मध्यरात्र झाली होती.
वार बुधवार होता. सगळीकडे शुकशुकाट
एक मांजर तेवढ्यात आडवं गेलं. दोन पावलं मागे सरकलो.
आणि पुढे रस्ता चालू लागलो.
एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं
कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं.
कोणी तरी पेताड आपल्याच नादात गुणगुणत चाल्ला होता.
दीर्घ श्वास घेऊन जीव हातात घेऊन मी नाकासमोर रस्त्याने चालू लागलो.
चालता चालता मागुन आवाज आला.
''कुठं फिरु राह्यला बे भाड्या एवढ्या रात्री.''
कोणीच दिसत नव्हतं
मंग ह्यो आवाज कुठून आला.
दरदरुन घाम फुटला. पायानं वेग घेतला.
घशाला कोरड पडली.
''अरे मी विचारले, कुठे चाल्लाय़ भाऊ तुम्ही एवढ्या रात्री''
एक जाडजुड, गोरापान माणूस, पानाचा तोबरा तोंडात भरलेला.
''काय नाय कामावरुन घरी चाल्लो व्हतो,
तुम्ही कुठ चाल्लावं'' कसंबसं हिम्मत करुन इचारलं
तुमी आमी असं बोलल्यामुळे शिष्टाचार पाळल्याच्या आनंदानं
तो बाबा खुस झाला.
रात्रीच्या येळला कोणी पांगळ्या माणसाचाबी आधार वाटतो.
त्याला पाहुन जरशीक हिम्मत आली.
त्याच्याशी कणत्या इषयावर बोलावं काय सुदरणा.
तोच बोलला-
''कंटाळलोय या दुनियादारीला . तीच तीच विम्याची दलाली.
तेच तेच कन्वेंस करायचं. फक्त कष्टमर बदललेला.''
त्यानं खोलवर श्वास घेतला. आभाळात पाह्यलं. खिशात काय तरी चाचपलं
काडीच्या पेटीतून काडी काढली आन तो दात कोरता बोलू लागला.
''मराठी संकेतस्थळ काढलंय. पदरमोड काढून चालवतो.
चालेल तव्हर चालवू नाय तर बंद करुन टाकू''
''आस्सं कसं बोलता भाऊ, दोन लोक एकत्र आल्यावर
जरशीक भाजी मंडई होईनच. त्याचा काय इचार करायचा'' हिम्मत वाढल्यानं माहाबी बोलाचं जोर वाढला.
''मराठी माणसं एकत्र यायला पाहिजेन. दोन गोष्टी जिवाभावाच्या बोलले पाहिजे.
काय तरी चांगभलं लिहिलं पाहिजे. याच्यासाठी मरमर करतो. ” गंभीर होऊन त्यो बोलत व्हता.
''खरं बोलून राह्यले दादा तुमी''
''पर, कधी कधी लिहिणा-याचा पांचटपणा पाहून डोकं उठतं.
वाटतं सारं बंद करुन हिमालयात तपस्या करायला निघुन जावं”
त्याचा त्रागा खरा असीन काय म्हाहित नव्हतं.
पण बोलता-बोलता माहंबी घर जवळ आलं व्हतं
तरीबी जीभ रेटून बोललो.
''तुम्ही हाय कोण? ''
एवढ्या रात्री बी आभाळात गडगडाट व्हावा तसा त्यो हसला’
आन अंधारात गायब व्हता-व्हता म्हणला-
’व्यक्तीगत प्रश्न’ पास.....
प्रतिक्रिया
16 Oct 2009 - 12:59 pm | सहज
क्या बात है!!
हा कॉलेजकट्टा आहे बाबूराव. थोडा टीपी चालायचाच
हुकूमावरुन!!
सुतकी चेहरे करुन वरणभात खायला व त्याहुन भयानक चर्चा करायला अजुन कोणीतरी खिशाला खार लावून व्यवस्था केली आहे.
16 Oct 2009 - 2:56 pm | अवलिया
असेच म्हणतो :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
16 Oct 2009 - 6:18 pm | दशानन
असे म्हणतो.
16 Oct 2009 - 1:06 pm | ब्रिटिश टिंग्या
छान आहे!
अवांतर :
थोडासा बदल :
पण बोलता-बोलता माहंबी घर जवळ आलं व्हतं
तरीबी जीभ रेटून बोललो.
''तुम्ही हाय कोण? ''
एवढ्या रात्री बी आभाळात गडगडाट व्हावा तसा त्यो पाचकन थुकला’
आन अंधारात गायब व्हता-व्हता म्हणला-
’व्यक्तीगत प्रश्नाला फाट्यावर मारतो आपण’.....
16 Oct 2009 - 1:20 pm | धमाल मुलगा
भारीय..
च्यायला, पण बाबुराव तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला? नागपूरभेट वगैरे झाली होती काय इतक्यात?
बाकी, सहजरावांशी पुर्ण सहमत! :)
16 Oct 2009 - 1:59 pm | ब्रिटिश टिंग्या
>>तुमचा विठोबा एकदम वर्हाडीत कसा काय बोलायला लागला?
विठोबाच्या "आनंदावर विरजण" पडलेलं दिसतयं ;)
16 Oct 2009 - 1:06 pm | श्रावण मोडक
अपेक्षीत; ठीक!
16 Oct 2009 - 1:10 pm | प्रमोद देव
बाबुराव,लय झकास !
च्या मारी(खावा म्हन्तो) जब्री लिवलंय. :)
16 Oct 2009 - 1:11 pm | टारझन
नॉट ईम्प्रेसिव्ह :)
असो ,
पु.ले.शु.
-(स्पष्ट) टारझन
16 Oct 2009 - 2:30 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. विरजणकर्त्याची जागा चालवित आहात का? :)
चालूद्या चालूद्या. :)
(टारुष्रीचा मित्र)बिडीफुकता
16 Oct 2009 - 2:25 pm | सखाराम_गटणे™
मस्तच,
सुंदर
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
16 Oct 2009 - 2:28 pm | llपुण्याचे पेशवेll
हाहाहाहाहा.. बाबूराव जबर्या. एक नंबर.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
16 Oct 2009 - 6:11 pm | अन्वय
बाबुला आतमधी घ्या अन
अवलियाला बाहेर काढा ;)
16 Oct 2009 - 10:31 pm | मिसळभोक्ता
बाबुराव, लय भारी !
(पण, "ही आमची रखमाई, हिच्यावर आमचा लै जीव", हे वाक्य विसरलात वाटतं.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
17 Oct 2009 - 8:52 am | पक्या
छान.
17 Oct 2009 - 1:14 pm | विलास आंबेकर
अहो, बाबुराव,
तो नक्की विठोबाच होता नां? नाही, तो माणुस गोरागोमटा होता म्हणताय म्हणुन म्हटलं!
17 Oct 2009 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे
ज्यानी कोनी दगड मारला आसन त्याला बी असा कोनी दगड मारन आनी त्यो बी लंगडत चालत ईव्हळत असा शाप आम्ही देतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.