त्वांड बंद केलय आमचं !!
25 Dec 2010 - 1:15 am | टारझन
ऐ स्वाश्या .. तुपलं लगिन झालंय ना ? थांब ह्या इस्क्रिन श्यॉटंच धाडतो ... :)
25 Dec 2010 - 1:18 am | सुहास..
म्हुन तर हा मज्जीम निकाय चा झोल !
आत तु ईच्चारत बसु नको हा मज्जीम निकाय काय ते !!
6 Mar 2014 - 10:36 am | बॅटमॅन
मदनबाणाचे कचकून आभार!! धागा वर काढत आहे.
7 Mar 2014 - 9:22 pm | वैनतेय
+१