बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव
लेखनविषय:
काव्यरस
डरकाळ्या : -
बायको ही बायको असते..
एरवी नॉर्मल असली तरी..तुमच्यासाठी सायको असते.. :T
साडीचोळी साठी तिची
सारखि धावाधाव असते..
तुमच्या तुंटपुंज्या बॅंकबॅलन्समधला..
बायको शिरकाव असते.. ~X(
घरामध्ये नववधुसारखी..
ओलांडुनी ती माप येते..
आयुष्यभर पुढे मग..
तुमचेच माप काढत बसते.. @)
बायको बंदीस्त रिंगणातला..
हेवीवेट फायटर असते..
तुम्हाला कसरती करायला लावणारी..
बायको हंटरवाली..रिंगमास्टर असते..
बायको ही बायको असते..
अख्खं निंदकाचं घर असते..
डोळ्यांत नाटकी अश्रु अन्..
भावनांचा चक्काचुर असते..
महागड्या फ्रिजजवळचा..
बायको खापरी "माठ" असते..
जीवनाच्या प्रवासातली..
बायको लागलेली "वाट" असते..
बायको ही बायको असते..
सदा..दुर्मुखलेली सुस्त असते..
मित्राचीच बघा कशी..
हिरवी टवटवीत ..मस्त असते...
बायको इथे तिथे.नको त्या वेळी..
दत्त म्हणुन हजर असते..
सेकंदा सेकंदाला जागवणारी..
बायको कर्णकर्कश्य गजर असते...
बायको म्हणजे..
ध्वनिप्रदुषण भरपुर असते.. :)]
मौनामध्ये हिटलर पेक्षा.. [(
कैकपटीने क्रुर असते... X(
बायको म्हणजे डोक्यात सोडलेला..
न पटणारा तर्क असते.. #:S
बायको म्हणजे घशात अडकलेला..
कडु औषधाचा अर्क असते.. :&
--- योगेशु (कागदी वाघ) >:)
म्यांव म्यांव : -
------------------------------
घनदाट जंगलामधली..
बायको हक्काची खोप असते..
काळरातीलाही पळवणारी..
बायको गाढ झोप असते.. I) (|:
नवर्याभोवती गुंडाळलेला..
बायको चंदेरी वर्ख असते..
जीवनाच्या दोन ओळींमधला..
बायको सुंदर अर्थ असते..
तुमच्या बटबटीत चेहर्यावरचे..
बायको मोहक हास्य असते..
चारोळीतही मावणारे..
बायको महाकाव्य असते..
तुमच्याभोवती लपेटलेली..
बायको हळवी वेल असते..
विस्कटलेल्या आयुष्यातला..
बायको ताळमेळ असते..
----------------------
मिठीमध्ये ती बाई असते..
पदराखाली ती आई असते...
---------------------
------ योगेशु (ताटाखालचे मांजर) :X
----------------------------------
--- कानडाऊ योगेशु (जोरु का गुलाम) :O)
8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8} 8}
वाचन
11925
प्रतिक्रिया
0