केला मी तर प्रारंभ पिण्या
लेखनविषय:
काव्यरस
(अनुवाद. कवी..भरत व्यास)
{माझ्या तात्याला दिवाळ सणाला स्मरून}
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या
लाखो मधली एक छबी
नयनी माझ्या ती बसली
एक कळी सहज फुलली
भ्रमराला ती घाबरली
फुलले एक फुल प्रीतिचे
मिळाले सूर एक गीताचे
दैव आणीते रंग नवे
सूर सुटता गीत सरे
मध्य भोवरा तूच सोडीला
मम प्रीतिचा अनुबंध तोडीला
प्रेमावरती प्रहार केला
देवा,देवा
जटील झाले जगायला
मदिरे कडूनी साथ मिळाली
शिकलो आता तुजविण जगण्या
केला मी तर प्रारंभ पिण्या
म्हणती इतर का पितोस बरे
म्हणते मन का जगतोस बरे
जगण्यात वाटेना अभिलाषा
मरण्यात दिसेना दिशा
जीवन असते व्यथा इथे
सांग तयाला उपाय कुठे
प्रीत आठवूनी पित नसतो
शुद्ध हरपूनी दुःखी नसतो
लक्ष आमुचे होते शोधले
पण दैव आमुचे होते रुसले
मार्गी साथी गेली सोडूनी
हृदय तुटले ठोकर खाऊनी
अशाच नशेच्या ह्या धाग्याने
शिकलो आता हृदय शिवण्या
पाप म्हणा वा पुण्य म्हणा
केला मी तर प्रारंभ पिण्या
श्रीकृष्ण सामंत
वाचन
4170
प्रतिक्रिया
10