केला मी तर प्रारंभ पिण्या

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
16 Oct 2009 - 11:29 pm

(अनुवाद. कवी..भरत व्यास)

{माझ्या तात्याला दिवाळ सणाला स्मरून}

पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या ती बसली
एक कळी सहज फुलली
भ्रमराला ती घाबरली
फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे

मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरती प्रहार केला
देवा,देवा
जटील झाले जगायला

मदिरे कडूनी साथ मिळाली
शिकलो आता तुजविण जगण्या
केला मी तर प्रारंभ पिण्या

म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात वाटेना अभिलाषा
मरण्यात दिसेना दिशा

जीवन असते व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पित नसतो
शुद्ध हरपूनी दुःखी नसतो

लक्ष आमुचे होते शोधले
पण दैव आमुचे होते रुसले
मार्गी साथी गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी

अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या

श्रीकृष्ण सामंत

करुणकविता

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

16 Oct 2009 - 11:32 pm | मिसळभोक्ता

व्यास आणि तात्याची नावे लागोपाठच्या दोन ओळीत पाहून धस्स झाले.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2009 - 11:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))

टारझन's picture

17 Oct 2009 - 2:19 am | टारझन

=)) =)) =))

- काड्याराम करणे
----
माड्यांचा अभ्यास करण्यापेक्षा त्यावरील सुविधांचा लाभ घ्या, बोळा तुंबण्याची झंझट नको.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Oct 2009 - 8:27 am | बिपिन कार्यकर्ते

अनुवाद आणि वरचे तीन प्रतिसाद वाचून....

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

17 Oct 2009 - 8:33 am | दशानन

अनुवाद आणि वरचे तीन प्रतिसाद वाचून....

=))
=))
=))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अवलिया's picture

17 Oct 2009 - 11:02 am | अवलिया

असले धागे पाहुन

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चतुरंग's picture

17 Oct 2009 - 12:15 am | चतुरंग

आता व्यासांचा त्रिफळाचूर्णाने सत्कार!!


(१९१८ - १९८२)

()चतुरंग

विसोबा खेचर's picture

17 Oct 2009 - 12:17 am | विसोबा खेचर

आयला म्हातारा बघितलं तर लैच फार्मात आहे! :)

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2009 - 4:20 pm | प्रकाश घाटपांडे

प्रारंभ करायला लईच उशीर केला ब्वॊ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वरील कविता वाचल्यावर 'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली आणि मला आवडणारी एक गझल आठवली.....!

न समझो कि हम पी गये पीते-पीते
कि थोडासा हम जी गये पीते-पीते ||धृ||

हमें सीधी राहोंने रोका बहुत था
कदम लडखडाही गये पीते-पीते......१

नहीं देखे साकीने हमसे शराबी (सा़की=दारू ओतणारी बारबाला)
कि मयखानेमेंभी गये पीते-पीते.......२ (मयखाना=दारूचा गुत्ता)

किसीने जो पूछा कि क्यूँ पी रहे हो
तो हँसके कहा पी गये पीते-पीते.....३

नशा हो तो क्या खौफ मरनेका 'आदम', (खौफ=भय)
कि हम कब्रमेंभी गये पीते-पीते .....४ (कब्र=थडगं)
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!