दिवाळी किल्ला - किल्ले सिंधुदुर्ग !!

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
20 Oct 2009 - 10:47 am

दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष.

काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला.
==============================================================

==============================================================

============================================================

===============================================================

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

20 Oct 2009 - 10:50 am | सायली पानसे

छान आहे किल्ला. लहान पणी आम्ही पण करायचो ... पण इत्का छान नाहि जमायचा..:-)

संजय अभ्यंकर's picture

20 Oct 2009 - 10:53 am | संजय अभ्यंकर

मानलं लहानग्यांना!
मोठेपणी कोणी कलाकार वा आर्किटेक्ट होतील असे वाटते.

आता पासुन चित्रकलेच्या परिक्षांची तयारी करवा.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण's picture

20 Oct 2009 - 11:35 am | मदनबाण

मस्त फोटो...
किल्ल्यांच्या स्पर्धेचे प्रमाण सुद्धा हल्ली वाढते आहे... :)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=166...

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=166...

(मराठी मावळा)
मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

गणपा's picture

20 Oct 2009 - 3:11 pm | गणपा

मस्त..

बाकरवडी's picture

20 Oct 2009 - 9:31 pm | बाकरवडी

मस्तच!!! छान आहे.

बाकी लपवलेल्या महाद्वारावर लिंबू-मिरची लावण्याचे प्रयोजन नाही कळाले ?

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अमोल केळकर's picture

21 Oct 2009 - 12:37 pm | अमोल केळकर

बहुतेक किल्ल्याला दृष्ट लागू नये म्हणून लिंबू- मिरची लावले असेल ;)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

संदीप चित्रे's picture

21 Oct 2009 - 2:16 am | संदीप चित्रे

हे किल्ले पाहून लहानपणी तयार केलेले किल्ले आठवले.
दोघांनाही धन्यवाद सांगा...

अमोल केळकर's picture

21 Oct 2009 - 8:58 am | अमोल केळकर

या मुलांनी केलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्यात फांदी फुटलेले नारळाचे झाड जे या किल्ल्याचे विशेष आहे ते झाड पण लावले आहे. त्याचा फोटो राहून गेला.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विसोबा खेचर's picture

21 Oct 2009 - 1:46 pm | विसोबा खेचर

हळवा झालो...!

आपला,
(बालपण हरवलेला) तात्या.